Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रध्दाला एक प्लेट भेळ, एक
श्रध्दाला एक प्लेट भेळ, एक प्लेट पाणीपुरी आणि एक प्लेट रगडा पॅटीस
"गैरोपे..." चांगलं होईल हे
"गैरोपे..." चांगलं होईल हे सुद्धा....पण हे थोडे तक्रारवजा आहे ना.... सौ.जिप्सी काहीसे "लडिवाळपणे' गाणे म्हणत आहेत असा सीन आहे. (जिप्सीही खुश होतो ते गाणे ऐकून)
श्रद्धा...."खत"....व्वॉव. खा
श्रद्धा...."खत"....व्वॉव. खा आता रगडून स्वप्नाकडून. एकापाठोपाठ एक चमचमीत प्लेटा !!
६७ मध्ये 'इस तरह' असेल का?
६७ मध्ये 'इस तरह' असेल का? त्यात सातारा बसेल कदाचित.
७१ : फ्रीजमधले लिंबू आणि दुध
७१ : फ्रीजमधले लिंबू आणि दुध एकमेकांच्या प्रेमात पडले. आपले मीलन झाले तर काय बहार येईल असे त्यांना वाटू लागले. आणि खरंच पनीर करण्यासाठी उकळत्या दुधात लिंबाचा रस टाकण्यात आला. आता ते दोघे कोणतं गाणं म्हणू लागतील?
७२. एका कापडाच्या मिल मध्ये
७२.
एका कापडाच्या मिल मध्ये दोन युनियन असतात. बरीच वर्षे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात. पण मग एकदा त्या दोन्ही युनियनचे लिडर एकत्र येण्याचे ठरवतात आणि एकत्रितपणे मॅनेजमेंटला भेटण्याचे ठरवतात. पुढे एकत्र नाही झाले तरी निदान एकत्र येण्याचा प्रयत्नही त्या मिलच्या इतिहासात एक माईलस्टोने मानला जाईल यात शंका नसतेच. तर मॅनेजमेंटला एकत्र भेटायला जाण्याआधी ते युनियन लीडर कोणतं गाणं म्हणतील?
मामी, हे उत्तर नाही. तेरे
मामी, हे उत्तर नाही.
तेरे अफसानों में मामी जी है झलक मेरे अफसानों की
दास्तानें हैं मिलती हुई अल्ला हम दोनों परवानोंकी
एकही शम्मा हो ना कहीं
अरे, जेवायला गेलो आणि तब्बल
अरे, जेवायला गेलो आणि तब्बल २०च्या वर प्रतिसाद

धागा खरंच जोरात धावतोय
७२ : हम तुम दोनो जब मिल
७२ : हम तुम दोनो जब मिल जाएंगे
एक नया इतिहास बनाएंगे
द्रुपल मुळे उत्तर किती वेळ माझ्या मनातच अडकुन पडले
कोडं ७१: ये वक्त ना खो जाये,
कोडं ७१: ये वक्त ना खो जाये, बस आज ये हो जाये, मै तुम मे समा जाऊ, तुम मुझमे समा जाओ?
कोडं ७३: मीता आणि निमिषचं
कोडं ७३:
मीता आणि निमिषचं एकमेकांवर फार प्रेम. निमिषने यूएसला जाऊन नशीब आजमावायचं ठरवलं. काही वर्षांनी तो भारतात परतल्यावर त्यांचं लग्न झालं. एका आलिशान बंगल्यात ते राहू लागले. एके दिवशी रात्री त्यांच्या बंगल्यावर दरोडा पडला. दरोडेखोरांनी दोघा नवराबायकोंना दिवाणखान्याच्या भरभक्कम लाकडी दरवाजाला जखडून ठेवलं. आणि सगळं लुटून नेलं. बिचारा निमिष हताशपणे बघत राहिला पण मीता मात्र हसायला लागली. 'वेड लागलं काय तुला?' त्याने वैतागून विचारलं. 'मुळीच नाही. पण तुला आठवतंय, तू आधी भारतात होतास तेव्हा आणि मग यूएसमध्ये असताना मी तुला एक गाणं म्हणून चिडवायचे? त्या गाण्याची आठवण होतेय आज" निमिषला ते गाणं आठवलं आणि तोही हसायला लागला. कोणतं गाणं असेल ते? ओळखा पाहू.
मगाच पासून आठवण करून द्यायचा
मगाच पासून आठवण करून द्यायचा प्रयत्न करतोय पण द्रुपाल आडवा येतोय
कोडं ६९ :
एकदा हत्तीने आपला सगळा कळप घेऊन सिंहावर चाल करण्यासाठी सरळ त्याच्या गुहेशीस ठाण मांडल. पण चतुर सिंहाने मात्र गनिमीकाव्याने त्याला फाडल.
हे गाण मराठी आहे पण चित्रपटातील नाही. याचा गीतकार माहीत नाही तसेच कुणाच्या आवाजात रीकॉर्ड तसेच नेटवरही असण्याची शक्यता कमीच.
कुणी ओळखलच तर मला ते पुर्ण गाण हवाय.
ह्या द्रुपालाला 'द्वारपाल'
ह्या द्रुपालाला 'द्वारपाल' म्हणायला हवं. नेहमी आडवा येतो.
७२ : हम तुम दोनो जब मिल
७२ : हम तुम दोनो जब मिल जाएंगे
एक नया इतिहास बनाएंगे
द्रुपल मुळे उत्तर किती वेळ माझ्या मनातच अडकुन पडले
>>>>> बरोब्बरे भरत. अॅक्च्युअली तुमचं कोडं वाचुनच मला हे सुचलं. अपनी शम्मा एक है या नही?
स्वप्ना नाही. मामी. शम्मा अलग
स्वप्ना नाही.
मामी. शम्मा अलग अलग है
भरत, हे एक गाणं आहे, बहुतेक ३
भरत, हे एक गाणं आहे, बहुतेक ३ देवियातलं
उफ्फ कितनी थंडी है ये रुत
सुलगे है तनहाई मेरी
सन सन सन जलता है बदन
कांपे है अंगडाई मेरी
पण तुमच्या कोड्यात तनहाई नाहिये
७१: आओ मिल जाए हम सुगंध और
७१:
आओ मिल जाए हम सुगंध और सुमन की तरह
७१ : फ्रीजमधले लिंबू आणि दुध
७१ : फ्रीजमधले लिंबू आणि दुध एकमेकांच्या प्रेमात पडले. आपले मीलन झाले तर काय बहार येईल असे त्यांना वाटू लागले. आणि खरंच पनीर करण्यासाठी उकळत्या दुधात लिंबाचा रस टाकण्यात आला. आता ते दोघे कोणतं गाणं म्हणू लागतील?
उत्तर : एक मैं और एक तू
दोनो मिले इस तरह
और जो तन मन में हो रहा है
वो तो होना ही था.
अगदीच आचरट आहे नाही? पण पनीर बनताना दुधाची अशीच अवस्था होत असेल.
जिप्सीची सातार्या ट्रीप पण बाकी आहे ना अजून?
स्वप्ना, काही क्लु?
कोक्र. ६९ : सातारा क्ल्यू
कोक्र. ६९ :
सातारा क्ल्यू :
गाणे टांगाघोड्यातील आहे.....हिर्विन हिर्व्या च्या मागे लागलीया...!!
("द्रुपलरावा"नी टोल नाक्यावर अडवले होते गेले दोन तास...)
कोक्र. ६९ : होले होले साजना
कोक्र. ६९ : होले होले साजना धीरे धीरे बालमा..........?
ग्रेट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट
ग्रेट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट स्निग्धा.....आता स्वप्नाला नाही तर तुलाच १ डझनभर सातारी कंदी पेढे.....जिप्सीकडून...त्याच्याकडे स्टॉक आहे....!
कोडे क्र>६९ :
काल एक उत्तर बरोबर आल्यामुळे स्वप्नाने जिप्सीकडे १०० सातारी कंदी पेढ्याची मागणी केली....ते आणण्यासाठी जिप्सीने सातार्याकडे लागलीच धाव घेतली. त्यांची लगबग पाहून सौ.जिप्सी कोणते गाणे म्हणतील ? (जिप्सी 'बाय डीफॉल्ट' मॅरीड आहेत असे गृहीत धरलेले आहे.)
उत्तर
ज़रा हौले-हौले चलो मोरे साजना
हम भी पीछे हैं तुम्हारे
कैसी भीगी-भीगी रुत है सुहानी,
कैसे प्यारे नज़ारे
भरत, गाणं बोटीवरचं आहे एव्हढा
भरत, गाणं बोटीवरचं आहे एव्हढा एकच क्लू देऊ शकते मी.
स्वप्ना, बोटीतलं गाणं
स्वप्ना, बोटीतलं गाणं म्हटल्यावर मला हेच आठवलं..
हॉल (दिवाणखाना शब्दावरून) कैसा है जनाब का..
आधीच्या सगळ्या चाट डिशांसाठी थँक्यू.
प्रतिक टांगाघोड्यातील
प्रतिक
टांगाघोड्यातील आहे.....हिर्विन हिर्व्या च्या मागे लागलीया म्हटल्यावर मी पण हेच गाणे देणार होतो पण द्रूपाल आला.
तुझ्या गाण्याचा आणि कोड्याचा संदर्भ कळाला नाही
गुगु, त्या कंदी पेढ्यांवर माझ
गुगु, त्या कंदी पेढ्यांवर माझ नावं असणार लिहीलेल म्हणुन व्दारपालाने तुम्हाला अडवलं.
>>आधीच्या सगळ्या चाट
>>आधीच्या सगळ्या चाट डिशांसाठी थँक्यू.
थॅन्क्स कशासाठी? यू डिझर्व्ह्ड इट
पण आत्ताचं उत्तर मात्र चुकलं हं.
कोडं ७३:
मीता आणि निमिषचं एकमेकांवर फार प्रेम. निमिषने यूएसला जाऊन नशीब आजमावायचं ठरवलं. काही वर्षांनी तो भारतात परतल्यावर त्यांचं लग्न झालं. एका आलिशान बंगल्यात ते राहू लागले. एके दिवशी रात्री त्यांच्या बंगल्यावर दरोडा पडला. दरोडेखोरांनी दोघा नवराबायकोंना दिवाणखान्याच्या भरभक्कम लाकडी दरवाजाला जखडून ठेवलं. आणि सगळं लुटून नेलं. बिचारा निमिष हताशपणे बघत राहिला पण मीता मात्र हसायला लागली. 'वेड लागलं काय तुला?' त्याने वैतागून विचारलं. 'मुळीच नाही. पण तुला आठवतंय, तू आधी भारतात होतास तेव्हा आणि मग यूएसमध्ये असताना मी तुला एक गाणं म्हणून चिडवायचे? त्या गाण्याची आठवण होतेय आज" निमिषला ते गाणं आठवलं आणि तोही हसायला लागला. कोणतं गाणं असेल ते? ओळखा पाहू.
उत्तरः
चाहे रहो दूर, चाहे रहो पास, सुन लो मगर इक बात
एक डोरसे बंधोगे सनम किसी दिन हमारे साथ.
बोटीवर ही-मॅन धर्मेन्द्र आणि तनुजा गातात.
अर्थात हे कडवं धर्मेन्द्रचं आहे. तेव्हढं माफ करा.
"...तुझ्या गाण्याचा आणि
"...तुझ्या गाण्याचा आणि कोड्याचा संदर्भ कळाला नाही..."
~ म्हणजे मला असे म्हणायचे होते की, 'जिप्सी' पेढे आणण्यासाठी सातार्याला लगबगीने घोडागाडी काढून चालले आहेत, ते पाहून सौ.जिप्सीही त्यांच्यासमवेत जाण्यासाठी (शर्मिला टाईप) मागे, त्याना न सांगता, बसल्या आहेत, व पुणे-सातारा मार्गावर मग ते गाणे जिप्सीच्या कानी घालत आहेत.
"...बोटीवर ही-मॅन धर्मेन्द्र
"...बोटीवर ही-मॅन धर्मेन्द्र आणि तनुजा गातात. .."
~~ आणि मी दुसरीकडे हृतिक रोशन आणि अमिशा पटेल यांच्या 'कहो ना प्यार है" मधील बोटीत ते गाणे शोधत होतो.
डोर हा क्लु होता का? मी आपला
डोर हा क्लु होता का? मी आपला दरवाजा बघत होतो
आत्ता सहज चेक केलं.....एक
आत्ता सहज चेक केलं.....एक आठवड्यात आपण जवळजवळ ७०० पोस्ट्स टाकल्या आहेत
आणि ७३ कोडी. म्हणजे एका कोड्याला सरासरी ९-१० पोस्ट्स....
होय भरत, डोर (डोअर) हाच क्लू होता.
Pages