Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सांसो से नही, कदमोंसे नही,
सांसो से नही, कदमोंसे नही, मुहोबत से चलती है दुनिया
असलीच कोडी येउ देत. यात खरी मजा आहे
धन्यवाद केके.
धन्यवाद केके.
सुप्रभात लोक्स कोडं ६७
सुप्रभात लोक्स
कोडं ६७ :
अनिल कपूर, जुही चावला, मेहमूद, पद्मिनी, आमिर, माधूरी, श्रीदेवी, राजेश खन्ना, गोविंदा, शिल्पा, राज कपूर आणि सायरा बानो एकत्र येऊन कुठले गाणे म्हणतील?
भरतजी ६६ वाचल्याबरोबर थोडा है
भरतजी ६६ वाचल्याबरोबर
थोडा है थोडे की जरुरत है हेच डोक्यात आलं!
<<ओर्थोपेडिशियन पेशन्टला
<<ओर्थोपेडिशियन पेशन्टला सर्व्हायकल झालाय हे कळाल्यावर कुठले गाणे म्हणेल?<<
रेव्यु .. हे 'कमरीया लचके रे... ' टाईप आहे का?
६७ : अंदाज मेरा मस्ताना मांगे
६७ : अंदाज मेरा मस्ताना
मांगे दिल का नजराना
जरा सोच के आंख मिलाना
हो जाए न तू दीवाना?
अनिल कपूर जुही चावला : अंदाज, मेहमूद पद्मिनी : मस्ताना, अमीर माधुरी : दिल
राजेश खन्ना श्रीदेवी - नजराना, राज कपूर सायरा बानो - दीवाना.
शिल्पा गोविंदा :?????
शिल्पा गोविंदा :आंखे
शिल्पा गोविंदा :आंखे
कोडं ६७ : आल्याड दोंगुर
कोडं ६७ :
आल्याड दोंगुर पल्याड डोंगूर मदीच ख्वॉल ख्वॉल दरी...
गेली सांगून द्यानेस्वरी न माणसा परास मेंढरं बरी..
सह्हीये भरत तुला मिडियम साईज
सह्हीये भरत
तुला मिडियम साईज डबल चीज बर्स्ट पिझ्झा 
शिल्पा गोविंदा =आंख = आंखे
)
(इतना तो चलता है ना
कोडं ६७ :
अनिल कपूर, जुही चावला, मेहमूद, पद्मिनी, आमिर, माधूरी, श्रीदेवी, राजेश खन्ना, गोविंदा, शिल्पा, राज कपूर आणि सायरा बानो एकत्र येऊन कुठले गाणे म्हणतील?
उत्तर:
अंदाज (अनिल कपूर, जुही चावला) मेरा मस्ताना (मेहमूद, पद्मिनी)
मांगे दिल (आमिर, माधूरी,) का नजराना (श्रीदेवी, राजेश खन्ना)
जरा सोच के आंख (=आंखे,गोविंदा, शिल्पा,) मिलाना
हो जाए न तू दीवाना (राज कपूर आणि सायरा बानो)
वा जिप्स्या, मस्त कोडी
वा जिप्स्या, मस्त कोडी घालतोयस रे. पीएचडी केलयस की काय?
वा जिप्स्या, मस्त कोडी
वा जिप्स्या, मस्त कोडी घालतोयस रे. पीएचडी केलयस की काय?>>>>>>धन्स मामे
पीएचडी केलं नाही, पण अजुन काही महिने या बाफवर राहिलो तर आपोआपच होऊन जाईल 
कोडं ६८ : एकदा राजकुमार,
कोडं ६८ :
एकदा राजकुमार, भारतभूषण, प्रदीपकुमार असे तीघे एका गाण्याच्या कार्यक्रमाला जातात. तिथे तिघांनाही गाण्याची हुक्की येते आणि ते सरळ स्टेजवर जाऊन एकत्र गाणं म्हणतात. आश्चर्य असे कि प्रेक्षकांनाही त्यांचे गाणे चिक्कार आवडते. ते अगदी मंत्रमुग्ध होऊन गाणं ऐकतात. माहौल एकदम खासं होतो. त्यांच गाण संपल्यावर त्यांना पाहुन प्रेक्षक कुठले गाणे म्हणतील?
कोडं ६९ : एकदा हत्तीने आपला
कोडं ६९ :
एकदा हत्तीने आपला सगळा कळप घेऊन सिंहावर चाल करण्यासाठी सरळ त्याच्या गुहेशीस ठाण मांडल. पण चतुर सिंहाने मात्र गनिमीकाव्याने त्याला फाडल.
हे गाण मराठी आहे पण चित्रपटातील नाही. याचा गीतकार माहीत नाही तसेच कुणाच्या आवाजात रीकॉर्ड तसेच नेटवरही असण्याची शक्यता कमीच.
कुणी ओळखलच तर मला ते पुर्ण गाण हवाय.
६८> जिप्स्या, पत्थर भी गाना
६८>
जिप्स्या, पत्थर भी गाना गाते है टाईपचं की काय?
तर मग हे असेलः
सांसो की तार पर, धडकन की ताल पर
दिल को पुकारता, रंग भरे प्यार का
गीत गाया पत्थरों ने ......
कोडं ६८ : एकदा राजकुमार,
कोडं ६८ :
एकदा राजकुमार, भारतभूषण, प्रदीपकुमार असे तीघे एका गाण्याच्या कार्यक्रमाला जातात. तिथे तिघांनाही गाण्याची हुक्की येते आणि ते सरळ स्टेजवर जाऊन एकत्र गाणं म्हणतात. आश्चर्य असे कि प्रेक्षकांनाही त्यांचे गाणे चिक्कार आवडते. ते अगदी मंत्रमुग्ध होऊन गाणं ऐकतात. माहौल एकदम खासं होतो. त्यांच गाण संपल्यावर त्यांना पाहुन प्रेक्षक कुठले गाणे म्हणतील?
अनहोनी को होनी कर दे होनी को अनहोनी
एक जगह जब जमा हो तिनो
बाप रे ! सकाळपासून अगदी ७०
बाप रे ! सकाळपासून अगदी ७० च्या आकड्यापर्यंत कोडी आली ?? इतकी धमाल (विशेषतः "अंदाज मेरा मस्ताना..." मस्तच) झाली असेल याची कल्पनाच आली नाही.
चला एक माझ्याकडूनही (पण थोडे सोप्पे आहे...)
कोडे क्र.६९
काल एक उत्तर बरोबर आल्यामुळे स्वप्नाने जिप्सीकडे १०० सातारी कंदी पेढ्याची मागणी केली....ते आणण्यासाठी जिप्सीने सातार्याकडे लागलीच धाव घेतली. त्यांची लगबग पाहून सौ.जिप्सी कोणते गाणे म्हणतील ? (जिप्सी 'बाय डीफॉल्ट' मॅरीड आहेत असे गृहीत धरलेले आहे.)
मामी, बरोब्बर . तुम्हाला १०
मामी, बरोब्बर :-). तुम्हाला १० पैकी १० गरमागरम अळुवड्या
गुणेश, हे हि गाणं चालल असतं मन मामीने सांगितलेले गाणे मनात होते. (मामीकडुन २-३ अळुवड्या घे :-))
कोडं ६८ :
एकदा राजकुमार, भारतभूषण, प्रदीपकुमार असे तीघे एका गाण्याच्या कार्यक्रमाला जातात. तिथे तिघांनाही गाण्याची हुक्की येते आणि ते सरळ स्टेजवर जाऊन एकत्र गाणं म्हणतात. आश्चर्य असे कि प्रेक्षकांनाही त्यांचे गाणे चिक्कार आवडते. ते अगदी मंत्रमुग्ध होऊन गाणं ऐकतात. माहौल एकदम खासं होतो. त्यांच गाण संपल्यावर त्यांना पाहुन प्रेक्षक कुठले गाणे म्हणतील?
उत्तर :
सांसो की तार पर, धडकन की ताल पर
दिल को पुकारता, रंग भरे प्यार का
गीत गाया पत्थरों ने ......
जिप्सी मला शिल्पा म्हटल्यावर
जिप्सी मला शिल्पा म्हटल्यावर राज कुंद्राची शिल्पाच आठवली. शिरोडकर बाई विस्मृतीत गेल्या.
कोडं ६६: चाहिये थोडा प्यार,
कोडं ६६: चाहिये थोडा प्यार, थोडा प्यार चाहिये? पण ह्यात ते पल्लवी जोशी स्टाइलमध्ये आधीच्या स्पर्धकाला निरोप आणि नवीन स्पर्धकाचे स्वागत जमत नाहिये
>>जिप्सी 'बाय डीफॉल्ट' मॅरीड आहेत असे गृहीत धरलेले आहे
बाय डीफॉल्ट मॅरीड? प्रतीक, न्यायदेवतासुध्दा गुन्हा शाबित होईपर्यंत निरपराध मानते रे
सॉल्लीड धावतोय धागा. आता वाचते एकेक
कोडे क्र.६९: सातार्यावरून
कोडे क्र.६९: सातार्यावरून मला एकच गाणं माहित आहे - बुगडी माझी सांडली ग
कोडं ७०: 'आबा, ओ आबा, त्या
कोडं ७०:
'आबा, ओ आबा, त्या सुभान्याने सुफलाची पोती पाठवलीत." अभयने ओरडून वडिलांना वर्दी दिली.
"पाठवली का? बरं झालं रे, अगदी वेळेत पाठवलीन गड्याने आठवणीने. मला तर वाटलं विसरला असेल. हे बघ, असं कर. त्याचे आभार मानायला एक फोन कर त्याला" त्याचे बाबा म्हणाले.
अभयला हिंदी गाण्यांचं फार वेड. त्याने सुभान्याचे आभार गाण्यातून कसे मानले असतील?
जिप्स्या, छान कोडी टाकतो आहेस
जिप्स्या, छान कोडी टाकतो आहेस रे. पण ते बाय डीफॉल्ट वगैरे ऐकून घेऊ नकोस. एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाक.
मी जरा बिझी आहे, म्हणून काही दिवस जरा वर्दळ कमी आहे माझी इथली. पण रात्री घरी सगळे वाचून काढतो.
स्वप्ना....गाणे हिंदी
स्वप्ना....गाणे हिंदी आहे....! आणि जिप्सीची "जयश्री" सातार्याला चाललेली नाही, खुद्द भटकबहादूर जिप्सोबा चालल्येत !
प्रतीक, गैरोंपे करम अपनोपे
प्रतीक, गैरोंपे करम अपनोपे सितम नाहिये ना रे?
स्वप्ना.... सुभानरावासाठी हे
स्वप्ना....
सुभानरावासाठी हे गाणे होईल ?
"सुभान अल्लाह हसीं चेहरा ये मस्ताना अदाएँ
खुदा महफूज़ रखे हर बला से हर बला से..."
कोडं ७०: 'आबा, ओ आबा, त्या
कोडं ७०:
'आबा, ओ आबा, त्या सुभान्याने सुफलाची पोती पाठवलीत." अभयने ओरडून वडिलांना वर्दी दिली.
"पाठवली का? बरं झालं रे, अगदी वेळेत पाठवलीन गड्याने आठवणीने. मला तर वाटलं विसरला असेल. हे बघ, असं कर. त्याचे आभार मानायला एक फोन कर त्याला" त्याचे बाबा म्हणाले.
अभयला हिंदी गाण्यांचं फार वेड. त्याने सुभान्याचे आभार गाण्यातून कसे मानले असतील?
>>>>
आपका खत मिला, आपका शुक्रिया...
प्रतीक नाही श्रध्दा, राईट यू
प्रतीक नाही
श्रध्दा, राईट यू आर 
कोडं ७०:
'आबा, ओ आबा, त्या सुभान्याने सुफलाची पोती पाठवलीत." अभयने ओरडून वडिलांना वर्दी दिली.
"पाठवली का? बरं झालं रे, अगदी वेळेत पाठवलीन गड्याने आठवणीने. मला तर वाटलं विसरला असेल. हे बघ, असं कर. त्याचे आभार मानायला एक फोन कर त्याला" त्याचे बाबा म्हणाले.
अभयला हिंदी गाण्यांचं फार वेड. त्याने सुभान्याचे आभार गाण्यातून कसे मानले असतील?
उत्तरः आपका खत मिला, आपका शुक्रिया, आपने याद मुझको किया, शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया
स्वप्ना बरोबर आहे की. माझ्या
स्वप्ना बरोबर आहे की. माझ्या चीझ बर्स्ट मीडियम पिझ्झातला अर्धा तुला. मीच काय म्हणून शिल्पा शेट्टी सोडून शिल्पा शिरोडकरची साइझ घेऊ?
६६ : नारदमुनी पृथ्वीचा फेरफटका मारून इंद्रदेवाच्या दरबारी रुजू झाले, त्यांच्या `भूलोकी काय विशेष' या पृच्छेच्या उत्तरार्थ वदले, की `सांप्रत महाराष्ट्र देशी सकळ जन सारेगमप नामक गायन स्पर्धेत मग्न आहेत'. नारदांनी केलेले वर्णन ऐकून इंद्रदेवांनाही स्वर्गात अशीच स्पर्धा घ्यायची इच्छा झाली. स्पर्धकांची कमतरता नव्हतीच. पण परीक्षक आणि सूत्रसंचालक या जबाबदार्या स्वीकारण्यास कोणी आत्मा तयार होईना. शेवटी या दोन्ही पदी किशोरकुमार यांची नियुक्ती झाली. स्पर्धा सुरू झाली.
एकदा एका स्पर्धकाने छानसे प्रेमगीत म्हटल्यावर परीक्षकांना पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्टाइलमध्ये 'गाणं तू छान म्हटलंस, पण गाण्यात अजून थोSSSSडं प्रेम हवं होत' असं म्हणायचं होतं. मग सूत्रसंचालकाने पल्लवी जोशी स्टाइलमध्ये आधीच्या स्पर्धकाला निरोप आणि नवीन स्पर्धकाचे स्वागत करायचे होते.
किशोरकुमारनी ही दोन्ही कामे एकाच गाण्यात केली. कशी?
चाहिए थोडा प्यार थोडा प्यार चाहिए
जानेमन गुलबदन मेरी बात मानिए
अंतर्याच्या शेवटी बच्चा लोक /छोकरा लोक बजाओ टाली . आली की नाही पल्लवी जोशी?
स्वप्नासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत.
स्वप्ना, मस्त होतं कोडं.. असे
स्वप्ना, मस्त होतं कोडं.. असे शब्दखेळ असलेली कोडी सोडवायला मज्जा येतेय इथे.
बाकी स्वप्ना तुझ्याकडून बटाटेवडे, भजी वगैरे काही नाही का? 
>>अंतर्याच्या शेवटी बच्चा
>>अंतर्याच्या शेवटी बच्चा लोक /छोकरा लोक बजाओ टाली . आली की नाही पल्लवी जोशी?
थॅन्क्स फॉर द पिझ्झा भरत! याहू!!!!
ओहो, हे नाही लक्षात आलं माझ्या
६५.ओर्थोपेडिशियन पेशन्टला सर्व्हायकल झालाय हे कळाल्यावर कुठले गाणे म्हणेल?
हे काहीतरी 'मान गयी' असे शब्द असलेलं गाणं असणार. पण मला एकच गाणं माहित आहे 'मान गयी, मै तो जान गयी, कोई बनाये बहाने' असं काहीतरी, ह्याला बाकीचं जुळत नाहिये
Pages