..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी आहे ?

मग :

"नंबर फिफ्टी फोर, द हाऊस इन द बॅम्बु डोर
बांबुचे घर, बांबुचे दार, बांबुची जमीन, पिवळी शार..."

हेच असेल ना?

बरसात कि रात मधेच, आशा आणि सुधा मल्होत्रा नी गायलेल्या आणखी दोन कव्वाल्या आहेत.

जी चाहता है चूम लू आणि निगाह नाझ.. या दोन्ही फार ऐकण्यातल्या नाहीत. पण खुप सुंदर आहेत.

http://ww.smashits.com/barsaat-ki-raat/songs-7809.html इथे ऐकता येतील.

प्रतिक.. एकदम बरोबर

नंबर ५४, द हाउस विथ द बँबु डोअर

आज सकाळि गप्पा-टप्पा मध्ये लागलेले. तेव्हाच सिचुएशनचा विचार करु लागले Happy

साधना...

तुझे हेच का ते पेन्डिंग कोडे ?

हिरो शहरातला रुबाबदार तरुण तर हिरवीन गाव की शर्मिली गोरी. दोघे कसे काय प्रेमात पडतात देवास ठाऊक. असेच एकदा भेटल्यावर हिरविन लाजतमुरडत भावी आयुष्याची सुंदर स्वप्ने हिरोला ऐकवते. हिरोला ती एवढी आवडतात की ती परत परत ऐकण्याचा तो हट्ट धरतो.

मी 'चलो सजना...' टायपले होते...पण ते फिट बसत नाही असे दिसत्ये.

हिंटव ना थोडेसे !!

चलो सजना नाही.. हिर्विन स्वप्ने सांगतेय ना लाजत लाजत ते गद्यात.... मग हिरो गाण्यातुन हट्ट धरतो. तशी ती रिपिट टेलेकास्ट करते परत...

जिप्सी प्रतिकला त्याचा मेंदु जरा वापरुदे ना..... वस्तु वापरल्या नाहीत तर गंजतात. Happy

च्यामारी....मेंदू खरवडला आता, परत एकदा आणि 'वक्त' मधील 'मैं ने एक ख्वाबसा देखा है..." हे गद्य आणि पद्य रचना असलेले गाणे स्मरले. पण साधना तर म्हणत्ये तिची हिरवीन 'गाव की गौरी' आहे...आणि पडद्यावरील साधना तर चक्क डून स्कूलवाली चकचकीत दिसत्ये. मग हे नसणार.

अजुन एक हिंट - चित्रपटातली सगळी गाणी झक्कास पण चित्रपट अतिभिकार..

आणि हो- कोड्यात हिरविनीचे नाव आहे Happy

मी दोन वाजल्यानंतर पुण्याला जातेय. त्यामुळे इथे नसणार.. तोवर उत्तर कोणाला सुचले नाही तर जिप्स्याच्या मागे लागा. त्याला माहिताय...

हिंटीत 'शर्मिला' हे नाव दिसते, त्यामुळे तिचा एक अतिभिकार चित्रपट होता 'दिल और मुहब्बत' त्यातील खालील गाणे होईल का, कोड्याचे उत्तर :

"हाथ आया है जब से तेर हाथ में, आ गया है नया रन्ग जजबात में
मैं कहाँ हूँ मुझे ये ख़बर ही नहीं, तेरे कदमों पे ही गिर न जाऊँ कहीं..."

हिरो शहरातला रुबाबदार तरुण तर हिरवीन गाव की शर्मिली गोरी. दोघे कसे काय प्रेमात पडतात देवास ठाऊक. असेच एकदा भेटल्यावर हिरविन लाजतमुरडत भावी आयुष्याची सुंदर स्वप्ने हिरोला ऐकवते. हिरोला ती एवढी आवडतात की ती परत परत ऐकण्याचा तो हट्ट धरतो.

पलकों के पीछे से क्या तुमने कह डाला फिर से तो फर्माना
नैनों ने सपनों की महफिल सजायी है तुम भी जरूर आना

रुबाबदार हिरो- राकु क्र २? देवा वाचव.

वॉव्व.....अद्यापि १ महिना पूर्ण नाही, तोपर्यंत २००० चा ट्प्पा....

कॉन्ग्रॅट्स मामी !

(मला खात्री आहे, अ‍ॅडमिन आणि मंडळी देखील या धाग्याच्या यशाने अचंबित झाले असल्याने त्यांची कात्री इकडे आलेली नाही.)

मामे, वाद न घालण्याच्या तूझ्या स्वभावाचे हे फलित आहे. तूझा कंपू वाढो.. ( मे युअर ट्राईब इन्क्रिज !)

देवण्णा आणि शर्मिला चा ये गुलिस्तॉं हमारा, नावाचा पण चित्रपट आला होता. त्यात, "गोरी गोरी गाँवकी गोरी रे " असे गाणे होते. मी त्याचा विचार करत होतो.
हा सिनेमा अयशस्वी ठरल्याने, हि जोडी परत दिसली नाही कधी एकत्र.

प्रतिक, दिनेशदा धन्यवाद.
दिनेशदा, मी वाद घालत नाही हे तुमचे मत 'योग्य' ठिकाणी वाचून दाखवणेत एईल, याची खात्री बाळगा. त्यावर काय उत्तर एईल हे ही मी सांगू शकते. Proud

मामे जायचंच कशाला त्या ठिकाणी ? आता तर बीबीच्या नावावरूनच मला कळतं, कि इथे वाद होणार आहे ते !!

आता मी पार्टीसाठी श्रीखंड करण्यासाठी दही बांधून ठेवलं, पाणी गेल्यावर ते कमी पडेलसे वाटले म्हणून आणखी दही बांधून त्यावर ठेवले. लवकर पाणी निघून जावे म्हणून त्यावर काय वजन ठेवायचे याचा विचार करत होतो. माझा छोटा मित्र बाजूलाच खेळत होता. त्याचे खेळणेच ठेवावेसे वाटले वजन म्हणून.. तर मी कुठले गाणे म्हणेन ?

मामी अभिनंदन २००० च्या टप्प्यासाठी !
( मधेच बंद करा बंद करा म्हणून चर्चा झाली ..मला वाटलं खरच !! Proud )

खरे तर मीच सुरवात केली होती, कि हा बंद करुन दुसरा सुरु करावा. कारणे दोन होती. एकतर अ‍ॅडमिन कडूनच तशी सूचना झाली असती, आणि दुसरे खरे वाटू नये इतके खेळीमेळीचे वातावरण इथे कायम राहिले.
कधी कधी सत्यही स्वप्नापेक्षा सुंदर असू शकते !

Happy

Pages