Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एका तरुणाच्या मते
एका तरुणाच्या मते त्याच्याकरता 'पु' हे अक्षर फारच भाग्यशाली ठरायचे. त्याचे नाव पुष्कर, बायकोचे पुष्पा. शिवाय तो 'पु' नावाने सुरू होणार्या विशिष्ट शहरातील असल्याने 'पु'ढचे काही वेगळे सांगायची गरज नाहीच. तर असा तो, चारचाकी घेण्याकरता एका दुकानात जातो. तेथे अनेक मॉडेल्स असतात पण त्यातलं एक मॉडेल जे 'पु' नावानं असतं त्यातली शेवटची गाडी नुकतीच विकली गेली असते. पुष्करला तीच गाडी हवी असते म्हणून तो डिलरला सांगतो की प्लीज त्या गिर्हाईकाला समजाव आणि मला ती गाडी मिळवून दे. डिलर त्याला तसा प्रयत्न करण्याचे आश्वासन देऊन परत पाठवतो. दुसर्या दिवशी डिलर पुष्करला फोन करून सांगतो की, त्याला ती गाडी मिळतेय. येऊन घेऊन जावी. हे तो कसं सांगेल? (हुश्श!)
हो गं साधना...माझ्याही मनात
हो गं साधना...माझ्याही मनात पहिल्यांदा हेच गाणं आलेलं!
नफरत की लाठी तोडो
लालच का खंजर फेको
जिद के पीछे मत दौडो
मेरे देशप्रेमियो
आपस में प्रेम करो देशप्रेमियों!
स्वप्ना, नाही साधना, बरोबर
स्वप्ना, नाही

साधना, बरोबर
मायबोलीच्या एका बाफवर काही कारणाने वाद चालु असतो. तेथे सगळेच हमरीतुमरीवर आलेले असतात. कुणीही कुणाचे ऐकण्याच्या स्थितीत नसतो. ई-हाणामारी चालु असते. आपलंच म्हणणे बरोबर आहे याच हट्टाला सगळे चिकटुन असतात. शेवटी (नेहमीप्रमाणे ) अॅडमिनवर तो धागा बंद करण्याची वेळ येते. अशावेळी त्या बाफवरच्या मायबोलीकरांना उद्देशुन अॅडमिन कोणते गाणे म्हणतील?
(रच्याकने, जेंव्हा कोणत्याही बाफवर वाद होतो तेंव्हा हेच गाणे मला प्रतिसादात लिहावेसे वाटते. )>>>>>
नफरत कि लाठी तोडो, जिद के पीछे मत दौडो
मेरे देशप्रेमीयो आपसमें प्रेम करो, देशप्रेमीयो
जिप्स्या, आम्ही शाळेत एक गाणे
जिप्स्या, आम्ही शाळेत एक गाणे म्हणायचो.
मारामारी मत करो, गांधीजीकी याद करो..
आता हे गाणे कुणालाच आवडणार नाही, ते सोड.
आणि आपल्या बाफल्या उद्देशुन
आणि आपल्या बाफल्या उद्देशुन तु कुठले गाणे गाशील???
मामी, तुम पु'कार' लो,
मामी, तुम पु'कार' लो, तुम्हारा इंतजार है?
दुसर्या दिवशी डिलर पुष्करला
दुसर्या दिवशी डिलर पुष्करला फोन करून सांगतो की, त्याला ती गाडी मिळतेय. येऊन घेऊन जावी. हे तो कसं सांगेल? (हुश्श!)
<<<<
तुम 'पु'कार लो, तुम्हारा इंतजार है...
माझं कोडं: बॅन्क लुटायला दोन
माझं कोडं:
बॅन्क लुटायला दोन चोर आलेत ही बातमी पोलिसांना लागते. त्यावेळी पोलिस स्टेशनमध्ये एकच गाडी आणि २ पोलिस असतात. तरी न शोभेलश्या तत्परतेने ते बॅन्केत हजर होतात आणि प्राणांची शर्थ करून चोरांना पकडतात. त्यांचे मास्कस काढतात तेव्हा एक चोर आणि एक चोरीण (उर्फ चोरनी) आहे हे पोलिसांना कळतं. पोलिसांकडे एकच हतकडी असते. त्यामुळे दोघा चोरांना एकत्र अडकवून पोलिसांच्या गाडीत बसवण्यात येतं आणि पोलिस बाकीची कारवाई पूर्ण करायला बॅन्केत आत जातात. चोर आणि चोरीण एक्मेकांना ओळखत नसतात पण योगायोगाने एकाच वेळी बॅन्क लुटायला आलेले असतात. गाडीत बसल्याबसल्या ओळख आणि त्याचं रुपांतर प्रेमात होतं. तर ते दोघे एकमेकांना काय म्हणतील?
उत्तरः तेरेमेरे बीचमे कैसा है ये बंधन अंजाना
आता मला वाटतं प्रतीकचं
आता मला वाटतं प्रतीकचं रामदेवबाबाचं कोडं आणि भरतच्या जुळ्या कोड्यांपैकी दुसरं कोडं एव्हढीच पेंडिंग आहेत, बरोबर?
आणि आपल्या बाफल्या उद्देशुन
आणि आपल्या बाफल्या उद्देशुन तु कुठले गाणे गाशील???>>>>>
आओ झूमे गाए, मिलके धूम मचाए
आणखी एकः सलमान खानने शेवटी
आणखी एकः
सलमान खानने शेवटी लग्न करायचं ठरवलं. त्याचा निकाह संपन्न झाल्याचं ऐकताच सोमी अली, ऐश्वर्या आणि कॅटरिना सलमानला कोणत्या गाण्यातून शुभेच्छा देतील?
मायबोलीच्या भद्र
मायबोलीच्या भद्र महिलावर्गाकडून सातत्याने होत असलेला अपमान पाहून सर्वश्री राजकुमार, प्रदीपकुमार, भारत भूषण, विश्वजीत, जॉय मुखर्जी ही गरीब बिचारी मंडळी त्याना उद्देश्यून कोणते गाणे म्हणतील....?
मायबोलीच्या भद्र
मायबोलीच्या भद्र महिलावर्गाकडून सातत्याने होत असलेला अपमान पाहून सर्वश्री राजकुमार, प्रदीपकुमार, भारत भूषण, विश्वजीत, जॉय मुखर्जी ही गरीब बिचारी मंडळी त्याना उद्देश्यून कोणते गाणे म्हणतील....?
इतनी शक्ती हमे दे ए दाता
मन का विश्वास कम होने दे ना
हिंदी सुधारून घेणे
प्रतीक, दिलको देखो चेहेरा ना
प्रतीक, दिलको देखो चेहेरा ना देखो?
सोमी आणि अॅशचे माहीत नाही,
सोमी आणि अॅशचे माहीत नाही, पण कॅटरिना हे गाणे नक्की म्हणेल :
"जाइये आप कहाँ जायेंगे, ये नज़र लौट के फिर आयेगी
दूर तक आप के पीछे पीछे, मेरी आवाज़ चली आयेगी"
(अरेरे ! इतकं सुंदर गाणे सलम्यावर मी घातले.....ओपींचा आत्मा चरफडत असेल !!)
@ अनिल ~ तुम्ही निवडलेले गाणे
@ अनिल ~ तुम्ही निवडलेले गाणे 'प्रार्थना' रूपातील आहे.....माझ्या मनीचे गाणे 'याचना' काईंड आहे.
@ स्वप्ना : ईल्ला.....तुझ्या गाण्यात अपील आहे...."याचना" नाही. ट्राय !!!
प्रतिक, ------ इधर एक नजर....
प्रतिक, ------ इधर एक नजर.... अस गाण आहे ते का? मला आत्ता शब्द आठवत नाहीत.
अरे जियो !!!! मामी आता पार्टी
अरे जियो !!!! मामी आता पार्टी हवीच
आणि दिनेश स्वप्ना प्रतिक राम भरत जिप्सी साधना तुम्हालाही शुभेच्छा!!!!
खुप खुष झालो दोन दिवसानी इतके पोस्ट पाहून
धन्यवाद गुगु. स्वप्ना,
धन्यवाद गुगु.
स्वप्ना, श्रध्दा बरोबर. डोकं चालवून लिहायला जेवढा वेळ लागला त्याच्या एक-सहस्त्रांश वेळात सोडवलत.
एका तरुणाच्या मते त्याच्याकरता 'पु' हे अक्षर फारच भाग्यशाली ठरायचे. त्याचे नाव पुष्कर, बायकोचे पुष्पा. शिवाय तो 'पु' नावाने सुरू होणार्या विशिष्ट शहरातील असल्याने 'पु'ढचे काही वेगळे सांगायची गरज नाहीच. तर असा तो, चारचाकी घेण्याकरता एका दुकानात जातो. तेथे अनेक मॉडेल्स असतात पण त्यातलं एक मॉडेल जे 'पु' नावानं असतं त्यातली शेवटची गाडी नुकतीच विकली गेली असते. पुष्करला तीच गाडी हवी असते म्हणून तो डिलरला सांगतो की प्लीज त्या गिर्हाईकाला समजाव आणि मला ती गाडी मिळवून दे. डिलर त्याला तसा प्रयत्न करण्याचे आश्वासन देऊन परत पाठवतो. दुसर्या दिवशी डिलर पुष्करला फोन करून सांगतो की, त्याला ती गाडी मिळतेय. येऊन घेऊन जावी. हे तो कसं सांगेल?
>>>>> तुम 'पु'कार लो, तुम्हारा इंतजार है!
स्निग्धा...."इधर एक नजर..."
स्निग्धा...."इधर एक नजर..." मी ऐकलेले नाही....पण ते नाही. {प्रीती झिंटाचे एक "इधर से देखो उधर से देखो, देखो चाहें जिधर से देखो" अशा अर्थाचे एक पुसटसे आठवते....प्रीतीमुळे काही काळ लक्षात राहिले होते... चित्रपट फालतूच असणार, नावही आठवत नाही.}
ज्यांना ज्यांना पार्टी हवी
ज्यांना ज्यांना पार्टी हवी आहे त्यांनी दिनेशदांच्या ई-मेजवानी ला भेट द्यावी.
प्रतिक तुम्हाला माहीत नसेल अस
प्रतिक तुम्हाला माहीत नसेल अस वाटत नाही. मला शब्द आठवले की सांगते.
प्रतीक नाही. अरे, कोणीतरी
प्रतीक नाही. अरे, कोणीतरी त्या सलमानसाठी गाणं सुचवा की ऐश, सोमी अली आणि कॅट तिघींना.
मामी, मी भारतात येईपर्यंत
मामी, मी भारतात येईपर्यंत ५००० चा टप्पा ओलांडणार. आणि खरेच देईन मी पार्टी !
इथल्या लोकांची जी भन्नाट डोकी चालताहेत ना, ते बघून मला अचंबित व्हायला होतेय !!
स्वप्ना, हे गाणे नक्किच नसणार. पण प्रेमपत्र नावाच्या एका सिनेमात, शशि कपूर ला उद्देशून तीन नायिका (बहुतेक साधना, नंदा आणि बेला बोस ) हे गाणे म्हणतात.
नींद उड जाये तेरी, चैन से सोनेवाले
ये दुवा मांगते है, नैन ये रोनेवाले...
जाम पकाव चित्रपट होता तो.
दिनेशदा, हेच गाणे लिहायला आलो
दिनेशदा, हेच गाणे लिहायला आलो होतो मी पण
दिनेशदा, जिप्सी
दिनेशदा, जिप्सी नाही.
कोडं:
सलमान खानने शेवटी लग्न करायचं ठरवलं. त्याचा निकाह संपन्न झाल्याचं ऐकताच सोमी अली, ऐश्वर्या आणि कॅटरिना सलमानला कोणत्या गाण्यातून शुभेच्छा देतील?
उत्तरः
हमसे ना सही गैरोसे सही, तुम्हे दिलका लगाना आ तो गया
दुनियामे किसीके हो तो गये, तुम्हे प्यार निभाना आ तो गया
स्वप्ना....कुठल्या पोतडीतून
स्वप्ना....कुठल्या पोतडीतून काढलेस हे गाणे ? कुणाचे आहे ?
माझ्या कोड्याचे उत्तर देऊन टाकतो...
मायबोलीच्या भद्र महिलावर्गाकडून सातत्याने होत असलेला अपमान पाहून सर्वश्री राजकुमार, प्रदीपकुमार, भारत भूषण, विश्वजीत, जॉय मुखर्जी ही गरीब बिचारी मंडळी त्याना उद्देश्यून कोणते गाणे म्हणतील....?
"पल भर के लिये कोई हमें प्यार कर ले, झूठा ही सही
दो दिन के लिये कोई इक़रार कर ले, झूठा ही सही...."
~ तर करा खोटं खोटं का होईना.... प्रेम त्या पाच पांडवांवर !!!
क. ही वि.
(अरेरे ! इतकं सुंदर गाणे
(अरेरे ! इतकं सुंदर गाणे सलम्यावर मी घातले.....ओपींचा आत्मा चरफडत असेल !!)
गाणे पडद्यावर आले तेव्हा ओपींचा आत्मा त्यांच्या शरिरातच होता. तेव्हाही तो चरफडलाच असणार विश्वजीतला पाहुन.
स्वप्ना....कुठल्या पोतडीतून
स्वप्ना....कुठल्या पोतडीतून काढलेस हे गाणे ? कुणाचे आहे ?
मी ऐकलेय हे गाणे. पडद्यावर कोण आहे ते विसरलेय. पुजा भट्टच्या बाबाचा पिक्चर असावा बहुतेक.
प्रतिक त्याच गाण्यात ओळ आहे
प्रतिक त्याच गाण्यात ओळ आहे ना ही ?
माना के तूम हसीनो मे हसी हो. (चुक असणार)
अपनीभी सुरत बुरी तो नही है !!
Pages