..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाबाचे अनुयायी लोकाना जागृत करायला कोणत गाणं म्हणतील?....

दोन आठवतात (पण ही अक्षरी नाही म्हणणार ही दोन्हीही)

१. "सुनो सुनो ए दुनियावालो बापूजी की अमर कहाणी !" (इथे बापूजी ऐवजी 'बाबा')

तर

२. "दुनिया में हम आये हैं तो जीना ही पडेग
जीवन है अगर ज़हर तो पीना ही पड़ेगा...

गिर गिर के मुसीबत में सम्भलते ही रहेंगे
जल जाएं मगर आग पे चलते ही रहेंगे
गम जिसने दिये हैं बही गम दूर करेगा..."

~ दुसर्‍यातील कडवे एकदम फिट बसते त्या 'रामलीला' पुकार ला (पाहू या !)

फेडररच्या लैलेची अवस्था पाहून राफेल म्हणेल....

"रोना कभी नहीं रोना चाहे टूट जाए कोई खिलौना
सोना चुपके से सोना चाहे टूट जाए कोई सपना सलोना"

गेले २-३ दिवस नेटच्या संपर्कात येऊ शकलो नाही.
या धाग्याची २००० चा टप्पा ओलांडून पुढची घोडदौड सुरू असल्याचं पाहून खूप आनंद झाला.
मामी आणि धाग्यावरील सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन.

अरे ग्रेटच! सगळ्यांना पेढे, जिलेब्या, लाडू Happy मामी, आता केक कापाच

>>लिबास नावाच्या अप्रकाशित चित्रपटातील गाण.

हा पिक्चर अप्रकाशित आहे हे माहित नव्हतं. बरंच आहे म्हणा. त्यातल्या गाण्यांची पडद्यावर वाट लावलेली बघायला लागली असती कदाचित. ह्यातली गाणी माझा जीव की प्राण आहेत. सिली हवा, खामोशसा अफसाना आणि फिर किसी शाखने.....

>>काल फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये फेडररची हालत बघून त्याची मैत्रीण मान खाली घालून बसली होती.

ती सौ फेडरर आणि फेडरर के बच्चोंकी मा आहे आता Happy

>>काल फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये फेडररची हालत बघून त्याची मैत्रीण मान खाली घालून बसली होती. तिला उद्देशून राफा कोणतं गाणं म्हणेल?

ना मुंह छुपाके जियो, न सर झुकाके जियो?

भरतचे पोस्ट वाचून, राकुचा हिर रांझा आठवला, त्यात कुणी साधे संवाद म्हणतच नाही, सगळे काव्यातच बोलतात !

भरतचे पोस्ट वाचून, राकुचा हिर रांझा आठवला, त्यात कुणी साधे संवाद म्हणतच नाही, सगळे काव्यातच बोलतात !

हो, तीच खासियत होती त्या चित्रपटाची.. पण ते काव्यमय संवाद म्हणायला राजकुमार नी प्रिया राजवंश हे ठोकळे निव्डले हे आपले दुर्दैव. मी अजुन तो चित्रपट पाहिला नाहीय, पहिल्यांचा त्याचा एक तुकडा पाहिला तेव्हा हे लोक असे का बोलताहेत ते कळले नाही, नंतर कुठेतरी वाचले त्याच्या संवादाबद्दल. चित्रपट एकदातरी पाहणार हे नक्कीच.

हरे रामा! ह्या पिक्चरमधली गाणी पहायच्या आधी हीर-रांझा ही प्रसिध्द प्रेमजोडी आहे हे माहित होतं म्हणून बरं नाहीतर हीर-रांझा हे दोघं वेड्याच्या इस्पितळातून पळून आलेले वेडे असावेत अशी खात्रीच झाली असती. आता रांझाला टुणटूण उड्या मारताना बघून हीर वेडी झाली की तिला वेड्यासारखं हसताना पाहून रांझा 'होश खो बैठा' हा संशोधनाचा विषय आहे. Happy मामी, सॉरी. हे विषयांतर आहे, पण रहावलं नाही.

"हाथ आया है जब से तेर हाथ में, आ गया है नया रन्ग जजबात में
मैं कहाँ हूँ मुझे ये ख़बर ही नहीं, तेरे कदमों पे ही गिर न जाऊँ कहीं..."

माझ्या अत्यंत आवडत्या १० गाण्यात हे गाणे आहे. Happy

माझं कोडं:

बॅन्क लुटायला दोन चोर आलेत ही बातमी पोलिसांना लागते. त्यावेळी पोलिस स्टेशनमध्ये एकच गाडी आणि २ पोलिस असतात. तरी न शोभेलश्या तत्परतेने ते बॅन्केत हजर होतात आणि प्राणांची शर्थ करून चोरांना पकडतात. त्यांचे मास्कस काढतात तेव्हा एक चोर आणि एक चोरीण (उर्फ चोरनी) आहे हे पोलिसांना कळतं. पोलिसांकडे एकच हतकडी असते. त्यामुळे दोघा चोरांना एकत्र अडकवून पोलिसांच्या गाडीत बसवण्यात येतं आणि पोलिस बाकीची कारवाई पूर्ण करायला बॅन्केत आत जातात. चोर आणि चोरीण एक्मेकांना ओळखत नसतात पण योगायोगाने एकाच वेळी बॅन्क लुटायला आलेले असतात. गाडीत बसल्याबसल्या ओळख आणि त्याचं रुपांतर प्रेमात होतं. तर ते दोघे एकमेकांना काय म्हणतील?

स्वप्ना, डोळ्यांवर दगड ठेऊन हा चित्रपट बघायला पाहिजे तो फक्त संवादांसाठी. Happy
आता गुगलत होते त्यात ह्या चित्रपटाला फोटोग्राफीचे फिल्मफेअर मिळालेले असे वाचले.

हे गाणे ओळखा Happy

मायबोलीच्या एका बाफवर काही कारणाने वाद चालु असतो. तेथे सगळेच हमरीतुमरीवर आलेले असतात. कुणीही कुणाचे ऐकण्याच्या स्थितीत नसतो. ई-हाणामारी चालु असते. आपलंच म्हणणे बरोबर आहे याच हट्टाला सगळे चिकटुन असतात. शेवटी (नेहमीप्रमाणे ;-)) अ‍ॅडमिनवर तो धागा बंद करण्याची वेळ येते. अशावेळी त्या बाफवरच्या मायबोलीकरांना उद्देशुन अ‍ॅडमिन कोणते गाणे म्हणतील?

(अ‍ॅडमिन, क्षमस्व :-))

(रच्याकने, जेंव्हा कोणत्याही बाफवर वाद होतो तेंव्हा हेच गाणे मला प्रतिसादात लिहावेसे वाटते. :फिदी:)

काल फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये फेडररची हालत बघून त्याची मैत्रीण मान खाली घालून बसली होती. तिला उद्देशून राफा कोणतं गाणं म्हणेल?

स्वप्ना बरोब्बर . न मूंह छुपाके जियो आउर न सर झुकाके जियो
गमों का दौर भी आए तो मुस्कुराके जियो.
स्वप्ना, ती फेडररच्या मुलांची आई आहे, पण सौ झालीय का? तिला फेडररची पार्टनरच म्हणतात ना? अर्थात मला काय त्याचे:)

हे ओळखा बरं :

काल स्वप्नाने विचारलेले गाणे ओळखायचा प्रयत्न करून करून अगदी रडकुंडीला आलो. आता केव्हा एकदाची सकाळ होते आणि स्वप्ना त्या कोड्याचे उत्तर देते असे झाले होते हे मी गाण्यात कसे सांगेन?(इथे मला तात्पुरता स्त्रीपार्ट करावा लागेल)

मायबोलीच्या एका बाफवर काही कारणाने वाद चालु असतो. तेथे सगळेच हमरीतुमरीवर आलेले असतात. कुणीही कुणाचे ऐकण्याच्या स्थितीत नसतो. ई-हाणामारी चालु असते. आपलंच म्हणणे बरोबर आहे याच हट्टाला सगळे चिकटुन असतात. शेवटी (नेहमीप्रमाणे ) अ‍ॅडमिनवर तो धागा बंद करण्याची वेळ येते. अशावेळी त्या बाफवरच्या मायबोलीकरांना उद्देशुन अ‍ॅडमिन कोणते गाणे म्हणतील?

>>> अरे देवा, तुझी मुले अशी का रे भांडतात?

जामु आणि साबा या जोडीचे एक अशा धर्तीचे गाणे आहे :

"हाथों में हाथ होंठों पे अफ़साने प्यार के
मंज़िल को अपनी चल दिए दीवाने प्यार के "

~ पण स्वप्ना जुन्या गाण्यांचा गल्लीत सहसा डोकावत नसल्याने हे असणारही नाही.

@ साधना....

"हाथ आया है जब से तेर हाथ में, आ गया है नया रन्ग जजबात में
मैं कहाँ हूँ मुझे ये ख़बर ही नहीं, तेरे कदमों पे ही गिर न जाऊँ कहीं..."

याच्या कौतुकाबद्दल तुला १० मोदक.

>>जामु आणि साबा

हा काय प्रकार आहे? हे गाणं मी ऐकलेलं नाहिये.

@ बाबा रामदेव, साथी हाथ बढाना, एक अकेला थक जाये तो मिलकर बोझ उठाना?

मायबोलीच्या एका बाफवर काही कारणाने वाद चालु असतो. तेथे सगळेच हमरीतुमरीवर आलेले असतात. कुणीही कुणाचे ऐकण्याच्या स्थितीत नसतो. ई-हाणामारी चालु असते. आपलंच म्हणणे बरोबर आहे याच हट्टाला सगळे चिकटुन असतात. शेवटी (नेहमीप्रमाणे ) अ‍ॅडमिनवर तो धागा बंद करण्याची वेळ येते. अशावेळी त्या बाफवरच्या मायबोलीकरांना उद्देशुन अ‍ॅडमिन कोणते गाणे म्हणतील?

>>> अरे देवा, तुझी मुले अशी का रे भांडतात?>>>>>>मामी, पद्यात हवंय गद्यात नको Proud

मामी, स्वप्ना>>>>नाही Happy

जिप्स्या हे एक गाणंच आहे. पण सिनेमातलं नाहीये.>>>>>मला माहितच नव्हते. (किती ते घोर अज्ञान :()

जिप्स्या, मलाही हेच गाणे सुचले होते. तु कधी ऐकले नाहीस??? कम्म्मालाअय बा..

अमिताभच्या देशप्रेमी मध्ये गाणे होते जिप्स्याच्या सिचुयेशनला सुटेबल. पण मला आता नीटसे आठवत नाहीय..

नफरत की लाठी तोडो...
.....
मेरे देशप्रेमीयो, आपस मे प्रेम करो देशप्रेमीयो..

Pages