Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? 
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जरा कठीण आहे....
जरा कठीण आहे....
पेंटच्या दुकानात जाऊन तो रोज
पेंटच्या दुकानात जाऊन तो रोज एका शेडची चौकशी करायचा. पण पेंट काही विकत घेत नव्हता. त्याच दुकानात एक अतिशय सुंदर मुलगी कामाला होती. हा तिच्याचकडे पहात बसायचा. दुकानदाराच्या हे लक्षात आल्यावर त्याने त्याला आत बोलावलं. त्याच्याकडच्या संगणकारव कलर व्हील दाखवलं आणि जी शेड बघायची ती ( काय ते एकदाची ) ती बघून घे असं सुनावलं..
ती तरूणी गालातल्या गालात हसत या मजनूसाठी मनात कुठलं गाणं म्हणत असेल ?
किर्न्या... हुस्न के लाखों
किर्न्या...
हुस्न के लाखों रंग
कौन सा रंग देSSSsखोSSSssगे
आग है ये बदन
कौन सा अंग देSSSsखोSSssगे....
चावट
बरोब्बर
बरोब्बर
अरे पण तो दुकानदार काय
अरे पण तो दुकानदार काय म्हणाला असेल गाणं ?
मामी (आणि या धाग्यावरच्या
मामी (आणि या धाग्यावरच्या सगळ्या माबोकरांचे), अभिनंदन २००० चा टप्पा ओलांडल्याबद्दल
अरे पण तो दुकानदार काय
अरे पण तो दुकानदार काय म्हणाला असेल गाणं ?
चातक ने ओळखलेल्या गाण्याशी अगदी जवळचा संबंध आहे या गाण्याचा.
दुकानदार हे म्हणेल गाणे ? इस
दुकानदार हे म्हणेल गाणे ?
इस रंग बदलती दुनिया में, इनसान की नीयत ठीक नहीं
अरे पण तो दुकानदार काय
अरे पण तो दुकानदार काय म्हणाला असेल गाणं ?
====
इस रंग बदलती दुनिया मे इन्सान की नियत ठीक नही
निकला ना करो तुम साज धज कर इमान की नियत ठीक नही
अक्षरी....अगं दोन सेकंदाच्या
अक्षरी....अगं दोन सेकंदाच्या फरकाने आपण दोघांनी हेच गाणे दिले....मज्जाच !
ग्रेट माईंड वगैरे वगैरे...
ग्रेट माईंड वगैरे वगैरे...;)
ग्रेट माईंड.....! तू त्या
ग्रेट माईंड.....!
तू त्या व्याख्येत फिट बसशील, पण माझ्या कॉलेजची झाडून सारी प्रोफेसर मंडळी "मी आणि ग्रेट" या संकल्पनेवर खो-खो करून हसतील.
बघ म्हंटल ना ग्रेट माईंड?
बघ म्हंटल ना ग्रेट माईंड? माझे प्रोफेसर पण ग्रेट सोडा तिला माईंड तरी आहे का असं पहिले विचारतील.
रीअली ? दॅट्स क्वाएट अमेझिंग
रीअली ? दॅट्स क्वाएट अमेझिंग देन !
विद्यापीठातील सार्या प्रोफेसर मंडळींची हीच टेन्डन्सी असते जणू....जसे काय त्यांना पटावर फक्त आद्य शंकराचार्य, विवेकानंद, मादाम कामा, रमाबाई रानडे आणि साने गुरुजी मुशीतीलच विद्यार्थी हवेत.
जरा कुठे मी चळवळीत भाग घेतला की, "झालं, आता तुझं कल्याण. तू आता काय सुटतोस फायनल मधून....!"
वैतागच होते ते युनि.एज्युकेशन !
अक्षरीसमवेत झालेल्या या
अक्षरीसमवेत झालेल्या या संवादावरूनच पदवी निकालानंतरचा एक प्रसंग आठवला; तो इथे कोड्यात गुंफतो.
प्रा.श्रीमती सुहासिनी राजाज्ञा याना नक्की खात्री होती की त्यांचा विद्यार्थी जरी काहीसा अनियमित (प्रसंगी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारा) असला तरी त्यांचा त्याच्या अॅबिलिटीवर विश्वास होता. तथापि हेड ऑफ द डीपार्टमेन्ट आणि अन्य सीनिअर लेक्चरर्ससमोर त्या त्यालाही शक्य त्या कठोर भाषेत "झोडपत". पण पदवी परीक्षेत ज्यावेळी त्याला Distinction Marks मिळाले, त्यावेळी त्याना झालेला आनंद कॅमेर्यात टिपण्यासारखा होता....मिठाई घेता घेता त्यांनी त्याचे सर्वासमोर बेधडक कौतुक केले. जर त्यांना आपला आनंद गाऊन व्यक्त करायचा असेल तर मॅडम कोणते गाणे गातील ?
(क्ल्यू : अगदीच गुरूकुल पद्धतीतील गाणे नाही.....)
.....
.....
वो तो है अलबेला, हजारो मे
वो तो है अलबेला, हजारो मे अकेला
सदा तुमने ऐब देखा
हुनर को ना देखा
ग्रेट माईंड केमिस्ट्री वर्क्स
ग्रेट माईंड केमिस्ट्री वर्क्स अगेन !
खरे तर तो किस्सा कोड्यात गुंफताना माझ्यासमोर शाहरुखच्या वरील गाण्याबरोबर राकेश रोशन अभिनीत 'तुमसे बढकर दुनियामे' हे कामचोरचेही गाणे आले होते, पण शेवटी हे दुसरे काहीसे प्रेमप्रसंगाला शोभणारे असल्याने 'वो तो है अलबेला.."च ठेवण्याचे नक्की केले....
....आणि ते तसे होण्याच्या अगोदरच अक्षरीने सिक्सर ठोकलीच.
थॅन्क्स !
जिप्स्या धन्यवाद. बहोत खुब
जिप्स्या धन्यवाद.
बहोत खुब अक्षरी.
अरे पण तो दुकानदार काय
अरे पण तो दुकानदार काय म्हणाला असेल गाणं ?
क्ल्यू होता..
चातक ने ओळखलेल्या गाण्याशी अगदी जवळचा संबंध आहे या गाण्याचा..
गाणं असं
ये पब्लिक है ये सब जानती है..ये पब्लिक है !!
( मैने प्यार किया मधल्या अंताक्षरीत हुस्न के नंतर लगेच हे गाणं आहे. आणि सिच्युएशनमधे सांगित;ल्याप्रमाणे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं म्हणून .)
आता मी पार्टीसाठी श्रीखंड
आता मी पार्टीसाठी श्रीखंड करण्यासाठी दही बांधून ठेवलं, पाणी गेल्यावर ते कमी पडेलसे वाटले म्हणून आणखी दही बांधून त्यावर ठेवले. लवकर पाणी निघून जावे म्हणून त्यावर काय वजन ठेवायचे याचा विचार करत होतो. माझा छोटा मित्र बाजूलाच खेळत होता. त्याचे खेळणेच ठेवावेसे वाटले वजन म्हणून.. तर मी कुठले गाणे म्हणेन ?
उत्तर ;
चक्के पे चक्का, चक्के पे गाडी..
मस्त दिनेशदा.
मस्त दिनेशदा.
काल रामदेव बाबा आणि त्यांचे
काल रामदेव बाबा आणि त्यांचे अनुयायी झोपेत असताना त्यांच्या वर लाठी चार्ज झाला. बाबाच्या म्हणण्यानुसार तर त्यांना मारून टाकायचा पोलिसांचा मनसुबा होता. काही लोकांना आणीबाणीच्या दिवसांची आठवण झाली तर काहीना ब्रिटीश काळाची. अश्या वेळेस बाबाचे अनुयायी लोकाना जागृत करायला कोणत गाणं म्हणतील?
अपनी आजादी को हम हरगिज मिटा
अपनी आजादी को हम
हरगिज मिटा सकते नही
सर कटा सकते है लेकिन
सर झुका सकते नही..
अनिल माझ्या मनात हे गाणं
अनिल माझ्या मनात हे गाणं नव्हत
जागो सोनेवालो सुनो मेरी
जागो सोनेवालो सुनो मेरी कहानी......
नाही मामी. खरं तर खूप गाणे
नाही मामी.
खरं तर खूप गाणे ह्या सिचुएशन ला जुळतील पण माझ्या मनात हे गाणं नाहीये.
अक्षरी उषःकाल होता होता
अक्षरी
उषःकाल होता होता काळरात्र आली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली
काल फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये
काल फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये फेडररची हालत बघून त्याची मैत्रीण मान खाली घालून बसली होती. तिला उद्देशून राफा कोणतं गाणं म्हणेल?
काल स्वप्नाने विचारलेले गाणे
काल स्वप्नाने विचारलेले गाणे ओळखायचा प्रयत्न करून करून अगदी रडकुंडीला आलो. आता केव्हा एकदाची सकाळ होते आणि स्वप्ना त्या कोड्याचे उत्तर देते असे झाले होते हे मी गाण्यात कसे सांगेन?
Pages