..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश, चित्रपट मी पाहिला नाही पण हे गाणे छायागितात खुप वेळा पाहिलेय. सुंदर आहे गाणे. पण बहुतेक सगळ्या चित्रपटात बिचा-या शशीला एक हिरोईन मिळताना मारामार असाय्ची, यात एक्दम तिन-तिन् गळ्यात पडतत म्हणजे नवलच....

आणि आपल्या बाफल्या उद्देशुन तु कुठले गाणे गाशील???>>>>>
आओ झूमे गाए, मिलके धूम मचाए

येस जिप्सी अगदी १००० %.... Happy

प्रतीक, http://www.imdb.com/title/tt1010439/soundtrack चेका आता.

>>तर करा खोटं खोटं का होईना.... प्रेम त्या पाच पांडवांवर !!!

त्यापेक्षा मला विहिरीत ढकल. निदान सुखाने मरेन मी. Proud

चला आता आणखी एक कोडं....पुन्हा सलमानभाऊवर

आपल्या प्रेमपात्रांशी फारकत घेतली की त्यांची लुकअलाईक शोधण्याची सलमानभाऊंची खोड जुनीच. ऐशला उत्तर म्हणून स्नेहा उल्लल आली. कॅटरिनाला उत्तर म्हणून झरीन खान. पण एकदा मात्र सलमानभाऊंची खट्टी जिरली. किती शोधलं तरी त्यांना लुकअलाईक मिळेचना. हैराण होऊन काय बरं म्हणतील?

दिनेशदा....

माना तू सारे हसीनों से हसीं है, अपनी भी सूरत बुरी तो नहीं है
कभी तू भी, ओ कभी तू भी हमारा दीदार कर ले...

~ अशा त्या दोन ओळी आहेत....यातील 'दीदार' चा अर्थ डिक्शनरीत पाहिला होता.

@ अगं साधना....नसेल, चरफडला....! त्यावेळी जॉय आणि विश्वजीत गरम होतेच ना गल्ल्याच्या दृष्टीने, त्यामुळे बिचारे ओंकार प्रसाद तरी काय करतील ?

आपल्या प्रेमपात्रांशी फारकत घेतली की त्यांची लुकअलाईक शोधण्याची सलमानभाऊंची खोड जुनीच. ऐशला उत्तर म्हणून स्नेहा उल्लल आली. कॅटरिनाला उत्तर म्हणून झरीन खान. पण एकदा मात्र सलमानभाऊंची खट्टी जिरली. किती शोधलं तरी त्यांना लुकअलाईक मिळेचना. हैराण होऊन काय बरं म्हणतील?<<<<
स्वप्ना,
मुझे तेरे जैसी लडकी, मिल जाये तो, क्या बात हो...

ओये स्वप्ना.....बाई, तू कशाला विहीरीत उडी घेतेस ??? त्यापेक्षा ते पाचजण म्हणतील, 'प्रतीकभाऊ, आम्ही राहतो इथे वर, आरामात...!"

...आणि होय....कुठला काढलास हा "पिघलता आसमान" चित्रपट. अशा नावाचा शशी कपूरचा एक चित्रपट होता, हे तुझ्यामुळे आत्ता समजले मला.

>>कुठला काढलास हा "पिघलता आसमान" चित्रपट.
बस काय आता? मी पिक्चर काढला तर शशी कपूरला घेईन का? त्यात 'जॉन' असेल हिरो आणि मी हिरवीन Proud

स्वप्ना....लूकअलाईकचे जामु चे एक गाणे आहे, पण तू नकार देणारच...:

"तेरी सूरत से नहीं मिलती किसी की सूरत
हम जहाँ में तेरी तस्वीर लिए फिरते हैं..."

तू 'जानराव'ची हिरवीन ???....ती जेनेलिया येईल भांगडा करत आणि देईल तुला बारागडगड्याच्या विहिरीत ढकलून ! बस, तिथेच किंकाळ्या फोडत..."जान्या, जान्या !!!"

चला मी पण एक सुचवून बघतो.

सारे शहर मे आपसा कोई नही..

हे दिकु, लीना चंदावरकर ला उद्देशून म्हणाला होता, आणि तिच्याबाबतीत तरी ते खरे होते.

स्वप्ना, विहिर बांधून तयार आहे. मामींना पत्ता माहित आहे. जेनेलिया नाही आली तरी, शशि कपूरबद्दल अपशब्द काढल्याने, साधना पण तसे करण्याची शक्यता आहे.

.....साधना पण तसे करण्याची शक्यता आहे.

~ शशी कपूरसाठी साधना तसे करण्यास तयार असेल तर मीही यथाशक्ती स्वप्नाचा खातमा करण्यासाठी तिला हार्दीक म्हणतात तसले सहकार्य करण्यास तयार आहे,,,, अन तेही विनामोबदला.

दिनेशदा, नाही हो Sad प्रतीक, तुझं उत्तर मात्र बरोबर आहे. पण तू जॉनबरोबर जेनेलियाचं नाव का जोडतो आहेस बाबा? बालनांच्या विद्याला राग येईल हा. मग ती येईल 'आमी मोंजोलिका' करत आणि तुझी मुंडी उडवेल.

कोडं

आपल्या प्रेमपात्रांशी फारकत घेतली की त्यांची लुकअलाईक शोधण्याची सलमानभाऊंची खोड जुनीच. ऐशला उत्तर म्हणून स्नेहा उल्लल आली. कॅटरिनाला उत्तर म्हणून झरीन खान. पण एकदा मात्र सलमानभाऊंची खट्टी जिरली. किती शोधलं तरी त्यांना लुकअलाईक मिळेचना. हैराण होऊन काय बरं म्हणतील?

उत्तरः
तेरी सूरत से नहीं मिलती किसी की सूरत
हम जहाँ में तेरी तस्वीर लिए फिरते हैं

काल स्वप्नाने विचारलेले गाणे ओळखायचा प्रयत्न करून करून अगदी रडकुंडीला आलो. आता केव्हा एकदाची सकाळ होते आणि स्वप्ना त्या कोड्याचे उत्तर देते असे झाले होते हे मी गाण्यात कसे सांगेन?(इथे मला तात्पुरता स्त्रीपार्ट करावा लागेल)
हे इतके सोपे गाणे न ओळखल्याबद्दल काय शिक्षा देऊ?

उत्तर : रुलाके गया सपना मेरा
बैठी हूम कब हो सवेरा

>>हे इतके सोपे गाणे न ओळखल्याबद्दल काय शिक्षा देऊ?

मी उठबशा काढल्या इथे. मला शिक्षा नको प्लीज.

घरी जायला उशीर होतोय म्हणून मिताने गडबडीत लॉन्ड्रीतून न चेक करताच कपडे घेतले. घरी येऊन पहाते तो काय? तिचा लाडका रुमाल त्यात नव्हता. दुसर्‍या दिवशी गेली तणतणत. लॉन्ड्रीतला एक माणूस तिला येताना बघताच दुसर्‍याला म्हणाला "बघ, काल रुमाल बघितल्यावरच मी वैतागलो होतो की आज ह्या बयेच्या कटकटीला तोंड द्यावं लागणार म्हणून". हे तो गाण्यात कसं सुचवेल? सोप्पं आहे.

स्वप्ना चा नव्या गाण्यांचा स्टॉक जबरदस्त आहे. एकाच सिच्चेशनला आमचे जूने, आणि स्वप्नाचे नवे गाणे, असा पण खेळ खेळता येईल. पुर्वी विविधभारतीवर तब और अब, असा प्रोग्रॅम असायचा.

तुम्हाला किंग एडवर्ड आठवा माहीत असेलच. पण त्याने आपल्या प्रियतमेसोबत एक हिंदी गाणे म्हटले, चक्क एका अंतर्‍यासकट हे नसेल माहीत. ओळखा ते गाणं.

<<घरी जायला उशीर होतोय म्हणून मिताने गडबडीत लॉन्ड्रीतून न चेक करताच कपडे घेतले. घरी येऊन पहाते तो काय? तिचा लाडका रुमाल त्यात नव्हता. दुसर्‍या दिवशी गेली तणतणत. लॉन्ड्रीतला एक माणूस तिला येताना बघताच दुसर्‍याला म्हणाला "बघ, काल रुमाल बघितल्यावरच मी वैतागलो होतो की आज ह्या बयेच्या कटकटीला तोंड द्यावं लागणार म्हणून". हे तो गाण्यात कसं सुचवेल? सोप्पं आहे.<<

हाथोंमे आ गया जो कल रुमाल आपका

<<तुम्हाला किंग एडवर्ड आठवा माहीत असेलच. पण त्याने आपल्या प्रियतमेसोबत एक हिंदी गाणे म्हटले, चक्क एका अंतर्‍यासकट हे नसेल माहीत. ओळखा ते गाणं.<<

हे अराउंड द वर्ल्ड इन एट डॉलर का?

एका जोडप्याला विस्मरणाचा आजार झालेला असतो.. नवर्‍याची नोकरी फिरतीची असते.. तर बाहेरगावी जाताना ते दोघे कुठले गाणे म्हणतील...

राम, बायक : मुझे तुम याद रखना और मुझको याद आना तुम
नवरा धमकी देतो : मगर मैं लौट के आउंगा (तोवर इथे विबासं करू नकोस) ये मत भूल जाना तुम

मी_आर्या, बरोबर! Happy

घरी जायला उशीर होतोय म्हणून मिताने गडबडीत लॉन्ड्रीतून न चेक करताच कपडे घेतले. घरी येऊन पहाते तो काय? तिचा लाडका रुमाल त्यात नव्हता. दुसर्‍या दिवशी गेली तणतणत. लॉन्ड्रीतला एक माणूस तिला येताना बघताच दुसर्‍याला म्हणाला "बघ, काल रुमाल बघितल्यावरच मी वैतागलो होतो की आज ह्या बयेच्या कटकटीला तोंड द्यावं लागणार म्हणून". हे तो गाण्यात कसं सुचवेल? सोप्पं आहे.

उत्तरः हाथोंमे आ गया जो कल रुमाल आपका, बेचैन कर गया हमे खयाल आपका.

दिनेशदा, बाप रे! एव्हढी गाणी माहित नाहीत हो. Sad पण ह्या बाफवर खूप जुनी गाणी असतात कधीकधी म्हणून मी अश्या गाण्यांवर कोडी घालून वचपा काढते Proud

भरत, 'एक घर बनाऊंगा तेरे घरके सामने' मध्ये एक ओळ आहे 'उल्फतमे ताज छूटे येभी तुम्हे याद होगा'. पण हे मुखड्यात नाहिये. किंवा मग राहुल रॉय नावाच्या ठोकळ्याचं 'मै दुनिया भुला दूंगा तेरी चाहतमे'. समोर महिनोनमहिने खायला न मिळाल्याने खंगलेली अनू अगरवाल! यक्क!

भरत .. बरोबर.. Happy
महिनोनमहिने खायला न मिळाल्याने खंगलेली अनू अगरवाल! यक्क!>>> Lol स्वप्ना तीला तु किंग अंकल या शिनुम्यात पहा... Wink

<<समोर महिनोनमहिने खायला न मिळाल्याने खंगलेली अनू अगरवाल! यक्क!<< Rofl

खरच गं! दोघेही ठोकळेच होते तेव्हा! अन त्या राहुल रॉयची हेअर स्टाईल नि किडके दात्...इइइइइइ!

>>स्वप्ना तीला तु किंग अंकल या शिनुम्यात पहा...

राम, खलनायिका ह्या नावाचाही शिनुमा होता ना? Proud

अरेच्या...मी स्वप्नात तर नाही ना ? आज स्वप्नाने चक्क जॉय मुखर्जीच्या गाण्याला 'येस्स' म्हणून माझे उत्तर गौरविले !!!

"तेरी सूरत से नहीं मिलती किसी की सूरत
हम जहाँ में तेरी तस्वीर लिए फिरते हैं"

~ व्वा...आपुन खुश हुवा....आता तुला विहीरीत ढकलत नाही.

आर्या....तू रारॉ आणि अअ चा तो चित्रपट पूर्ण पाहिलास म्हणजे तुझ्या सहनशीलतेचे कौतुकच केले पाहिजे.

Pages