Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? 
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुल्हन वही जो पिया मन
दुल्हन वही जो पिया मन भाये>>>>>"खुशिया हि खुशिया हो दामन में जिसके" (येसुदास+हेमलता) हे गाणे यातलचं ना?
साधने, तुझ्या दुसर्या
साधने, तुझ्या दुसर्या कोड्याचं उत्तर:
किसी ना किसी से, कभी ना कभी, कही ना कही दिल लगाना पडेगा - कश्मीर की कली. (यात प्राणचा ट्रक त्याच्या गाडीपुढे असतो. पण त्याचं लक्षही नसतं त्या ट्रकाकडे. :-))
प्रतीक, 'पुकारता चला हूं मै'चं चित्रीकरण बघितलं तर गाणं तिने दिलेल्या सिच्युएशनमध्ये फिट बसत नाही, असं दिसेल.
प्रतीक हे गाणे नसणार पण तरीही
प्रतीक हे गाणे नसणार पण तरीही
संध्याकाळ झाली आहे...."तो" घरी आला आहे...पाहतो तर 'ती' घरात नाही. 'तो' इकडे तिकडे चौकशी करतो...पण कुठेच नाही. त्याची तिच्याविषयीची तगमग पाहून मग त्यांच्या शेजारचे जोडपेच 'तिच्या' शोधार्थ बाहेर पडतात....कुठले गाणे म्हणतील ?>>>>>
चंदा को ढुंढने सभी तारे निकल पडे
हे गाण 'तो' म्हणेल शेजारचे
हे गाण 'तो' म्हणेल शेजारचे नाही तरीही.......
तू कहां ये बता......माने ना मेरा दिल दिवाना....
१. श्रद्धा....मीही ते
१. श्रद्धा....मीही ते चित्रीकरण पाहिले आता. पण विश्वजीत आणि जॉय मुखर्जी आणि काही प्रमाणात शशी+शम्मी हेच सारखे सारखे काश्मिर आणि सिमल्याला पळत असत ना? आणि 'आशा पारेख'चे तर टेंडरच मंजूर झाले होते त्या स्थळांचे. म्हणून 'मेरे सनम' आठवला....बघू या, साधनाताई काय फटका मारतात ते !
२. जिप्सी ~ बिग नो !
३. स्निग्धा...."तो" म्हणत नाहीत....त्याच्यासाठी शेजारचे जोडपे म्हणते... शिवाय गाण्यात कोरसही आहेच. पडद्यावर कुणी गाईले आहे याची माहिती उपलब्ध नाही.
गाणे तसे अवघड आहे आठवायला...म्हणून हिंट देतो ~ त्या चित्रपटाचा निर्माता एक चरित्र अभिनेता म्हणून गाजलेला आहे....(ही माहितीही आत्ताच श्री.गुगलराव यांच्याकडून समजली)
प्रतीक, माझ्या डोक्यात आलं ते
प्रतीक, माझ्या डोक्यात आलं ते गाणं, पण मी हे नुस्तं ऐकलंय पाहिलं नाही. त्यामुळे त्यात हिरवीन आहे की नाही माहित नाही.
साधने, तुझ्या दुसर्या
साधने, तुझ्या दुसर्या कोड्याचं उत्तर:

किसी ना किसी से, कभी ना कभी, कही ना कही दिल लगाना पडेगा - कश्मीर की कली. (यात प्राणचा ट्रक त्याच्या गाडीपुढे असतो. पण त्याचं लक्षही नसतं त्या ट्रकाकडे. )
हे गाणे खरेतर फिटींग आहे. पण माझ्या डोक्यात 'पुकारता चला हु मै' हे होते त्यामुळे मार्क मिळणार प्रतिकला.
'पुकारता.......' मध्ये आशा सायकलवर आहे. मला निटसे आठवत नव्हते त्यामुळे तो गाडी उलटसुलट फिरवुन तिच्याभोवती गोंडा घोळतोय हे लक्षात आले नाही.
आणि 'आशा पारेख'चे तर टेंडरच मंजूर झाले होते त्या स्थळांचे. हो, पण क्युट दिसते हा इथे.
मीही उत्सुकता चाळविली म्हणून
मीही उत्सुकता चाळविली म्हणून त्या हिरविणीबद्दल गुगलले ! पण ईल्ला.... एकही शब्द नाही तिच्याबद्दल. फक्त तिच्या बापाच्या रेकॉर्डवरून कळले की तिने केवळ दोनच चित्रपट केले....त्यापैकी वरील सुंदर गाण्याचा एक....फार मधुर आहे गाणे, खरंच.
आता मी एक कोडं घालते
आता मी एक कोडं घालते हं....
सुहासराव तणतणत सोसायटीच्या ऑफिसमध्ये शिरतात. गेले २-३ महिने त्यांच्या बेडरूममध्ये पाण्याच्या गळतीमुळे सगळ्या भिंती खराब होत असतात. सेक्रेटरी त्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि म्हणतात "तुमच्या वरच्या मजल्यावर कोण रहातं?"
"पाटील"
"मग? त्यांना सांगितलंत का? त्यांच्या बाथरूममध्ये लिकेज असणार"
'तिथंच तर घोडं पेंड खातंय' हे सुहासराव गाण्यात कसं सांगतील?
"....त्यामुळे मार्क मिळणार
"....त्यामुळे मार्क मिळणार प्रतिकला. स्मित...."
~~ यिप्पी.....प्रसन्न झाली बाबा ही साधनाबाई एकदाची ! हुश्श...त्या विश्वजीतपेक्षा मीच दमलो त्या आशा पारेखच्या मागे जीप दामटून दामटून !!
प्रतीक, हे गाणं नसणार तरी खडा
प्रतीक, हे गाणं नसणार तरी खडा टाकून बघते....दो हंसोंका जोडा बिछड गयो रे?
मग बर्याच वर्षांनी तिचा
मग बर्याच वर्षांनी तिचा आवाजाला तो बाजारू आणि उठवळ म्हणाला
वर्षा भोसलेने आईबद्दलच्या लेखात ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय. आशा इंडस्ट्रीत आली ती संसार मोडुनच. त्यामुळे तिच्याबद्द्ल लोकांनी बरेच समज/गैरसमज करुन घेतले. तिला गाणी देतानाही भेदभाव केला. हिरविन गाणार लताच्या आवाजात आणि चित्रपटातली उठवळ बाई अका कॅबरे डान्स नी मुजरा डान्सर मात्र आशाच्या आवाजात तोंड उघडणार. (याचवेळी मराठी चित्रसृष्टीने मात्र तिच्या वैवाहिकस्थितीकडे अजिबात न पाहता उत्तमोत्तम अशी गाणी तिला दिली.) जवळजवळ १० वर्षे हा अन्याय तिने सोसला. आरडीशी लग्न केल्यावर मात्र तिला अचानक सगळ्यांनी आपल्या 'गुडबुक'मध्ये घेतले आणि मग नायिकाही तिच्या आवाजात तोंड उघडु लागल्या. आणि असल्या या डबल स्टंडर्डवाल्या चित्रसृष्टीमध्ये कित्येक वर्षे सम्राज्ञीचे पद भुषवणा-या लतावर मात्र लोक ती डबलस्टँडर्डची म्हणुन टीका करतात. लताला काय सम्राज्ञीपण आरामात लाल पायघड्या घालुन मिळाले नसणारच. तिलाही त्रास झाला असणारच आणि सम्राज्ञीपद मिळाल्यावर तिने त्याचा योग्य तो वचपाही काढला असणारच.
सुहासराव तणतणत सोसायटीच्या
सुहासराव तणतणत सोसायटीच्या ऑफिसमध्ये शिरतात. गेले २-३ महिने त्यांच्या बेडरूममध्ये पाण्याच्या गळतीमुळे सगळ्या भिंती खराब होत असतात. सेक्रेटरी त्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि म्हणतात "तुमच्या वरच्या मजल्यावर कोण रहातं?"
"पाटील"
"मग? त्यांना सांगितलंत का? त्यांच्या बाथरूममध्ये लिकेज असणार"
'तिथंच तर घोडं पेंड खातंय' हे सुहासराव गाण्यात कसं सांगतील?
उपरवाला जानकर अंजान है..
अपनी तो हर आह एक तुफान है...
स्वप्ना, बनाके क्यो बिगाडा रे
स्वप्ना,
बनाके क्यो बिगाडा रे ???
साधनाचे गाणं बरोबर वाटतंय.
नाही गं, हे तर नाहीच नाही.
नाही गं, हे तर नाहीच नाही. शिवाय 'शेजारी' ते गाणे म्हणतात. तसेच हिंट दिली आहे की, त्या नायिकेचे फक्त दोनच चित्रपट झाले....तीदेखील 'त्या' प्रसिद्ध बापाची मुलगी असल्यानेच...!
दुसरी हिंट ~ मन्ना डे आणि लता मंगेशकर ! (मन्ना डे सार्वजनिक कार्यक्रमातून 'अंतरा' समवेत हे गाणे नेहमी गात....मात्र आता वय ९२ झाले असल्याने मन्ना दा नी असे कार्यक्रमही बंद केले आहेत.)
त्या विश्वजीतपेक्षा मीच दमलो
त्या विश्वजीतपेक्षा मीच दमलो त्या आशा पारेखच्या मागे जीप दामटून दामटून !!
कशाला दमलास?? आत्ताच पाहिले मी ते गाणे. काही ट्रॅफिक नव्हता रस्त्यावर, सायकलवर आशा नी तिच्या मैत्रिणी नी उलटसुलट उघडी जीप चालवणारे, तरीह केसाच्या कोंबड्यातला एकही केस न विस्कटलेले साहेब.
कोंबडा कसा विस्कटेल ?
कोंबडा कसा विस्कटेल ? श्रीनगरच्या गर्द हिरवळीत जीप १० च्या स्पीडने मारतोय ना तो ! शिवाय केसाला 'लोमा' ही लावलाय....चमकतात बघ किती ते ! आशालाही असेच तेलकट तुपट पैशाच्या जपानी गादीत लोळणारे नायक हवेहवेसे वाटत होते.
साधना, ह्ये काई बरूबर न्हाई.
साधना, ह्ये काई बरूबर न्हाई.
तू दिलेल्या सिच्वेशनमंदी 'किसी ना किसी से..'च बसतं. 'पुकारता चला हूं मै' मध्ये तो आशातैंच्याच मागे मागे जातोय, न्हवं का?
हो गं.. म्हणुन तर म्हटले की
हो गं.. म्हणुन तर म्हटले की तुझा गेस बरोबरच आहे. पण माझ्या डोक्यात पुकारता होतं ना.. आणि तो नालायक तिच्या मागे जातोय हे मी आधी लक्षात घेतले नाही. ती सायकलवर आहे एवढेच आठवत होते. तु लिहिल्यावर मी तुनळीवर पाहिले तेव्हा त्याची चाल लक्षात आली
आशालाही असेच तेलकट तुपट पैशाच्या जपानी गादीत लोळणारे नायक हवेहवेसे वाटत होते.
गुजरातीण पैसे बघणार की प्यार?????????
प्रतीक, अजुन काही क्लु?
प्रतीक, अजुन काही क्लु?
श्रद्धा.....चिडूडूडू नका ना
श्रद्धा.....चिडूडूडू नका ना !! कधी नव्हे ते माझे एक गाणे 'बरोबर' आहे असे तिने म्हटले आहे...जरा नाचतो ना मी देखील !!
साधना, बरोबर..... पूर्वीच्या
साधना, बरोबर.....
पूर्वीच्या काळच्या चित्रपटातल्या हिरविनींचं बरं होतं नाही का? बापाकडे चिक्कार पैसा असायचा, मग ह्या वेळ घालवायला कॉलेजात जायच्या (१-२ पुस्तकं घेऊन) किंवा क्लबात टेनिस वगैरे खेळायच्या. ह्यांच्या मैत्रिणी घरी गप्पा छाटायला आल्या की नोकर चहा आणायला तत्पर असायचे. संध्याकाळी भटकायला बाहेर पडायच्या. सुट्टीचा अर्ज न टाकता काश्मीर किंवा नॉर्थमधल्या थंड हवेच्या ठिकाणी जायच्या. तेव्हाच जन्माला यायला पाहिजे होतं नै?
अजून हिंट देऊ त्या गाण्यासाठी
अजून हिंट देऊ त्या गाण्यासाठी ???
चलो, दे देते है....आप भी क्या याद रखोगे ~
हिंट ~ गाण्यात "शाम" आणि "राधा"....'यमुना नदी' आहे.
आता ओळखालच सर्व !!
>>आशालाही असेच तेलकट तुपट
>>आशालाही असेच तेलकट तुपट पैशाच्या जपानी गादीत लोळणारे नायक हवेहवेसे वाटत होते.
हं. मग रुचीपालट म्हणून गरीब दिसणारे कपडे घालून खन्नांच्या राजेशला 'आजा पिया तोहे प्यार दू" म्हणायची.
अरे ती कुठे चिडलीय.. उलट माझे
अरे ती कुठे चिडलीय.. उलट माझे कोडेच थोडे चुकलेले
स्वप्ना खरेच तेव्हा बरे होते. चित्रपट सुरू झाल्या झाल्या हिरविन नी हिरो दोघेही चालले सिमल्याला. हिरोबरोबर एक मित्र आणि हिरविनीबरोबर १०-१५ मैत्रिणी. किती महिने राहणार, हॉटेलचे बिल वगैरे काही चिंता नाही. मला तर कधी वाटायचे चित्रपटात दाखवतात तसे माझेही अतिश्रीमंत आईवडील कुठेतरी असावेत आणि आयत्या वेळी अवतरावेत, निदान मी १६ किंवा १८ पुर्ण व्हायची वाट पाहात बसलेला वकील तरी असावा ज्याच्या हातात माझ्या नावाने सगळी संपत्ती केलीय असे लिहिलेले कोणा श्रीमंत आत्या/काका/मामाचे मृत्युपत्र असावे.
पण हाय रे दैवा.....
"....संध्याकाळी भटकायला बाहेर
"....संध्याकाळी भटकायला बाहेर पडायच्या. ...."
~ अगदी अगदी स्वप्ना....आणि असली हिरवीन नटुनथटून संध्याकाळी बाहेर पडताना लॉनवर चहाचे घुटके घेत बसलेला तिचा बाप 'राज मेहरा' किंवा 'नासीर हुसेन' मोठ्या काळजीने विचारत असे...."बेटी कहाँ चली तूम ?" मग ही रंभा काहीश्या कोपाने बापाकडे पाहत फुरंगुटून म्हणायची..."ये मत पुछो ना डॅडी !!". मग तो ठोंब्या बाप गाढवासारखे हसत बरळायचा..."ओ, समझा समझा....जाव बेटा जाव !"
मग ही उनाडली लगेच...! मज्जाच होती त्यावेळच्या हिरोंची.
प्रतिकः शाम ढले जमुना किनारे
प्रतिकः शाम ढले जमुना किनारे
वॉव्व.....'आर्या" ला वरचा
वॉव्व.....'आर्या" ला वरचा 'सा..."
""शाम ढले जमुना किनारे किनारे
आजा राधे आजा तोहे श्याम पुकारे
कभी रुके कभी चले राधा चोरी चोरी
पिया कहे आ जिया माने नहीं गोरी...."
चित्रपट : "पुष्पांजली" ~ [प्रथमच नाव ऐकले]
मन्ना डे आणि लतादिदी, संगीत : लक्ष्मीकांत प्यारेलाल
निर्माता : किशोर साहू (होय, तोच 'गाईड' मधला मि.मार्को....याची मुलगी 'नयना साहू' दोन चित्रपटात चमकली....पैकी एक हा तर दुसरा 'हरे कांच की चुडिया..."
पहिल्यात संजय खान तर दुसर्यात जॉय मुखर्जी तिचे हिरो होते...दोन्ही आपटले, त्याबरोबर नयनाची सिनेकारकिर्दही)
योगायोग म्हणजे याचं उत्तर
योगायोग म्हणजे याचं उत्तर नयनानेच दिलं!
'हरे कांच की चुडिया..." हा
'हरे कांच की चुडिया..."
हा दुरदर्शनवर पाहण्याचे भाग्य मला लाभले
माझे एक कोडे पेंडींग आहे
Pages