बोजड मराठी शब्द

Submitted by हर्ट on 6 April, 2011 - 12:01

नमस्कार मित्रहो. इथे काय लिहायच? मराठी भाषेत जे शब्द तुम्हाला कायम बोजड वाटत आले आहेत ते शब्द.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला साक्षेपी, व्यवच्छेदन, व्यामिश्र हे शब्द फार बोजड वाटतात. मराठी समीक्षकांचे तर फार आवडीचे शब्द आहेत हे.

अर्थ नीट कळला नाही ते शब्द बोजड वाटतात. अर्थ, त्याच्या छटा कळल्या तर प्रत्येक शब्द चपखल , सुंदर वाटेल . उगाच भाराभार बाफ का सुरु करत सुटलायस ?

मेधा, अर्थ कळूनही काही शब्द बोजड वाटतात कारण त्यापेक्षा सोपे शब्द असतात व्यवहारात. उगाचं काही लेखक शब्दांचे अवडंबर करतात.

तीन वेळा सेव्ह वर टिचकी मारली म्हणून ३ धागे उघडल्या गेले.

मला सबगोलंकार हा शब्द विचित्र वाटतो .. त्याचा अर्थ आता कळलाय तरी अजूनही पहिल्यांदा oval असाच अर्थ वाटतो ह्या शब्दाचा ..

Caps lock ऑन ठेवून ऐकलं का?>>
Caps lock ऑफ करुन ऐकल तर तो विचारेल 'गोरत्या' म्हणजे काय? >>
अनावश्यक.

"रक्टीमा" म्हणजे काय, एका गाण्यात ऐकले होते.
"गोरट्या गालावरी का चोरटा हा रक्टीमा."

>>> ऐकण्यात किंवा लिहीण्यात चूक झाली आहे .. तसं नसेल तर हेही अनावश्यक!

"रक्तिमा" असा शब्द आहे .. अर्थ लाली (blush) ..

कायम बोजड वाटत आले आहेत ते शब्द>>> पण जर ते कायम वाटत आले नसले तर रे ? काय करायचं?

बोल्ड = बोजड
म्हणजे बघ, माझ्या शैक्षणिक कारकिर्दीत मला विश्लेषण, सांख्यिकी, संकीर्ण बोजड वाटलं होतं पण आता ते तसं नाही वाटत! Proud

बादवे बीबी चा उद्देश नाही कळला.

"एकसमयावच्छेदेकरून" , "अश्लाघ्य" , "अध्याह्रुत" , "उपरीनिर्दिष्ट" , "अर्हता" , "क्लृप्ती" , "सरिस्तृप" , "अनृत" , "संपृक्त" , "पृथःकरण"
अजुन आठवले तर लिहिण्यात येतील. सद्यस्थितीत उपरीनिर्दिष्ट बोजड शब्दांचे अर्थ सांगण्याची कृपा करावी. कारण काही अर्थ मलाही माहीत नाहीयेत Sad

संपृक्त = saturated
पृथःकरण = analysis
अर्हता = योग्यता
अश्लाघ्य = निंद्य
अध्याहृत = गृहीत धरलेले

"एकसमयावच्छेदेकरून" - एकाचवेळी
"उपरीनिर्दिष्ट" - वर उल्लेख केलेले
"अर्हता" - औपचारिक ठिकाणी वापरल्यास अर्थ एलिजिबिलिटी. एरवी लायकी असाही होऊ शकतो.
"क्लृप्ती" - युक्ती, शक्कल
"संपृक्त" - हा शब्द नुसता येत नाही कधी. कुठल्यातरी शब्दाच्या नंतर येतो. उदा: ओमकारो बिंदुसंपृक्तं.. म्हणजे बिंदु असलेला ओमकार. थोडक्यात '__ने युक्त' असा अर्थ.
"पृथःकरण" - गजाभाऊ अनॅलिसिस म्हणजे विश्लेषण होईल ना. पृथःकरण म्हणजे गोष्टी वेगळ्या करणे. विश्लेषणाच्या आधीची पायरी होईला ना?

अर्थ समजून घेतल्यावर शब्द वापरायला मजा येते याबद्दल मेधाशी सहमत. इंग्लिशमधल्या अनेक गोष्टींचं भाषांतर केलंच पाहिजे हा मला अट्टाहास वाटतो कधी कधी पण भाषेत आहेत ते शब्द केवळ बोजड वाटतात म्हणून टाळून इंग्रजी शब्द वापरायचे हे फारसं पटत नाही.

संपृक्त शब्द इयत्ता आठवीच्या रसायनशास्त्रात होता - संपृक्त द्रावण Wink

उपरीनिर्दिष्ट - उपरनिर्दिष्ट की उपरीनिर्दिष्ट??? उपरी म्हटल्यावर मला तो हिंदी शब्द वाटतो.

उपरी च बरोबर आहे. उपर नव्हे.

संपृक्त द्रावण... हे माझ्या लक्षातच आले नाही. ८ वी पासून सेमीविंग्रजीवाले ना आम्ही Happy
काय बरं अर्थ असेल संपृक्तचा इथे. मी आठवायचा प्रयत्न करतेय हे कशाचं भाषांतर असेल बरं?

Pages