बोजड मराठी शब्द

Submitted by हर्ट on 6 April, 2011 - 12:01

नमस्कार मित्रहो. इथे काय लिहायच? मराठी भाषेत जे शब्द तुम्हाला कायम बोजड वाटत आले आहेत ते शब्द.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी_आर्या, तुमचे बरोबर आहे 'वडवानल' शब्दाबद्दल. शब्दकोशातही बघितले. मी पोस्ट एडिट केले आहे माझे.

मला मधुचंद्र, बळीचा बकरा हे शब्द बुचकळ्यात टाकतात.

वकील लोक जे नोटीशी (?) ड्राफ्ट्स तयार करतात,त्यात तर अशा अनेक जुन्या मराठी,ऊर्दू,फारसी, अरबी शब्दांची रेलचेल असते.

(एक काहीसे दुय्यम, पण या बाफाशी संबंधित मत:)
या बाफाला 'शब्दार्थ' बाफाचे स्वरूप आले आहे. त्यासाठी अगोदरपासून एक बाफ असताना, तिथेच माहिती विचारणे/सांगणे करणे अधिक योग्य होईल. इथे ती मांडल्याने माहितीचे बेशिस्त व्यवस्थापन घडण्याचा संभव आहे (कारण उद्या, इथे किंवा शब्दार्थ बाफावर विचारलेल्या शब्दांवरून नवोदित किंवा येऊन-जाऊन असलेल्या माझ्यासारख्या मंडळींकडून पुन्हा नवीन बाफ उघडणे, अगदी संभाव्य आहे. Happy ).

त्यामुळे या बाफाचे नेमके प्रयोजन काय ? बोजड शब्दांची यादी बनवणे (आणि नंतर त्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे :हलकेच घ्या:) असा आहे काय ? तसे असल्यास, बोजड शब्द ही संज्ञाच मुळात सापेक्ष आहे; मग बोजड शब्दांची आधी सर्वमान्य वाख्या करावी लागेल :).

असो. मुद्दा एवढाच, की प्रत्येकाने योग्य तो बाफ वापरावा. Happy

-विनंतीवरून.

मलाही संकल्पा सारखेचं वाटते आहे. इथे लोक शब्दार्थ वगैरे विचारतील असे वाटले नव्हते आधी. नाहीतर वर तशी सुचना लिहिली असती.

तर जनहो, इथे शब्दार्थाचा आधीचं एक बा. फ. आहे. इथे या बाफवर शब्दांचे अर्थ न विचारता तुम्हाला जे शब्द बोजड वाटतात ते लिहा. जसे वर मी लिहिले आहे की मला साक्षेपी, व्यवच्छेदन हे शब्द जॅम बोजड वाटतात. Happy

मला उहापोह (बरोबर लिहिलाय ना??) हा शब्द बोजड वाटतो. मी चुकूनही याचा उच्चार करत नाही कारण माझ्या तोंडात नेमके उपापोहच येते Happy

आणि दुसरा तो एकसमयावच्छेदेकरुन... मला चटकन उच्चारता येतो पण समया म्हटले की लगेच निरांजने पण आठवतात... Happy

रच्याकने, बादरायण संबंधावर लहानपणी चांदोबात वाचलेली गोष्ट आठवते.

ही चांदोबातली गोष्ट नाहीये, ८ वी की ९वीच्या संस्कृत धड्यात होता बादरायण संबंध. शब्द त्याआधीही ऐकलेला पण बादरायण म्हणजे काय तेच माहित नव्हते.

ह्म्म्म.. म्हणजे माझ्या पिढीत ती पाठ्यपुस्तकात होती, तुमच्या पिढीपर्यंत पोचताना चांदोबात गेली... Sad
बादरायण शब्दावर ही एकमेव कथा असावी. कारण बादरायण मधल्या बादरचा संबंध त्या बोरीच्या झाडाशी आहे. पाहुणा निघताना यजमानाशी संस्कृतमध्ये जी बडबड करतो त्यात तो बादर शब्द वापरतो. माझे संस्कृत जरा कच्चेच होते.

साधना बरोबर आहे. 'अस्माकं बदरीवृक्षं, युष्माकं बदरीवृक्षं' असा काहीतरी तो श्लोक आहे.

तसेच बादरायण नावाचे ऋषी आहेत. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता ह्यांना हिंदू धर्माची प्रस्थानत्रयी म्हणतात. त्यातील ब्रह्मसूत्रे हे बादरायण ऋषींनी लिहिले आहे. काही लोकांचे म्हणणे असे की बादरायण ऋषी म्हणजेच व्यास ऋषी, कारण व्यासांचा जन्म बोरांची झाडं असलेल्या बेटावर झाला होता. काहींचे म्हणणे असे की ते दोघे वेगळे आहेत.

"अस्माकं बदरी चक्रं, युष्माकं बदरी तरु: । बादरायणसंबंधात, यूयं यूयं वयं वयं ।"

आमच्या (बैलगाडीचे) चाक बोरीच्या लाकडाचे आणि तुमच्या दाराशी बोरीचे झाड आहे असा आपला बादरायण संबंध!

भ्रमणध्वनीऐवजी चलभाष हा शब्द मी माझ्या बोलण्यात, लिहिण्यात वापरतो. एके जागी असतो तो दूरभाष. आणि हलता, जवळ बाळगतो तो 'चल'भाष. फोनवर आपण नुसता ध्वनी करत नसतो तर दूरवर संभाषण करीत असतो. म्हणून तो दूरभाष. मसुराश्रमाचे कै. ब्र. विश्वनाथजी यांनी मला हे सांगितले. मला ते पटले. दूरभाष शब्दावरून मला चलभाष शब्द सुचला. या दोन्ही शब्दात जोडाक्षरे नाहीत. त्यामुळे त्यांना बोजडपणा नाही.

मालवणी कन्ये हर्षदा परब तू उगाचच त्या एच्एच् च्या नादी लागलीस. नंद्या यांनी माझ्या लक्षांत आणून दिले कीं कानाखाली जाळ खरे तर त्या एच्एच् च्चा आहे.

१. "बालकवींच्या अभ्यस्त शब्दांकडे एखादा अपवाद वगळता मराठी समीक्षेचे लक्ष गेले नाही." असे एक वाक्य वाचनात आले. यातील 'अभ्यस्त' शब्द म्हणजे नेमके काय सुचविते ?

२. तसेच 'उन्नयन' हा देखील असाच एक बोजड शब्द.

मैतर, चलभाष योग्य शब्द आहे. 'अंतर्नाद' मासिकाने तो मागच्या महिन्यापासूनच स्वीकारला आहे. आपणही तो रुढ करुयात.

"आंत्रपुच्छ", "मज्जारज्जू",
अहो पण काय करणार? सगळे मराठीतच बोलायचे ना?
नि आजकाल संस्कृतचा अभ्यास नसल्याने सगळे कसे बोजड वाटते.
त्या मानाने इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक शब्द लोकांना परवडतात. तोंड दाबून बुक्क्यांचा मार! त्या शब्दांना बोजड म्हंटले तर लोक म्हणतील, अशिक्षित आहे, गांवढळ आहे! म्हणून तेच सुटसुटीत वाटतात असे लोकात सांगायचे.

टी व्ही वाले प्रेक्षकाना उद्देशुन दर्शक हा शब्द का वापरतात? हा प्रश्न इथे बोजड तर होत नाही ना?

१)एखादा शब्द 'बोजड' असणे ही गोष्ट, माझ्या मते, व्यक्ति-सापेक्ष, त्या व्यक्तीच्या अनुभव- सापेक्ष, ज्ञान-सापेक्ष असते!
२)जर मला एखादा शब्द माझ्या लेखनात, संभाषणात वापरायचा असेल, तर तो शब्द बोजड आहे, की सोपा, हे नी बघत बसणार नाही, तर तो शब्द अर्थाच्या (अर्थ्-छटेच्या) बाबतीत, त्या ठिकाणी किती योग्य आहे, चपखल बसतो आहे, हेच बघेन...!
असो, या बा फ ला शुभेच्छा !

Pages