Submitted by हर्ट on 6 April, 2011 - 12:01
नमस्कार मित्रहो. इथे काय लिहायच? मराठी भाषेत जे शब्द तुम्हाला कायम बोजड वाटत आले आहेत ते शब्द.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदी अगदी. वकाधावि कविधावि
अगदी अगदी.
वकाधावि कविधावि कभुधावि ऐकलंयस ना!
तेवढाच काय तो फरक.
त्या कभुधावि, अविधावि,
त्या कभुधावि, अविधावि, वकाधाविचा जाम धसका घेतला होता शाळेत असताना.
डॉ.साती..... ~ आज तुमचे येथील
डॉ.साती.....
~ आज तुमचे येथील प्रतिसाद वाचून मला जो आनंद झाला (वा होतो आहे...) तो अक्षय असाच राहील. मराठी भाषा समृद्ध आहे हे माहीत आहे पण ज्यावेळी क्वचितच भेटणार्या शब्दांचा अर्थ उदाहरणासह तुम्ही समजावून सांगता त्यावेळी समाधानाचा जो वारा मनी स्पर्श करतो तो खरोखरी विलोभनीय असाच आहे.
धन्यवाद.
अजून काही --- तपमान - तापमान
अजून काही ---
तपमान -
तापमान -
संचलन -
संचालन -
वदतो व्याघात म्हणजे ऑक्सीमोरानच का ???? नीट लक्षात येत नाहीये ..
उदा. प्रचंड छोटा, भयंकर सुंदर
साती - छान माहिती...
साती - छान माहिती...
साती, तुमचं व्याकरण आणि
साती,
तुमचं व्याकरण आणि अर्थोत्पत्तीवरील प्रभुत्व पाहून आनंद झाला!
एखाद्या असिधाराव्रताप्रमाणे जोपासलेले तुमचे कौशल्य अक्षुण्णपणे वृद्धिंगत होऊन त्यास सर्जनशील धुमारे फुटोत. तुमच्या या कार्यजोषास अनुचित परिप्रेक्ष्यात ठेवून अव्यापारेषु व्यापार संबोधणे हे वदतो व्याघातासारखे आहे.
आ.न.,
-गा.पै.
अय्या, एवढं कौतुक! सगळं
अय्या, एवढं कौतुक!

सगळं हजारो वर्षांपूर्वीच्या आठवणीतून लिहिलंय , बरोबर असेलच असे नाही असा एक डिस्क्लेमर टाकते.

वदतो व्याघात म्हणजे
वदतो व्याघात म्हणजे ऑक्सीमोरानच का ???? नीट लक्षात येत नाहीये ..
उदा. प्रचंड छोटा, भयंकर सुंदर
<<
ही दोन्ही उदाहरणे ऑक्सीमोरॉनची आहेत. वदतो व्याघात थोडा वेगळा प्रकार आहे.
वदतो व्याघात हा शब्द वा शब्दसमूह, मुळातच अतिशयोक्त रित्या खोटा असतो. व तो तसा आहे, हे बोलणारा व ऐकणारा या सर्वांना ठाऊक असते.
जसे, You shall get it after the Hell freezes over. यात नरकातल्या 'हेलफायर' आगी गोठून थंड होणे अशक्य आहे, हे ठाऊक आहे, अर्थात, तुला अमुक गोष्ट कधीच मिळणार नाहीये, हे अलंकारिकपणे सांगणे हा वदतोव्याघात झाला.
दुसरे कॉमन उदाहरण म्हणजे 'मुंगीने मेरूपर्वत गिळला' हे असावे बहुतेक.
एक उदाहरण- सध्याचे कल्याणकारी
एक उदाहरण- सध्याचे कल्याणकारी सरकार
असहमत. कोणाचेतरी कल्याण होतेयच ना.. मत देणा-या मंडळींचे होत नसेल तर त्यांचे नशिब
. असो, खुपच अवांतर झाले.
मराठी व्याकरण ह्या विषयाची भिती घालण्याचे काम शिक्षकमंडळींनी केले, नाहीतर मीही शिकले असते काहीतरी. "वाक्य चालवुन दाखवा" ह्या प्रश्नाचा अर्थ काय हेही कोणी कधी सांगितले नाही तर उत्तर कुठून येणार सामान्य विद्यार्थ्याला? नेहमी वर्गात हा प्रश्न विचारला की लाडकी मंडळी धडाधड उत्तरे देत आणि बाकीचे टकामका एकदा विचारणारा आणि एकदा सांगणारा अशी तोंडे पाहात राहु.
ते कसले कसले कर्तरी आणि कर्मणी प्रयोग यांची तर धास्तीच घेतलेली.
साती जी... तो शब्द त्याच्या
साती जी...
तो शब्द त्याच्या अर्थासहित लक्षात राहील अश्या सहज सोप्या भाषेत सांगण्याचे तुमचे प्रभुत्व केवळ अप्रतिम!
धागा कुठलाही असो (विविध विषय) त्यावरील तुमची पोस्ट ही काही ना काही शिकवुन जाते. माबो वरती परत परत यायला भाग पाडते.
धन्यवाद-/\-
''चक्राच्या छिद्रिकरणाने
''चक्राच्या छिद्रिकरणाने अंर्तगत वायुचे बहिर्गमन झाले''या वाक्यासाठी एक बोजड शब्द लिहुन हवा आहे.योग्य मोबदला दिल्या जाईल.जय गुरुदेव(म्हस्केसायेब).....'बोजड ' हा.....तुम्ही काय वाचलत....छे छे ..भल्तच.....
साती, वरचे काही प्रदिसाद मस्त
साती, वरचे काही प्रदिसाद मस्त
अव्यापारेषु व्यापार-
म्हणजे आता कामधाम सोडून माझं मायबोलीवर चाललेय ते!>>>
ईथले सर्व शब्द वाचुन मला घेरी
ईथले सर्व शब्द वाचुन मला घेरी येउ लागली आहे..
सृजन/सर्जन ही दोन्ही भाववाचक
सृजन/सर्जन ही दोन्ही भाववाचक नामे सृज् या धातूपासून बनली आहेत. निर्माण होणे आणि निर्माण करणे असा छोटासा अर्थभेद आहे.
क्षत हे १) विशेषण म्हणून वापरले तर त्याचा अर्थ जखमी, दुखावलेला, दंश झालेला असा होतो.. २) नाम म्हणून वापरले तर त्याचा अर्थ जखम, ओरखडा असा होतो.
क्षुण्ण हे क्षुद् चे कर्मणि भू.धा.वि. आहे. त्याचे १)तुडवलेला, मळलेला(मळलेली वाट), आचरलेला २)भंग केलेला (violated) 3)पराजित (defeated) ४) कुटलेला (powdered) असे अर्थ आहेत. क्षुद् या मूळ धातूचे अर्थ हेच म्हणजे १)तुडवणे, वर पाय ठेवणे (to crush,to trample upon) २) पीठ करणे (to pound) 3) to move, to be agitated क्षुब्ध होणे हे अर्थ शब्दकोशात दिलेले आहेत.
वदतोव्याघात म्हणजे बोलाफुलाला गाठ पडणे. परस्पर संबंध नसलेल्या दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. उदा. कावळा बसायला आणि फांदी मोडायला. आता कावळ्याच्या वजनाने काही फांदी मोडली नाही, पण ते एकदमच घडले खरे. (यातली दुसरी गोष्ट ही थोडी अनिष्ट असते.) वदतोव्याघातच्या अर्थाविषयी तितकीशी खात्री नाही. कोणाला अधिक माहिती असेल तर खुलासा करावा.
मी क्षत चा अर्थ भोक समजायचो.
मी क्षत चा अर्थ भोक समजायचो. व्रत कवितेत शेवटचे कडवे
इंद्रियांचा इंद्र उद्गारे क्षतांचा
यात कोठे प्रश्न येतो आत्म्याच्या व्रताचा
क्षत चे मराठीबोली भाषेत खटे
क्षत चे मराठीबोली भाषेत खटे झाले. आजारी मनुष्य बिछान्यावर खूप दिवस राहिला तर त्याला खटें पडतात म्हणजे जखमा होतात. गुरांच्या खुरांना खटें पडतात. (नपुंसक लिंग सुचवण्यासाठी अनुस्वार दिला आहे.)
वा, साती ! अत्र्यांची एक
वा, साती !
अत्र्यांची एक कविता होती. सायकल वर डबलसीट जाताना पोलिसांनी पकडल्याबद्दल.. त्यात असे बरेच शब्द होते. आमच्या पुस्तकात होती. बहुदा प्रेमाचे अद्वैत असे नाव होते.
परस्मैपदी किंवा आत्मनेपदातही
परस्मैपदी किंवा आत्मनेपदातही चालविता येतो.>>>>>>> मुजरा कबूल करण्यात यावा.
मला बाई ,पु.ल.काकांचे वाक्य भारी आवडते"उगाच नाही पाणिनीला वाघाने खाल्ला"
धन्यवाद हिरा. मी भोकं हा अर्थ
धन्यवाद हिरा.
मी भोकं हा अर्थ त्या इंद्राच्या गोष्टीवरून घेतला होता. त्याला शाप मिळतो ना की तुझ्या अंगाला हजारो भोके पडतील म्हणुन. कदाचित ते हजारो जखमा होतील असे असावे.
हीरा, सध्या व्याकरणाचे
हीरा, सध्या व्याकरणाचे कोणतेही पुस्तक हाताशी नाही.
पण नेटवर सर्च केले तर वदतोव्याघातचा अर्थ सगळीकडे ऑक्सिमोरॉनसारखाच दिलाय.
पण त्यातही सगळे नवे लेखन्/ब्लॉग्ज/ वर्तमानपत्रातले अग्रलेख इ. सापडले.
जुन्या मराठी / संस्कृत पुस्तकात कुठे हा शब्द दिसतो का ते पहायला हवे.
बाकी तुम्ही देत असत असलेल्या माहितीला तोडच नाही.
केव्हातरी एक लेख लिहा असा पुन्हा आग्रह!
वदतो व्याघात चा शब्दशः अर्थ,
वदतो व्याघात चा शब्दशः अर्थ, वाघ बोलला असा आहे का? तसं असले तर बोलाफुलाला गाठ जास्त ठीक वाटतो ना ओक्झीमोरॉन पेक्षा?
साती आणि हीरा ग्रेट.
साती आणि हीरा ग्रेट.
अमित वाघ काय ? कुठून? काहिही
अमित वाघ काय ? कुठून?

काहिही हं अमित.
ओके मला माहित न्हवत. मी आपलं
ओके मला माहित न्हवत. मी आपलं व्याघ्र असेल असं समजून वाघ समजत होतो.
वदतो व्याघात चा शब्दशः अर्थ,
वदतो व्याघात चा शब्दशः अर्थ, वाघ बोलला असा आहे का?<< हे अतिच क्लासिक आहे.
माझ्या माहितीनुसार वदतोव्याघात चा अर्थ सांगताना अशक्य अथवा असत्य आहे हे माहित असूनही सांगणे. उदा. सश्याची शिंगे.
अमित, मस्तं!
अमित, मस्तं!

आयला अशक्य, असत्य हा अर्थ
आयला
अशक्य, असत्य हा अर्थ माहीत होता, म्हणूनच वाघ बोलतो म्हणजे असत्य असलं काही डोक्यात असेल.
पण हा शब्द कसा आला कोणी सांगेल का?
तर आता हा शब्दं माझ्या
तर आता हा शब्दं माझ्या खनपटीला बसलाय.
तर आता काही हा मला झोपू देत नाही.
तर आत्तापर्यंत मी काढलेला आढावा असा की
मोल्सवर्थ साहेब म्हणतात -
वदतोव्याघातः A Sanskrit phrase used of a speaker asserting an impossibility or a difficulty to be fact.
आता हा शब्दं कसा निघाला असावा.
तर असा अंदाज की-
वदता आणि आघात असे दोन शब्द बहुदा मध्ये एव ने जोडले असतील.
म्हणजे बोलताच त्याचे खंडन करणे.
वदता आणि व्याघात असे दोन शब्दसुद्धा कदाचित एकत्र जोडले गेले असतील.
यात 'व्याघात' हा १३ वा नित्य योग असून त्याचा परिणाम मारणे/ठार करणे असा होतो.
म्हणजे आपल्याच बोलण्याला ठार करणे असा अर्थं होऊ शकतो.
हे सगळं नेट धुंडाळून गंमत म्हणून लिहित्येय. खरं खोटं पाणिनी जाणे.

व्याघात या शब्दाचे मूळ अर्थ
व्याघात या शब्दाचे मूळ अर्थ आहेत - अडथळा / विघ्न / विरोध / अशक्य असलेली गोष्ट / पराभव
या शब्दाचा संस्कृत व्याकरणात वापरला जाणारा अर्थ म्हणजे एकाच वाक्प्रयोगातून / एकत्र आलेल्या शब्दांतून विरुद्ध अर्थ अथवा विरोध ध्वनित करणे / होणे (असा अर्थ जो प्रत्यक्षात असणं शक्य नाही)
वदतोव्याघात - बोलताना / बोलण्यातला व्याघात
आपणच काहीतरी एक विधान करायचं आणि लगेच त्याच्या विरुद्ध अर्थाचं काही बोलायचं, म्हणजे आपणच आपलं बोलणं खोडून काढायचं अशा अर्थी वदतोव्याघात वापरतात.
'खूप थोडं', 'संधीसाधू मित्र' हे वदतोव्याघात.
सशाची शिंगे हा वदतोव्याघात नाही. व्याघात या शब्दाचा वाघाशीही संबंध नाही.
वदतोव्याघात म्हणजे Antilogy
वदतोव्याघात म्हणजे Antilogy
Pages