Submitted by हर्ट on 6 April, 2011 - 12:01
नमस्कार मित्रहो. इथे काय लिहायच? मराठी भाषेत जे शब्द तुम्हाला कायम बोजड वाटत आले आहेत ते शब्द.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऋतु हिरवामधील आशा भोसलेचं
ऋतु हिरवामधील आशा भोसलेचं गाणं.. घनरानी साजणा..
त्यात एक शब्द आहे.. हृदया रे अदया रे सांग ना..
अदया म्हणजे काय?
दया नसलेला - निर्दय.
दया नसलेला - निर्दय.
जाणीव-नेणीवेच्या सीमारेषेवर
जाणीव-नेणीवेच्या सीमारेषेवर म्हणजे माझ्या काय बुवा? त्यातल्या त्यात नेणीव म्हणजे काय?
नेणीव म्हणजे काही न जाणवणे.
नेणीव म्हणजे काही न जाणवणे. जसे शुद्ध - बेशुद्ध तसे जाणीव - नेणीव.
सडासंमार्जन हा शब्द आधी मला
सडासंमार्जन हा शब्द आधी मला संडासमार्जन (प्रातःविधी) वाटायचा.
हो ना, त्यात 'प्रातःकाळी करी
हो ना, त्यात 'प्रातःकाळी करी बाळा शौचादिमुखमार्जन' असेही थोर मोठे सांगत असल्याने सडासंमार्जन आणि शौचादिमुखमार्जन यात एकदम काहितरी कनेक्शन असेल असे वाटायचे नै!

पूर्वसंचित, मलाही हाच प्रश्न
पूर्वसंचित, मलाही हाच प्रश्न पडायचा जाणीव- नेणीव म्हणजे नक्की काय? महेश उत्तराबदद्ल धन्यवाद.
दुसरं द्वैत-अद्वैत हाही प्रकार कधी कळला नाही.
पद्मावति द्वैत म्हणजे 'दोन
पद्मावति द्वैत म्हणजे 'दोन वेगवेगळे असण्याची भावना' म्हणजे निर्माता देव आणि आपण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मानणे.
अद्वैत म्हणजे 'दोन्ही गोष्टी एकच असण्याची भावना' म्हणजे माझ्यातच्तो निर्माता देव आहे किंवा मी त्याचाच अंश आहे किंवा 'तोच मी' ही भावना.
शक्यतो देवाच्या बाबतीत हे शब्दं वापरत असले तरी पती पत्नी किंवा प्रियकर- प्रेयसी यांच्यातही अद्वैतभाव असू शकतो.
धन्यवाद साती. द्वैत आणि
धन्यवाद साती. द्वैत आणि अद्वैत चा अर्थ आणि दोघांमधला फरक छान समजावून सांगितला.
अक्षुण्ण ? परिप्रेक्ष्य
अक्षुण्ण ?
परिप्रेक्ष्य ?
वदतो व्याघात ?
अव्यापारेषु व्यापार ?
असिधाराव्रत ?
सर्जनशील का सृजनशील ? आणि त्यांचे अर्थ ...
अक्षुण्ण वर मोदींच्या
अक्षुण्ण वर मोदींच्या शपथविधीच्या वेळी बरीच चर्चा झाली आहे.

अक्षुण्ण वर मोदींच्या
अक्षुण्ण वर मोदींच्या शपथविधीच्या वेळी बरीच चर्चा झाली आहे. >>>> मला फक्त या शब्दाचा अर्थ हवाय (शब्दकोशात असतो तसा)

>>Caps lock ऑन ठेवून ऐकलं
>>Caps lock ऑन ठेवून ऐकलं का?<<
तडारहित / छिद्ररहित/
तडारहित / छिद्ररहित/ अखंड
उदा. १.भारताच्या संविधानावर अक्षुण्ण विश्वास
२. बळी देण्याकरिता अक्षुण्ण मानव पाहिजे ( आठवा तो कुठलासा हिंदी सिनेमा ज्यात नायकाला जखम झालेली असते म्हणून जंगली जमात त्याचा बळी देण्याचे क्यान्सल करते.)
३. तो वीर लढ्यात विजयी होऊन अक्षुण्ण परतला.
असिधाराव्रत- असि- तलवार धारा-
असिधाराव्रत-
असि- तलवार
धारा- कडा/ धार
व्रत- नेम
तलवारीच्या पात्यावरून चालण्याइतकं खडतर व्रत.
सर्जनशील्/सृजनशील मूळ धातू -
सर्जनशील्/सृजनशील
मूळ धातू - सृ
परस्मैपदी किंवा आत्मनेपदातही चालविता येतो.
त्यावरून सृजन की सर्जन ठरते.
दोन्हींच अर्थं जवळपास एकच. नवनवे (काव्य, शोध, विचार, कला) प्रसवण्याची क्षमता.
अव्यापारेषु व्यापार- म्हणजे
अव्यापारेषु व्यापार-

म्हणजे आता कामधाम सोडून माझं मायबोलीवर चाललेय ते!
वा, डॉ. साती - सार्या
वा, डॉ. साती - सार्या शब्दांचे अर्थ सुरेख उलगडून सांगितल्याबद्दल अनेकानेक आभार्स ...
अव्यापारेषु व्यापार - भारीच्चे .....
असिधाराचा अजूनही एक अर्थं
असिधाराचा अजूनही एक अर्थं होतो म्हणतात.

पण तो खरा का प्रवाद ते माहिती नाही.
म्हणजे अमुक एक कार्यं /संकल्प सिद्धीला जाईपर्यंत पतीपत्नी दोघे (एकाच मंचकावर) झोपताना दोघांच्यामध्ये एक उघडी तलवार ठेवायची.
शक्यतो राजाराणी असले व्रत करायचे.
आणि राजाला हॉलमध्ये जाऊन कोचावर झोपायची मोकळीक नसायची.
परिप्रेक्ष्य =
परिप्रेक्ष्य = पर्स्पेक्टिव्ह.
अहो दीमा, सोप्या मराठीत अर्थं
अहो दीमा, सोप्या मराठीत अर्थं सांगा ना!
वदतो व्याघात हे 'सशाची शिंगे'
वदतो व्याघात हे 'सशाची शिंगे' सारखे शब्दप्रयोग होत, जे खोटे आहेत हे आधीच ठाऊक असते.
दर्शन-तत्वचर्चेत थोडा वेगळा अर्थ होतो, असे वाचल्याचे आठवते आहे.
आजकाल मराठी शब्दांचे अर्थ
आजकाल मराठी शब्दांचे अर्थ मुलांना सांगताना इंग्रजीतून सांगायची इतकी सवय झाली आहे, की ..
दृष्टीकोण हा एक शब्द परिप्रेक्ष्य ला पर्यायी होऊ शकेल.
अक्का, आता परस्मैपद व
अक्का,
आता परस्मैपद व आत्मनेपद म्हणजे काय तेही सोप्प्या मराठीत विषद करून टाका पाहू.
वदतोव्याघात म्हणजे ऑक्सीमोरॉन
वदतोव्याघात म्हणजे ऑक्सीमोरॉन का मग?
वदतोव्याघात ची फोड करुन सांगा
वदतोव्याघात ची फोड करुन सांगा ना, म्हणजे लक्षात राहिल नीट.
अक्षुण्ण हा शब्द कधीच ऐकला नाही. खरेच असा शब्द आहे का?
दीमा, ते असं चटकन सांगणं
दीमा, ते असं चटकन सांगणं सोप्पं नाही.
म्हणजे सोप्पं आहे, पण लिहित बसायला वेळ लागेल.
तरी थोडक्यात एखादी गोष्टं स्वतः करतो, घडते तेव्हा आत्मनेपद आणि दुसरा करवतो, घडवतो तेव्हा परस्मैपद वापरतात्झ (हे जरा ग्रॉसच सांगत्येय आणि वापरात काही वेळा सरमिसळही दिसते) जवळपास कर्तरी / कर्मणि प्रयोगासारखे.
म्हणजे 'पी' हा धातू असला तर आत्मने पदात 'पिणे' होते आणि परस्मैपदात 'पाजणे' होतं.
(आणि मराठवाड्यात 'पाजवणे' पण होतं , ज्याचा अर्थं रत्नागिरीत पात्याला धार काढणे असा होतो.)
खाणे हा धातू आत्मनेपदात तर भरवणे परस्मैपदात.
बाकी सगळे रोजच्या वापरातले संकेत आहेत आणि एखाद्या अमराठी माणसाला हे असेच का हे नियमांसकट सांगा म्हटले तर मला सांगता येणार नाही.

साधना, अक्षुण्ण हा शब्दं
साधना, अक्षुण्ण हा शब्दं पंप्र / खासदार शपथ घेताना वापरतात की नेहमी.
वदतोव्याघात हा भाषेचा एक
वदतोव्याघात हा भाषेचा एक अलंकार, अलंकार म्हणण्यापेक्षा दोष समजतात.
म्हणजे 'वदतोव्याघात ' या शब्दाचा वाक्यात उपयोग नाही दिसणार फारसा.
एक उदाहरण- सध्याचे कल्याणकारी सरकार.
हो का? मी ऐकला नाही कधी.
हो का? मी ऐकला नाही कधी.
अक्षत आणि अक्षुण्ण या दोन्ही शब्दांचे अर्थ एकसारखे असतील का नसतील?
अक्षुण्ण म्हणजे ज्याच्यात कुठलीही क्षती नाही ते. अक्षत म्हणजे ज्याला असे क्षत पडूच शकत नाही ते?
Pages