Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रीसांथीनी किती रन दिलेत ना
श्रीसांथीनी किती रन दिलेत ना योग. झाहीरने पहिल्या तीन ओव्हर मेडेन टाकल्यात.
it doesnt matter
it doesnt matter anymore....... just enjoy the win
रच्याकने: त्याला अजून श्रीशांथी मिळायची आहे रे!
आणि युवराज हसला: ईतका
आणि युवराज हसला:
ईतका तणावपूर्ण सामना सुरू असताना (लंका आपल्याला शेवटच्या षटकात कुटत होते तेव्हा), युवी चा प्रेक्षकात ऊपस्थित डुप्लिकेट दाखवला. अगदी तासाच रंगीत चष्मा घालून आला होता. मोठ्या स्क्रीन वर त्याला पाहिल्यावर मैदानात युवी ने देखिल एक मस्त स्माईल दिली... that was million dollar! (कुणि पाहिले का?)

तो एक छोटासाच क्षण- रणरणत्या उन्हात एखादी गार झुळूक यावी तसा वाटला.
युवी हसतानाच अधिक चांगला दिसतो हे त्याला पुन्हा सांगितले पाहिजे. त्याच्या चेहेर्यावर आता ते जुने हसू परतेल अशी आशा. त्याच्या खेळाला असे आनंदी रहाणे अधिक मानवते
(मुरली ला देखिल त्याच्या संघाने खांद्यावर घेवून एक फेरी मारायला हवी होती असे वाटतेल. आपल्या प्रेक्षकांनी नक्कीच त्याला सन्मान दिला असता. he deserved better send off!)
हो मी पाह्यला तो युवी चा डु
हो मी पाह्यला तो युवी चा डु आय आणि युवीची स्माइल!!
अर्जुन तेंडुलकर स्क्रीनवर दिसल्यावर सचिनच्या चेहर्यावरही म्हणे स्माइल झळकले असं पेप्रात आलंय. पाह्यलं का कोणी?
(No subject)
धोनीची शेवटची सिक्स त्याच्या
धोनीची शेवटची सिक्स त्याच्या एक्स्प्रेशन्ससकट कुठे मिळेल बघायला. स्टार क्रिकेटच्या हायलाइटसमधे पण नाही दिसली.
मला पुर्ण मॅच परत बघायची आहे.
मला पुर्ण मॅच परत बघायची आहे. कुणी लिंक देऊ शकेल का?
धोनीची
धोनीची सिक्सर
http://www.youtube.com/watch?v=ULGN2UD7ovE
ध्वनी, पण यात तो धोनीचा काही
ध्वनी, पण यात तो धोनीचा काही सेकं चा पॉज नाही दिसतं.
>>धोनीची शेवटची सिक्स
>>धोनीची शेवटची सिक्स त्याच्या एक्स्प्रेशन्ससकट कुठे मिळेल बघायला. स्टार क्रिकेटच्या हायलाइटसमधे पण नाही दिसली.
its worth watching... dhoni's approach to his whole innings is in that "look". very subtle, very definitive, very determined, and very focussed! as they say "its all in the eyes" 
अगदीच कुठे नाही सापडली तर सांग.. क्लिप पाठवून देतो
To me another best moment is
To me another best moment is a big bear hugg by sachin to yuvi........ (around 16:40) it seems like the world stopped there for a moment!!! incredible... will bring tears in your eyes.. haven't seen sachin do this to anyone else in long long time. almost as if he was "looking" for that moement with yuvi the way he approached yuvi... too good for any words.
ईथे पहा:
www.cricketcrowd.com
(click on video link " dhoni leads india to world cup glory")
भाऊ या धाग्यावरची व्यंगचित्रं
भाऊ
या धाग्यावरची व्यंगचित्रं एका स्वतंत्र धाग्यावर टाका ... मस्त आहेत !!
गॅरी कर्स्टनचं तर लैच भारी !!! सकाळ ला पाठवा ताबडतोब
अगदी... भाऊ, गॅरी वरील
अगदी...
भाऊ,
गॅरी वरील व्यंगचित्रं अगदी "बोलकं"
तुमच्या व्यंगचित्रांनी अजून जास्त मजा आली... वातावरणही थोडं हलकं व्हायला मदत झाली दर वेळी.
१९८३ चा कप पाहिला.. तेव्हा कृष्ण धवल टिव्ही संचापुढे आम्ही ३० जण एकत्र बसलो होतो. (सर्वांकडेच नव्हते तेव्हा tv). तेव्हा १० वर्षाचा मी वडीलांच्या खांद्यावर नंतर बसून मस्त सोसायटी मध्ये नाचलो होतो..
त्यानंतर आता २०११ मध्ये लेकीला खांद्यावर घेवून नाचवायची ईच्छा होती. तिकडे मुंबईत ती तीन वर्षाची छकुली (माझी मुलगी) चक्क शेवटपर्यंत तीच्या आजोबांबरोबर सामना बघत होती... आणि सामना जिंकल्यावर पुन्हा एकदा त्यांनीच तीला खांद्यावर नाचवले.. मी ईथेच मनाने नाचून घेतले... ती भेटेल तेव्हा परत अॅक्शन रिप्ले करूच.
ईथे सामना चालू असताना मायबोलीवर अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते म्हणे. खरे आहे एकदा जीव लावला की बुप्रा वगैरे सर्व गौण वाटते. परवा पाक बरोबर "ईंडीया जिंकणार" असे ती पाक च्या विकेटस पडायच्या आधी म्हणत होती.
काल सकाळी आज श्रीलंका जिंकेल असे तीचे बोलणे चालू होते. लंकेचे २७५ झाले तेव्हा मी फोन करून म्हटलं "आज लंका जिंकली तर बाबा तुझ्याशी कट्टी करतील हा.. चालेल का?" यावर अर्थातच ती "नको नको.. मग ईंडीयाच जिंकेल" असे म्हणली आणि मग तोच जप कायम ठेवला.. 
गम्मत असते खरं... ती तसे म्हणली आणि ईकडे मला धीर आला...
(ही तीन वर्षाची चिमुरडी हातात प्लास्टीक ची बॅट आणि बॉल घेवून मोठ्या मुलांबरोबर मैदानात चक्क क्रिकेट खेळायला जाते आणि तेही प्रेमाने तिला खेळवात. तीनही पिढ्यांना या एका खेळाने घट्ट जोडून ठेवले आहे... अजून काय हवे?)
योग, ती लिंक चालत नाही.
योग, ती लिंक चालत नाही. तुझ्याकडे असलेल्या सर्व लिन्क टाक ना. मला तर पुर्ण सामना परत एकदा एकट्याने बसून बघावासा वाटत आहे. सचिन नि सेहवाग आउट झाल्यानंतर मला वाटलं की आता १०० च्या आत सर्व धडाधड पडतील. तो मलिंगा कसा खवार बॉलिन्ग करतो!
रच्याकने: काल द्रविड आणि
रच्याकने:
काल द्रविड आणि लक्षमण अण्णा पण दिसले नाहीत कुठे....
त्यांची आठवणच झाली नसेल
त्यांची आठवणच झाली नसेल मंडळाला. लक्ष्मण या नावातच हजारो वर्षांचा अन्याय आहे... कितीही चांगली कामगिरी करा, निष्ठा ठेवा..दुर्लक्ष ठरलेलंच
मंडळाचे जाऊदे हो... निदान
मंडळाचे जाऊदे हो... निदान प्रेक्षकात तरी...? त्यांना स्वखर्चाने देखिल तिकीट परवडण्याचा प्रॉब्लेम नसावा
मग गेले कुठे? अनुपस्थिती खूपच जाणवली.
जंबो होताच की प्रेक्षकात सहकुटूंब.
काल बरेचं जण नाही दिसलेत.
काल बरेचं जण नाही दिसलेत. कपिल देव पण नव्हते. जडेजा पण दिसला नाही.
(मुरली ला देखिल त्याच्या
(मुरली ला देखिल त्याच्या संघाने खांद्यावर घेवून एक फेरी मारायला हवी होती असे वाटतेल. आपल्या प्रेक्षकांनी नक्कीच त्याला सन्मान दिला असता. he deserved better send off!) >> त्याला अवॉर्ड दिले तेंव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या अधिक जोरात. तेंव्हा नक्कीच कौतुक केले असते.
सगळेजण वेगवेगळ्या टीव्ही
सगळेजण वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवर होते. जाडेजा होता की सहकुटुंब मैदानात. आधी एनडीटीव्हीवर होता. पण मुक्काम वानखेडेच्या बाहेर.कुठल्याशा गच्चीवर.
)
लक्ष्मण आणि द्रविड अजून 'माजी' झालेले नाहीत. ते कसे काय येतील? कुंबळे पण कर्नाटक क्रिकेट संघटनेचा पदाधिकारी .(हे कसे अमक्याच्या लग्नाला कोण कोण आले नाहीत, का आले नसतील.... सारखे वाटतेय
काल विजयाइतकीच संघभावना पाहून छान वाटले.
क्रिकेट वैयक्तिक कामगिर्यांचा सांघिक खेळ . तरी पण भारतीय संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी पूर्ण स्पर्धेदरम्यान केली. महत्त्वाचे म्हणजे बाद फेरीत कामगिरी उंचावली. प्रत्येकाने कुठे ना कुठे हातभार लावला. आपल्या 'कमकुवत' गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांना २६०-२७५ मध्ये रोखले....अगदी ऑसी/लंकेलाही.
जडेजा होता बहुतेक. मुलगा,
जडेजा होता बहुतेक. मुलगा, मुलगी दोघंही बरोबर होते त्याच्या.
असामी, सेमी फायनलला राऊंड मारला वाटतं मुरलीला खांद्यावर घेऊन ना?
पार्ल्याहून इथे: मला पण
पार्ल्याहून इथे: मला पण धोनीचा तो फोटो हावभावासकट पहायचा होता. मी ती षटकारची फित दहावेळा पाहिली पण मला त्याचे भाव पकडता नाही आले. वर लालूनी पाठवलेल्या लिंकमधे १३.५२ च्या वेळस ती लिंक थांबवून ठेवा मग ते भाव दिसतील. तशी मी त्याची जेपेग बनवली आहे. पण एक तीन सेकंदाचा तो काळ तिथेचं बघा.

ब्रेकिंग न्युज : धोनीचा
ब्रेकिंग न्युज : धोनीचा केशसंभार गायब.
कपिल इतर चँपियन कॅप्टन्स बरोबर सामन्यांवर कमेंट्स करतोय की. हे आयसीसीच्या सौजन्यानाने.
योग पाठवच रे लिंक. ध्वनीने
योग पाठवच रे लिंक.
ध्वनीने दिलेल्या लिंकमधे तो पॉज, ती नजर काहीच नाहीये.
अगदी अगदी... डोळे भरून आले
अगदी अगदी...
डोळे भरून आले होते काल युवी, धोनी, भज्जी, सेहवाग आणि साहेबांच्या डोळ्यात पाणी बघून...
कोहली अगदी नेमकं बोलला...
This Cup really meant a lot to them...
and to us too...
नीधप, ही १६ मिनिटांची लिंक
नीधप, ही १६ मिनिटांची लिंक पहा आणि १३ ते १४ मिनिटा दरम्यानचे दृश्य पहा. त्यात धोनीचा तो स्थिर पापण्यांचा चेहरा दिसेल.
http://www.youtube.com/watch?v=Q21TA4HHfM4
बी..धन्यवाद.. कितिहि वेळा
बी..धन्यवाद.. कितिहि वेळा पाहिले तरि समाधान नाहि होत..
या स्पर्धेतले काही योगायोग -
या स्पर्धेतले काही योगायोग -
(१) स्पर्धेची सुरूवात पहिलाच चेंडू सीमापार पाठवून झाली व शेवटही चेंडू सीमापार पाठवूनच झाला. स्पर्धेतल्या सर्वात पहिल्या चेंडूवर (बांगला वि भारत) सेहवागने कव्हरमधून चौकार मारला होता आणि स्पर्धेतल्या शेवटच्या चेंडूवर भारताच्याच धोनीने षटकार मारला.
(२) जयवर्धनेने कालच्या सामन्यापूर्वी एकदिवसीय सामन्यांत एकूण १३ शतके केली होती. ते सर्व १३ सामने श्रीलंकेने जिंकले होते. काल त्याने १४ वे शतक केले, परंतु, श्रीलंकेचा पराभव झाला.
(३) विश्वचषकाच्या इतिहासात १९७५, १९७९, १९९६, २००३ व २००७ मधल्या अंतिम सामन्यात ज्या संघाच्या खेळाडूने शतक केले होते तोच संघ विजयी झालेला होता (१९७५ - लॉईड, १९७९ - रिचर्डस, १९९६ - अरविंद डिसिल्वा, २००३ - पॉन्टिन्ग, २००७ - गिलख्रिस्ट). परंतु २०११ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या जयवर्धनेने शतक करूनही श्रीलंका पराभूत झाले.
(४) भल्याभल्या थोर फलंदाजांना आपल्या फिरकी गोलंदाजीने बाद केलेल्या मुरलीधरनला आपल्या आयुष्यातल्या अखेरच्या सामन्यात एकही बळी मिळाला नाही.
(५) २०११ चा विश्वचषक यजमान देशाने आपल्याच भूमीवर जिंकलेला पहिलाच विश्वचषक. यापूर्वी १९९६ मध्ये श्रीलंका सहयजमान असताना त्यांनी विश्वचषक जिंकला होता. परंतु अंतिम सामना लाहोरमध्ये झाला होता (म्हणजेच सामना श्रीलंकेच्या भूमीवर झालेला नव्हता).
(६) आयर्लॅन्डच्या केव्हिन ओब्रायनने या स्पर्धेत विश्वचषकाच्या इतिहासातले सर्वात वेगवान शतक झळकावले (इंग्लंड विरुध्द ५० चेंडूत शतक).
(७) या स्पर्धेतला सर्वात लहान खेळाडू म्ह़णजे कॅनडाचा नितिशकुमार (स्पर्धेच्या पहिल्या दिवशी त्याचे वय १६ वर्षे २७४ दिवस होते) व सर्वात वयस्कर खेळाडू म्ह़णजे कॅनडाचाच जॉन डेव्हिसन (स्पर्धेच्या पहिल्या दिवशी त्याचे वय ४० वर्षे २८६ दिवस होते).
(८) ऑइन मॉर्गन २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत आयर्लॅन्डच्या संघातून खेळला होता. २०११ च्या स्पर्धेत तो इंग्लंडच्या संघातून खेळला.
मास्तुरे, मला वाटतं काल
मास्तुरे, मला वाटतं काल लंकेनी पावर प्ले शेवटच्या पाच ओव्हर मधे दिला ते आपल्यासाठी फायदेकारक ठरले. काल झाहीरने २१ विकेट घेतल्याचा विक्रम केला. तो आणि अफ्रिदी आता बरोबर आहेत. दोघांच्या ए. दि. आ. मधे आता २१-२१ विकेट आहेत.
युवीची ती 'खास व्यक्ती'
युवीची ती 'खास व्यक्ती' म्हणजे सचिनच!
Pages