विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही टीम्स चांगल्या खेळल्या .सामना अगदी चुरसीचा झाला .भारताची शान राखल्याबद्दल टीम इंडियाला
धन्यवाद व अभिनंदन .सर्व जगातल्या भारतियांच अभिनंदन .

चला, शेवट गोड झाला...
यशासारखं दुसरं यश नाही आणि भारतिय कप्तानाच्या हाताला यश आहे ते ही उगाच नाही. सर्वांची कामगिरी उंचावण्याचं कारण धोनी आहे. टीका सहन करूनही नेहराला संघात घेणं, त्याच्याचकडून सेमी फायनल मधे कामगिरी करून घेणं, कोहली, रैना यांना संघात घेऊन विश्वास टाकणं, गंभीरला सातत्याने संधी देणं ... पराभव झाला असता तर हेच पब्लिक धोनीवर काय तुटून पडलं असतं ना ?

योवराज, धोनी, आणि सचिन सोडला तर इतर खेळाडूंना प्रोत्साहन, मानसिक आधार यांची गरज असते हे टीकाकार विसरले होते. झहीर या स्पर्धेत सुरूवातीपासून लयीत खेळत राहीला. मुनाफवर विश्वास टाकल्यानं ऐन मोक्याच्या क्षणी तो बहरात आला.

लग्न समारभात सर्व क्षेमकुशल बघत सर्व टेन्शन स्वतःवर घेणा-या नारायणासारखी धोनीची अवस्था होती. या प्रेशरखाली भलेभले खेळाडू कोलमडलेले असतांना पब्लिक विचारत होतं धोनीची बॅटींग कुठाय ? त्यांच्या नानाची टांग !!

काल दोन कप्तान संघाची गरज असताना ऐन वेळी खेळले .. ते म्हणजे संगकारा आणि धोनी. या खेळाडूंना फॉर्मात यायला वेळ लागत नाही. संगकाराची इनिंग ही खरोखर सुंदर होती. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूचा खेळही एन्जॉय करता आला पाहीजे. आता जिंकलोच आहोत म्हणून नाही तर काल श्रीलंकेच्या टीमचं खरोखर खूप वाईट वाटलं. मुरलीला कप देण्याचं त्यांचंही स्वप्न होतं आणि संपूर्ण स्पर्धेत त्यांनी चुकीचं काहीच केलं नाही. २७४ धावा ही देखील चांगली टोटल होती.

पण.. निर्णायक ठरली ती श्रीलंकेच्या डावातील पॉवरप्ले मधील षटकं. विशेषतः तीनपेक्षा कमी सरासरी मधे दहा षटकं निघून गेली आणि सेहवाग सचिन बाद झाल्यानंतर भारताच्या डावाची उभारणी केलेली गंभीरची अफलातून खेळी. तो फॉर्मात होता कि नव्हता याचं टेन्शन त्याच्या चेह-यावर कुठंच नव्हतं.. फक्त जिंकण्याची जिद्द आणि कमिटमेण्ट दिसत होती. माझ्या दृष्टीने कालचा मॅन ऑफ द मॅच गंभीरच होता.

आणि सर्वात शेवटी धोनी.... टीकाकार आता कुठंतरी गल्लीत जाऊन लपून बसले असतील. संघातील खेळाडूंना तू जसा धीर देतोस तसाच त्यांनाही दे आणि खिलाडूवृत्तीचं दर्शन घडव...!!!

संपूर्ण संघाने सचिनला खांद्यावर बसवून फेरी मारली तो क्षण खरंच डोळ्यात पाणी आणवणारा होता. कुठंतरी भावना शिल्लक आहेत हे काल डोळे पुसताना जाणवलं...आणि खरंच बरं वाटलं !!

जय हो !!!

विराट कोहलीचे शब्द डोळ्यात पाणी आणणारे होते.

तो म्हणाला,ज्याने २१ वर्षे क्रिकेटचं ओझं भारतासाठी आपल्या खांद्यावर वाहीलं आहे,आज त्याला खांद्यावर उचलून आनंद साजरा करण्याचा क्षण आहे.

१९८३ च्या विश्वकपात आणि या विश्वकपात प्रेक्षकांमधला महत्वाचा फरक म्हणजे...

त्या वेळी बघणारे बहुतेक सर्व (पुरूष) प्रेक्षक हे मैदानावर क्रिकेट खेळलेले असायचे. मैदानं त्या वेळी उपलब्ध होती. आताच्या पबिलकने हाफ पीच किंवा रस्त्यावर क्रिकेट खेळलेलं असतं. कॉलेजमधे जे खेळले ते अपवाद सोडून...

पण आताचं पब्लिक लिहीतं लई जबराट ..!!

यश पण एक वेगळीच चीज आहे.
आज अनेक ब्लॉग्स / वृत्तपत्रे वाचत होतो. जे समिक्षक / स्तंभलेखक ढोनी/ भारतीय संघ / निवड समिती यांच्यावर सणकुन टिका करायची तिच मंडळी संघची स्तुतीसुमने रकानेच्या रकाने भरुन लिहित आहेत.

आता विश्वकप जिंकल्यावर खेळाडूंनी पवारांना ठणाकावून सांगायला हवं... एका महास्पर्धेनंतर ऐन उन्हाळ्यात ४०+ तापमानात लगेचच आयपीएल... हे अति होतंय !! बास्स करा. खेळाडू आहेत, रोबो नाहीत ते .

हे अति क्रिकेट कुणासाठी आहे ?

बुकींचा अंदाज होता भारत ३ ते ४ धावांनी जिंकणार..

काल जिंकायला चार धावा हव्या होत्या आणि छक्का बसला... भारत ३ धावांनी जिंकला !!!

<<साला नेहमी नेहमी त्या ८३ च्या वर्ल्डकपचं टुमणं ऐकत आलो..
आला आमच्याही पिढीत वर्ल्डकप आला........................................ साला !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! >>
येस्स ! अगदी अगदी ! Happy

<< साला नेहमी नेहमी त्या ८३ च्या वर्ल्डकपचं टुमणं ऐकत आलो..
आला आमच्याही पिढीत वर्ल्डकप आला............ साला!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! >> अरे, आनंद घ्या ना या यशाचा; कशाला उगीचच खेचता जुन्या पिढीला यांत !

wc1983.JPG

भाऊ...

Biggrin

मागची पिढी,आत्ताची पिढी,पुढची पिढी ..सगळे मिळून हा आनंद साजरा करु या...

Circle_of_Dancing_Smiley_Faces.gif

team batting 2nd has only won 2 of 8 finals. The highest 2nd innings total in a final is 274 (Aus v. WI in 1975 off 60 overs). Aus lost.....

आकडेवारी भारताच्या बाजूने नसतानाही भारत जिंकला. इतके सामने चांगले न खेळून सुध्दा धोनी ने शेवटच्या सामन्यात मॅच विनिंग खेळी केली. थोडक्यात प्रत्येक सामना हा नवीन असतो. इतिहास फक्त मनावर गारुड करतो. Happy

What a way to win this match.... Happy सामना संपल्यावर लोकांनी आणि खेळाडूंनी जे सेलिब्रेशन केलं त्याला तोड नव्हती. खास करून सचिनला खांद्यावर घेऊन जी विक्टरी लॅप मारली तेव्हा खरच डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. जे लोक फिक्सिंग फिक्सिंग म्हणून ओरडत होते त्यांना एकच सांगावसं वाटतं, कि हे भाव बघून खरच वाटतं कि ही लढत फिक्स असेल म्हणून? हे लोक खेळाडू आहेत, अ‍ॅक्टर नाहीत Happy

ते काहीही असू दे!! मला एका गोष्टीचा अभिमान वाटतोय कि जिंकले गेलेले दोन्ही सामने माझ्या हयातीत झालेत. १९८३ च्या वेळी मी फ्क्त ६ वर्षाचा होतो आणि जास्त काही कळत नव्हते पण आजचा सामना मरेपर्यंत माझ्या मनावर जसाच्या तसा कोरला गेलेला असेल Happy

सर्व माबोलीकरांना - ज्यांनी प्रतिकुल परिस्थितीतही आपल्या संघावरचा विश्वास ढळू दिला नाही - त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन Happy

पुन्हा एकदा सगळी इनिंग दाखवतायत आणि पुन्हा एकदा पाहण्याचा आनंद काय महान आहे!! Happy
स्टार स्पोर्ट्स वर दाखवतायत.

भरत मयेकर | 31 March, 2011 - 15:10

कालची मॅच टीव्हीसमोरून न हालता पाहिली. माबोला कुलूप. आज 'त्या' धाग्यावरच्या कमेंट्स वाचताना खूप मनोरंजन झाले. शिव्या आणि काय काय!
काल मुनाफ पटेल बर्‍याच लोकांना रणवीर कपूरसारखा आणि नेहरा शाहिद कपूरसारखा वाटायला लागला.(ज्याने त्याने आपल्याला हवे ते नाव घालावे).

वर्ल्डकप संपल्यावर हेंगोव्हर उतरण्यासाठी प्रत्येकाने या तिन्ही धाग्यावरच्या स्वतःच्या सगळ्या पोस्ट्स वाचून त्या पोस्ट्सचे अ‍ॅनालिसिस करावे

Lol

एक सतरा वेळा बघितली असेल धोनीची सिक्स! ती सिक्स मारताना युवराज नॉन स्ट्राईक ला होता आणि तो बॉल पडायच्या आधीच दात ओठ खाऊन, डोळ्यात पाणी आणून मान हलवत होता!!
अप्रतिम!!! एक एक क्षण परत परत बघून आणखिनच अभिमान वाटतो.

काल नेहरा अगदी एक सेकंदचं दिसला मला आणि मग कप मेमोंटो घेताना. कुणी म्हणतं मुनाफ हा अक्षय कुमार आणि हृथिकचे मिश्रण दिसतो.

काहिहि/कसही असले तरि भारत जिंकला यात आनंद आहे. साहेबांच्या हातुन चषक दिला गेला. Wink खरेतर पहिल्यांदा चषक साहेबांच्या हाती आला - खरे मानकरी .:डोमा:

असो. विजयानंतर जे उधाण आले उत्साहाचे, भारतप्रेमाचे ते पाहुन बरे वाटले. पण हे भारतप्रेम फक्त क्रिकेट पुरतेच मर्यादित आहे याचे वाइटही!

डॉ. कैलासजी , तुम्ही पोस्ट केलेल्या फोटोंबद्दल धन्यवाद. कालच्या संदर्भातलं कांहीही पाहिलं तरी ऊर आनंदाने व अभिमानाने भरून येतो !!!

भिब्ररा तुमची ८:१९ची पोस्ट आवडली.

धोनीने सगळ्यांच्या तोंडातले प्रश्न अगदी घशात हात घालून काढून घेतले आणि कुस्करून पुन्हा त्याच तोंडांत कोंबून सगळी तोंडे बंद केली.

आज पण इथे शिव्या किंवा तत्सम शब्द वाचायला मिळाले. काही तर सचिनबद्दल. कोणत्या अँगलने तो दडपण घेऊन खेळताना दिसला? महत्त्वाच्या सामन्यांत तो चालत नाही अशा टेपा बाहेर आल्या की नाहीत? त्याच्या खेळीचे आणि संघात असण्याचे महत्त्व त्याच्या सहकार्‍यांपेक्षा जास्त कुणाला कळेल?

भारतीय उपखंडात झालेल्या स्पर्धेत सर्वाधिक बळी एका भारतीय वेगवान गोलंदाजाने घेतले. तरी आम्हाला आपलं डेल स्टेनचं कवतिक.

असो.विजयाची गुढी उभारू चला.

बिस्मिलाह इर रेहमान इर रहीम....

हमारे सभी बच्चे अच्छे खेले. माही ने कमाल दिखाया. जहीर ने भी अच्छा किया. गौतमनेभी कमाल दिखाया . सभी अच्छे खेले. इन्शा अल्लाह हम ऐसेही जीतते रहेंगे. अल्लाहका शुकर है. Proud

धोणी चा विजयी षटकार... कायमचा स्मरणात राहील
धोणी -"द ग्रेट गँबलर". (Fortune favors the Brave!)
रामदास स्वामींचे शब्द खरे केले: ऐकावे जनाचे करावे मनाचे!

दादा दर वेळी समालोचन करताना म्हणायचा की धोणी ने स्वत:ला ४/५ क्र. वर पाठवावे. तो थोडा सेट व्हायला वेळ घेणारा खेळाडू आहे पण एकदा सेट झाला की तो मॅचविनर आहे.
तसे त्याने ऑसी,पाक,ईंग्लंड वि. केले पण तो फेल गेला (अर्थात षटके कमी शिल्लक होती). तरिही काल पुन्हः स्वताच्या हुनर वर विश्वास ठेवून सर्व प्रेशर, टीका ई. ची तमा न बाळगता जो डाव त्याने खेळलाय त्याला तोड नाही. सर्वार्थाने खरीखुरी कॅप्टन ईनिंग. (तुलना बरोबर ठरणार नाही पण १९८३ मध्ये जसे कपिलने खेळी केली तसेच.). शेवटच्या तीन सामन्या आधी दोघा तीघांच्या कामगिरीवर अवलंबून असलेला संघ नंतर प्रत्त्येक सामना सांघिक खेळाच्या बळावर जिंकला आणि ईथेच आपला विजय झाला.
गंभीर च्या जागी पठाण असावा असे मलाही वाटत होते पण गंभीर ने पुन्हा एकदा संघातील त्याचे स्थान आणि महत्व सिध्ध करून आम्हा सर्वांना खूश केले. शिवाय सन्नीभाय म्हणतो तसे श्रीशांथ "लकी मॅस्कॉट" या पदवी ला जगला- त्या अर्थाने संघातील त्याचा समावेश सार्थकी लागला Happy
ऐन मोक्याच्या वेळी विरू आणि साहेब पडले पण बाकी वीरांनी जबरदस्त चढाई करून गड जिंकला. भारतीय क्रिकेट च्या भवितव्याच्या दृष्टीने ही फार मोठी आणि सुखदायक गोष्ट आहे. भारतीय संघाला आता विजयाची खरी चटक लागेल.

अशा चटक लागलेल्या अन भविष्यात हे मोठ्ठे ओझे खांद्यावरून ऊतरवलेल्या सचिन, विरू, धोणी आणि कंपनीला खेळताना बघायचे आहे. सचिन ची आता भविष्यातील प्रत्त्येक खेळी "बिंधास्त" प्रकारातील असेल आणि त्याची मजा काही औरच असणार... तेव्हा "ये दील मांगे मोअर" Happy

(कांगारू सावधान ! क्रिकेट खेळातील सर्वोच्च बहुमानाचा आणि यशाचा मुकूट डोक्यावर चढवून एक करोड भारतीय व जगातील सर्व भारतीयांच्या हृदयावर अधिराज्य करणारे आता "छत्रपती" येतायत!)

मायबोलीकरांबरोबर ही संपूर्ण स्पर्धा आणि अंतीम सामना बघायचा आनंद शब्दातीत आहे. ईथे लिहील्या गेलेल्या सर्व बर्‍या, वाईट, सकारात्मक, नकारात्मक, प्रसंगी कटू अशा शब्दांतून मात्र दर वेळी भारतीय संघाकडून असणारी विजयाची अपेक्षा अन खेळाडूंवर जीव लावण्याची भावना समोर येत होती. विश्वचषक भारतानेच जिंकावा असेच सर्वांना वाटत होते हे नक्की. असो. मायबोलीच्या कारकिर्दीतील हाही एक यशस्वी टप्पा आणि आम्ही त्याचे जिवंत साक्षीदार ! अजून काय हवे ?
----------------------------------------------------------------------------------
रच्याकने: कालची एक रात्र हा अख्खा संघ झोपला नसेल (आनंदोत्सवात) आणि उर्वरीत आयुष्य ते सर्वजण विशेषतः सचिन शांतपणे झोपतील.
काल सामन्यानंतर मांजरेकर च्या प्रश्णाला ऊत्तर देताना सचिन म्हणला: आमच्यावर टीका करणार्‍या आणि आमच्या क्षमतेबद्दल संशय व्यक्त करणार्‍या सर्वांना आम्ही आता प्रत्त्युत्तर दिले आहे! असे म्हणून सचिन पाठ फिरवून दुसरीकडे गेला.. त्या आधी त्याच्या चेहेर्‍यावरचे भाव बरेच काही सांगून गेले.

तेव्हा आपल्यासाठी मोठ्ठी शिकवणः शब्द जपून वापरावेत आणि कुणी कितीही टिका केली वा परिस्थिती तुमच्या विरुध्ध असली तरिही, स्वताच्या हुनर अन क्षमतेवर कधीच संशय घेवू नये.

धोनीने सगळ्यांच्या तोंडातले प्रश्न अगदी घशात हात घालून काढून घेतले आणि कुस्करून पुन्हा त्याच तोंडांत कोंबून सगळी तोंडे बंद केली
>>>
मायबोलींकराबद्दल बोलताय का तुम्ही मयेकर? मग बरोबर आहे....

कोणापेक्षाही धोनीलाच क्रिकेट जास्त कळते हे सिद्ध झाले....

Pages