Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्हेज बनाना केक ची कृती? इथे
व्हेज बनाना केक ची कृती?
इथे काही लिंक्स आहेत : http://www.maayboli.com/node/2589
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/122019.html?1186501471
बनाना अँड आलमंड टी लोफ -
बनाना अँड आलमंड टी लोफ - http://www.maayboli.com/node/2589
लो कॅल बनाना केक - http://www.maayboli.com/node/19456
दोन्हीमधे अंडी घातलेली आहेत.
मला सोया चंक्सच्या पाककृती
मला सोया चंक्सच्या पाककृती हव्या आहेत. कृपया कोणीतरी लिहा, नाहीतर लिंका द्या.
मंजूडी जुन्या माबोवर ही लिंक
मंजूडी जुन्या माबोवर ही लिंक मिळाली : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/113854.html?1152753549
मला फिरनि कशि करतात ते हवं
मला फिरनि कशि करतात ते हवं आहे (तांदुळाच्या खिरिचा एक प्रकार)
फिरनी :
फिरनी : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103368.html?1139851589
अकु, त्याशिवाय काही दुसर्या
अकु, त्याशिवाय काही दुसर्या असतील तर प्लिज दे..
मिनोतीची आहे ना एक बनाना
मिनोतीची आहे ना एक बनाना केक्/ब्रेडची पाकृ इथे..
http://vadanikavalgheta.blogspot.com/2009/09/three-versions-of-banana-br...
मंजूडी : ब्राऊन राईस वुईथ
मंजूडी :
ब्राऊन राईस वुईथ बेबी कॉर्न, सोया चंक्स
http://www.patrika.com/recipes-inner.aspx?intRID=622
पालक दाल सोया
http://www.patrika.com/recipes-inner.aspx?intRID=531
सोया पालक दिलरूबा
http://in.jagran.yahoo.com/sakhi/?page=article&choice=print_article&cate...
सोया चंक्स पॅटिस : http://www.loksatta.com/lokprabha/20091120/chef.htm
मागे एकदा मायबोलीवर शेपु+पालक
मागे एकदा मायबोलीवर शेपु+पालक वापरुन केलेल्या कबाब/कट्लेट सदृश पदार्थाची कृती वाचली होती..तो धागा कोणीतरी द्याल का प्लीज?..मी खुप शोधली पण सापडत नाहीये.. प्लीज!
ह्या धाग्यावर शेपूच्या
ह्या धाग्यावर शेपूच्या बर्याच कृती आहेत. इथे बघितलत का ?
कुसुमिता, तुम्हाला ही रेसिपी
कुसुमिता, तुम्हाला ही रेसिपी हवी आहे का?
फ्रिटर्स-
http://www.maayboli.com/node/21457
सिंडरेला आणि लालू धन्यवाद!
सिंडरेला आणि लालू धन्यवाद! लालू हीच रेसीपी हवी होती.. पण मला का कोण जाणे यात पालक पण घालायचा असं वाटत होत.. दोघीनाही थँक्स पुन्हा एकदा..
अगदीच बावळट प्रश्न
अगदीच बावळट प्रश्न विचारतेय....
(खर्या कैरीच्या) पन्ह्याचं घट्ट करून ठेवलं तर ते फ्रिजरमधे मुंबईत आणि या उन्हाळ्याच्या दिवसात किती टिकेल? साखरेशिवाय नुसता शिजवलेला पल्प टिकेल का?
ह्या काकूंच्या रेसीपी छान
ह्या काकूंच्या रेसीपी छान असतात, कोणाला हवे असल्यास पहा.
एकतर त्या मस्त मराठीत बोलतात त्यामुळे पहायला तरी बरे वाटते.
http://www.youtube.com/watch?v=-5-KEayyap4
नीधप, माझी आई तसे मिश्रण
नीधप,
माझी आई तसे मिश्रण शिजवूनच ठेवते. अगदी मुरंब्यावर जाईल एवढे नाही शिजवायचे. आणि फ्रिजमधे आठ दहा दिवस टिकते. जास्तहि टिकेल, पण तेवढे केले जात नाही.
साखरेशिवाय जर पल्प ठेवायचा असेल, तरी तो थोडा आटवून ठेवायचा. नक्कीच राहतो.
बाजारात, पन्ह्याची तयार पाकिटे पण मिळतात. असाच आठवलेला पल्प असतो. एक ग्लास पन्हे होते त्यापासून. त्याची चव अगदी घरगुति असते.
ध्वनी, बघितला मी तो व्हीडिओ.
ध्वनी, बघितला मी तो व्हीडिओ. छान वाटला. आता बाकिचे घरी जाऊन बघीन.
दिनेश, अच्छा. मला मस्त वाटते
दिनेश, अच्छा. मला मस्त वाटते त्यांच्या सादरीकरणाची पद्धत.
आपण वर्ल्डकप जिंकत असतानाच
आपण वर्ल्डकप जिंकत असतानाच माझं पन्हं करून झालं पण. पूनमने सांगितल्याप्रमाणे एक चटका देऊन केलंय. मस्त झालंय. या प्यायला.
मदत मदत पट्कन हवी
मदत मदत पट्कन हवी आहे.
खव्याच्या पोळ्यांचा बेत आहे आज माझ्याकडे पण खवा भाजुन कोमट असताना त्यात साखर घातली,पिठी साखर पण त्याचा गोळा नाही झाला, रव्यासारख सारण तयार झालं...आता काय करु?
अरे कुणी मदत करा रे....
अरे कुणी मदत करा रे....:(
माझा एक प्रश्नः लो़खंडाच्या
माझा एक प्रश्नः लो़खंडाच्या कढईमधे पापड्,भजी तळले तर चालते का?
जरा वेळ फ्रीझमध्ये ठेवून बघा
जरा वेळ फ्रीझमध्ये ठेवून बघा घट्ट होतय का.
ठेवुन बघते. पण ते अस कस
ठेवुन बघते.
पण ते अस कस झालं? खवा चांगला नसेल काय?
रचू, सारण कोरडे झालेय ना ?
रचू, सारण कोरडे झालेय ना ? त्यात थोडे कोमट दूध शिंपडून बघता येईल. आधी हा प्रयोग, थोड्याच सारणावर करायचा.
पीहू, नक्कीच चालते, पण उरलेले तेल वापरायचे नाही. जास्त तेल वाया जाऊ नये म्हणून आमच्याकडे अगदी छोटी लोखंडी कढई वापरतात. त्यात पूर्ण पापडही तळता येत नाही. चार तूकडे करुनच तळतो. पण तेल फार घालावे लागत नाही, आणि वायाही जात नाही.
मला ब्रोकोलीच्या रेसिपी हव्या
मला ब्रोकोलीच्या रेसिपी हव्या आहेत, १-२ सोप्या असतील तर सान्गा ना.
दीपा
दीपा, कृपया ह्या लिंका बघा :
दीपा, कृपया ह्या लिंका बघा : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/106482.html?1142965395
http://www.maayboli.com/node/23980
धन्यवाद दीनेशदा ,तळलेले तेल
धन्यवाद दीनेशदा ,तळलेले तेल मी ही कधीच नाही वापरत ,टाकुन देते.
मी परवा केप्र चा मालवणी मसाला
मी परवा केप्र चा मालवणी मसाला आणलाय. कशाकशात वापरावा बरं? काही स्पेशल व्हेजी पदार्थ आहेत का ज्यात वापरता येईल?
सावनी, उसळी, बिरड्यांमध्ये
सावनी, उसळी, बिरड्यांमध्ये चांगला लागतो.
Pages