पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ढेमश्याच्या खुप सार्‍या पाककृतींची माहीती दिल्याबद्दल सर्वांचे मनापासुन आभार! आज केली होती भाजी..खुप आवडली!

ढेमश्याच्या खुप सार्‍या पाककृतींची माहीती दिल्याबद्दल मंजू डी, अ.कु. आणि दिनेशदांचे मनापासुन आभार! आज केली होती भाजी..खुप आवडली!

अल्पना! रुनीच तिरामिसु करता येईल का? कंडेन्स्ड मिल्क घालुन मनस्वीनीची झटपट रवा लाडु ची रेसिपी आहे. मस्त होतात लाडु!

दिनेशदा, लाईफलाईन सपोर्ट करीत असल्यासारखे ... पाच मिनिटांत उत्तर!
इथे मायबोलीवर रेसिपी सर्च करता येईल?

एक कानडी पदार्थ खाल्ला होता- तांदूळ, हरबरा डाळ आणि दाणे रात्रभर भिजवायचे, सकाळी उपसून वाटायचे आणि नंतर वाटली डाळ/ कणसाची डाळ करतो तसे खूप परतायचे. फार भारी लागतो तो प्रकार. मला कोणी ह्याचे नाव आणि घटक पदार्थांचे प्रमाण देऊ शकेल?

मला कोकणाची भेट म्हणुन राताम्बे मीळाले आहेत. जवळ जवळ २-३ कीलो त्याचे कोकम सरबत आणी
ईतरही पदाथ कसे करायचे ते कुणी सान्गेल का ?

कमल. इथे आहे तो प्रकार.
रातांबे नीट पिकले कि आडवे कापून दोन भाग करायचे. आतला पांढरा भाग खायला वापरायचा. त्याला सूटलेला रस वेगळा ठेवायचा. हा आतला भाग चांगला गोड लागला पाहिजे, म्हणजे रातांबा पिकला असे समजायचे.
आता एक काचेची बरणी घेऊन त्यात तळाला थोडी साखर घालायची. मग रातांब्याच्या प्रत्येक वाटीत साखर घालून ती त्यात रचत जायची. वर बाजूला ठेवलेला रस टाकायचा. मग परत वर साखर टाकायची. मग हि बरणी दादरा बांधून उन्हात ठेवायची. त्याला रस सुटतो तेच अमृत कोकम. त्यात चवीप्रमाणे मीठ, जिरेपूड व पाणी घालून प्यायचे. रस काढून घेतल्यावर मुरलेली कोकमे पण खायला गोड लागतात. हे सरबत मग हवे तर वेगळ्या बाटलीत भरुन ठेवायचे. वेळ असेल तर सालीचे तूकडे करुनही हे करता येते. त्याला लवकर पाणी सुटते.

आतला पांढरा भाग खायला वापरायचा

दिनेश, कसा खायचा तेही सांगा ना तिला, नाहीतर पिवळेजर्द दात लपवत बसावे लागेल तिला...:P

हो, दात खुप आंबतात रातांब्याने. तो पांढरा भाग लागतो छान पण थेट जीभेवर ठेऊन खायचा. दातांना स्पर्श झाला तर दात खुप आंबतात. माझ्या पुढच्या दातांवर तर पिवळे रोगण जमा व्हायचे.

आ आ करत वर बघायचे, मग कुणाला तरी तो भाग अलगद तोंडात टाकायला सांगायचे, आणि मग ते गिळून टाकायचे. चव कळे कळेतो, तो गर पोटात गेलेला असतो.

रातांब्याच्या बियांचं आजी एक भन्नाट सरबत करते, पण ते ताजं ताजंच चांगलं लागतं. बिया पाण्यात घालून ठेवायच्या. मग थोड्या वेळाने पाणी गाळून घ्यायचं, एखादा ताजा रातांबा बारीक चिरून घालायचा. चवीप्रमाणे साखर, मीठ घालायची आणि एक हिरवी मिरची बारीक कापून घालायची. एकदम भन्नाट चव लागते. पण हे सरबत करून ठेवता येत नाही, बियांची तुरट चव उतरते.

कमल, बियांचा तसा काही उपयोग नाही.
त्या फोडून, पाण्यात उकळून त्यापासून तेल काढतात. तेच मुटीयाल. पायांच्या भेगांवर उत्तम औषध. काहि वेळा ते खाण्यासाठी पण वापरतात. हे तेल रुम टेंपरेचला देखील घट्ट असते.

दिनेशदा कमळबिया मागच्या आठवड्यात काकांनी आणल्या होत्या. त्या आम्ही कच्च्याच फोडुन खाल्या.

कमल, बियांचा तसा काही उपयोग नाही.
दिनेशदा कमळबिया मागच्या आठवड्यात काकांनी आणल्या होत्या. त्या आम्ही कच्च्याच फोडुन खाल्या.>>>> Lol

सॉरी. पण जागू, दिनेशदांनी कमलला उद्देशून पोस्ट लिहीली आहे. कमळबियांबद्दल लिहीलेले नाही. Lol

Lol

प्राची Lol

खांडसरी साखर साध्या साखरेला पर्यायी म्हणून वापरावी कि गुळाला पर्यायी म्हणून? अर्धा किलो आहे घरी. ती एरवी गरम तुपात घालून साध्या भाताबरोबर किंवा फुलक्याबरोबर खायला फक्त वापरली जाते. पण आता उन्हाळ्यामूळे घी-शक्कर खाणं कमी झालंय.

मला पण नक्की माहित नाही. बहूदा गुळ आणि साखर यामधली फेज असणार. माझ्याकडे जी आहे तिला इथे आणि सासरी शक्कर म्हणतात. दिसायला गुळाच्या पावडरीसारखी दिसते आणि चव थोडीशी गुळासारखीच आहे. आईला फोनवर वर्णन करुन सांगितल्यावर तिने ही बहूदा खांडसरी साखर असेल असं सांगितलं, पण तिलाही याची फक्त ऐकून माहिती आहे, कधी वापरली नाहीये.

ओके.

प्राची Lol

दहीपोहे करायला खूप सोप्पे आहेत साक्षी.... जाडे किंवा पातळ पोहे + दही + मीठ + साखर + बारीक चिरलेली हिरवी मिरची / खारातली मिरची / तळलेली मिरची ( आवडीप्रमाणे आणि हवी असेल तरच) + चिरलेली कोथिंबीर.

काहीजण वरून जिरे, कढीपत्ता, भिजवलेली हरभरा डाळ व सुक्या लाल मिरच्यांची फोडणी घालतात. दह्यात बाकीचे सर्व घटक पदार्थ घालून, ते घुसळून (मीठाखेरीज - मीठाने दही जरा आंबट होते असा अनुभव आहे) फ्रीजमध्ये गार करून ठेवता येते व भिजवलेल्या पोह्यांमध्ये हे दही घालायचे व खादडश्चमे!!! सर्व घटकांचे प्रमाण आवडी व चवीनुसार घ्यायचे.

दही पोह्यांच्या कृतीत बरीच व्हर्शन्स आहेत, पण ही आपली मला ठाऊक असलेली सोप्पी पध्दत.

Pages