पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनोतीची किन्वा मसालेभात्/खिचडी/पुलावाची रेसिपी सापडतेय का कुणाला? मला मिळत नाहीये. तुम्हाला मिळाली तर प्लीज इथे लिंक द्या.

http://www.maayboli.com/node/22575 इथे आहे खुब्यांची रेसेपी.
जागूने माशांच्या बर्‍याच रेसेपी लिहिल्या आहेत.

मालवणी मसाला + काळ मीठ + लिंबाचा रस हे कॉम्बीनेशन मी चुरमुर्‍याच्या चिवड्यासाठी वापरते.. एकदम यम्मी

कच्च्या करवंदाच गुळ घालुन जे गोड लोणचं [तात्पुरतं] करतात [यात थोड तिखटही असतं] ते कसं करतात कोणाला माहीत आहे का?

माझी आजी हे लोणचं या दिवसात नेहमी करायची पण मी रेसिपी शोधायला लागले तर सगळ्या तिखट लोणच्याच्याच म्किळाल्या,

आईला फोन लागला Happy कृती मिळाली Happy

थँक्स लालू, प्रज्ञा. स्नेहश्री चिवड्याचं कॉम्बो वाचूनच तोंपासु. करून बघायलाच पाहिजे.

नाचणीचं सत्व कसं काढायचं ? मायबोली वर र्पुवी सांगितलं होतं कुणीतरी, मी शोधलं पण मिळाली नाही रेसीपी.
कुणाला माहीत असेल तर सांगा.

घरच्या घरी सुपारीविना सुपारी ची रेसिपी आहे का इथे ? रोज जेवणानंतर आपण खातो ती. मी करते घरी त्यात बडीशेप, ओवा, लवंग, वेलची, ज्येष्टमध, काळे मीठ हे सगळे घालून करते. पण मला खूपच टेस्टी सुपारीची रेसिपी हवी आहे, जशी बाहेरची मुखवास वगैरे असते तशी.

कृपया मला कॉर्नमील वापरुन (ब्रेड व मफीन सोडुन)काय काय बनवता येईल, हे सुचवा व जमल्यास त्या पाककृती द्या.

नाचणीचं सत्व कसं काढायचं

माझी आई आदल्या रात्री नाचणी भिजत घालते. दुस-या दिवशी ती मिक्सरवर वाटुन तिचे दाटसर दुध काढुन ते टोपात घालुन ठेवुन देते तासभर. तासाभराने खाली जो साका बसतो तो वरचे पाणी अलगद काढुन घेऊन वेगळा करते. हा साका दुधात घालुन, चमचाभर साखर घालुन थोडे उकळले की माझ्या मुलीचा आवडता ब्रेफा तय्यार (वय सहा महिने ते आज वय वर्षे १६ पुर्ण झाल्यावरही त्याच आवडीने खाते). नुसताच साका टोपात घेऊन गॅसवर ढवळत बसल्यास थोड्या वेळाने गच्च गोळा होतो. याच्या शेवया पाडुन त्या नारळाच्या दुधात घालुन शिरवाळ्या म्हणुनही लेकीला चालतात. आईने एकदा असे लाडुही केले होते, फक्त्स ते लव्कर संपवावे लागले.

कसा वाळवायचा? ताटात पसरुन वाळवायचा काय? मला प्लेस्टिकवर खायच्या वस्तु ठेऊन त्यांना उन्हात गरम करायला जीवावर येते. आपण इथे भारतात वापरतो तो प्लॅस्टिकचा कागद फुडग्रेडचा नसावा बहुतेक.

हो ताटातच वाळवायचा. तो तर नो फ्रॉस्ट फ्रीजमधेही वाळतो. त्याचा वड्या पडतात, मग कुटून ठेवायचा.
कुठलीही प्रिंट केलेली पॉलिथीन शीट, फूड ग्रेडची असू शकत नाही. जरी एका बाजूने प्रिंट केले असेल, तर ज्या बाजूचा थेट अन्नपदार्थाला स्पर्श होतोय, ती बाजू लॅमिनेट केलेली असावी लागते. आपल्याकडे हा नियम नाही पाळत बहुदा.

मला कोणी बिस्कीटं घालुन dessert कसा करायचं सांगा. घरातील पदार्थ वापरुन. बाहेरुन फार काहि न आणता.......

दीपाकुल :

घरगुती डेझर्ट :

मारी बिस्किटं + साय/ क्रीम + साखर + आवडणारा सुका मेवा ( काजू, बदाम, खारीक इ.) चा चुरा मिक्सरमधून काढायचा.... फ्लेवर हवाच असेल तर कोणतेही सिरप घालायचे (ऑरेंज, रोझ, मँगो, केशर इ.), फ्रीजमध्ये गारेगार करायचे, सजवताना वरून सुका मेवा भुरभुरायचा आणि गट्टंस्वाहा....
सुका मेवा, सिरप ऐवजी तुम्ही कोको पावडर/ ड्रिंकिंग चॉकलेट व चॉकलेट सिरपही वापरू शकता.

दीपाकुल. लेमन आणि मुळ - दोन्ही तिरामिसूच्या पाकृ वाच की..

सॉरी, मी तुझे 'घरातले पदार्थ वापरुन' हे पुढचे वाक्य वाचले नाही.

वरच्या तिरामिसु मध्ये लागणारे मस्कारपोने चिज आणि लेडीफिंगर इथे कधी मिळतील त्याची मी वाट पाहतेय... Happy

तोषवी, विनोदाने नाही लिहित, पण जे तयार पनीर चिली मिक्स मिळते, त्याने छान चव येते.
अगदी नेमक्या प्रमाणात घटक असतात त्यात.

Pages