मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहाहा अगदी सहीये.. इतक्या वेळा झालंय आणि अगदी अस्सच वाटतं कि आता अदृश्य होता आलं तर ...भल्ली मोठी लिस्ट देता येयील इतके मुले बंड होत चाललेय..

नवरा मुलांसाठी बाल गोकुलम/संस्कार वर्ग होतात तिथे गेम्स आणि योगा घेतो (मोठ्यांची योग शाखा पण घेतो त्यामुळे सगळे अगदी अदबीने बघतात) , मोठा मुलगा (व.व. ६) हि जातो तिथे .. नवर्याने गेम्स चालू करायच्या आधी सगळ्यांना सांगितले आज सूर्य नमस्कार करणार आहे आणि मग गेम्स सुरु करू.. तर मुलगा सगळ्यांना ऐकू येयील अशा आवाजात बाजूच्या मित्राला म्हणतो ...
Surya namaskar how boring .. we do that at home too.. not fun at all !!!! (तरी बरं रोज व्यायाम हि करायला सक्ती नसते. कधी तरी जानेवारीत सूर्य नमस्कार घालतात म्हणून ५ दिवस फक्त घरी त्याने surya namaskar केला असेल )
योगा मास्तुर, पोराचा बाप अगदी गोरामोरा झाला होता. Happy

दुसरा मुलगा तर कुठे काय बोलेल काहीच भरवसा नसतो आणि एकदम ऑफ बीट ठिकाणी..
एकदा क्लिनिक मध्ये त्याला बर नाही म्हणून घेवून गेलो ..तो आजारी होता.. घरी बर्या पैकी झोपून वगैरे होता क्लिनिक मध्ये जावून जरा चेंज मिळाला म्हणून कि काय ५-१० मीन ताजा तवाना झाला बहुतेक..
बाजूला एक काळा माणूस बसला होता.. मोठे केस जरा विचित्र वाटला.. पण आमचं लक्ष गेलं नाही कारण आम्ही फॉर्म वगैरे भरत होतो ..बाकी मुल कोणी दंगा करत नव्हती
आणि हा मोठ्याने म्हणतो
mama look that man looks so funny .. his hair is scary lets sit somewhere else.. Sad

माझ्या मोठ्या लेकीने माझ्या आईला यावेळीच्या भारत भेटीत सांगितले, माझी आई वरण-भात करत नाही कधीच. पोळी पण नाही करत! Sad
आई म्हणाली मी सांगते हं तिला तुझ्यासाठी वरण-भात, पोळी करायला.

प्रित, वत्सला Lol
चेतन, लिही नक्की. Happy
(हा धागा विरंगुळा मध्ये काढायचा होता, गुलमोहर मध्ये नाही. :(. आता काय करता येईल ?)

आपल्या आईवडलांच्या कार्ट्यांबद्दल लिहीले तर चालेल का Uhoh

मी लहान असतानाचा किस्सा .. एका रविवारी बाबांना बरे नसल्यामुळे त्यांनी आईला सांगुन ठेवले.. कुणी आले तर घरी नाही असे सांग. मी ते सांगतना एकले.
थोड्याच वेळात दार वाजले आणि मी उघडले. समोर ओळाखीचे एक काका होते. त्यांनी बाबा आहेत का विचारल्यावर आस्मादिकांनी सांगितले "बाबा घरात आहेत पण ते घरात नाहीत असे सांगायला सांगितले आहे"
हे मागुन आईने एकले... तिला त्या पाहुन्यासमोर कसे वाटले असेल याची कल्पनाच करवत नाही Lol

विरंगुळामधे वाहून जाईल. अ‍ॅडमीनना हा धागा योग्य ठिकाणी हलवण्याची विनंती करता येईल.

मस्त धागा.

मवा, मस्त धागा आहे Happy मी विचारच करत होतो असा काहीतरी धागा काढायचा. बरं झालं आधीच निघाला Happy
मी आठवेल तसं आणि घडेल तसं टाकत जाईन इथे Happy

माझ्या लेकीने एकदा आंघोळीला जाताना )वय वर्ष तीन होतं तेव्हा) स्वतःच्या छातीला हात लावून मला विचारलं होतं... ममा हे तुलाच का आहे मला का नाही? ते काय आहे? कशासाठी असतं? मला कधी येणार? ते चिकटवलं आहे का? निघत नाही का?

असले सगळे प्रश्न ऐकून मी गार पडायच्या बेतात होते... पण मला जमतील तशी उत्तरं दिली आणि शंकासमाधान केलं तिचं एकदाचं...

एकदा एका ऑफिशियल डिनरवरून घरी यायला रात्रीचे १२- १२.३० वाजले होते मला... ही जागीच होती... मग विचारलंन, काय गं तू एवढ्या लेट का आलीस? तू काय लग्न करायला गेली होतीस? मला धक्काच बसला... मग मी विचारल,, कुणाशी करू बाई लग्न? त्यावर तिचं उत्तर होतं, मुलग्याशी कर!!!

भन्नाट किस्से! Lol
[एक शन्का मनाला चाटून गेली की वरचे मवा अन प्रीत यान्नी सान्गितलेल्या किश्श्यान्मधे ते किस्से त्याप्रकारे घडण्यामागे "इन्ग्रजी" भाषेचा व संस्कृतीचा अन्तर्भाव प्राथमिक शिक्षणापासून असल्याचे कारण कितपत असेल? Happy म्हणजे कळते होईस्तोवर घरातच इतरान्कडून ऐकलेले मातृभाषेतील संवाद व त्यातुन घेतले गेलेले व्यावहारीक व इतर ज्ञानाचे कण, परकी भाषा केजीपासुन असेल तर घेणे अवघड जात असेल का? ]

माझ्या मानसकन्येचा किस्सा. उत्तम संस्कारात वाढलेली. कधीही खोटं बोलत नाही.

तर एकदा ती आणि तिची आई, मुंबईला येत होत्या. एअरपोर्टवर कष्टम ऑफिसरने विचारले बॅगेत काय आहे. तर तिच्या आईने सांगितले काही खास नाही. त्याला एक्स रे मधे, दागिन्यासारखे काहि दिसले असावे, तर त्याने परत विचारले, कि दागिने सोन्याचे आहेत का ? तर तिच्या आईने सांगितले खोटे आहेत.

तर या सत्यवादी बालिकेने त्याला तिथेच सांगितले, दागिने सोन्याचे आहेत. (कारण तिच्या कानातले, होते त्या बॅगेत आणि ते सोन्याचे होते.)
बॅग उघडावीच लागली.

मजेशीर किस्से. छान आहे धागा. Happy

(एक सुचवू का? लहान, खोडकर मुलांना सरसकट कार्टा/कार्टी असे शब्द वापरले जातात. पण त्याचा अर्थ अनौरस पुत्र / कन्या असा होतो. त्यामुळे आमच्या घरात मुलांना उद्देशून हा शब्द कधीही वापरला जात नाही. हे थोडंसं 'सुअर के बच्चे' सारखं आहे. त्या संबोधनातून आपण स्वतःलाच काहीतरी वावगं म्हणून घेतोय हे बोलणार्‍याच्या गावीही नसतं. त्यामुळे 'कार्टी लाजवतात तेव्हा' हे अगदी समर्पक शीर्षक असलं तरी ते बदलावं असं माझं वैयक्तिक मत. कृपया गैरसमज नसावा, मला रंगाचा बेरंग करायचा नाही.)

मी परवा माझ्या मुलाला मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाला घेऊन गेलो होतो. आम्ही उशीरा पोचलो तेव्हा केक कापणे प्रोग्राम संपला होता.. बरेचशे लोक डिश संपवून घरी जाण्याच्या बेतात होते. आम्ही पण बाळाला शुभेच्छा देऊन थोड्या वेळाने जायला निघालो..
मित्राने माझ्या पोरग्याला विचारले..काय मग आवडला तुला बर्थडे..मज्जा आली ना..??
तर म्हणे हो पण तुम्ही मला केक नाही दिला...
अरे देवा..मला तिथून पळून जावेसे वाटले..तो बिचारा पण बावरला..कारण केक नेमका सगळ्यांना वाटून संपला होता..
त्याने थांब हा मी आणून देतो म्हणून सांगितले पण त्याला कुठे मिळेना...
मी राहू दे म्हणलो तर आमचे महाशय वर आणखीन "अरे पण बाबा बड्डे ला केक असतो ना."
शेवटी त्याने कुणाला तरी पाठवून बेकरीतून केक मागवला..तो नेमका वाटीवाला निघावा..
मी संकोचाने अगदी पाणी पाणी होत होतो पण अजून बाकी होतं..
नशिब तो कानात म्हणाला.."बाबा क्रीमवाला केक नाहीये.बड्डेला असा केक असतो का.??"
मी कसाबसा त्याला तो केक भरवून अक्षरश तिथून पळ काढला..

अरे मालश्यांच्या कार्ट्याचा अर्थात औरस पुत्राचा (आम्ही काय मराठी सिरीयल मधले आहोत) म्हणाजेच माझा एक किस्सा मी नुकताच वेंधळेपणा मधे टाकलाय.

काळ: आजी ने गोष्ट सांगायचा आणि नातवासकट आजुबाजुच्या कार्ट्यानीही enjoy करायचा. (असे दिवस नाही राहीले आता)

तर माझी आजी गोष्ट सांगत होती. अस्मादिकांबरोबर मित्रमंडळही बसलेल. गोष्ट महाभारतातली पांडवांच्या अज्ञातवासाबद्दल
आजी "आणि अर्जुननाने शमीवृक्षावरून शस्त्रे काढली त्यात त्याच गांडीव धनुष्यही होत..."

मुल फस्स्कन हसली . आजी ने डोळे वटारले.
आणि तिला कळल धोका आहे आपला नातू शांत कसा.

तेव्हढ्यात एकाने खुणेने विचारल तुला नाही कळल आम्ही का हसलो ते .
मी "त्यात काय आकारावरून पडल असेल ते नाव"

सगळ्यांचे किस्से मस्तच आहेत. Biggrin
मंजूडी, धन्यवाद. Happy
लिंबूटींबू, मला समजले नाही तुम्ही नक्की कश्याविषयी बोलताय ?
ललिता, ओके, खरेतर हे शब्द घरीपण कधी वापरत नाही, त्यामुळे असा अर्थ असेल हेच माहीत नव्हते, बदल करते. Happy

सगळेच किस्से Lol

माझा मुलगा लहान असताना वाढदिवसाला गेलो कि बड्डे बॉयला हळुच ( म्हणजे त्याला वाटायचे तो गपचुप विचारतोय पण सगळ्यांना व्यवस्तीत एकु येइल असे ) विचारायचा रिटर्ण गिफ्ट काय आहे हे.. आणि मग खरच लोकांसमोर कुठुन इथे आलो असे व्हायचे

माझी लहान कन्या जरा जास्तच स्पष्ट्वक्ती आहे ,ती तीन वर्षाची असतानाचा प्रसंग, ती पाळणाघरात रहाते ,तिथे ती चित्र रंगवत होती , इतक्यात त्या काकु म्हणाल्या कि रिया त्या पाणाला हिरवा रंग दे (त्या पान-पाण्,मानसी-माणसी,संजना-संजणा अस म्हणतात) हि बया लगेच बोलली काकु पाणाला काय पाणाला? पानाला म्हणा ना! बिच्चार्‍या काकु इतर मुलांसमोर गार!

माझ्या शेजारी नविनच राहायला आले होते..
त्यांच्या मुलाने बाबांच्या वाढदिवसा दिवशी शेजारील सर्व मुलांना सांगुन ठेवले.. आज माझ्या बाबांचा बड्डे आहे..

संध्याकाळी सगळी मुले हजर.. मग शेवटी पटकन त्यांनी चॉकलेट्स व वेफर्स आणून सगळ्यांना दिले..

मला अपत्य नाही पण काही किस्से आहेत माहितीतल्या / नात्यातल्या मुलांचे!

१. माझी पुतणी सानिका तेव्हा चार वर्षाची होती. मी आणि बायको मोटरसायकलवर होतो. ती माझ्या पुढे पेट्रोल टॅन्कवर बसली. तिचे आई वडील म्हणजे माझे भाऊ व वहिनी त्यांच्या मोटरसायकलवरून मागून येत होते. मधेच सानिका मला म्हणाली:

आई आणि बाबा रत्नागिरीला चाललेत. पण नेमके आजी आणि आजोबाही त्यांच्याबरोबर आत्ताच निघाले. आता तिकीटाचा खर्च बाबांनाच पडणार ना? हे बरोबर आहे का?

मी उतरल्यानंतर ते भावाला आणि वहिनीला हासत हासत सांगितले आणि त्यांनी कपाळावर हात मारून घेतले.

तेव्हा सगळ्यांचीच गरिबी असायची. घरात असे संवाद कधीकधी होतातच, त्यातलाच त्या सानिकाने ऐकलेला होता आणि सांगितला.

२. असेच नातेवाईकांचे गटग आमच्या घरी एक दिवस असताना सगळ्यांनी माझ्या एका मेहुण्याला (ज्याचे माझ्या मावस बहिणीशी नुकतेच लग्न झालेले होते) गाणे म्हणायला सांगितला. तो अजिबातच त्यातला नव्हता आणि अर्धा तास 'नाही नाही, मला आग्रह करू नका' म्हणत होता. शेवटी हारला. गायला लागला. एकही सूर धड लागेना की आवाज व्यवस्थित येईना! आमच्या शेजारचं एक दिव्य बाळ (याच्याच याच्याहून बर्‍याच मोठ्या असलेल्या चुलत बहिणीशी - ती लहानपणापासून सुट्टीत येत असल्यामुळे - माझं लग्न झालं नसतं तरच नवल ते झालं ) ते गाणं ऐकत होतं. आता सगळ्यांचाच जावई त्यामुळे कसाही गायला तरीही मान डोलवायलाच हवी. पण अचानक स्फोट झाल्यासारखा आवाज आला. त्या यशोधन नावाच्या लहान मुलाने इतका वेळ दाबून धरलेलं हसू त्याला आवरलं नाही. आणि तो इतका जोरात हासला की गाणंच बंद झालं!

दोन्ही प्रसंगात संबंधितांचे चेहरे कसे झाले असतील ........... !!!!!!

===================================

अजूनही किस्से आहेत. देत राहण्याचा मोह होत आहे. वरील सर्व किस्सेही भारीच आहेत.

(अवांतर - मागे एक पुस्तक निघायचं हिंदीमध्ये! त्यात 'मै तो शरमके मारे मरगयी' नावाचे एक सदर असायचे व लहान मुलांनी केलेल्या विनोदांमुळे त्यांच्या आयांची कशी विचित्र परिस्थिती झाली त्याचे वर्णन असायचे. एका बाईने लिहिलेला किस्सा: सुट्टीत ते चौघांचे कुटुंब नातेवाईकांकडे राहायला गेले होते परगावच्या! यांच्या छोट्या मुलाला झोपवण्याची एकच युक्ती म्हणजे 'बाबांबरोबर झोपणार ना' अशा स्वरुपाचे प्रश्न विचारणे! त्या नातेवाईकांकडे तो काही केल्या झोपेना तेव्हा त्याच्या आईने भान विसरून सर्वांसमोर विचारले.. पापा के साथ कोन सोयेगा?? आणि भान विसरूनच 'मुलगा उत्तरच देत नाही म्हंटल्यावर' त्याला झोपण्याचा मोह व्हावा म्हणून स्वतःच 'मै सोउंगी'असे म्हणून पाहिले. सगळे हसायला लागले, पोरगं काही झोपलं नाही.)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

(धागा उत्तम आहे. अभिनंदन!)

>>>>>>>>>>एक सुचवू का? लहान, खोडकर मुलांना सरसकट कार्टा/कार्टी असे शब्द वापरले जातात. पण त्याचा अर्थ अनौरस पुत्र / कन्या असा होतो. त्यामुळे आमच्या घरात मुलांना उद्देशून हा शब्द कधीही वापरला जात नाही. >>>>>>>
मवा आणि ललिता.......

अगं सांगली कोल्हापूर भागात मुलं याऐवजी पोरं असं नेहेमीच म्हणतात. हा शब्द बोलीभाषेतला अग्दी इमफॉर्मल आणि थोडं कॅज्युअली वापरला जाणारा आणि जवळीक दाखवणारा असावा. मला पोरं म्हणण्यात कधी काही चूक वाटली नाही. पण लग्न झाल्यापासून पोरं हा शब्द टाकला. कारण साबा म्हणायच्या जी पोरकी असतात त्यांना पोरं म्हणतात. तेव्हा ते पटलं नाही. पण तो शब्द गेला खरा तोंडातून!

आमच्या सोसायटीत एक आर्णवी नावाची तीन वर्षांची मुलगी राहते. ती बर्‍याचदा आमच्याकडेच असते. तिला आम्ही 'टिक्कू' म्हणतो.

परवा आम्ही जेवायला बसलेलो असताना ती अचानक माझ्या वडिलांसमोर जाऊन नाचली आणि गाणे म्हणू लागली.

"शीला, शीला की जवानी, आयाम तु छेछ्छे फार्यो, म्है थेरे हाथ्ना आनी... शीला...."

मी आणि बायकोने एकमेकांकडे बघत हसू दाबले. बाबांना ते गाणं माहीतही नाही आहे. त्यामुळे ते फक्त हतबुद्ध होऊन तिच्याकडे बघत बसले हातात पोळीचा घास तसाच ठेवून!

-'बेफिकीर'!

माझ्या एका वहिनीचे नाव प्रीती आहे.... तिचा नवरा, म्हणजे माझा भाऊ तिने हाकेला बराच वेळ ओ दिली नाही की तिला कधी कधी ''ए प्रीटी झिंटा'' नावाने हाक मारतो. त्यांची लेक फारच वस्ताद.... तिने एकदा पाहुण्यांसमोर आपली आई हाकेला ओ देत नाहीए म्हणून जोरात तिला 'ए प्रीटी झिंटा, इधर आ,' करून हाक मारली. कोणीतरी तिला हटकले, ''आईला अशी हाक मारतात होय गं?'' त्यावर तिचे उत्तर, ''माझा पप्पा अशीच हाक मारतो आईला!'' त्यावर विचारणारी व्यक्ती आणि वहिनी दोघांनाही काय प्रतिक्रिया द्यावी हेच उमगले नाही!!

माझ्या लेकीचा हा किस्सा:
मी माझ्या लेकाच्या वेळी बाळंतपणासाठी माहेरी गेले होते. मोठी मुलगी त्या वेळेस अडीच वर्षाची होती.
मुलाला सांभाळायला, माझ्या आईच्या मदतीला एक सोवळ्या आजी नेमल्या होत्या. त्या माझ्या लेकाला "श्रीहरी " म्हणायच्या.
सिच्युएशन पहा........आमच्या कडे मी बारीकच(तेव्हा हो...आत्ता नाही) आणि माझी आईही अगदी बारीक आणि खूप अ‍ॅक्टिव्ह. आई अजूनही तशीच आहे. ...बारीक. बरं माझ्या नवर्‍याकडचे सगळे तब्ब्येतीत. साबा माझ्या लग्नाच्या वेळी आमच्या समोरच काय पण एकंदरीतच खूपच जाड.
त्या बाळाला सांभाळणार्‍या आजी आपलं असंच दोन्ही मुलांशी बडबड करत रहायच्या. बोलता बोलता एकदा असंच माझ्या आईचं भराभर काम करणं बघून त्या असंच म्हणाल्या, " काय श्रीहरी ..कशी आज्जी भराभर कामं उपसतीये....बघ गं(हे माझ्या लेकीला होतं) ...कशी सडसडीत आहे आज्जी ...अगदी भराभर कामं आवरते.....तिकडची (म्हण्जे माझ्या साबा)आजी पण अशीच आहे का चवळीची शेंग?"
त्यावर माझी आई म्हणाली, " नाही हो त्या नाहीत हं माझ्यासारख्या फाटक्या अंगाच्या. त्या छान आहेत अगदी....जिथल्या तिथं!" आईला साबांचं खूप कौतुक होतं...गोर्‍या, देखण्या, आणि सुबक ठेंगणी सुंदर खाशी यात मोडणार्‍या!
आम्ही बाळंतपण वगैरे आवरून बॅक टु पॅव्हिलियन (सासरी ) गेलो. एकदा कधी तरी बरेच दिवसांनी काही तरी जाड बारीक गप्पा चालल्या होत्या. साबा साबू, दीर जाऊ, नवरोबा आणि आम्ही सगळे होतो. तेव्हा अचानक माझी लेक म्हणाली, " आजी ...सांगलीची आजी ..त्या बाळाला सांभाळणार्‍या आजींना .. सांगत होती की नगरची आजी खूप लठ्ठ आहे म्हणून." वय अडीच ते तीन. मी अवाक...अगदी तोंडात मारल्यासारखं झालं.
काय करणार मुलं कधी कधी तोंडघशी पाडतात.

फार फार वर्षांपुर्वीची गोष्ट

"कॉय सांगतात बाई म्हणाला आमाला दाकव बगू..." वगैरे बोबडा आग्रह माझ्या मामेबहीणीला चालला होता.

झाल ही गायली मोठ्यांदा " जरा सावधाssssन आयुष्यभर समाsssssधान"

संततीनियमनावरची ही ट्युन एकेकाळी बरीच फेमस होती.

मस्त किस्से आहेत सगळे.. माझ्या लहान बहिणीचा हा किस्सा.

आमच्याकडे गौर-गणपतीमध्ये सगळी फॅमिली एकत्र येते. तर असे आम्ही विसेक जण गप्पा मारत बसलो होतो.. तर हिला (वयः ३ वर्ष) बड्बड्गीत / गाणं वै. म्हणायचा आग्रह होऊ लागला. हिने बाबाना विचारलं की कुठलं गाणं म्हणू? त्यावर पपा म्हणाले, " अग ते म्हण ना, शाळेत नविन शिकवलंय ते.. पोपटाचं". (विठू विठू पोपट, आहे मोठा चावट... हे पपाना अपेक्षित असलेलं गाणं!)
या मुलीने जोरदार सुरुवात केली.." जवा नविन पोपट हा...."
सगळ्यान्ची हसुन हसुन मुरकुंडी वळली आणि पपांचा चेहरा (न) बघण्याजोगा झाला.

Pages