बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत ओव्या..

योडे पुढच्या ओव्या टाकताना नवीन पोस्ट मध्ये टाक.. म्हणजे कुठून वाचायला सुरुवात करायची त्याचा प्रश्न पडणार नाही..

ह्या पुढच्या ओव्या. ओवीकार ललिता-प्रीती.

ओव्या फार भारी| लली सर्व वाचून काढी|
भर त्यात न घाली| स्वतःची||

मंजी करी एसेमेस| कट्ट्यावरी चक्कर टाक|
लई बिझ्झी लली मात्र | हात चोळे ||

पाडल्या दोन ओव्या | वाचूनि काढाया|
कट्ट्यावरी कुणी | दिसेना ते ||

श्लेषालंकाराने युक्त | पाडल्या दोन पोस्टी फक्त |
पण प्रतिसादांची चौकट रिक्त | राहोनि जाये ||

उष्मा झाला अति | अवजड शब्दांची पाटी |
जोमाने ललिता प्रिती | ओततसे ||

विपुचे आवताण | योडीकडून मिळाले |
ललीला तिथे जाऊन लिहिणेचे | लगेच काय नडले ||

जड भाषा उद्धरू | ऐसा कल्लोळ करू |
भाषा आपुली सुधारू | नी म्हणे ||

उष्मा झाला अति | त्यात ओवीज्वर सरेना |
योडीलाही कळेना | किती करू पेस्टं || (आलं/गेलं प्रमाणे पेस्टं चा उच्चार करावा)

गुण येईना औषधे | तरी करी मधे मधे |
हाकलला असुदे| परफेक्टीणीने ||

घरातून हाकलल्याविना | जनसेवा होत नसे |
ओव्याचे काय ते | घेऊन बैसला ||

हसू हसू गडाबडा लोळले | लोक खुर्चीतून सांडले |
ओव्यांनीहे काम केले | कट्ट्यावरी ||

अचानक मालवणी | सुरू जाहली |
हा कट्टा आहे की गजाली | प्रश्न पडे ||

जड ओव्यांबद्दल | आश्विनी पुसतसे |
लाजोला प्रश्न पडतसे | वजनाचा ||

ओवी माझी जड अशी | भरले किलो एकशेऐशी|
याहून काय जड करशी | आता बाई ||

ओवीचं वजन वजन बाई | जात्याहून जास्त नाही |
कट्यावर वाहत राही | जडावून ||

देह तो देहु | जड तो जडु |
बोजड तो बोजडु | चालू कशी ||

ओवी जड जड | पापण्याही जड |
कसा चढायचा गड | जडावून ||

बदकाची चाल | फतक फतक |
कामाचा पडेना | उरक उरक ||

लोक सर्व विद्वज्जडं | काय असे तयापुढं ||
उरेना कुणाचा पाड | कट्ट्यावर ||

पाड पाड ओवी पाड | घरी उगवले झाड |
कामाचाही उरका पाड | कधीतरी ||

वेळ मिळे काल आज | ओव्यांसाठी सावज |
राहिले कोण ढालगज | अम्या पुसतसे ||

केश्विनी जगन्माता | थकूनी बोलली आता ||
कर्मयोग न सरता | पार खंतावूनी ||

गुब्बी आहे का इथेच | पडला कसला तीस पेच ||
कोणाची तरी खेच | हाकानाका ||

खुर्चीचा पाळणा | फाईलींची उशी |
घोरुया इथेच | केश्वी म्हणे ||

रिकामं खोकं | पडली भोकं |
कोंबूनी ओव्या | झिरमिळ्या निघतसे

घोरूची मावशी | असते अश्वी |
डोळे मिटूनी | घर्रर्रर्र करितसे |

पीडीएफ ठेवल्या | अवती भवती |
इमेल करी सत्वर | संत अम्या ||

दासबोध वाचूनी ऐश्या | ओव्या जमवीन खाश्या |
अम्याच्या ऐका फुरश्या | मोठ्यामोठ्या ||

नाद्या करितसे घोळ | यमकांचा नुसता लोळ |
होईल बट्ट्याबोळ | ओवीचा तो ||

करू'नी' खोड्या | ओव्या थोड्या |
मुक्कामार देऊनी हळूच | खेचीतसे ||

काय आहे आज खास | न कळे पामरास |
अम्याच्या वाचनास | दासबोध एकदम ||

आल्या आल्या जागूताई | त्यांना नाही कसली घाई |
घरी जाउनी काय काय खाई | प्रश्न फक्त एव्हढाच

कट्टा नाही शांत | जरी असे विकांत |
अश्वीला झोपेची खंत | दे ताणुनिया ||

स्वप्नी आले रामदास | म्हणाले मज पामरास ||
वाचोनी दासबोधास | उपकृत करावे ||

केला मीही विचार थोडा | उगा का लोक म्हणती रेडा ||
कोणत्या प्रकारचा मी वेडा | जाणोनी घ्यावे ||

काय सांगू नवलाई| कट्टा ओसंडतो काव्यी ||
सार्‍यांना चावतसे | ओवीयांचा किडा ||

केश्वे तूझा आयडी नाही | मेल ड्राफ्टात सेव्हूनी राही ||
माझ्याकडे नुस्ताच पाही | केविलवाणे ||

ओव्यांचा हा भार | झालो मी ठार |
करा मला हद्दपार | आता इथूनी ||

सुचिर्भुतुनी रोज | कट्ट्यावरी जावे ||
नित्य नवे उद्द्योग | मिळुनी करावे ||

ऑफीसचा असा वेळ | सत्कर्मि लावावे ||
तेव्हाची मिळे पगार | मल्ली म्हणे ||

नको करु अम्या खंत | कावळे ते कृमी जंत |
शापाने का त्यांच्या संत | मरत असे ||

किती आले आणिक गेले | वंदले मग निंदले |
घरच्या मिठात मिंधले | तरी कृतघ्न |

ओव्यांच्या या यज्ञकुंडी | आल्या ओवीकरांच्या झुंडी |
बर्‍यावाईट त्या धुंडी | सगळेजण ||

शुकु फुल्ल फॉर्मात | ओव्या लिही दणक्यात ||
मग आम्हा कसली खंत | मरोत ते सर्व जंत ||

मेल गेला याहूवरी | पहाण्याची कृपा करी ||
काय म्हणणे यावरी | सत्वरी सांगावे |

गोंधळ संतांचा सावळा | कट्टा माझा लेकुरवाळा |
जमतो गोतावळा | ओव्या रचणेस |

ओवीकार नीधप, ललिता-प्रीती, असुदे, नादखुळा, अश्विनी के, शैलजा, शुभांगी कुलकर्णी..

गोंधळ संतांचा सावळा | कट्टा माझा लेकुरवाळा |
जमतो गोतावळा | ओव्या रचणेस ||

वेग नाही इतुका बरवा | ओव्या हळूहळू घडवा |
पेस्टण्यास द्या वावा | नी म्हणे ||

कृपा मजवरी करावी | पीडीएफ मजला पाठवावी |
कृपादृष्टी असावी | रामदासे मजवरही ||

ओवी वर ओवी | पाडे सारे कट्टेकरी ||
सारा माबो थंडावला | कट्ट्यावर येउन टेकला ||

शुकू रचिते ओव्या | पडो कामाचा पसारा ||
ओव्या रचिता वाटे| जशा केल्या की शेवया ||

वाचूनिया या ओव्या टोलेजंग | भेदरला बिळातला भुजंग |
चालुद्या आपले टाळ नी मृदुंग | जोर लावुनी ||

आयडी द्यावे भरभरा | पाठवितो दासबोधा सत्वरा ||
दास रामाचा तो खरा | कृपा त्याचीच जाणावी ||

उतरते दारू केल्यावर नशा | ओवीची वेगळी भाषा
अशी वेगळीच नशा | उतरावी कैसी ||

ओव्या पाडण्यात गर्क | कट्टेकरी तरुण तुर्क |
योडी राहतसे सतर्क | बहरात पेस्टण्यास ||

आधिच ओव्या वेगात | वेळ जाई वाचण्यात ||
वर द्रुपालचि साथ | लागे कामाचि वाट ||

भुजंगाचे विष जैसे | मृदुंगाचे बोल कैसे |
ओवीयांचे भुरळ ऐसे | उतरेचीना ||

कोणी ओव्यात मांडे | आपले गर्‍हाणे ||
कुठे दिसेला असे | ओव्यांने झिंगणे ||

झाली ओव्यांची नशा | गुंडाळावा कामाचा गाशा |
परी बॉसच्या नजरा अश्या | कामचुकार म्हणुनी ||

साजिर्‍या तो गोऽजिर्‍या |ओवाळूया मीठ मोहर्‍या |
कर रोज ऐशा वार्‍या | कट्ट्यावरी ||

अम्या माझा आय्.डी. | केलास किकाय डिलीट |
ऐकून विठूच्या पायीची | थरारली वीट ||

खुप्श्या ओव्या | योडेची मिसल्या ||
कॉपी करुन सगळ्या | तुका मी मेलल्या ||

तुकोबांना धाडी ओव्या| काय मल्लिचे धाडस ||
किती असेल गाठीस | पुण्य ह्याच्या||

पुण्य थोधाया आता | सोडली ती गाठ |
फिटूनी सारे लागली वाट | भर कट्ट्यावर ||

व्रत ते एवढेच | वसा असे कट्ट्याचा ||
किती हाकलले तरी | व्रत नाही उतायचा ||

व्रत ते एवढेच | व्हा जमल्यास 'संदीप' ||
किती कोसले तरी | व्रत नाही मातायचा ||

व्रत ते एवढेच | असा हा कट्ट्याचा ||
देई संत रुप | मल्ल्या म्हणे ||

बापरे... हे भयंकरविनोदीच्यापण पल्कडलं आहे... भदादा ओव्यांचा दणका. संदर्भं माहीत नसूनही प्रचंड मनोरंजन...

ह्यानंतर आज काहीही वाचण्याची इच्छा नाही.

जात्यातले सुपात | गोत्यातले पोत्यात |
नक्की कुठे जाऊ | केपीकृष्ण पुसे ||

पोत्यात गेले की गोत्यात येणार|
गोत्यात आले की पुसले जाणार|
पुसले गेले की पुसायला|
काय शिल्लक रहाणार?|

केश्विस लागला | ओवीयांचा ध्यास ||
ग्रंथ लिहिण्यासी | बैसली जणू ||

आपोआप झरती | ओव्यांच्या पंक्ती |
पस्तावली असे | सरसोती ||

वारंवार झडती | गटगच्या पंगती|
आम्ही दुर्लक्षित | पोत्यामध्ये|

पाहत असेल| खेळ काही क्षण||
खोड्या सान थोर| दुर्लक्षोनी ||

आणील पस्तावा | चित्तासी तियेच्या|
असा नाही कोणी | त्रिभुवनी ||

तिनेच दिले गं | खेळाया अंगण |
बाळाचे रांगणं | कौतुके पाहे ||

बाळ फार वांड | करी उसका उसकी |
ओवी करुन फेकी | इकडे तिकडे ||

तुझ्याची कृपेने | इतुके गं जमे |
पैलू तूची पाडी | सरसोती माये ||

पोत्यालाहो छिद्रे | जाणूनी ठेवीली |
चहा आतून पिई | हळू हळू स्ट्रॉने ||

छिद्रे ती आहेत | पोतीयांना का हो ||
आक्रोश करिती | कृ आणि केप्या ||

कृ आणि केप्या | आभार की माना ||
केश्विनीने दिले| छिद्रांकित पोते ||

लपा की पोत्यात | काटा किर्रीस जाऊन ||
मिसळीवर ताव | मारा की लपून ||

सूचना धरा हो | ही एक मात्र चित्ती |
उडवा दोन थेंब | दिशेने ठाणियाच्या ||

काटाकिर्र बाहेर | पोते नेऊन ठेवू |
आत बसे जाऊन | केश्वी आणि शैलू ||

ओवीकार अश्विनी के, शैलजा, कृष्णा..
-श्रीवर्धन बाफवरुन साभार

काटा किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र Happy

निनाद जोशीने (नंद्या) फार वर्षांपूर्वी देवदासचे परिक्षण केलं होतं----

जुलै २००२

देवदास... चघळून चोथा झालाय...त्याच चोथ्याची ही शेवटची गोळी थुंकणे स्मित... भंसाळीचे ५० कोटी आणि माझे सात सामोसे यांची एक आठवण.

ऐश्वर्या उर्फ पारो- ही बाई जितली नाटकी हसते आणि नाचते, दु:खात तितकीच सुंदर दिसते. हिने कायम उदास असावे असे आम्हाला का बरे वाटावे? एरवी दोन घासात संपणारा सामोसा, ही पडद्यावर आली की सीन संपेपर्यंत हातातच थिजून रहातो. मी प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. फक्त ही आणि देवदास दोघे एकत्र असलेल्या प्रत्येक सीनमधे background मधे तिच्या लहानपणीची ती 'खीक्याव' अशी 'कावळट' किंकाळी कशाला ऐकवण्यात येते हे कळले नाही.

माधुरी उर्फ चंद्रमुखी- काय बोलावे... हिच्या 'मार डाला' पुढे किती मेले ह्याचा हिशेब ठेवणे अवघड आहे. आम्ही मान्य करतो की आम्ही ठार मेले... शेवटी शेजारच्या शिटावरल्या गाडगीळमावशींनी "मेल्या किती टुकशील तिला" असे म्हणून आम्हाला चारचौघात लज्जेने दुसर्‍यांदा की तिसर्‍यांदा मारले, तेव्हा आम्ही होश मधे आलो.

ह्या दोघींचा confrontation सीन मात्र अप्रतिम आहे. दोघी एकमेकींवर मांजरीसारख्या गुरगुरत होत्या तेव्हा आम्हाला इकडे बघू की तिकडे हा गहन प्रश्न सतावित होता. luckily दोघीही मांजरीसारख्याच भांडत असल्यामुळे सारख्या गोल गोल फिरत राहतात म्हणून screen वर एकाच कोपर्‍यात टक लावून ठेवली की आपोआप दोघी आलटून पालटून दिसतात हा formula आम्हाला पटकन सुचला....

Jackie उर्फ चुनीलाल - च से चुनीला से चंद्रमुखी याखेरीज च से चुxxx असे आम्हालादेखिल काहीबाही आठवलं आणि ते जोरात बोलायचा मोह झाला, पण ल से लज्जा म्हणा किंवा भ से भिडस्तपणा म्हणा आम्ही गप्प बसलो. ह्या बोन्धूनी अमरप्रेम मधल्या राजेश खन्नाची नक्कल करून आम्हास व से वैतागवाडीस पाठवले. कोशिंबीरीत एक कडू काकडी आली की जसे होते तसे काहीसे हे पात्र आहे.

शहारूख उर्फ देवदास- आता लेखकानेच बुळ्या बनविल्यावर रोलचा राडा करायला हा ऑफिशयली मोकळा. प्रत्यक्ष कादंबरीत हे पात्र कसे आहे माहित नाही परंतु सिनेमात ह्याचे ह्यालाच नक्की काय करायचे आहे ह्याचा पत्ता नसावा. अगदी तो दुसरा दास फलंदाजी करताना जसे होते तसे. कधी जबर्‍या माज, कधी अकस्मात बुळबुळीतपणा, कधी कोडगेपणा तर कधी फालतु गोष्टींबद्दल नको तितका ओलावा... नक्की भट्टी काही जमली नाही असे आमचे मत पडले. मेहफिलीत चंद्रमुखी नेहमी शेवटच्या कडव्यावर आली की बरोब्बर हा पारोच्या आठवणीने मायग्रेन झाल्यासारखा डोक्याला हात लावून ओठ थरथरवून का दाखवायचा ह्याचे कोडे आम्हाला अजूनही सुटलेले नाही.

चित्रपटातील इतर पात्रे का आहेत याचा उलगडा चित्रपट पाहून चार दिवस झाले तरी झालेला नाही. किरण खेर यांचा नाच बघून आम्ही इथून पुढचे खेळ शीर्षासनात बघायचे ठरवले आहे.... भिंतीकडे तोंड करून.

अरे हो, चित्रपट का बघायला गेलो हे सांगायचेच विसरलो... त्या 'मार डाला' गाण्यात मागे पंडित बिरजू महाराज यांचे नृत्यपथक आहे, त्यात माझी एक होणारी वहिनी आहे (माधुरीच्या मागे उजवीकडची पहिली), तिने आपला आग्रह केला म्हणून... नाहीतर कोण मरायला....

दवणे मोडातून मराठी चित्रनायिकांचा पाकसुगंधी आ(गाऊ)ढावा.
आशूडी | 3 May, 2011 - 14:20
केशरमुग्ध भारतीय संस्कृतीचा वरदहस्त लाभलेल्या भारदस्त दगडजंगी (न श! क आ?) वाड्यांच्या पिळदार चर्चेत चिक्कणमातीस्पर्ध्य मौर्वत्य (अती मऊ. न श! क आ? )लोण्यापासून जाडमीठाच्या चुर्‍यासम रवाळ तूपाचा नाकपुडीविभोर साज लेऊन हा मुक्त पवन कोठून आला बरे?

मंजूडी | 3 May, 2011 - 14:21
मुक्त पवन..... इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ

गजानन | 3 May, 2011 - 14:24
पळाऽ !

नीधप | 3 May, 2011 - 14:24
_डि, आज काय आहे? Proud

श्रद्धा | 3 May, 2011 - 14:26
मंजू, चांगलं तुपाच्या वासाबद्दल आहे ते.. 'मुक्त पवन' हे शब्द आपल्या पुरातन, उदात्त संस्कृतीत बदनाम झाले आहेत. Proud मुन्नीसारखेच!

आशूडी | 3 May, 2011 - 14:35
बघ बघ सिमाते! तरीही आपल्या आद्य योगासनसंस्कृतीत ऋषी पतंजलिंनी पवनमुक्तासन सांगून ठेविले आहे. पण ही पहा कुठे चालली आहे आपली संस्कृती?, आपलं, मुक्त पवन?
साजूक तूप पचवायलाही साजूक आतडं लागतं. तरच त्या आतड्यातून आशाकाळेब्रँड सात्विकता उमलते. असे अस्ते तर इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ पळून जायच्या ऐवजी फक्त कानावर हात ठेवून भुवयांची साचेबध्द हालचाल करुन टिकली ठरविक उंचीवर गेल्यावर दु:खातिवेगाने डोळे आणि ओठ एकाच वेळी (!) घट्ट दाबून 'कट' म्हणेपर्यंत बंद ठेवता आले असते!
पाहिलेत अश्रूपातकहृदयद्रावक आसनाचे सामर्थ्य?

कांदापोहे | 3 May, 2011 - 14:34
आशुडे Lol पवनमुक्त राहुदे पण तू परीक्षामुक्त झाल्याचे जाणवते आहे हं.

मंजूडी | 3 May, 2011 - 14:36
आशाकाळेब्रँड सात्विकता>>> Lol

एकूणातच ही पोस्ट Rofl

श्रद्धा | 3 May, 2011 - 14:40
तरच त्या आतड्यातून आशाकाळेब्रँड सात्विकता उमलते. असे अस्ते तर इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ पळून जायच्या ऐवजी <<<<
खरेय ज्युमा... तसेही आशाकाळेबै आणि जैश्रीश्रीश्री (एक 'श्री' लिवता येत नाई!) गडकरबै यांना कुठल्याच चीत्रपटात पळताना पाहिलेले नाहीये. इइइइइइइइइइइइइइइइइइ करून पळून जाणार्‍या नायिकांच्या काळात या दोघींनी एकाच जागी भक्कमपणे उभे राहून तुम्ही वर्णिल्यासारखा सात्विक अभिनय सादर केला.

आशूडी | 3 May, 2011 - 15:03
बरोब्बर निरीक्षण श्रध्दामाता. त्यांनी कधीच पळण्याच्या, पळून जाण्याच्या, पळवण्याच्या कृतीत सक्रिय सहभाग घेतला नाही याचे कारण त्यांची परिस्थिती असावी. पण प्रत्येक चित्रपटातून 'परिस्थिती बदलते' हे तात्पर्य सांगणार्‍यांची पळणीय परिस्थिती बदलू नये हे चित्रसृष्टीचे दुर्भाग्य!

कांदापोहे | 3 May, 2011 - 15:24
हर्षदा खानविलकर आहे >>>
बर ती अर्चना पाटकरच ना? दोन दोन घडी मधली. कसली भयाण दिसते ती आता.

पौर्णिमा | 3 May, 2011 - 15:26
हर्षदा खानविलकर अर्चना पाटकर कशी असू शकेल रे???????????????????????
इक्वली जाड्या आणि थोराड असल्या, तरी वेगळ्या आहेत! Proud

आशूडी | 3 May, 2011 - 15:37
अर्चना पाटकरने एका सिनेमात 'झिंबाब्वे पद्धतीने कुरडया' केल्या आहेत आणि त्याची कृती ती बंगलोरस्थित नवरा प्रशांत दामलेला सविस्तर सांगते तेव्हापासून ती माझ्या बरोब्बर लक्षात आहे. Lol
तर अशी अभिनवपाककृतीकुशल सुगृहिणी ही आपल्या मराठी चित्रपटांची पुढची पिढी. तुपात भेसळ असल्याने वजन वाढत गेले सात्विकता कमी होत गेली.

कांदापोहे | 3 May, 2011 - 15:37
इक्वली जाड्या आणि थोराड असल्या, तरी वेगळ्या आहेत! >>>
असो. म्हणुन तर लिहीले ना दोन घडीमधली.

आशुडे Rofl

मंजूडी | 3 May, 2011 - 15:41 नवीन
आशूतै, अलकाकुबलबाईंच्या वळणावर थांबून जरा लिहा की त्यांच्याही आधी तळवलकरबै रांगेत आहेत, पण ठीके... त्यांना सोडून देऊ.

आशूडी | 3 May, 2011 - 15:57 नवीन
अलकाबाई हे संक्रमण काळातील बेजोड असे बायप्रॉडक्ट आहेत. सर्वप्रेक्षकसहिष्णू होण्याच्या वेडात त्यांनी अनेकांच्या सहनशक्तीची अपरिमित हानी केली. त्या माहेरची साडी नेसून देवी मातेसमोर भावाच्या आयुष्याचं दान डोकं आपटून मागायाच्या तेव्हा तो कर्णपिपासू आक्रोश सहन न होऊन देवळातल्या घंटाही एकमेकींवर डोकं आपटायच्या. जेव्हा त्या निलोफर बनून बागेत मैतरिणींसमवेत गाणी गात फ्रॉकात विहार करायच्या तेव्हा आंधळ्या मुलाचा टाईपरायटर आपल्या पोटावर बुक्के मारुन घ्यायचा. स्टेपकट करुन त्यांनी मराठीतली माधुरी दीक्षित व्हायचा प्रयत्न केला तेव्हा माधुरीने त्यांना घरी आईच्या हळदीकुंकवाला बोलावून ती मराठीच असल्याची खात्री पटवली तेव्हा यांनी पुन्हा तीच सैल वेणी घालायला सुरुवात केली. मग पुनवेची वाट पाहताना त्यांचा पुनर्जन्म झाला (काय ना, महिन्याभराचेही आयुष्य मिळू नाही!) आणि निशिगंधाताई एकच बट गुंडाळत आल्या. (त्या काही वर्ष'असिधारा' पुडीचा दोरा कंपनीत दोरा गुंडाळायच्या कामावर रोजगारावर होत्या, पण पुढे बालकामगार विरोधी कायदा आला आणि तेही काम सुटले, असे ऐकून आहो.)
* पहिल्या वाक्यात हिंदी, इंग्रजी शब्द आले आहेत ते केवळ भावनातिरेकाने. नायिकेला प्रभावी दाखवायचे तर हे हवेच असे आम्हाला कोठारे गुरुजींनी शिकवले आहे.

साजिरा | 13 May, 2011 - 17:09
अफाट कंटाळा आल्यावर काय करायचं असतं बरं? चहा पिऊन झालाय. आवडते काही तरी खाऊन टाईमपास होणार नाही, उलट रात्रीच्या जेवणाची वाट लागेल. लिहायची-वाचायची अजिबात इच्छा नाही. काम जे पडले आहे, ते आजच केले पाहिजे असे नाही. लाँग ड्राईव्ह मारून येण्यासारखे वातावरण नाही. सामान्य माणसाचा कंटाळा म्हणजे अभूतपूर्व प्रॉब्लेम. बिचार्‍याला इतर कुठेच नाही, आणि कंटाळ्यातही सिलेब्रेशन नाही. मोठे सिलेब्रेटी किंवा कवी-लेखक किंवा त्यांचे नायक कंटाळा आल्यावर कशा भारी भारी गोष्टी करतात..! संदीप कंटाळ्यावरच उत्साहाने कविता लिहितो, आणि सलील त्याला अजिबात न कंटाळता पण कंटाळ्याची पुरेपूर प्रचीती येईल अशी चाल लावतो. नेमाडेंचा नायक एकतर विड्या फुंकतो, नाहीतर उशांवर उशा रचून त्यावर शेषशायी नारायणासारखी मान टाकून पहुडतो, नाहीतर नाईलाजाने गाणी ऐकतो आणि कंटाळून 'किशोरचाही आजकाल रफी होऊ लागला आहे' अशी टिप्पणी पण करतो, नाहीतर किचनओट्याजवळ पाळलेला कोळी आणि त्याने पाळलेले जाळे तासन्तास बघत बसतो. पानवलकरांसारखे कंटाळून ढीगाने कुठून कुठून अचाट उपमांचा ढीग तयार करत होते. मनोहर कंटाळल्यावर भारतीय आणि पाश्चात्त्य शास्त्रज्ञांची हुशारी आणि सवयी याबद्दल समोरच्याला बेशूद्ध कंटाळा येईस्तोवर बोलतात. वालावलकर कंटाळले की जास्तीत जास्त अनैतिक आणि अधःपतनयुक्त काय करता येईल ते सारे करत. लंप्या कंटाळला की वाटेल त्याला साहेब म्हणे. म्हणजे ढगसाहेब, हमालसाहेब, सूर्यसाहेब, पाऊससाहेब, ऊनसाहेब इ. जीए कंटाळले की सारखे मनातल्या कोळ्यांची जाळी, मग त्या जाळ्यातले नवीन कोळी, मग त्या कोळ्यांची नवीन जाळी असा खेळ खेळत. वपुंनी तर कंटाळून आयुष्याबद्दलचे अफाट तत्वज्ञान वाक्यावाक्यागणिक आणि शब्दाशब्दागणिक लिहून ठेवले आहे. नगरकरांनी पुण्यातल्या बहात्तर हजार सातशे त्रेचाळीस कुत्र्यांच्या रात्रीबेरात्री भुंकण्याला कंटाळून त्यांच्या भुंकयुक्त जागतिक उठावाबद्दल लिहिले. अजून कोण कोण काय काय करत होते. हायला आपली कंटाळल्यावर समोरच्यावर साधे वस्सकन ओरडायची शामत नाही. कंटाळा आला असं म्हणायचं अन तसं म्हणून कंटाळा येईस्तोस्वर म्हणतच राहायचं. हो की नाही? नमस्कार वाडेश्वर.

बाळू जोशी. | 19 May, 2011 - 13:44

ह्या सगळ्या गरबडीत त्या मूळ ४९५८ ने शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करून शुद्ध नागर भाषेत ती कथा दुरुस्त ही केली होती पण कोणी बघेल तर शपथ. जो तो 'हाणा मारा ठोका ' अशा रण दुंदुभी वाजवीत कमरेची धोतरे सावरीत (हो ना नाहीतर धर्म करता कर्म उभे रहायचे.) हिकडून तिकडं आन तिकडून हिकडं सैरावैरा धाविन्नले. 'अरे पण कोणाला मारा?' असे एका किंकर्तव्यमूढ योद्ध्याने विचारले असता' काय माहीत ? समोर येईल त्याला हाणा , शत्रू असो वा मित्र' असे ओरडत तो आपल्या धोतराची काळजी वाहात सुरक्षित ठिकाणी गेला. मग जो तो मुंडके तुटलेल्या मुरारबाजीसारखा बेभान आणि दिशाहीन तल्वार फिरवू लागला ' मामे काके भाचे गुरू, याते कैसा मी संहारू? तोंडात बाटाचे खेटरूं , हाणतील लोक..' या वचनाचाही विसर त्याना पडला. आणि या हलकल्लोळात तो बीबी बुडाला.व रसातळाला गेला...

बाळू जोशी. | 19 May, 2011 - 14:00
होती ना लुगडं ब्रिगेडही होती. अगदी 'ढाल छातीशी, पुत्र पाठीशी, कमरेला तलवार' अशा थाटात होती. पण ह्या रण धूम्राळीत (म्हणजे रणावर उडालेल्या धुळीमुळे ) लाल लुगडी कदाप्रमाणे, पिवळी पिताम्बराप्रमाणे, पांढरी तर धोतराप्रमाणेच दिसों लागली. त्यात तो दिनमणी अस्तायमान होऊं घातलेला. ज्याना तलवारी घावल्या त्यानी तलवारी, कुणी लाटणी, कुणी डास मारायच्या चिनी रॅकेट्स काय काय घेऊन आल्या होत्या. पण खिळ्यावर हातोडा मारायच्या ऐवजी स्वतःच्या बोटावर मारावा तसे आपल्याच क्याम्पातल्या लोकाना त्या हाणू लागल्या...

खरं तर दत्ताजी शिंद्यानन्तरचा हा दुसरा शिं 'दा ' , 'पां'नी " क्यंव शिन्दे और लडेंगे? ' या विचारलेल्या कुत्सित पृच्छेवर ' इन्शा अल्ला, बचेंगे तो और भी लडेंगे !' असंही म्हटला होता पण तेवढ्यात डुलकी संपलेले पडदेमास्तर भान न राहवून बोम्बलले 'पडदा पडदा !!' आणि मग अकालीच पडद्याची कुर्हाड त्या दृश्यावर कोसळली

अहो वैबु, 'आपण जे काही साहित्य लिहिता ते ठिकठिकाणाहून गोळा केलेले असते , त्यामुळे माझी अपरिमीत ज्ञानवृद्धीही होते . पाने फुले, स्वयम्पाक इत्यादि, मी ती अतीव उत्सुकतेने वाचतोही त्याबद्दल मला आदरही आहे. पण ते एक प्रकारचे चौर्यकर्मच नाही का? ६० टक्के माहिती चौर्य आणि ४० टक्के मांडणी कौशल्य. पण त्याला साहित्य (आणि तुम्हाला साहित्यिक )कसे म्हणता येईल'?' याला का शिवीगाळ म्हणतात का?

बहुधा मास्तरांच्या डोक्यावरून गेल्यामुळे त्याना ती शिवीगाळ वाटली असण्याची शक्यताही आहे
Proud

रश्मीला विचारा अशीच चर्चा झाली की नाही शेवटी शेवटी. आम्हाला वाटले चांगला पूर्व पक्ष व उत्तरपक्ष झाला आहे. घटपटांची चांगली चर्चा रंगणार म्हणून येरवाळीच वडापाव खाऊन घ्यावा म्हणून भाईर आलो आन वडापाव खाऊन पुन्यांन्दा गेलू त कशात काय आन फाटक्यात पाय तसं ह्ये मानसं मर्तिकावरून परत यावीत तशी बीबी बन्द झाला म्हणून घरी निघालेली....

अरे लै भारी. प्रतेक्श त्या लढ्याचे वाचन केल्यानंतर बाजोबाबांचे हे निरुपण तर लै झक्कास बघा. Lol

Pages