बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिर्‍या द ग्रेट

खंडेराव | 5 July, 2011 - 10:57
काही वाईट वाटून घेऊ नका. माफक प्रमाणात धोपटणे आवश्यक असते. आता आमच्या काळातले धोपटणे म्हणजे अक्षरशः आदिकाळात शोभेल असेच होते. दोरी, काठी, झाडू यांचा सर्रास वापर होई. हात बांधून ठेवण्यासाठी त्याकाळचे बिल्डर लोक त्याकाळच्या घरांत मध्येमध्ये लाकडी वगैरे खांब पण ठेवत. तीन बाय तीन फुटाचा चौकोन खडूने आखून त्यामध्ये आठआठ तास स्थानबद्ध केले जाई. सारी भांडी खंगाळून काढणे, अख्खे घर आरशासारखे लख्ख करणे, सारी कपाटे, कपडे आवरणे इत्यादींचा पण शिक्षेत अंतर्भाव असे. यामुळे होई काय, की एकाच वेळी शिक्षा, भारतीय कुटुंबपद्धतीची शिकवण, कामे आवरणे- सारे होई; आणि घरात शांतता नांदे. एकच कुणीतरी चुकला तरी त्याच्यासोबत घरातल्या इतर सार्‍या अपत्यांची 'काय उगाच बाकी ठेवा' म्हणून सर्व्हिसिंग होई. या होलसेल सर्व्हिसिंगचा फायदा म्हणजे पुढच्या सर्व्हिसिंगच्या ड्यू डेटपर्यंत सारे कसे बिनधोक, ओळीत, शिस्तीत चाले. आता हातातली शस्त्रे जाऊन हाताचा फक्त माफक प्रमाणात वापर होतो. तर तेवढे तर पायजेच ना. उद्या त्यांनीच विचारले, की वेळोवेळी माफक शिक्षा करून आम्हाला का नाही वठणीवर आणले तुम्ही?- मग झाला का पस्तावा. खंडेराव, तू पण तुझ्या पोरांना देखील त्यांच्या पोरांना अशीच माफक शिक्षा करण्याचे शिकव. लईच पाल्हाळाख्यान लावतोस राव पण तू. गोष्ट सांगत जा फक्त. नमस्कार वाडेश्वर.

बाळू जोशी. | 13 July, 2011 - 08:22
र्‍हैना तै. माजी का आटवन काडलीत ती. ? माजा पेन कम्पनीशी काय संबंध? म्या हमेशा इंक पेण वापरतुया आन बॉल पेणाचा राग राग करतु. पेन्डशे गुर्जी त्यांच्या 'त्या 'ब्रम्हास्त्राने' लै हानायचे बाल पेन बगिटला की... आता च्याचाच आणि शिग्रेटीचा इशय निंगालाय तं सांगतु, च्याचे पैले दोन तीन घोट आन शिग्रेटीचे पैले २-३ कश ह्यातच गम्मत .पुडं सगलं रिपिटेशन. 'तोच पलंग तीच नारी, सतार नव्हे एकतारी...' तसंच एकसुरी. त्यामुळे शिग्रेटचे थोटूक आन कटिंग चाय पुरेसा....
असो. हे गुर्जीना सांगू नका. न्हाय तं हे 'जीवन शिक्षण' कुठून मिळाले हा प्रश्न त्याना पडायचा
लिम्ब्या नसल्याने माबोवर करमत नाही....
(कृपया शुद्दलेकनाला हासू नाही. आन वरचे कोटेशन विन्दांचे आहे मला हानू नाही.)

या होलसेल सर्व्हिसिंगचा फायदा म्हणजे पुढच्या सर्व्हिसिंगच्या ड्यू डेटपर्यंत सारे कसे बिनधोक, >>>> भारीच... पाठ खरचं हुळहुळली..... Happy

श्री अरभाटांचे मौक्तिक.

साउंडमास्टर साजन | 1 November, 2011 - 14:10 नवीन
बाय द वे, जितेंद्रने नक्की किती चित्रपटांत नागाची भूमिका केली आहे? आताच १० मिनिटे शेषनाग पाहिला. जितेंद्र नाग, माधवी नागिण (विजय दिनानाथ चौहानीण - पण 'हृदय नसलेली मत्सरग्रस्त' नव्हे!), ऋषी कपूर गावबावळा (=व्हिलेज इडियट) पण बासरीबहाद्दर आणि रेखा त्याची बहीण (??!!!) रेखाचा नवरा अनुपम खेर. हा मात्र हृदय नसलेला मत्सरग्रस्त. जितेंद्रचे कपडे भविष्यातील/परग्रहवासीयाचेच वाटतात आणि क्षणभर मला ते परग्रहवासीच वाटले. माधवी एकतर अंगापिंडाने मजबूत आहे आणि शिवाय तिने अंगभर कपडे घातले आहेत (रिना रॉयमुळे नागिणींकडून सामान्यांच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत) त्यामुळे ती नागीण न वाटता थोराड धामण वाटते. ते असो. तर सांगायचा मुद्दा हा की त्या दोघांत जितेंद्रच लक्षवेधक ठरतो.

जितेंद्र ते दोन्ही हातांचा फडा काढून जे काय करतो त्यात नागनृत्याची संपूर्ण वाटचाल दिसून येते. पूर्वीच्या काळी, म्हणजे अर्जुन-बिर्जुनासारखे शेहरीबाबू शेहरांमध्ये नाना लफडी करायचे, मग ती प्रकरणे दाबून टाकण्यासाठी त्याचे भाऊ/मामा वगैरे लोक त्याला गाँव में पाठवायचे. त्याच सुमारास गावात चित्रांगदा, उलूपी असल्या नावांच्या, कात टाकण्याची वेळ झालेल्या नागिणी असायच्या. मग त्या कात टाकत असताना हा बाबू त्यांणा लपूनछपून बघायचा, बर्‍याच वेळा तर ह्याच्यामुळेच त्या कात टाकायच्या. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये एक लवलवनाच असायचाच. 'लवलव' म्हणजे नागभाषेत 'दोरीवर वाळत घातलेल्या कपड्याप्रमाणे अंग फडकवणे'. कात टाकायची म्हणजे तरी दुसरे काय असते? (लै पावरबाज भाषा आहे नागभाषा). तो जबरी व अत्यंत परिणामकारक असावा (पहा - नागलोकांची संख्या वाढतेच आहे. पूर्वी फक्त नागालँडात असायचे, आता आमच्या सोसायटीतसुद्धा दिसतात. शिवाय आमचे प.ज्ञा.मित्र श्रीकंस भांडारकर यांच्यामते ट्रिपल शेझवान फ्राईड राइस आणि प्रेमासाठीचा इंग्रजी शब्द हे दोन्ही नागालँडातूनच आले आहे.) तो खरा नागानाच. तर अर्जुनासारख्या लफडेबाज शेहरीबाबूंनासुद्धा हे प्रकरण पाहून हृदयविकाराचा झटका यायचा. (तटी). तर हा खरा नागानाच जितेंद्रच्या स्टेप्समध्ये पहिले काही सेकंदच किंचितसा दिसतो. अर्जुनानंतर शेहरीबाबूंनी तिथे जाण्याचे प्रमाण फारच वाढले. प्रत्येकालाच 'लवलवनाच' शिकण्यात इंटरेस्ट. पण ज्याप्रमाणे कुठल्याही बाफचा ओढूनताणून हिंदुत्वाशी संबंध न लावणे प्रत्येकालाच जमते असे नाही, त्याप्रमाणेच प्रत्येकाला नागानाच जमतोच असेही नाही. त्यामुळे नागानाचात फालतू स्टेप्स वाढल्या, उगीच मॉडर्नपणा आला आणि तो 'वळवळनाच' झाला. ही स्टेजसुद्धा जितेंद्रच्या नाचात दिसते, जेव्हा तो आख्या माधवीला वळवळत विळखा-बिळखा घालायचा प्रयत्न करतो (चळवळ झाली तरी ते शक्य नाही हा भाग अलाहिदा!) यानंतर नागानाच शेवटच्या स्टेजला पोहोचला - 'वल्हवतनाच'. म्हणजे दोन हातांचा फडा करून, तो पार उंच करून जीवाच्या आकांताने हवेत वल्हवत राहणे. ही स्टेप फारच पॉपुलर ठरली. इतकी की नाग जाऊच दे, पण नाग फक्त ज्याच्या अंगाखांद्यावर असतो अश्या देवाच्या पोराच्या उत्सवातसुद्धा लोक हीच स्टेप घेऊन नाचतात. ही स्टेप जन्मली कशी ते बघणे फार मजेदार आहे. तेव्हा तुम्हीसुद्धा बघाच. शेषनाग.

तटी :
पूर्वीची संस्कृती (हिंदू काय, नाग काय, एकच! कोण रे ते 'सारखेच विषारी' म्हणतंय? केदारला सांगेन हां!) लै भारी, लै मॉडर्न! फिजिक्स, जेनेटिक्स, बायोइंजिनिअरिंग, मेटॅलर्जी आणि हो, एरोनॉटिक्समध्ये ते लैच पुढे गेले होते. याच विषयांवर सतत काम केल्यामुळे टेक्स्टाइल इंजिनिअरिंग मागेच पडले होते. त्यामुळे कपडे-बिपडे बेतास बात, जेवढ्यास तेवढेच असायचे. साहजिकच शेहरीबाबू नाग-गावात (नीट उच्चारावा. कृपया.) आल्यावर आधीच भंजाळलेला असायचा. त्यात हा लवलवनाच! मग हे लोक शेहरात जाऊन म्हणायला लागले, "अहो, तिथे काय नागानाच चालतो माहितीये? वावा!" आता हेच द्रोण-कृप यांसारख्या ब्राह्मणांच्या/बामणांच्या/भटांच्या/भटुरड्यांच्या/बामणुलुंच्या/बोम्मलुंच्या/बोम्मनच्या/"कोणाची-माय-व्याली-आहे-बामण-म्हणायला"यांच्या कानावर गेले आणि सवयीने सानुनासिक झाले, "आहों, आमचां शिष्य अर्जुन, नुंकतांच 'तेंथे' जावोन आलां आणि शिंचा आम्हांस वर्णन करोन सांगतों की तेंथे कैसां नांगानाच चालतो." तर त्या 'सानुनासिक नागानाचा'चा अपभ्रंश होऊन कालांतराने वेगळाच शब्द तयार झाला. ते असो.

साजिरा | 1 November, 2011 - 14:27 नवीन
सौंड्मास्टरचे संशोधन बरेचसे बरोबर वाटते आहे. पाभै आधी बघितलेला असला तरी रा-वन बघण्याआधी एकदा पुन्हा बघावा. म्हणजे कोणतेतरी रूप घेऊन एका ठिकाणावरून अदृश्य होऊन दुसर्‍या ठिकाणी अवतरणे हे शाखाचे नाही, तर जितूचे फाइंड आहे, हे सहज कळेल. पार्टिकल ट्रान्स्फर का काय ते- आधीच हिंदू लोकांना सापडले होते. जितूच्या लवलवनाच अ‍ॅक्शनवरूनच स्पायडरमॅन, सुपरमॅन आणि रा-वन यांनी जमिनिवरून हवेत उड्या घ्यायच्या अ‍ॅक्शन कॉपी केल्या. उत्तर महाराष्ट्रात खूप नाग सापडत असलेल्या नागाव नावाच्या गावात पण एक इंजिनियरिंग कॉलेज आहे. लवाळे पाटील का असेच कुणीतरी त्याचे प्रवर्तक आहेत. यावरूनही नाग-लव्-संस्कृती-हिंदू-इंजिनियरिंग यांचा संबंध शोधता येईल. टेक्स्टटाईल इंजिनियरिंग प्रगत होऊन कासट-जयहिंद (हे जयहिंद म्हणजे 'आमचे कपडे घाल, आणि 'जाय-हिंड!'' असे पूर्वी होते. स्वातंत्र्यानंतर ते जयहिंद झाले) वगैरे तयार झाले. लोकं अंगभर कपडे लेवू लागले. जिंतेंत्र वगैरे कमीकपड्यांवाले रेअर स्पेसीज् झाले.

साजिरा, सासा.. आख्ख्याच्या आख्ख्या पोस्टीसाठी! __/\__ Rofl
साजिरा... नगाव बारीचं इंजिनियरींग कॉलेज सांगतोयेस काय!! Lol

हिंदू काय, नाग काय, एकच! कोण रे ते 'सारखेच विषारी' म्हणतंय? केदारला सांगेन हां!) >> Lol अरे मला हिंदू बद्दल काहीही म्हणलं तरी चालतं, आर्य बाहेरचे म्हणल्यावर आपली सटकते. आणि संस्कृतीचं अन माझं काहीच घेणं देण नाही.

Lol .. सर पण काहीही म्हणा जामोप्याच्या विनोदी बाफांची सर नाहि हो तुमच्या नाचात, फारच सोज्वळ निघाला तुमचा Lol

असाम्या, सरांचा नाच गरळओकवळवळनाच नाहिये रे. सर खुदुखुदुगुदगुल्यानाच करवतात. वर बघ सगळे तसेच नाचतायत की नाही Proud

आशूडी यांनी वाग्मय (मला शब्द लिहिता येत नाही यात त्यांचा दोष नाही) चर्चा यावर एक व्याख्यान दिले. या शब्दाची व्युत्पत्ती, नाट्यमय भाषिक प्रवास, पार्श्वभूमी, त्या अनुषंगाने त्या काळची भाजिक संस्कृती, वांग या भाजीला समाजात असलेले स्थान, त्या संदर्भातील रूढ प्रथा व तीळ या फार्सी संस्कृतीतील सौंदर्यस्थान मानल्या गेलेल्या एका दुर्मीळ व मिळाल्यास कायमस्वरुपी आपल्याकडेच राहणार्‍या पुटकुळीबाबत काही विचार मांडले. त्यातील एक वाक्य येथे देताना आम्हाला फारसा आनंद होत नाही आहे कारण उरलेला महत्वाचा पॅरा सेव्हच नाही. असो!

<<<तेव्हा वांगी इतकी दुर्मिळ असत की एखाद्या चेहर्‍यावर अनेक तीळ दिसले तरी त्यास तीळ न म्हणता लोक 'वांग' म्हणून समाधान करुन घेत >>>

विजय दिनकर पाटील | 26 December, 2011 - 17:06 नवीन
भुंग्या, तिरकसपणा थोडा कमी कर मित्रा. कोब्रांचे सगळेच गुण जसेच्या तसे वापरले पाहिजेत असे थोडेच आहे?

भुंगा | 26 December, 2011 - 17:07
विदिपा.. बोलू आपण.

111_0.JPG

इथे फक्त हलके फुलके संग्राह्य असे लेखन archive करावे कृपया. उखाळ्या पाखाळ्यांचे स्क्रीन शॉट्स नकोत. संबंधित अधिकारी इकडे लक्ष देतील काय ?

भंडउभंड | 30 December, 2011 - 15:07

विचित्रवेळ असल्याने चाकोफीशिवाय* नमस्कार. आजच्या बातम्या -
नुकत्याच केलेल्या उत्खन्नावरून माचूपिचूसंबंधी नवी धक्कादायक माहिती उपलब्ध होते आहे. त्यात एका भूर्जपत्रावर पुढील इतिहास आढळला -
आदिकालात भारतवर्षात विविध फलफलावले उपलब्ध होती. पण काही फळे आयातच करावी लागत. पण ती पुरेशी ठरत नसत. म्हणून काही दुकानदारांनी मूळ देशात जाऊन फळे आणण्याचा विचार केला. त्यामुळे एकतर ट्रेड रूट एस्टॅब्लिश होईल आणि मुख्य म्हणजे डिमांड असल्याने व्यापारात फायदाच फायदाच. तेव्हा ही व्यापारी मंडळी फळे शोधत हिंडाहिंडी करू लागली. हिंडण्याच्या वेडाने हे लोक इतके झपाटलेले होते की लोकांनी 'काय हो, जायफळ आहे का?' असे विचारले तर उत्तर यायचे 'नाहीये, पण मिळेल. चला, आपण हिंडू'. शेवटी लोक त्यांनाच 'हिंडू' म्हणू लागले. तर असेच भटकत यातील काही लोक कोकण प्रांती पोहोचले. आंब्याचा सीझन होता. हा हिंडूंनी आंबा चाखला आणि ते वेडेच झाले. मग ते दिसेल त्या घरात घुसून 'आंबा आहे का?' विचारायला लागले. मालक तर तेव्हा आमराईत असायचे, घरी मालकीणबाईच असायच्या. मग पुढील संवाद घरोघरू व्हायला लागले -
'आंबा आहे का?'
'घरी नाहीये, झाडावर आहे. जवळजवळ पिकलाच आहे. पाडायलाच आलाय.'
'मग आम्ही जाऊन तोडू का?'
'जरा थांबा हो पाहुणे. मालक घेऊन येतीलच.' असे 'सवालजवाब' सततच घडू लागले. इतके सतत की हिंडू दारी दिसले रे दिसले की मालकीणबाई स्वतःच दारापाशी येऊन 'आंबा पिकून पाडायलाच आलाय, पण नका तोडू, जरा थांबा' असे सांगू लागल्या. पण तरी काही कोकणी लोक इतके भंडावून गेले की ही ब्याद टाळण्यासाठी त्यांनी या हिंडूंना आंब्यापेक्षा भारी फळाची लालूच दाखवली - पेरू, तोही लाल आणि हिरवा. अन् सांगितले की हे फळ पार सातासमुद्रापार मिळते. जहाजात बसून जा. झाले! मग हिंडू मंडळी जहाजात बसून निघाली. पण जहाजप्रवास त्यांना एकचदम नवीन. जहाजाच्या झुलण्याची भीती वाटायला लागली. तेव्हा जहाजाचे झुलणे कमी करण्यासाठी त्यांनी देवाला नवस बोलला, 'झुलणे थांबव, तर तुला लाल पेरूचा नैवेद्य दाखवू.' काय आश्चर्य! झुलणे थांबले. मग त्यांनी देवाचे नाव ठेवले - 'लाल पेरू आवडणारा झुलणे थांबवणारा देव'. तर मजल दरमजल करत ते एका दूर्देशी पोहोचले, तेव्हा त्यांना वाटले हाच तो पेरूप्रदेश. तिथे 'पेरू कुठे? कुठे पेरू?' करत ते हिंडायला लागले. असे फिरत फिरत ते एका डोंगरमाथ्यावर पोहोचले तर काय! तिथे एक भव्य शहर. काय तो थाट! वावा!! तेव्हा व्यापाराला संधी मिळाली म्हणून हिंड्यांना लय आनंद झाला. पण व्यापार करायचा म्हणजे तिथल्या राजाची परवानगी पाहिजे. म्हणून त्यांनी एकाला 'भैया, ये शहर किस का है?' असे विचारले. आता तिथे निम्मे लोक टुरिस्ट. ज्याला विचारले तोही टुरिस्ट. त्याने स्थानिकांकडे बोट दाखवून सांगितले, 'ये इनका शहर है'. पुढील इतिहास सर्वज्ञातच आहे.
यातल्याच काही लोकांना हिंडून इतका वैताग आला होता की ते म्हणाले, 'बास झाले, हिंडूत्वात काही दम नाही. एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे.... याला काही अंतच नाही. सगळाच फसवा खेळ आहे. ही सगळी मोहमाया आहे.' असे म्हणून ते हिंडूंपासून फुटून निघाले आणि त्यांनी नवीन प्रदेश वसवला. तिथे फक्त 'जग ही माया आहे' असे मानणार्‍यांनाच प्रवेश होता. मग लोक त्यांनाच माया म्हणू लागले.
यातीलच काही हिंडू सतत हिंडतच राहिले आणि हिंडतहिंडत जगाला वळसा घालून पाचनद्यांच्या प्रदेशात पोहोचले. पण जेव्हा त्यांना कळले की आपण आता परत तिथेच आलो आहोत, तेव्हा ते म्हणाले, आता इथेच थांबू. मग त्यांनी तिथे हिंडप्रदेश वसवला. तर ते असो.
* हा शंकराचा मंत्र नाही. हे शंकराचे 'उत्तेजनदायकस्तोत्र' नाही.

.

Pages