बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेव्हा फारेंड यांनी 'माया, इन्का, पेरू प्रमाणे चिलीची उत्पत्ती कळाली असती तर ग्रंथ परिपूर्ण वाटला असता' असा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा श्रद्धा यांनी तत्परतेने ती उणीव दूर केली -

श्रद्धा | 30 December, 2011 - 13:19

माया, इन्का, पेरू प्रमाणे चिलीची उत्पत्ती कळाली असती तर ग्रंथ परिपूर्ण वाटला असता<<<<
इनका शहर उंचावरच्या पर्वतावर होते. विमान आकाशातून जाताना तेवढ्या उंचीवर गेले की, आतमध्ये माहिती देणार्‍या टीव्हीवर उणे १०+ तापमान दाखवतात. म्हणजेच तिकडे सदासर्वकाळ थंडीच असते. कोकणातून (व्हाया गोवा इंटरन्याशनल एअरपोर्ट) थेट तिकडे गेल्याने या लोकांनी बरोबर पुरेसे कपडे (उबदार!) नेले नव्हते. त्यामुळे भयंकर कुडकुडणारी अवस्था त्यांना प्राप्त झाली. तिथली टूर लौकर आटपून (व सोबत पुरेशा पिस्को सावरच्या बाटल्या घेऊन हे महत्त्वाचे!) कसेबसे ते समुद्रसपाटीवरचा प्रदेश शोधत शोधत एकेठिकाणी आले. तिथेही पुन्हा त्यांना दुसरीकडचे टूरिस्ट भेटले. त्याकाळी कुणालाच विशेष उद्योग नसल्याने लोक संधी मिळेल तेव्हा ऑफ सीझन डिस्काउंट मिळेल तिथे हिंडत असत. त्यांच्या 'हा प्रदेश कुठला? तुम्ही कोठून आलात? इथे कसे वाटतेय? आधी कुठे होतात?अण्वस्त्रबंदी व्हायला हवी का? अँजेलिना जोलीला मुले किती?' वगैरे कुठल्याही प्रश्नाला अविरत कुडकुडण्यामुळे यांच्या तोंडून 'चिली' हे एकच उत्तर बाहेर पडत होते. स्थानिक वृत्तपत्रांत यांची बातमी झळकल्यावर लोकांना तो शब्द बराच इंट्रेष्टिंग वाटला. मग त्यांनी दहा डॉलरांच्या ष्टांपपेप्रावर अ‍ॅफिडेविट करून देशाचे नाव ते ठेवून घेतले. यांनी कॉपीराइटाचा मुद्दा काढू नये, म्हणून स्पेलिंग मात्र वेगळे केले.

मंदार_जोशी | 2 January, 2012 - 13:01

सुठ वडी करता येईल म्हणून पाककृती वाचायला गेलो आणि पोपट झाला.
असंख्य प्रश्न मनी आले.

>>तुप पातळ करुन घ्यावे..
म्हणजे काय?
उपप्रश्नः तूप आधीच पातळ असल्यास काय करावे?

>>चमचाभर पिठी साखर वगळावी..
म्हणजे चमचाभर वगळून बाकीची घ्यावी की चमचाभर वेगळी काढून ती घ्यावी?
आणि बाकीच्या पिठीसाखरेचे काय करावे?

>>एका ताटलीला तुपाचा हात फिरवुन वरुन वगळलेली पिठी साखर भुरभुरावी..
भुरभुरावी म्हणजे काय करावे? भुरभुरताना उडून गेल्यास उरलेली "वगळलेली" समजावी काय?

>>एका लहान पातेलीत सुंठ पुड व साखर चमच्याने एक्त्र करुन घ्यावी..
एकत्र करताना वगळलेली साखर घ्यावी की बाकीची?

>>आता वरुन पातळ केलेले तुप थोडे-थोडे ओतावे..घट्टसर गोळा होईपर्यंत ढवळत रहावे..

किती घट्ट? घट्टसर म्हणजे काय? थोडे थोडे म्हणजे किती?

>>तयार गोळा तुप लावलेल्या ताटलीत थापावा..
इथे साखरेचे काय?

>>बोटाच्या एक पेराएवढ्या लहान लहान वड्या पाडाव्या..
बुंदी सारख्या का? की कशा?

>>रोज सकाळी एक वडी खावी ..थंडीपासुन रक्षण होते..
त्यापेक्षा तुम्हीच पाठवा. मी खातो Proud

आता वरुन पातळ केलेले तुप थोडे-थोडे ओतावे
>>>
आता वरून पातळ केलेले अन खालून पातळ केलेले असे तुपाचे पातळ करण्याचेही दोन प्रकार आहेत का? ते कसे करतात? आणि का करतात? का? का? का?

बाजो Rofl

limbutimbu | 16 January, 2012 - 14:45
>>> काका जास्त बोलु नका आपण मेलेलो आहोत. हाहा हाहा हाहा
नै पण आपण पिम्पळावर बसुन बोल्तोय ना झाडाला उल्टे लटकुन? मन्ग?

(या मरण्यावर एक सुन्दर स्वगत पाडता येईल खर तर!
पहिल्यापासून आम्ही मरतच आलोय. लहानपणी भेळ-कुल्फि वगैरे खाण्यावर मरत राहिलो.
जरा मोठ्ठे झाल्यावर जेव्हा कधी सर्कस बघितली, सर्कशीतल्या यच्चयावत गोष्टीन्वर मेलो.
अजुन मोठ्ठे झाल्यावर म्याटीनीला शिनुमात बघितलेल्या ब्ल्याकान्व्हाईट्ट नटनट्यान्वर मेलो.
मधेच कधीतरी चूकुन लिम्बीवर मेलो, आजवर मरतच राहिलो. फिदीफिदी
अन आता हे असं, बॉससमोरदेखिल मेल्यागतच अस्तो आम्ही सदान्कदा.
तिकडे ते चिन्हवाले आले तर आम्ही बापडे लाजुन लाजुन मरतो.
पलिकडे कल्ट वाले आले तर आम्ही आमच्याच देवासमोर हात जोडाताना देखिल मरतो.
अन आम्ही मेलो नै वेळच्यावेळीच, उगाचच शब्दान्च्या लाह्या फोडतच राहिलो, तर आम्हाला पालथेघडे/मठ्ठ्म्भारती वगैरे म्हणून मारले जाते... मरतोच आम्ही.
येवढ मरण पुरेस नै तर तिकडे जनगणमनचे तिसरे कोडे आम्हाला मारायला तय्यारच आहे, फक्त त्या सापळ्यात अडकण्याची तेवढी खोटी आहे! हाहा
मला तर वाटते की मी सोडून आख्खे जग यमाचे दूत आहे. पावलापावलावर मारत अस्ते. )

श्रद्धा | 12 March, 2012 - 16:42

रामकाकांनी टाकलेल्या छायाचित्राचे विश्लेषणः

समोरून पहिल्या ओळीतल्या पांढरा टीशर्ट घातलेल्या व्यक्तीचे केस समोरून मागे उडत आहेत. एक्स्ट्रीम राईटच्या व्यक्तीने तर वार्‍याच्या झोतापुढे शरणागती म्हणून आपले डोके लवविले आहे. वार्‍याने उडून जाऊ नये म्हणून मालक अज्ञात असलेला एक हात खांब पकडून दिसतो. या परिस्थितीचा अभ्यास करता राका वार्‍याच्या झोताच्या दिशेशी समांतर का उभे राहिले असतील, हे सहज कळून येते. (विग सलामत तो फोटो पचास!) एरवी सहसा लोकांत बक्षीस स्वीकारणे, लग्न इत्यादी प्रसंगात केवळ फोटो काढणार्‍याकडेच बघायची प्रथा दिसून येते. ही प्रथा मोडण्यातली मजबूरी आणि विषण्णता फोटोत राकांच्या चेहर्‍यावर दाटली आहे.
*****
श्रद्धा | 12 March, 2012 - 16:55

राका, तुमच्या लक्षात आलंय का? इथे शेपू आवडणारी जनता डोक्यावर भरपूर केस राखून आहे आणि शेपू न आवडणार्‍या तुमच्या डोक्यावर.. (जाऊ दे, पुन्हा पुन्हा दु:खावर डागण्या नकोत.) तर माझा काय सल्ला आहे की, मन घट्ट करून शेपू खायला लागा. होमेपदीच्या साबुदाणा गोळ्यांपेक्षा शेपू चविष्ट लागेल. आहारात शेपू, मेथी, पालक, चिवळ अशा जुडीवर्गातल्या भाज्यांचा समावेश असू दे. बटाटा, दुधीभोपळा, वांगं अशा गुळगुळीत भाज्या वर्ज्य! सहा महिन्यांत चमत्कार पहा. वार्‍याच्या झोताला तुम्ही मजबूत केसांनी सामोरे जाल. सॅमसनानंतर महाकाव्यांत उल्लेख होईल तो तुमच्याच केसांचा! 'द क्यूरियस केस ऑफ रामकाका' नावाचा ऑस्करविजेता सिनेमाही तुमच्यावर बनेल. तथाऽऽऽस्तु!

श्रच्या घरात कबुतर आल्यावर -

मिल्या | 14 June, 2012 - 11:55
श्र, फारेंड, अँकी

आज इकडे कबूतरनामा का?

श्र : तू त्यापेक्षा 'पंछी बनू उडती फिरू मस्त गगन मै' हे जुने गाणे म्हण...म्हणजे जशास तसे होईल... त्याने तुझ्या घरात अतिक्रमण केले तू त्याच्या घरावर करायची धमकी दे...

आमच्या माबो प्रतिनिधीने ह्या घटनेविषयी काही जाणकारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या

मनेका गांधी : (ह्या कायम पेटलेल्या असतात) 'पेटा' कायद्यानुसार श्र आणि फ ला पोटा लावून घरातून बाहेर काढायला पाहिजे... कबुतराला पण मन असते .. त्याला जर फ्लॅट वर राहावेसे वाटत असेल तर आपण मानव कोण त्याला आडवणारे?

दिग्विजयसिंग : ह्यात नक्कीच संघाचा 'हात' आहे. श्र RSS agent आहे... नेहरूंना कबुतरे आवडत म्हणून ती मुद्दम्हून त्याला हाकलून लावत आहे.. कबूतर हे अल्पसंख्यांक आहे... त्याला आरक्षण मिळालेच पाहिजे...

राहुल गांधी : कबुतर एका सुखवस्तुच्या घरात शिरल्यावर त्याचे असेच होणार... त्याने एकाद्या गरीबाच्या झोपदीत जायला हवे होते म्हणजे त्याचा यथोचित आदर-सत्कार झाला असता...

अण्णा हजारे : सामान्य माणसाला upa सरकारच्या राज्यकाळात स्वतःच्या घरात सुखाने राहाणेही अवघड झाले आहे... हा सर्व सरकारच्या भ्रष्टाचाराचा परीणाम आहे... जर हे कबूतर ८ दिवसात श्र च्या घरातून निघून गेले नाही तर मी आमरण उपोषण करेन...

किरण बेदी : आण्णा च्या नावने मेडिआ दिशाभूल करत आहे.. आण्णा उपोषण करणार नाहीत...

अरविंद केज्रीवाल - आण्णा उपोषण नक्कीच करणार... बेदीं आणि माझ्यात काहीही मतभेद नाहीत

मोहन भागवत : सिंगापूर्स्थित भारतियांच्या घरात कबूतर शिरणे हे चिनीप्रणित माओवाद्यांचे कारस्थान आहे... सर्व हिंदूनी एकजुतीने ह्या घटनेचा निशेध केला पाहिजे...

सुषमा स्वराज : कबूतराचे नाव 'मसक्कली' असल्याने सरकार त्याला पाठीशी घालत आहे... ह्या सरकारला सत्तेवर रहायचा काहीही अधिकार नाही...

बाकी ब्रेक के बाद

फारएण्ड | 14 June, 2012 - 12:16
मिल्या, जबरी

माबो आयडी १: कॉंग्रेससरकारच्या नेभळटपणामुळे ते कबूतर अजून ठाण मांडून बसले आहे. १९४८ सालीच ते हलवायला हवे होते. पण नेहरू...

माबो आयडी २: तुमच्या भाजपने १३ दिवसांत कावळे, चिमण्या सुद्धा हाकलले नाहीत म्हणून जनतेने त्यांना हाकलले.

माबो आयडी ३: कौव्वा हंस की चाल चला, पर... (हा विनोद नक्की काय होता ते किमान लिहीणार्‍याला तरी कळले असावे अशी आशा आहे)

माबो आयडी ४: सावरकरांनी घरात एकही कबुतर येउ देउ नका म्हणून आधीच सांगितले होते. आता सगळे जग तो मंत्र मानते, पण तोंडावर गांधी...

माबो आयडी ५: कबुतर या जातीलाच अक्कल नसते.

माबो आयडी ६: तुम्ही काय स्वतःला गरूड समजता काय?

माबो आयडी ६: अ‍ॅडमिन येथे पक्ष्यांच्या जातीवरून विनाकारण वैयक्तिक शेरे मारले जात आहेत. कृपया (तुमचे कामधंदे सोडून) येथे सतत लक्ष ठेवा.

माबो आयडी ७:
आता सगळे जग तो मंत्र मानते, पण तोंडावर गांधी...>>> येथे एतद्देशीय पक्ष्यांच्या जातीचे काय घेऊन बसलात? वर्षानुवर्षे मॅकॉलेप्रणीत पोपटपंची करणार्‍यांना काय कळणार कबुतरांशी कोणत्या भाषेत बोलावे लागते? यांना उद्या एखादा किंगफिशर घरात आलेला चालेल पण देशी कबुतरे आली की यांची आपल्या संस्कृतीवर उठसूट टीका चालू. तिकडे देशविघातक कारवाया चालू आहेत आणि कबुतरे घेऊन बसलेत.

(ही पोस्ट कोणालाच न कळाल्याने चर्चा पुरेशी झाली असे समजून बंद करण्यात आलेली आहे).

सुरुवातीची काही पोस्टे:

श्रद्धा | 14 June, 2012 - 11:40
आज सकाळी घरात कबूतर शिरले. आधी ते बाथरुममध्ये होतं. मग शूचिर्भूत होऊन ते स्वैपाकघरात आलं. मग ग्यासशेगडीशेजारी ठाण मांडून बसलं. त्याची आन्हिकं आटोपलेली वाटली म्ह्णून 'आज ओटमील कर' असं सांगून मी आंघोळीला गेले. परत आले तर ते तसंच काम न करता मख्ख बसलं होतं. त्यामुळे आजचा ब्रेकफास्ट बुडला.

कबुतराला बाहेर घालवायला केलेले उपायः
१. कबूतर जाजाजा गाणे म्हटले. संशोधन: हे गाणे कबुतराला आवडले नाही. गाणे ऐकून त्याने ग्यासशेजारचा मुक्काम हलवून फ्रीजबाजूस नेला. (गाण्याने डोके तापले असेल.)
२. मांजरीचा आवाज काढला. कबूतर निधड्या छातीचा वीर निघाले. जागचे तसूभरही हलले नाही.
३. छ्त्री उघडमीट करून फडफड आवाज काढला. कबुतराच्या ध्वनिकोशात असा काही आवाज नसावा. त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र छत्रीची काडी मोडली.

शेवटी त्याला 'दूध फ्रिजात आहे. चहा लागला तर करून घे. भूर्र्र्र्‍अकन उडून जा' असे सांगून, खिडक्या उघड्या ठेवून घराला कुलूप घालून निघालो.

तर सुप्र लोक्स.

संपादन
आगाऊ | 14 June, 2012 - 11:53
श्रद्धा, बहुतेक त्या कबूतराची 'टेस्ट' वेगळी असावी. तू; दिल जंगली कबूतर (कहर), चढ गया उपर रे (दलाल) आणि दिल मेरा लकी कबूतर( दाग-द फायर) ही गाणी म्हणायला हवी होतीस.

प्राची | 14 June, 2012 - 11:58
खिडक्या उघड्या ठेवून घराला कुलूप घालून निघालो.>>> झालं... आता कबूतर आपल्या मित्रमैत्रिणींना जमवून पार्टी करणार दिवसभर. फ्रिजात अजून कसल्याकसल्या बाटल्या असतील तर लवकरच गूटरगूंडॉट्कॉमवर 'त्या' बाफवर किस्सेही येतील कबुतरांचे. 

श्रद्धा | 14 June, 2012 - 12:01
हो हो.. तसंच 'नैन कबूतर उड गये दोनों' पण आहे. त्यात उडणे सूचित केले आहे, म्हणून ते जास्त परिणामकारक होईल बहुधा. ('ऐसे उडे कबूतर मेरे लौट के फिर ना आये' हा अ‍ॅडेड बोनस!) संध्याकाळीही ते तिथेच असेल तर 'लाईव्ह आरकेस्ट्रा' करणार. शेवट मा श्री कादरखाँ आणि श्रीश्रीश्री गोविंदा यांच्या 'छछूंदर के सर पे न भाये चमेली' या गाण्याने! या गाण्यात कबूतर नाही, पण ते माझे फेवरिट गाणे आहे.

संपादन
प्राची | 14 June, 2012 - 12:03
श्र, ते कबूतर नव्या पिढीतले असेल तर 'मस्सकली' सुद्धा चालेल. 

आगाऊ | 14 June, 2012 - 12:08
उत्तम! तुझा याबाबतीतला व्यासंग दांडगा आहेच, तरीही 'मस्सकली' वगैरे गुलजारी गाणी शक्यतो नकोच. पुन्हा ते कबूतर आहे की कबूतरी हे माहिती नाही, उगाच लिंगनिरपेक्षतेचा घोळ व्हायचा.

श्रद्धा | 14 June, 2012 - 12:09
मसक्कली??? टीचर, ते मध्येच डोक्यावर येऊन बसलं तर काय करायचं?

आणि ते गाणंही नावडतं असेल तर,

'मसक्कली????
आता माझी सटकली'
असं म्हणून तांडव करायला लागलं तर??

फारएण्ड | 14 June, 2012 - 13:19
श्रद्धा  'डव्ह' साबण आहे का तुझ्याकडे? "आमच्या कडे बिन बुलाये आलेल्या कबुतरांचे आम्ही काय करतो ते त्यावरचे चित्र प्रूफ म्हणून दाखव त्याला'

मंजूडी | 14 June, 2012 - 13:30
सिंगपुरी कबुतर असल्याने त्याला मराठी हुकुम आणि हिंदी गाणी समजली नसण्याची शक्यता आहे. जरा वेगळ्या भाषेत त्याच्याशी बोलून बघा.बेगॉनवेल तुमच्याशी बोलली कारण ती पुण्यातली होती. कबुतर सिंगापुरातले आहे हे ध्यानी ठेवा.

तर सुप्र पुपु!

प्राची>> मसक्कली आणि फारएण्ड>> डव  

श्रद्धा | 14 June, 2012 - 13:34
फारएण्डा,  डव्ह साबण आहे रॅपरसकट. तोही वापरून पाहते.

डै, कबूतर सिंगापुरी असले तरी इकडे बॉलिवूड लोकेप्रीय आहे. तेव्हा त्याला आकलनास अडचण नसावी. तेवढे त्याच्या आवडीचे गाणे सापडायला हवे.

श्रद्धा | 29 June, 2012 - 08:10
मांसाहारावरून मला प्रमपूज्यनीय रतनलाल बाफना यांची आठवण झाली.

जळगाव नामे ग्रामी यांनी सोन्याची पेढी आणि शाकाहाराचा प्रसार असे दोन उद्योग सुरू केले. भिंतीवर ग्राफिटी, शालेय विद्यार्थ्यांसाठी आमरण शाकाहाराचा शपथविधी, बोकड कापला जाताना (त्याच!) बोकडाच्या मनातील भावनाकल्लोळाचे डिटेलवार अश्रूत्पादक वर्णन स्थानिक पेप्रांतून करणे अशा मार्गाने ते अविरत काम करत असत. दागिने कधी घडवत डन्न्नो! एकदा आजीच्या मावसचुलत भाचेसुनेच्या मुलीच्या लग्नासाठी तिथून दागिने घ्यायला गेल्तो तर एकदम जुनाट दागिने! वर्दातैंनी टाकलेले दागिनेसुधा त्यापुढे नवे वाटलेसते. नवीन फ्यान्सी डिझाइन नाही न काही नाही. भाचेसुनेच्या मुलीला शेवटी गाडगिळांकडनं घ्यावे लागले सगळे दागिने! (तिनी शिंदेशाही तोडे केले. भाचेसून म्हटली पाटल्यापण कर. पण तिला ते पटलं नाही म्हणे! आज्कालच्या मूली...) असो.

रबांचे बोकडवर्णन पुढे पुढे इतके वाढले की शालेय जनतेने त्यांना खूश होऊन 'मटणलाल बाफना' असे नाव बहाल केले. (जोधा अकबर सिनेम्याच्या रेफ.नुसार असे जनतेकडून नवीन नाव मिळालेला अकबर पहिला, आमचे मटणलालआजोबा दुसरे!)

तेही असोच.

श्रद्धा | 29 June, 2012 - 08:30
फारेंडा, आधी त्याचे नाव 'जलालुद्दीन मोहम्मद' एवढेच होते म्हणे! 'अकबर' लोकांनी दिले. नाहीतर नंतर ' अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी' 'आईने अकबरी' ही पुस्तके, अकबर्‍या हा पदार्थ (पहा: ओगलेआजींचे रुचिरा. हा पदार्थ फार खुमासदार लागतो) सगळयांच्या नावांची खूप पंचाईत झाली असती.

फारएंड मितरा, रुचिरा हे पदार्थांचे पुस्तक तर अकबर्‍या हा अ‍ॅक्चूअल पदार्थ आहे (असे ओगलेआजी म्हणतात. अजून मी अकबर्‍या केल्या नाहीत, खाल्ल्या नाहीत, 'अकबर्‍या केल्या व खाल्ल्या' असे सांगणारी/रा बाई अगर पुरुष पाहिलेला नाही. 'अकबर्‍या फारच खुमासदार लागतात.' हे रुचिरातलेच वाक्य येथे छापले आहे.) तर यापैकी काय खुमासदार असेल सांग बरे? दुसरा कंसः(माझ्या माँनेपण कधी अकबर्‍या केल्या नाहीत. त्यामुळे 'आईने अकबरी डब्यात दिली आहे./आईने अकबरी मस्त केली आहे./आईने अकबरी बिघडवली.' अशी वाक्ये लिहिण्याची संधी हुकल्याचे अतोनात दु:ख आहे.)

स्थळः अकबराचा राजवाडा. समोर नव्या पुस्तकाचे हस्तलिखित घेऊन बसलेला अकबर. पूनम सिन्हाने त्यादिवशी खपून अकबर्‍या केल्या होत्या. (त्या फारच खुमासदार झाल्या होत्या, इ.) त्यामुळे त्याच्या विचारांची पीन 'आईने अकबरी केली आहे. मस्त केली आहे. यम्मी झाली आहे.' एवढ्यावरच अडकली होती. तिकडून सासरा भारमल आला.

भारमलः काय म्हणता जावईबापू? कस्काय हवापाणी?
अकबरः एकदम कूल.. आजतर आईने अकबरी केली आहे.
भारमलः असं का? बरं बरं. एखादी आम्हीही खाऊ. राज्य वगैरे ठीक ना?
अकबरः यप.. आज आईने अकबरी..
भारमलः सहीये. जोधा काय म्हणत्ये?
अकबरः चिलिंग आऊट अ‍ॅट दार्जिलिंग. आईने अकबरी..
भारमलः नवीन लिखाण चाल्लंय वाटतं? यंदा तुम्हांला बुकर शुअर. काय नाव पुस्तकाचं?
अकबरः आईने अकबरी..

या सगळ्या प्रकरणातून रेकॉर्डकीपिंगच्या माणसाच्या हातून पुस्तकाचे नावच ते नोंदले गेले. यात त्याची तरी काय चूक? पुन्हा भूर्जपत्राच्या वर 'आईने अकबरी' असे खुद्द अकबराने खरडलेले मिळाले, असे संशोधन झाले आहेच. (पूनम सिन्हाच्या रेस्प्यांच्या डायरीतले भूर्जपत्र नंतर ओगलेआजींना मिळाले असावे, अशी दाट शक्यता आहे.)

'अकबर्‍या केल्या व खाल्ल्या' असे सांगणारी/रा बाई अगर पुरुष पाहिलेला नाही. 'अकबर्‍या फारच खुमासदार लागतात.' हे रुचिरातलेच वाक्य येथे छापले आहे
>>>>
इतकेच काय ,मुदलात गोखले आजींनी तरी कुठे अकबर्‍या केल्या व खाल्ल्या आहेत? नाही म्हणजे असे त्यानी 'रुचिरात ' कुठेही म्हटलेले नाही की मी सोत्ता अकबर्‍या (किंवा पुस्तकातले इतर सर्व पदार्थ )केले आणि खाल्ले आहेत म्हणून.. जोपर्यन्त त्यानी करून खाल्ल्याचा अस्सल पुरावा मिळत नाही तो पर्यन्ट त्यानी हायपोथेसिस मांडणार्‍या शास्त्रज्ञाप्रमाणे तर्काच्या आधारे रेस्प्या बणवळ्या आहेत अशे ग्रूहीत धर्णे भाग हाये...

नीधप | 4 July, 2012 - 10:03

मितरा या शब्दाचे मितवा या शब्दाशी जवळचे नाते.
वन्सपॉनटैम आटपाटनगरात एक सुंदर युवती असे. तिला मैत्रीचा भारी शौक.
ती सर्वे लोकांशी व प्राण्यांशी मैत्री करी. त्यांना पत्रे लिही.
तिच्या मैत्रीला लिमिटच नव्हते. त्यातून पत्रमैत्री. त्यामुळे काय आस्कूच्च नका, भाव्ना नुसत्या इकडून तिक्डे व्हात असत.
अश्या या सुंदर आणि मैत्रीपूर्ण युवतीमधे एक दोष होता. लोक बाकी नीट बोलतात पण एखादेच अक्षर चुकीचे बोलतात (जसे की हिंदी सिनेम्यातले सिंधी लोक र ला ड म्हणतात).. तसे ती एकदम सुद्ध लिहित असे पण जोडाक्षरे काढत नसे आणि र हाच्च केवळ चुकीचा काढत असे.
एकदा तिने एक व्याकूळ पत्र लिहिले. त्या सत्तेचाळीस पानी पत्रात प्रत्येक पानावर मितरा मितरा अशी हाक होती.

ते पत्र थोड्या कमी वन्सपॉनटैम नंतर तेव्हाच्या वरदाच्या हातात लागले. तोवर मितवा हा शब्द खूप गाजला होता. इतका की लोक मितवा तूउलथने अश्या प्रेमकविता करू लागले होते. मग तेव्हाच्या वरदाने हातात आलेल्या पत्राचे सं सं संशोधन केले आणि तिला वन्सपॉनटैमच्या सुंदर व मैत्रीपूर्ण युवतीच्या भाव्नाप्रवाहाचा शोध लागला.

तिने मितवा म्हणजे खरंतर मितरा असे सिद्ध केले.

श्रद्धा | 4 July, 2012 - 10:12

श्रद्धा - मग काळाच्या पुढे असलेले विडंबन म्हणू शकतो त्याला.
<<<< हाहा

नीधपतै हाहा आजही भोजपुरीबहुल पट्ट्यात 'मितवा' हेच प्रचलित आहे.

'आ लौट के आजा मेरे मितवा, तुझे मेरे गीतवा बुलाते है..' हे तेथील फेमस लोकगीत. यावर खरेतर डोक्यात पिसांचा पसारा खोवून करायचा जोषपूर्ण नाच होता, पण गीत चोरल्याचे कळू नये म्हणून भाभूला घेऊन त्याचे बैठे गीत केले गेले.

नीधप | 4 July, 2012 - 10:17

आजही भोजपुरीबहुल पट्ट्यात 'मितवा' हेच प्रचलित आहे.<<
तिकडेच होतं ते आटपाटनगर डोळा मारा

श्रद्धा | 4 July, 2012 - 10:20

'सुंदर युवती' या दोन शब्दांसाठी विशेष आभार. फिदीफिदी

तिकडेच होतं ते आटपाटनगर <<<< म्हणजे वर्दाताईंना कलकत्त्यापासूनही जवळ!

साती | 4 July, 2012 - 10:28

घायल मनवा का पगला पंछुडा उडने को बेकरार रही
पंख्वा हई कोमल अखिया हई टल्ली, जावन सागर पार रही
तनिक तुमही इसे समझैयो कहा पे राहवा भूलन गयी

असं एक कडवं त्यात आहे अस्म मला आताच वरदाने संपर्कातून कळवलंय.

साती | 4 July, 2012 - 10:30

आणि त्या पिसंवाल्या डाम्सच्या पाठी ' झिंगालाला हु, झिंगालाला हु, है, है '

श्रद्धा | 4 July, 2012 - 11:09

अजून थोडे संशोधनः 'आ लौट के आजा मेरे मीत..' हिंदीत पहिल्यांदा ऐकवले गेले तेव्हा काही लोक 'वा.. वा' म्हणत होते. लोकांनी गाण्याची वाहवा केली असे वृत्त लगेचच प्रसारित करण्यात आले. परंतु, त्या लोकांनी वाहवा केली नसून ते मूळ गाणे जाणणारे भोजपुरी होते व प्रत्येक ओळीत कुठलाकुठला वा राहून गेला आहे ते सांगत होते. ही माहिती रामशरण चौबे, (जिवंत असताना) राहणारः छपरा, यांच्या डायरीत सापडली. डायरी वरदातैंना छपरा येथील उत्खननात सापडली. छपरा येथे उत्खनन करायची प्रेरणा वरदाताईंना 'बंबई की लैला, छपरा के छैला' या सिनेम्याचे केवळ नाव ऐकून मिळाल्याचे आमचे कलकत्ता येथील वार्ताहर कळवतात.

मंजूडी | 4 July, 2012 - 11:14

प्रत्येक ओळीत कुठलाकुठला वा राहून गेला आहे >> हाहा

यासंदर्भातील अजून एक निरीक्षण म्हणजे अशी नामुष्की टाळण्यासाठी गाणे म्हणताना ज्या ज्या शब्दाला 'वा' लागण्याची शक्यता होती, तिथे तिथे सांगितिक शब्द गायले जाऊ लागले. उदा. 'आ लौट के आजा मेरे ट्यँव, तुझे मेरे ट्यँव, बुलाते है'

नीधप | 4 July, 2012 - 11:20

छपरा या गावची एक वेगळी गंमत आहे. तिथे मोठ्ठे मोठ्ठे क्रौंच पक्षी येत. त्यांचे पंख इतके मोठे असत की ते घरावर बसल्यावर छप्पर घालायची जरूरच पडत नसे. पण ते पक्षी मनस्वी असल्याने हवे तेव्हा उडून जात आणि घरे उघडी पडत. आयते छपर मिळत असल्याने छपरे बांधायची कला त्यांच्यात विकसित झाली नव्हती.
असो तर या पक्ष्यांना छप्पर असे नाव पडले होते. ते उडून जाऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी अन्न टाकण्यात येई, उडालेच तर त्यांना बोलावण्यासाठी 'छप्पर आ आ आ' असे गाणे म्हणले जाई.
या गाण्याचा आवाज इतका मोठा असे की पंचच काय दशक्रोशीतही गाणे ऐकू येई. तेव्हापासून त्या गावाचे मूळ नाव जे होते ते जाऊन छपरा असेच नाव पडले.
पुढे यथावकाश काही हुशार लोकांनी छप्पर अन्न खात असताना त्यांचे पाय घराशी जखडवून टाकण्याची कला आत्मसात केली आणि मग छप्पर उडेनासे झाले.

फारएण्ड | 4 July, 2012 - 11:22

उपरोक्त संशोधनास आम्ही दुजोरा देऊ इच्छितो. इतके दिवस आम्ही छपरात संशोधन म्हणजे लोक कौलांवर जाऊन उत्खनन करीत की काय असा संभ्रम जाणकार संशोधकांत निर्माण झाला होता (अजाण संशोधकांना "व्हाई दिस कौलावरी कौलावरी डी" हे गाणे त्याबद्द्लच आहे असे वाटे. म्हणजे कौलांवर संशोधन कशाला म्हणून). आता गेल्या काही वर्षांतील संशोधनांची संगती लागेल म्हणून लोकांनी सुस्कारा टाकला आहे. विद्यापीठांत आनंदाचे वातावरण आहे. पण एक मुद्दा अजून अनुत्तरित आहे. काही भोजपुरी वाक्यांत मूळ शब्दानंतर "वा" लावायची पद्धत आहे. उदा: बहुधा कक्काजी कहिन या एका जुन्या धारावाहिकेत "मुफत का है फुनवा, फुनवा मेरे मनवा" असे फोन करण्याबद्दल असलेले वाक्य. तरी त्वरित त्याचा खुलासा व्हावा.

श्रद्धा | 4 July, 2012 - 11:36
माते, तू खर्रंच अंतर्ज्ञानी आहेस. छपराच्या जवळ १० किमीवर एक फार्फार प्रसिद्ध उत्खनन झालंय
<<<< वरदातै, तिथे
'हम है छपरा के नामी
लौंडा गुल्ली लेबू के
लेबू डंडा गाडदेव
जुहू बीच पे झंडा'
ह्या ओळी असलेला आद्य शिलालेख सापडला आहे काय? (फारेंडाला नक्की आठवेल हे कारण जुन्या माबोत त्यानेच टाकले होते.) इतर वाचकहो, हा शिलालेख महत्त्वाचा मानला जातो कारण यानंतरच पहिला भोजपुरी माणूस जुहू बीचवर आला.

नीधप | 4 July, 2012 - 11:44 नवीन
काही भोजपुरी वाक्यांत मूळ शब्दानंतर "वा" लावायची पद्धत आहे. <<<
वन्सपॉनटैम ती सुंदर युवती होती त्या जमातीत खरंतर रा लावायची पद्धत होती. रा म्हणण्यासाठी स्वरयंत्र व जीभेला विशेष कष्ट पडत आणि त्यामुळे वाक्याचा शेवट सगळ्यांना नीट ऐकू जाई. पण सुंदर युवतीची संपूर्ण पिढी छप्पर पक्ष्यांना बांधल्यामुळे त्यांनी केलेल्या विलापाने झालेल्या ध्वनि प्रदूषणाची बळी होती आणि म्हणून सगळेच रा ऐवजी वा लिहित. अश्या तर्‍हेने 'वा' रूढ झाले.

या अशुद्ध भाषेला आणि प्रदूषणाला कंटाळून काही कुटुंबेच्या कुटुंबे दक्षिणेकडे स्थलांतरीत झाली. आजही आंध्रप्रदेशीय भाषेत वाक्याचा शेवट 'रा' ने करण्यात येतो.

सरांनी पुपुवर टाकलेले निवेदनः-

The ID formerly... | 5 July, 2012 - 13:54
स्रद्दातै, तूमी पर्वा सांगित्लेत की माज्या सतत्च्या आय्डि बदलण्यामूळे येथिल सदश्यांच्या फुटप्रिंटा वाढतात व असा साप दिलात की याचे उत्तर माहित आसुनसुद्दा स्पस्टीकरन दिले नाहि तर माला छकुले छकुले होत्याल. मी वळवळनार्या प्रान्यांना लै घाबर्तो. शिवाय येक्येळ मायबोलीवर्च्या फुटप्रिंटा वाढिल्या तर ठीक हाये, पन माझ्यामूळे आस्ल्या भल्त्याच फुटप्रिंटा वाढायला लागल्या तर काहि काळाणे माज्या शिकव्निला माजीच पोरं आसत्याल आनि 'आम्चे बाबा मास्तर हायेत' ह्यात खोखो होउन 'आम्चे मास्तर बाबा हायेत' असे होइल व माज्या जिवणाचाच खोखो होइल. तेव्वा तसे काइ होउ नायी म्हनुन मी इत्ते पर्तिद्यापत्र शिरसाष्तांग्नमस्कार सादर करित हाये -

आमचे अशील श्री. बदल्तायडी पुपुकर (राहणार पुपु, हृदय मुंबयीस्थित) या प्रतिज्ञापत्राद्वारे सर्व संबंधितांस, संबंधैच्छुकांस#, भावी संबंधितांस, असंबंधितांस असे जाहीर करू इच्छितात की त्यांचे नामबदलाने मायबोली हे संकेतस्थळ तसेच येथील संलग्न संस्था ज्या की मायबोली परिवार या नावाने ओळखल्या जातात तेथील सदस्यसंख्याच्या पदचिन्हसंख्यांमध्ये काहीही फरक पडत नाही. याच्या पुष्ट्यर्थ आमचे अशील खालील पुरावा (पुणे डिव्हिजनल कोर्टात वर्ग, नोंदणी क्र. - पीसी५४३/१२/३४५) सादर करत आहेत -
आमचे अशील यांना सर्वसाधारण मानवप्राण्यासारखेच (homo sapiens sapiens) दोन पाय व दोनच पावले आहेत. (तीन डॉक्टरांची साक्षांकित प्रमाणपत्रे, homo sapiens sapiens असल्याचे सिद्ध करणारे डीएनए चाचणीचे निष्कर्ष, अश्लीलाचे$ साक्षांकित छायाचित्र)
या पुराव्याद्वारे आमचे अशील पदचिन्हसंख्या वाढवत नाहीत हे नि:संशयरित्या सिद्ध होत असलेकारणे इतःपर आरोप अथवा अफवा अथवा कुजबूज अथवा बातम्या यांवर विश्वास ठेवू नये. असे जाहीर केले.

# च्यामारी या वकिलाच्या!!! संबंध इच्छुक म्हने! ह्येच्या आसल्या लिहिन्याने आमच्याकडे आता लोक सौंसयाने (आन काहि मित्र आसूयेने) पाह्यतात ना आता!
$ आरारारा!!! गुगल्यावर आमच्याच नावाचा 'हाय्येश्ट सर्च' जाला म्हने. ह्या वकिलाला ठेवुन लै पस्तावलो.

वरदा तैंचे उत्तर.

वरदा | 5 July, 2012 - 11:39

श्रीमान वकीलसाहेब यांस (आपल्याला काही जण अ‍ॅडव्होकेटचे मराठी भाषांतर झगडपिल्लू असे करून छळतात हे माहीत आहे, पण आम्ही नम्रपणे आमचे विशुद्ध हेतू जाहीर करायला आपल्याला आदरार्थी संबोधतो आहोत हे लक्षात घेणेचे करावे)

आपले अशील श्री. बदल्तायडी पुपुकर (राहणार पुपु, हृदय मुंबयीस्थित) यांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधी 'आपाप्ल्या नैतिक जबाबदारीवर वाचावे' अशी सूचना न दिल्याने आमच्या मान्नीय अशील वरदाबै खापरतुकडेतपासकर यांना काम करत असताना हे प्रतिज्ञापत्र सहज नजरेस पडून एकदम फिस्सकन हसू येऊन चहा पिताना ठसका लागला व प्राण जवळजवळ उर्ध्वदिशेला गमन कर्ताकर्ता राहिले. तसेच हातातला चहा अंगावर, कागदांवर व ल्यापटॉपवर सांडून त्यांच्या मालमत्तेची नुस्कानी व भाजून शरीराला इजा झाली. यामुळे त्यांच्या कामातला अमूल्य असा अर्धा तास वाया जाऊन त्यांचे आर्थिक, कार्यकारिक तसेच स्वैपाकिक नुकसान झाले. याबद्दल आप्ल्या अशीलास व आपणास जबाब्दार धरणेत येऊन आप्ल्याविरुद्ध नुकसानभरपाईचा दावा सुप्रीम कोर्टात का बरं ठोठावण्यात येऊ नये व कायदेशीर शिक्षा करण्यात येऊ नये याचे सकारण आणि सयुक्तिक स्पष्टीकरण देण्याचे करावे...

आपला नम्र....

त्यावर सरांचं प्रत्युत्तर

The ID formerly... | 5 July, 2012 - 12:06
तुमच्या फील्डमध्ये तुम्ही कुणालाच 'गडे मुर्दे क्यूं उखाड रहे हो?' असा प्रश्न विचारू शकत नसाल ना? >>>>
स्रद्दातै, तुम्चा दुस्रा प्रस्न आराध्नेत काकाखन्ना ते क्याकेहेना मद्दे सैफालि ते पा मद्दे आभिसेक बच्चन आसे सर्व इच्रु शक्तात ना?
वर्दातै, आसे दुस्ट प्रश्न आल्यास 'गडे@ मुर्दे उखाड्तो कारण ते तेथे आहेत म्हणून' असा मुहत्तोड ज्वाब देता येतो का? तसेच तुमास आशि इजा पोहोच्लेकारने आमी माफि मागतो. चा सन्डुन कागदपत्रात फेर्फार झाला आस्ल्यास डब्बल्माफि माग्तो. मंजे (डै, तुमाला नाय. हा पुपु हाये, कट्टा नाय) 'पंढरपुर्ला इसपूर्व २००० पासुन वस्ती होती' यावर चहाचा डाग पडुन इस्पूर्व २०००० जाले तर त्ये पुस्पक इमान, मयासुराज अम्युजमेन्ट पार्क, वगिरे गोस्टि तुमाला शोधायला लाग्तील ना बबौ!
(@ ह्ये लाडात बोलायचे नसून परिक्सा आहे याचे भान ठेवावे. क्रिप्या. सर्वान्नी. धन्यवाद. अवश्य.)
मामी, सासर तिथ्थे, प्रिया जिथ्थे. नन्दिनितै, तुमि पत्रकार. तुमाला दिले तर टैम्सोफिंडियाच्या वेब्सायटीवरच झळकाय्चे हो! स्वातै, त्ये कोर्टात वर्ग आहे. (वर्ग आम्चा नाहि, आम्चा न्हेमिच्याच ठिकानि आहे. मामला वर्ग आहे.)

The ID formerly... | 5 July, 2012 - 13:27 नवीन

स्रीस्रंसोधकस्रद्दातै, तुमचे 'आपन सारे स्रंशोधक' या सर्पु काळेलिकित पुस्तकाबद्दल काय मत्ते?
[ आता बगा, पुस्तके दोन प्रकार्ची अस्त्यात. पहिला प्रकार मंजी (ओ नाय हो डै! तुमी नायी, सान्गित्लन हा पुपु हाये) जी पुस्तके वाचुन जीवणविशैक तत्वज्ञान आसे कळते जणु खाउन पचिवलेले आन्न (ओ थाम्बा हो व्यासन्गी! दिस्ला शब्द कि निगाले वै वै करत... मानुस हाय का पन्जाबी भांगडेबाज!). आन दुस्रा प्रकार मंजी जी पुस्तके वाचुन जीवणविशैक तत्वज्ञान तेवढेच कळते जेवढे अन्न चाटुन चव कळते... तर या दुस्र्या पुस्तकान्ना चाटीव मंजे लिकित पुस्तके म्हन्तात.

आईने अकबरी..... Rofl खलास! Lol ('त्या' जगप्रसिद्ध विनोदाचा हा चपखल उत्तरार्ध आहे :फिदी:)

श्रद्धा | 6 July, 2012 - 10:54
आर्यन इन्व्हेजन थेरी:

आर्य उत्तरेकडून निघाले. उत्तरा म्हणजे बाई नोहे; दिशा. उत्तर ध्रुवावर तेव्हा सहा महिन्यांची रात्र झाली होती. त्यामुळे 'एकच (ध्रुव्)तारा समोर आणि पायतळी अंधार' अशी आर्यांची स्थिती झाली होती. त्यामुळे ते चालत चालत निघाले. त्याकाळी विमाने, आगबोटी नव्हत्या. पण सुदैवाने खंड अखंड होते (हिते कायतरी ग्रॅमॅटिकल मिष्टिक हाय, पण ते सोडा.) त्यामुळे उ. ध्रुवावरून चालत चालत दक्षिण ध्रुवापर्यंत जाऊन पेंग्विन पाहून परतता येई. खेरीज 'सबै भूमी गोपाल की' असे कुणीतरी सांगून गेले होते आणि हा गोपाल बीजगणितातल्या 'क्ष'सारखा असल्याने कुणालाच कधी दिसला नव्हता. त्यामुळे देश पास्पोर्ट व्हिसा वगैरे भानगडीही नव्हत्या.(असत्या, तर बिचार्‍या आर्यांची पंचाईत झाली असती, कारण उ. ध्रुवावर रात्र झाली की इमिग्रेशन ऑफिस सहा महिन्यांसाठी बंद होई.)
(गोपालसंदर्भात जास्तीचे संशोधनः अनेक वर्षे गेली तरी भूमी क्लेम करायला गोपाल काही येत नाही पाहून स्थानिक लोकांनी जमीन वाटून घेतली व अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सोविएत युनियन, दुल्हन के माथे की बिंदिया आय लव्ह माय इंडिया, इ. देश व देशभक्तीपर सिनेमे निर्माण केले.)

इकडे आर्य चालतच होते. शिकार करून जेवत होते. सततच्या चालीला कंटाळले होते. मग त्यांना हिमालयाचा पट्टा लागला. अजून हिमालयाला घड्या पडल्या नव्हत्या, त्यामुळे तो फ्लॅट होता.* आर्यांंनी तो सहज ओलांडला व ते दिल्लीत येऊन पोचले. पराठेवाली गलीतून येणार्‍या वासांनी त्यांची भूक खवळली आणि 'यल्गार हो! हर हर महादेव! जय एकलिंगजी की! टूट पडो!' अशा घोषणा देत ते जेवणावर तुटून पडले. तेव्हा लग्नाचा सीझन चालू होता. त्यामुळे दिल्लीत रोज जेवणावळी असत. आर्य दिल्लीत नवे असल्याने त्यांना प्रायव्हेट फंक्शन्स, पब्लिक रेस्टॉरंट्स, वगैरे काही कळत नसे. जेवणाचा वास आला की ते तिथे घुसून फडशा पाडीत. यालाच पुढे आर्यन इन्व्हेजन म्हटले जाऊ लागले.

काही काळाने आर्यन कबिल्याचा सरदार म्हटला, 'ड्यूड्स एन बेब्स, पॅक योर बॅग्स.. इट्स टाईम टू गो बॅक..' तसे सगळे आल्या वाटेने निघाले. पाहतात तो काय, तोवर हिमालयाला घड्या पडल्या होत्या नि तो अगदी 'परबत वो सबसे उंचा, हमसाया आसमां का' झाला होता.* कायम फ्लॅट भूभागावर राहिल्यामुळे आर्यांमध्ये १००पैकी १०१ जणांना व्हर्टिगो! त्यामुळे ते बिचारे परत जाऊच शकले नाहीत. अशी आहे आर्यन इन्व्हेजन थेरी!$

* - इथे मी पाच गोगलगाई व सतरंजी वापरून प्रयोग केला. आधी सतरंजी फ्लॅट असताना गोगलगाई आरामात इकडून तिकडे गेल्या. मग सतरंजीला घड्या घातल्यावर मात्र तिकडून इकडे येऊ शकल्या नाहीत. मात्र या प्रयोगामुळे 'नॉट टेस्टेड ऑन अ‍ॅनिमल्स' हा शिक्का
मिळाला नाही.

$ - आतापावेतो अशीच आहे. उद्या सारुकखानाचा मुलगा सिनिम्यात आला की पुन्ना नव्याने लिहावी लागेल.

आज श्रमाता बोगनवेलीच्या रूपात पुपुवर अवतीर्ण झाली. त्यानंतरचा हा संवाद -

मंजूडी | 12 July, 2012 - 12:39

ही श्रमाता तर नव्हे?? Wink

श्र, तू ती नसशील तर दिवा घ्या घे प्लिज!

बोगनवेल | 12 July, 2012 - 12:51

मंजू, पास झालीस भक्तीची परीक्षा. मीच ती माता.. सर्वव्यापी, अनेकरूपी, दुपारीझोपी, फ्यान्सीटोपी, सुगंधीकुपी, वरदायिनी, श्रीफस्वामिनी, सुपरड्युपरमाता.. (प्रत्येक रुपावर मातेचा असलेला असली होलोग्राम पाहूनच विश्वास ठेवा.) Happy

वरदा | 12 July, 2012 - 12:59

माते, तुझ्या नवीन स्वरूपाला साष्टांग प्रणिपात.
आषाढात दर्शन देऊन तू शक्तीपूजेच्या परंपरेत एक नवी भर पाडत आहेस. त्यामुळे नव्यानव्या उत्सवांना-सणांना वाव मिळेल. तुझ्या नावाने कथा, कहाण्या, माहात्म्ये, व्रते, दिव्य ट्रिकसीनचे होलोग्रामयुक्त आणि होलोग्रामविना (ड्युप्लिकेट) फोटू यांचा सुकाळ होईल. त्या समस्त पुस्तकांच्या छापखाने, लेखक, प्रकाशक, विक्रेते यांची चांदी होईल. जत्रा भरून अगणित स्टॉल्स, फुगे-पिपाणी-फिरता पाळणावाले-घोडेवाले-भेळवाले-आईस्क्रीमवाले आणि अशा लोकांच्या व्यवसायाला भरभराट येईल..

बोल माते, हा उत्सव कशापद्धतीने साजरा करावा? तुला कशाचा नैवेद्य दाखवावा? की ज्यामुळे तू प्रसन्न होऊन आम्हाला संततहास्यप्रसादाचा लाभ होईल?

बोगनवेल | 12 July, 2012 - 13:12

बोल माते, <<<< इथे 'पातालभैरवी' पद्धतीने 'बोल मेरी अंबे.. बोल जगदंबे' हे साजून दिसलं असतं. असो. वरदे, (माता मी आणि लोक तुला 'वर दे'.. म्हणणार.. अगदी मीसुद्धा :अओ:.. ये कैसी अनहोनी हय? कांपिटिशन वाडली की काय बया?)

प्रथम, तू माझ्यासाठी दार्जिलिंगमधली(आय लाईक दार्जिलिंग! मला थंड हवा आवडते.) एखादी साईट उत्खनन करून तिथे माझे ठाणे होते (आता मंजूला प्रेश्ण पडू शकतो, ठाणं तर पच्चिम महाराष्ट्रात हाय, दार्जिलिंगात कसं?) असं संशोधन प्रसिद्ध कर. तोवर दार्जिलिंगात हिवाळा येईल.

तेव्हा पहिल्या वर्षी मातेला ब्रँडेड फरकोट घालावा (म्हणजे तुम्हांला जीवनाच्या दु:खरूपी थंडीत मातेच्या कृपेची ऊब मिळेल), दुसर्‍या वर्षी मॅकचा मेकप किट वाहावा (म्हणजे तुमचे 'रूप निखरेल'... माता ब्युटीशियनच आहे), तिसर्‍या वर्षी जिमी चू वहावेत (म्हणजे कष्टप्रद वाटेवर चालताना तुमच्या पायांना दु:खरूपी काटे बोचणार नाहीत), चौथ्या वर्षी 'गुच्चीवाला परफ्यूम' उधळावा (म्हणजे तुमचे भवताल मंगलमय होईल), पाचव्या वर्षी हिर्‍यांचे दागिने वाहून मातेच्या व्रताचे उद्यापन करावे (म्हणजे मातेची कृपा तुमच्यावर 'सदा के लिये' राहील), अशी पंचवार्षिक योजना मी सुचवते.

वरदा | 12 July, 2012 - 13:25

सर्वव्यापी, अनेकरूपी, दुपारीझोपी, फ्यान्सीटोपी, सुगंधीकुपी, वरदायिनी, श्रीफस्वामिनी, सुपरड्युपरमाते,

तुला कांपीटिशन नसून तुझ्या कृपाप्रसादाचं चिन्ह म्हणूनच हे वरदा नाव म्या पामर भक्तीणीने धारण केले आहे. लोकांनी मला वर दे म्हणलं की आपोआप ते तुला पोचेल असा अध्यात्मिक चॅनल (टीव्हीचा नव्हे, प्लीज नोट) मी करून ठेवलेलाच आहे.
माते, तुझं मूळ ठाण दार्जिलिंगाच्या मागच्या पर्वतावरच आहे. पण कोणे एके जन्मी, जेव्हा मी लेपचा जमातीतली एक वृद्ध स्त्री होते तेव्हा रोज वरती जाऊन तुझी पूजा करत असे. तुला रोज मोमोज आणि थुक्पाचा नैवेद्य दाखवत असे जसं वयामुळे येणं अवघड झालं तेव्हा मी तुझ्या पायाशी थुक्पा भुरकताना प्राण (आणि तो थुक्पा पण) तुझ्यात विलीन होऊदेत असं मागणं मागितलं. माझी म्हातारी हाडं तुला फारशी आवडली नसली तरी थुक्पाच्या फ्याक्टरमुळे तू हा वर मला प्रदान केलास आणि पुढच्या जन्मी (दार्जिलिंगची थंडी सोसवेनाशी झाल्यामुळे) मी पुण्यनगरीत जन्म घेईन आणि तुझं ठाणं निर्माण करेन आणि देशोदेशीचे खाद्यपदार्थ, पेयं आणि कॉफ्या तुला अर्पण करून मोमो-थुक्पाने विटलेल्या जिभेला आणि पोटाला परत नवी तरतरी प्राप्त करून देईन अशा बोलीवर ही व्यवस्था सर्वशक्तीमान माते, तूच केलीस...

तुझ्या पूजापद्धतीचे विवरण दिल्याबद्दल धन्यवाद. ही माहात्म्यकथा आणि पूजापद्धती त्या दार्जिलिंगच्या मूळ ठाणाच्या फोटोसकट आणि तिथून तू पश्चिम महाराष्ट्रात आगमन करत असतानाच्या टिक फोटोसकट आणि सीडीसकट येत्या काही दिवसांतच प्रकाशित होईल.

भक्तांनी या पुस्तिकेचा आणि सीडीचा निश्चित लाभ घ्यावा.
पुस्तकाची उपलब्धता - फक्त खाजगी संपर्कातून (मोअर एक्स्क्लूजिव थिंग्ज सेल मोअर - या तत्वानुसार)

वरदा | 12 July, 2012 - 13:34

इतर अज्ञ जनहो, हे पूर्वजन्मीचं ज्ञान मला पास्ट लाईफ रिग्रेशनच्या कार्यशाळेत झालं तेव्हा या ज्ञानावर कसलीही शंका घेऊ नये, तुमच्या एरवीच्या तोकड्या वैज्ञानिक परिमाणांत ही ज्ञानमिती बसणं शक्य नाही म्हणून हे शास्त्रीय सत्य नाही असे अरण्यरुदन करू नये

चिनूक्स | 12 July, 2012 - 13:35

मातेच्या नावाने एकगठ्ठा फॉर्वर्ड करायचे पत्र.

||श्रीफस्वामिनी सुपरड्युपरमाता प्रसन्न||

मातेची असीम कृपा तुमच्यावर झाली आहे. या पत्राच्या पन्नास प्रती करून तुम्ही पाठवाल तर तत्काळ फळ मिळेल. बुलढाण्याच्या काळसेकरांनी पन्नास प्रती पाठवल्या, त्यांना तत्काळ पुत्र झाला. देऊळगाव राजाच्या बोराट्यांनी पत्राच्या पन्नास प्रती पाठवल्या, त्यांना तत्काळ पुत्र झाला. एदलाबादच्या वळसंगकरांनी शंभर प्रती पाठवल्या, त्यांना जुळे झाले.

सावधान, हे पत्र वाचून बाजूला टाकू नका. हे पत्र मातेचा मूर्त आशीर्वाद आहे. पांढरकवड्याच्या पाटलिणीने पत्राचे दोन तुकडे केले. तिची महागाची पैठणी उभी चिरली व तिचे दोन तुकडे झाले. या तुकड्यांचे वॉलह्यांगिंगही ती करू शकली नाही. टिमटाल्याच्या बाबू खाटकाने पत्राचे बारीक कपटे केले, त्याच्या एकूणएक कोंबड्यांचा एका क्षणात खिमा झाला व खिम्याचे भाव पडल्याने त्याला तोटा झाला. वरवट बकालच्या रामराव कुलकर्ण्यांनी पत्र माळ्यावर फेकले. मातेने पत्र माळ्यावरच्या परंपरागत हंड्याबरोबर खाली रामरावांच्या डोक्यावर फेकले. भुसावळच्या यशोदाबाई कुमावतांनी पत्र गाईला खायला घातले. गोवर्‍या थापता थापता त्यांच्या कमरेचा काटा ढिला झाला.

शुभ अस्तु! शांति अस्तु!

रैना | 12 July, 2012 - 13:38

भुसावळच्या यशोदाबाई कुमावतांनी पत्र गाईला खायला घातले.>>> मग काय झाले? गाईलाही पुत्र झाला का?

चिनूक्स | 12 July, 2012 - 13:42
नाही. गाईला शेण झाले. ती निरक्षर असल्याने तिला पत्र वाचता आले नाही.

आशूडी | 12 July, 2012 - 13:41

बोला दुपारीझोपी, फ्यान्सीटोपी, सुगंधीकुपी, वरदायिनी, श्रीफस्वामिनी बोगनवेल्निवासिनी श्रमहारिणी श्रमहाराणी माता की जय!
ऐक वरदे, श्रमातेची कहाणी. खूप खूप वर्षांपूर्वी या विशाळ मायबोलीवर पुपु नावाचे एक आटपाट नगर होते. दोन वर्षांपूर्वी काय झाले तिथे पोस्टींचा भव्य दुष्काळ लागला.*१ सबंध नगर ओस पडले. तमाम जंतेला चिंता झाली.आता काय करावं? मातेचं वास्तव्य तेव्हा पुण्यनगरीतून सध्याचे तिचे पूर्ण शक्तिपीठ *२. म्हणून ओळखले जाते त्या सिंगापुरीत होते. तिचा कोप झाल्यामुळेच गावावर हे संकट कोसळले अशी सर्व जनांची धारणा झाली.मग त्यांनी मातेचा धावा केला. मातेने तिकडून लगेच वावा केले आणि त्या नगराला पुपुआश्रम हे नाव बहाल केले, तोच हा आजचा १६११. त्या क्षणापासून आजवर या नगरात "दिवस असो की रात्र, पोस्ट एक तरी दिसे मात्र" हा नेम चुकला नाही. तेव्हा बोला,

सिंगापुरी पुण्यभूमी विचित्र
तिथे नांदते श्रमाता पवित्र
तया आठविता महाहास्य्राशी
नमस्कार माझा अनअ मातेपाशी!

मातेचरणी सादर अर्पण.

*
१.मान्सून सेलच्या बॅनरसारखा.
२.(शक्तीभोग आट्याचे नव्हे!)

चांगला सदस्य | 23 July, 2012 - 11:59
शब्दाबाहेरचा म्युच्युअली एक्स्क्लुजिव्ह डोमेन शोधायची फार हौस, असं म्हणतोय. >>>>> भारी!
श्र, तुम्ही चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान अमूल्य आहे!

पाचकळायडी : आयडू, पिपल लक्की नसतो. फारतर लाइव्ह असतो आणि तो लाइव्ह झाला तरी फार चालत नाही. दुसरे म्हणजे पिपलला लक्की म्हणून अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल तुमचा अंनिसतर्फे निषेध.

प्रतिक्रिया १ : पिपल लक्की नस्तो असे म्हणणार्यांन्नी कधी सकाळी सडासम्मार्जन करुन शुचिर्भुत होउन ओलेत्या अन्गाने पिम्पळाला प्रदक्षिणा घातलेस त्यान्ना तेजाचि अनुभुति आल्याशिवाय राहणार नाही पण ती तशी आवेगाने/प्रतिक्षिप्तपणे/कर्मधर्मसन्योगाने/पुर्वजन्मसुक्रुतामुळे आली आहे हे मान्य करावे लागेल ते मात्र या बुप्रान्च्या कुठल्या पुस्तकी विज्ञानात बसते ते त्यान्चे त्यान्नाच ठाउक! (हे लिहिल्यावर परत आपले मुंडी वर करुन सगळे पिम्पळ पाडुनच टाका असे म्हणायला मोर्चे निघतील तरी आश्चर्य वाटणार नाही!)

प्रतिक्रिया २ : पिंपळात तेज असतेच. ते तेज शरीरात भिनून शरीरक्रियाशास्त्र व शरीरररचनाशास्त्रानुसार पेशींचे, उतींचे व स्नायूस्थित चलनवलनीय मस्तिष्कसंदेशपेशी अधिक उत्तेजित होऊन एकाच वेळी शारिरिक जोम व मानसिक शांतता प्राप्त होते. हे 'नेचर'मधील एका लेखातच लिहिले आहे. - आपला ताठर, एककल्ली पण नम्र.

प्रतिक्रिया ३ : ताठर, एककल्ली पण नम्र, तुम्ही या लेखाची लिंक देता का? मी नेचर धुंडाळून पाहिले पण त्यात मला तरी सापडला नाही. आयडु, पिंपळ हा मूळचा भारतीय वृक्षच नाही. ऋग्वेदात तसेच ऐतरेय व शतपथ ब्राह्मणांत पिंपळाचा उल्लेख आढळत नाही. पिंपळाचा पहिला उल्लेख राजकूक याच्या 'महामुख्यशेफ्रेसिपीसञ्च' या पाली भाषेत लिखित ग्रंथात आढळतो. त्याचा पर्शियन भाषेत 'आला शेफारूनी' या प्रवाश्याने अनुवाद केला. त्यात "नाजूक हिरड्या असणार्‍यांनी पिंपळपानाच्या टोकाचा उपयोग भोजनोत्तर दात कोरण्यासाठी करावा" असे लिहिले आहे. हा उल्लेख मात्र मूळ ग्रंथात आढळत नाही. त्यावरून भारतात पिंपळ पर्शियातून आला असे मानले जाते.

प्रतिक्रिया ४ : काल केक कसा झाला? फोटो व रेसिपी कृ. यो. जा. टा.

प्रतिक्रिया ५ : म्हणजे शेवटी तुम्हालासुद्धा ब्राह्मणांचाच आधार घ्यावा लागला ना?

प्रतिक्रिया ६ : 'जागीर-इ-क्लिअर-ए-सिल' नावाच्या पर्शिअन पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटात सुलक्षणा पंडित व झरीना वहाब 'तेरा पिंपल, मेरा पिंपल, कब होगा क्लिअर अपना डिंपल' असे गाणे पिंपळाच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर झोके घेत गातात. त्यात नंतर त्याच दोघी पिंपळाच्या पानाचे पोटीस गालावर बांधताना दाखवल्या आहेत. पिंपळ ब्रॅण्डाचे हे मार्केटींग बघून बॉलीवुडातील हीच आद्य प्रॉडक्ट प्लेसमेंट आहे हे कळते.

प्रतिक्रिया ७ : हिंदूंचे ज्ञान आपण हिंदूच कधी बघत नाही. बाहेरच्या लोकांनी सांगितले तरच आपल्याला भारी वाटते. ताठर, एककल्ली पण नम्र, तुम्हाला अनुमोदन.

प्रतिक्रिया ८ : ए, काय टीपी लावलाय! माझा अभ्यास/संशोधन होत नाहीये. मल काम करू द्या ना!!

प्रतिक्रिया ९ : हे बघा, एकवेळ माझ्या आईबापांना बोललेले खपवून घेईन, पण हिंदूंना/सावरकरांना/गोरसांना/देवरसांना/वाजपेयींना/'द हिंदू' वर्तमानपत्राला बोल लावलात तर खपवून घेतला जाणार नाही.

प्रतिक्रिया १० : केक ऑस्सम! पिंपळपानाच्या आकाराचा केला होता. तूच माझी समै.

प्रतिक्रिया ११ : मग तुम्ही नेहमी आमच्या घरच्या गांधींना शिव्या घालता ते? तुमची भाषा सुधारा आधी. अ‍ॅडमिन, बघा हो, याने पयल्यांदा माझा बाप काढला.

प्रतिक्रिया १२ : काय चाल्लय? काहीच कळत नाहीये. पुपु एवढा जोरात का वाहतोय? मी चालले पोरांना ज्ञान पाजायला. माझ्या अनुपस्थितीत काय टीपी होईल तो बहरात हलवणे.

प्रतिक्रिया १३ : अ‍ॅडमिन, वरील सर्व आयडी सद्गुणी, सच्छील, सत्पुरूष, साधुवृत्तीचे, सव्यसाची, सुंदर, सुरेख आहेत. त्यांना परत आणावे.

आज नागपंचमीच्या निमित्ताने श्रमाता यांनी केलेली नागारती. संदर्भ - बंगालीमध्ये बँग म्हणजे बेडूक.

श्रद्धा | 23 July, 2012 - 13:38 नवीन

चालः जमेल तितकी 'भाग भाग डीके बोस'

बापू (वडील या अर्थाने. धन्यवाद. कृपया.) हमका बोला आज नागपंचमी हाय पोरी.
बँग टरकला सॉलिड बघूनच लांब दोरी.
नाग जो देखे हमका तो निकाले सिर्फ फँग.. फँग.. फँग...
बँग बँग चिटी चिटी चिटी चिटी बँग बँग...

आजचा गगोबहार................

तू मला पण छळले नव्हते
की छळलेले मला कळले नव्हते?
कळून काय होणार होते
कळले, मात्र ते वळले नव्हते

मी वडे तुझे तळले नव्हते
त्यावरुन तू छळले होते
ते मला पण कळले होते
पण बोलायचे टाळले होते

छळवादाच्या मार्गावरुनी
डूआयडींना पळवले होते
हे सारे कसे छळती ते
अ‍ॅडमिनना मात्र कळवले होते

अ‍ॅडमिनच्या दुर्लक्षाने मग
सारे कसे हळहळले होते
आयडी बॅन होताच मग ते
दु:खाने कळवळले होते

तरीही गगोला वाहताना पाहून
काही मनातून जळले होते Wink
गगोला काही अंत नाही
हे जेंव्हा त्यांना कळले होते Wink

Proud

परवाचे पार्ल्यातील 'मुक्तपीठ'...

सशल | 15 January, 2013 -
>> गोल्डन ग्लोब साठी पाय टेबलबर बरेच देशी रंग दिसत होते

त्यातला एक देशी रंग (तबू) माझ्या मुंबई - हाँगकाँग फ्लाईटला होता .. तिच्याबरोबर कोणी एक मैत्रिण टाईप बाईही होत्या ज्या हाँगकाँग एअरपोर्ट वरच्या मुव्हिंग साईडवॉकवर अडखळून पडल्या .. मग पुढे ट्रान्स्फर साठीच्या सिक्युरिटी चेकपाशी गेल्यावर त्यांनां कळलं की आपल्याकडे LA साठीचा बोर्डींग पास नाही .. मग कॅथे-पॅसिफिक चं ऑफीस शोधण्यासाठी दोघी निघाल्या त्यानंतर मग टिव्हीवरच दर्शन झालं .. Happy

फारएण्ड | 15 January, 2013 -
यातून एक आख्खा मुक्तपीठ लेख तयार होईल

सायो | 15 January, 2013 - 04:19

फारएन्ड, प्रतिक्रिया आपणच आयडी बदलून द्याव्यात का? Wink

मृण्मयी | 15 January, 2013 - 04:19

फारएण्डा, Biggrin

प्रतिक्रियांमधे...

"मज्जाय तुमची! सेलिब्रेटिंबरोबर प्रवास!"

"पडली तर त्यात सांगण्यासारखं काय आहे? नस्ते सवय सरकत्या पट्ट्याची एखाद्याला!"

"बाप रे! तुमच्या अंगावर तर नाही ना पडली?"

"बोर्डिंगपास घ्यायचं विसरली? आपले लोक असेच बावळट! इकडे सेलिब्रेटीज म्हणून मिरवतील. तिकडे गेल्यावर हे असं!"

असं!"

श्री | 15 January, 2013 - 04:22

हाहा

फारएण्ड | 15 January, 2013 - 04:24

सायो, मृ Lol

"अमेरिकापुराण झाले, आता हाँगकाँग पुराण सुरू करतायत"
"स्वतःच पडल्या असतील पट्ट्यावरून, आणि आता दुसर्‍यांचे नाव घेतात"
"काहीही! कॅथे ची फ्लाईट लुईजियानाला जातच नाही."
...

संपादन

सशल | 15 January, 2013 - 04:28

मृ, सायो, फारेण्ड .. Lol

सायो, ऐश्वर्या फॅशन्स् चा मुवाईना आणि खरेदी झाली .. त्याबद्दलचं मनोगत नंतर कधीतरी ..

मॅक्स | 15 January, 2013 - 04:28

लेखिकेला ती स्वतः कॅथे पॅसिफीक नी गेली हे सांगायचे होते. आता हे अमेरीका पुराण बस्स झाले. माझ्या आतेबहिणीचे यजमान मागच्या आठव्ड्यात लंडनहुन आले. ते म्हणातात व्हर्जीन ची मजा ती वेगळिच. अमेरीकेत काय ठेवल्लय...
Wink Proud

सायो | 15 January, 2013 - 04:31

मॅक्स, मृ, फा Lol
वा, वा, सशल. फिडबॅक वगैरे मेलमधून कळवलास तरी चालेल डोळा मारा

फारएण्ड | 15 January, 2013 - 04:31

यावरचीहे एक संभाव्य प्रतिक्रिया:
"तुमच्या आतेबहिणीचे यजमान नक्की एअरलाईनबद्दलच बोलत होते ना?" Happy

संपादन

श्री | 15 January, 2013 - 04:33

"किती ती हौस , आम्ही सेलिब्रेटी पाहिली ती मिरवण्याची ."
"त्यात काय एवढं , अशा सेलिब्रिटी तर आम्ही दररोज बघतो."
" आम्ही अमेरिकेत राहतो असा बडेजाव करण्याची लोकांना फारच हौस असते बुवा" Lol

दीपांजली | 15 January, 2013 - 04:34

कशाला पोचली LA ला , मधेच अडकली असती तर बरं झालं असतं , आधीच इथे काय कमी गर्दी आहे !

मॅक्स | 15 January, 2013 - 04:39

श्री. शंकर दयाळ शर्मा पण पडले होते विमानातून उतरताना. तब्बू पण म्हातारी झाली.

रणजित रॉजर | 24 May, 2013 - 14:58

पावसाळी कवितांमध्ये काही नवशिक्या कविता असतात. म्हणजे कवींचे मानणे असते की त्यांना 'पाऊस आल्या'मुळे कविता सुचली. पण कविता पाहिली तर 'च्यायला! हे तर कोणीही आलं तरी सुचू शकते' असे वाटू शकते. उदा. 'आला आला रानसखा आला,
हिरव्या पानांमधून धावत भेटायला,
अहा! हिरवी पाने नेसलेली साजणी
मान खाली घालून उभी लाजणी
(किती ही कवितेची खाजणी - इति वाचक)
आता वरील ओळी चि.सौ.कां. इव्ह व चि. आदम यांस उद्देशून नाहीत कशावरून? (आमचे येथे प्रेमळ मेंढपाळकृपेने इ. इ. ... विवाहस्थळ - सफरचंदी बाग इ.इ..... 'आमच्या मम्मीपप्पांच्या लग्नाला यायचं बरं का - समस्त मानवजात' इ.इ.)
असल्या कविता पहिल्या कडव्यातच कळतात. पुढील वाचूच नये. कवितेचा शेवट हमखास 'भेट झाली तृषार्तांची, फुलले वैभव हिरवे, सुखावली नजर सुखावले आभाळ, सृष्टीचे शालू बरवे' छाप असते. ('तरी ही देशस्थ आडनाव शेवटी णी*, आणि तो तर हिरवट करवे!' - इति वाचक).
* ही सुधारणा जनमत्रेट्यामुळे करावी लागली आहे.

प्राची | 24 May, 2013 - 14:56

सर, कुलकर्ण्यांना काही म्हणायचं नाही.

प्राची | 24 May, 2013 - 15:01

सर, जातीचा उल्लेख करायचा नाही.

रणजित रॉजर | 24 May, 2013 - 15:09

प्राची, देशस्थ म्हणजे देशावर राहणारे ते. असो.

श्रद्धा | 24 May, 2013 - 15:17

'आला आला रानसखा आला,
हिरव्या पानांमधून धावत भेटायला,
अहा! हिरवी पाने नेसलेली साजणी
मान खाली घालून उभी लाजणी
<<<<

ही कविता रानससा आणि पत्ताकोबीच्या मळ्यालासुद्धा सूट होईल.

स्वाती | 24 May, 2013 - 15:22

ही कविता रानससा आणि पत्ताकोबीच्या मळ्यालासुद्धा सूट होईल.>>

आशूडी | 24 May, 2013 - 15:27

असल्या कविता पहिल्या कडव्यातच कळतात. पुढील वाचूच नये.>> इथेच मार खातात सामान्य वाचक. शेवटच्या ओळीपर्यंत वाचायचा पेशन्स वाचकांत रहावा म्हणून शासनाने वपुंच्या कथा क्रमिक पुस्तकांत समाविष्ट कराव्यात अशी शिफारस आम्ही करतो. तर वरील कविता झोकदार वळणं घेत वास्तवाची धगधगती धग कशी पेश करते ते पहा.
आला रानसखा आला,
हिरव्या पानांमधून धावत भेटायला,
अहा! हिरवी पाने नेसलेली साजणी
मान खाली घालून उभी लाजणी
अनामिक हळवे कुतूहल उमटे
कोणते सांग तरी राणी
काय ग सागू सखया तुजला
माझी जन्म /कर्म्/वर्म/ मर्म कहाणी?

तो :एकच सांग बाई भरायचे आहे घरी पाणी
ती : एलबीटीमुळे बाजारपेठा बंद जाहल्या

तशातच धोबी गावी पळाला
भांडी घासताना दारी भिकारी आला
कपडे माझे लय भारी म्हणून घेऊनी पळाला

हातातले घेऊन मी तशी त्याच्या मागे
रानावनात वाट चुकले
व्हिम्बार घेण्या नाही परवडत
वापरतो आम्ही शितलची पावडर
ओलेत्यावर पावडर अन वर चिकटून पाने झाली नक्षी
तुला वाटले अहा! हिरवी पाने नेसलेली साजणी
मान खाली घालून उभी लाजणी

तो : काय सांगू ताई तुला,
मीच तो स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
ती : ताई ?? मेल्या, आधी म्हणे लाजणी साजणी??
घरी आई बोंब मारते
उलथणे घेऊन कुठे उलथली कारटी!
कधी उगवायची, कधी व्हायची भाजणी!

संपादन

चिंगी | 24 May, 2013 - 15:28
Lol

श्रद्धा | 24 May, 2013 - 15:33

ह्या कवितेत रानसख्याने पाने नेसल्याचा उल्लेख कुठेच नाही, त्यामुळे अ‍ॅडम-इव्ह अर्थाने घेतल्यास सदर कविता अश्लील ठरते. (रणजित नाव असलेल्याकडून अजून अपेक्षा तरी काय करणार?)

रणजित रॉजर | 24 May, 2013 - 15:35

आगाऊ, प्रतेक्ष भेटीत लॉजिक सांगणेत येईल.
रानससा पत्ताकोबी

याव्यतिरिक्त काही पावसाळी कविता विचित्रंगी (ऑड कलर्ड) असतात. त्या मात्र पूर्ण वाचाव्याच, कारण गोष्टींना/वस्तूंना असलेले नवनवीन रंग कळतात.
रक्तचंदनी घरांच्या ओळींवर
जांभळ्या ढगांची ओलसर गर्दी
टचकन पारा होतो निळासावळा
शरीरावर शिरशिरी हिरवीजर्दी
(ऐ भुसनळ्या, बोलावू का खाकी वर्दी! - इति वाचक)
जरी हे नवीन ज्ञान मिळाले तरी उगीच इकडेतिकडे ते पाजळू नये. मित्राच्या नव्या घेतलेल्या वास्तूमध्ये उगीचच 'वा! किती स्पेशस रक्तचंदनी किचन आहे!' किंवा 'वा, काय लिडबिडीत आंबेहळदी लिव्हिंग रूम!' असली वर्णने करू नयेत. आपल्या दमानेच जावे, उगीच उंटाच्या सोनचाफी बुडख्याचा गुलबक्षी मुका घ्यायला जाऊ नये.

पराग | 24 May, 2013 - 15:35

Lol

पौर्णिमा | 24 May, 2013 - 15:39
Lol
याला आवरा!

रणजित रॉजर | 24 May, 2013 - 15:40

(रणजित नाव असलेल्याकडून अजून अपेक्षा तरी काय करणार?) >>>>> Lol महान!
आशूडी, तुमच्या कवितेची अंतर्वळणे व बाह्यवळणे इतकी झोकदार आहेत की त्याचा पुणे रिंगरोडच (प्रस्तावित) झाला आहे! प्रस्तावित वास्तवाच्या दिशेने तुम्ही घातलेली साद या पावसाळ्यात यादगार बनून राहील.

साजिरा | 24 May, 2013 - 15:41

काव्यगनिमास काव्यानेच मारावे. "रयतेस तखल्लुस देणार्‍या गनीमास योजावे ऐसी दो तजवीज. येक ज्ये टण्याशास्त्री बोलितात तैसे, मदिरेच्या नादाने भुलवावे. गनीमास मद्य हे तौबा, पण 'पिता मद्य, होते पद्य' ऐसे पुराणे होष्यमाण. ऐसे काव्याने मारावे." ऐसे येक सुप्रसिद्ध वचन (होऊन गेले) आहे.

अश्विनीमामी | 24 May, 2013 - 15:43

ऑस्सम मॅन. टोटली. बादवे वैभव हिरवे कोण आहे?

पौर्णिमा | 24 May, 2013 - 15:43

साजिरा!!! एकदम वरचे आहे हे! बेश्ट!

मनीष | 24 May, 2013 - 15:44

'पिता मद्य, होते पद्य' >> Lol

कांदापोहे | 24 May, 2013 - 15:48

उंटाच्या सोनचाफी बुडख्याचा गुलबक्षी मुका >>:हाहा:
'पिता मद्य, होते पद्य' >>:हाहा:

आशूडी | 24 May, 2013 - 15:50

राडा रॉक्स!!
रणजित, पावसाळे अन रोड यांचे पुणेरी नाते खड्ड्यांशिवाय जोडले जाऊ शकत नाही. आमच्या रचनेत कोणतेही लूपहोल नसल्याने रोडची उपमा आम्ही साभार परत करत आहोत. वरील काव्यपंक्तीत तुम्ही इंद्ररंगी, कस्तुर्चुरा, अंजीरगर्भी, माणिकलाल(चंद नाही,) या खास दवणीय रंगांचा अनुल्लेख करुन दयनीय परिस्थिती प्राप्त केली आहे.
पुन्हा तेच - (रणजित नाव असलेल्याकडून अजून अपेक्षा तरी काय करणार?)

संपादन

रैना | 24 May, 2013 - 15:51

सर, साजिरा, आशू Lol

सर, कवितेवर काहुन राग, तरी तुम्ही गझलपौसाबाबत काहीच लिहीले नाही. त्याचा तर महापूर आलाय. तो प्रश्न पावसाळी झिम्माड भूरभूर कवितांपेक्षा गंभीर आहे याची तुम्हाला जाणीव झालेली दिसत नाही. त्यापेक्षा मी त्या हळव्या पावसाळी कविता वाचणे पसंद करेन. 'दगडापेक्षा वीट मऊ, किती कित्ती कविता देऊ'

रणजित रॉजर | 24 May, 2013 - 16:03नवीन

एकंदरीतच पावसाळी कवितांमध्ये कसले कसले कपडे चढवण्यावर/उतरवण्यावर कल असतो. पण तो घसरून पडून चिखल लागल्यामुळे नसतो. इथे उठता बसता पृथ्वीला कपडे चढवले, उतरवले जातात. बरे एवढे करून काहीतरी वेगळे तरी घालतील, तर तेही नाहीच. येताजाता हिर्वा शालू, हिरवी पैठणी, हिरवी काचोळी आणि तिला इंद्रधनुषी काठ! (ही असली काचोळी आहे का हो? असा प्रश्न घेऊन लक्ष्मी रस्त्यावर हिंडू नये! आणि विशेषकरून, अलका टॉकीज साइडने सुरूवात करून बाजीराव रस्त्याच्या दिशेने तर मुळीच जाऊ नये, कारण त्या दिशेने विचारणा करत गेलात तर एक वेळ अशी येते की 'आहे की! रात्री या' असे उत्तर येऊ शकते.) त्याला आधुनिक आव्हान म्हणून आम्ही पुढील नवकाव्यदुदुंभी फुंकत आहोत (फुंकण्यावरून आठवले. साजिरा, चंची काढा वाईच. एक बार भरून मगच फुकावी. काव्यदुदुंभी.) -

साजण टपकला बर्म्युडामध्ये दारी
धरतीचे अंगण एकदम क्लीन
चपापलाच साजण बघता धरतीस
धरतीवर टुपीस बिकिनी ग्रीन

साजिरा | 24 May, 2013 - 16:05

अरे ती बखर माझी न्हाई रे बाबांनो. स्लर्ट्याची.

कांदापोहे | 24 May, 2013 - 16:06

धर तिला बिकिनी??

नीधप | 24 May, 2013 - 16:11

साजिरा | 24 May, 2013 - 16:14

शब्दांचा गोंधळ करताहात तुम्ही. अशाने भाषेचे नुस्कान होते. काकाशाचे धडे पुन्हा गिरवायची वेळ आली आहे तुमच्यावर. बाईंनी काय शिक्विलेलं ते तरी पाहा.

***
पन्नास शब्द आणि रात्र हा शब्द आलटून पालटून ओवायचे. एक सुलट एक उलट असतं ना विणकामात तसं विणायचं. त्यामुळे काय होतं की नाई यमक आपोआप जुळतं. बघा हं मुलांनो कशी सुंदर बनते कविता.. आता कार्यशाळेअंतर्गत उदाहरणादाखल आपण दोन कडव्यांची कविता बनवू यात.
--
रात्र..

अहाहा रात्र उहुहु रात्र
काळी रात्र गोरी रात्र
धुंद रात्र मंद रात्र
रत रात्र गत रात्र
तरल रात्र सजल रात्र

(पहीलं कडवं अगदी सोपं ठेवलंय सर्वांना कळावं म्हणून. चार ओळी झाल्या की एक ओळीची जागा मोकळी सोडायची. मधेच काही बाही आठवलं तर तिथे लिहीता येईल.)

स्वप्नसजिली रात्र धुंद नशिली रात्र
शामरंगिली रात्र रास रसिली रात्र
शांत मोकळी रात्र कोमल हळवी रात्र
सरली सरली रात्र उरली उरली रात्र.
रात्र रात्र रात्र रात्र..
***

अशीच करा आता 'पाऊस' किंवा 'साजण' वर कविता

प्राची | 24 May, 2013 - 16:13

धरतीवर टुपीस बिकिनी ग्रीन>>> अग्गाई गं

आशूडी | 24 May, 2013 - 16:24

साजण टपकला बर्म्युडामध्ये दारी
धरतीचे अंगण एकदम क्लीन
चपापलाच साजण बघता धरतीस
धरतीवर टुपीस बिकिनी ग्रीन>>

साजण चपला घालून धरतीवर आला होता का? धरती म्हणजे काय त्याला बाग वाटली का फिरायला? लिबर्टी, मोची, वुडलँड किंवा जुन्या बाजार बाटा असल्यास त्याला घरी पाठवा. पावसाळ्यात बर्म्युडावर
पॅरागॉन पॅरागॉन
सिर्फ एक पॅरागॉन
ना रहे किडा ना रहे दर्द
मोजोंको आराम,

* राडा बहराचे उत्खनन करत आहेत. गेलेला बहर अन उगवता बहर यांची अजोड सांगड घालणारा एखादाच. राडा कालातीत होऊ पाहातायत. टाईम अ‍ॅक्सिसच्या चौथ्या डायमेन्शनने त्यांना जबरी 'इन्व्हाईट' दिलेला दिसतो.

संपादन

पौर्णिमा | 24 May, 2013 - 16:21

Rofl

मीन्वासाठी अगदी योग्य वेळ आहे एन्ट्री घेण्यासाठी! बोलावू का?

चिंगी | 24 May, 2013 - 16:23
Lol
अरारा!

ते रैनाते म्हणतात तसं गझलांकडे पण बघुन घ्या जरा.. लै ताप देतात.

मंजूडी | 24 May, 2013 - 16:24
Lol

एक सुलट एक उलट >> हे वाचून मला मीन्वा आली आहे असंच वाटलं.

रणजित रॉजर | 24 May, 2013 - 16:24
Rofl

म हा न! अगदी पूनम!
अस्सा पाऊस तस्सा पाऊस
ओला पाऊस कोरडा पाऊस
भिजल पाऊस गझल पाऊस
(वाचता गझल? किती हाऊस!)

कांदापोहे | 24 May, 2013 - 16:26

एक सुलट एक उलट >> हे वाचून मला मीन्वा आली आहे असंच वाटलं>> Lol

रणजित रॉजर | 24 May, 2013 - 16:31

राडा कालातीत होऊ पाहातायत. टाईम अ‍ॅक्सिसच्या चौथ्या डायमेन्शनने त्यांना जबरी 'इन्व्हाईट' दिलेला दिसतो. >>>> क्लास!

टण्या | 24 May, 2013 - 17:59नवीन

अर्राडा तू इतका जीर्ण काहून होत्साते? हा काव्यरगाडा ह्या आसेतूहिमाचल हिंदूभुमीत असाच अखंड वाहतो आहे. सांखळिया सरांनी गुंतवून ठेवलेल्या साखळ्यांच्या गुंताळ्यातून गाठी सोडवता सोडवता तुझे हाताची नखे जेव्हा सोलवटून गेली होती तेव्हा लाहोर रस्त्यावरच्या अण्णाजानच्या ढाब्यावर अख्तरीबाईच्या गझला ऐकत तुला पेल्यात बोटे बुडवून अवीट चवीचे पाणी आणून देणार्‍या म्हातार्‍या बिलावरने ऐकवलेल्या पेशावरी वह्यांनी तुझे डोळे तेव्हादेखील पाणावून नव्हते का गेले? त्याच काव्यपाकळ्या मोहोंजोदडोच्या फुटक्या कपर्‍यातून तुला दिसल्या तेव्हा कोरड्या ठक्क तुझ्या कार्‍या दिलावर मोरगावच्या वह्यांचे ठसे नाही उमटले? मोहोंजदडोच्या त्या भग्न गल्लातून कोणे एके काळी ती सिंधू माता जाते फिरवताना अश्याच ओव्या म्हणत असेल. त्या ओव्या ऐकत मोठ्या झालेल्या तिच्या मुली हडप्पाला सासरी जाताना त्याच ओव्या त्यांच्याबरोबर नेत असत. अश्याच ओव्या तुझ्या चिंगूताईने जहरगावच्या देशमुखांकडे नेल्या होत्या त्या तिच्याबरोबरच त्या घरात बुडून गेल्या. तिच्या मुलाने मात्र जहरगावाला फाट्यावर बसवून शहरात धाव ठोकली. गावच्या कुणबिकीच्या रगाड्यातून सुटलेल्या त्याने कालेजात मराठी शिकवत गावच्या आठवणींवर कवितांची उदबिकी सुरू केली. कविता अभ्यासक्रमात लागाव्या म्हणुन पुण्यातल्या म्हातार्‍या प्रोफेसर लोकांचे उंबरे जिझवत त्याच्या चपलांचे अंगठे तुटले पण पुण्यातल्या भामट्यांनी त्याला दिडकीचा भाव दिला नाही. इंटरनेटवर छापून प्रसिद्ध करायच्या खर्चाचा प्रश्नच सुटल्याने मग त्या तुझ्या भावडू भाच्याने तिथे जो काही काव्यबहर उघडला की तुझ्या कुणब्याच्या घरातल्या अडगळीत सुद्धा कमी गोष्टी सापडतील. पाऊस पडल्यावर त्याला वाटते,
अहाहा हाच तो पाउस, हेच ते पाणी
अहाहा हाच तो गंध, हीच ती न्हाणी
अहाहा हेच तो तरट, तीच ती केरसुणी
झाडली त्याने मी शाळा, आई करे भांडीधुणी
अहाहा हेच ते शहर, मागे राहिली गाणी
अहाहा हेच ते हॉस्टेल, हीच त्यातली खोली
अहाहा हेच ते कपाट, त्यात अशीच ती उत्तान बाई
अहाहा हाच तो पाउस, हीच ती राणी
अहाहा हिरची कंच साडी, जणू बहरली पांडव लेणी
अहाहा ते भांगेत कुंकू, जणू रक्तचंदनाची नाणी
अहाहा भरला तिने चषक, ज्यात किरमिजी पाणी
टपटप पडतो पाऊस, जशी मंजूळ तिची वाणी

साजिरा | 24 May, 2013 - 18:49नवीन

अर्रर्र टण्या तू मिशाळ गुर्जीस्नी अख्खा पाठच करून टाकला रे लईच अफाट!

वरदाबाई, तुमी काकाशाचा कोर्स करा. काकाशाबाईंच्या काही मौल्यवान टिप्स खालील्प्रमाणे.

***
आरोळी हा कवितेचा फॉर्म काही नवकविंची मान्यता पावला आहे. परंतु प्रस्थापित कविंना अजून त्रिकोण, चौकोन, कोष्ठबद्ध काव्यप्रकारांतून बाहेर पडायला जमलं नाहीये... त्यासाठी पोट आपलं ते मन साफ हवं
***
कवितेसाठी आपण पन्नास शब्द शोधले की ते आकाराप्रमाणे मांडून घ्यावेत. सारख्या आकाराच्या शब्दांची एकेक वहीच करावी. एकदा का पन्नास शब्दांचे असे वाटे करता आले की त्यावरुन किती प्रकारचे आकार बनवता येतात हे तपासावे. मग आपल्याला आवडेल त्या आकारात कविता लिहावी.
***
भरपूर संस्कृतोद्भव शब्द वापरा (शक्यतो नेहमीच्या वापरातले नको .. म्हणजे खांदा नको, स्कंध चालेल )
***
शेवटच्या कडव्यात तीन (मोजून) टींबे देऊन एक प्रचंड अर्थ निर्माण करायचा प्रयत्न कराल. बर्‍याच वेळेला फसाल पण एकदा तुक्का लागून जाऊन सर्वोत्कृष्ट कवितेचे बक्षीस गळ्यात पडेलच यांची ग्यारंटी!
***

Pages