खव्याची पोळी-पाकृ नव्हे वृत्तांत

Submitted by रैना on 19 March, 2011 - 09:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 
    सारणासाठी
  • २५० ग्रॅम खवा
  • १ वाटी साखर (साधी, नेहमीची)
  • २ मोठे चमचे बेसन, थोड्याश्या तुपावर भाजून
  • १ मोठा चमचा रवा, खसखस थोडीशी, थोड्याश्या तुपावर भाजून
  • फारच लाडात असल्यास किंचीत खोबरे, वेलदोड्याची पूड, केशराच्या काड्या, दुधाचा हबका वगैरे जे वाट्टेल ते Proud

पारीसाठी
मैदा (२ मोठे चमचे) +कणिक (अडिच वाट्या)+ मोहन - फार घट्ट नाही, फार सैल नाही (just perfect u see) स्टाईलने कणिक भिजवून ठेवावी.

क्रमवार पाककृती: 

ही पाकृ नसून हा एक वृत्तांत समजावा. आपल्या जिकीरीवर करावे. Proud
पदार्थ करायच्या आधी एखाद महिना वाहत्या बाफवर नुसतेच करणार, करणार म्हणत रहावे.
त्याने काय होते? माहौल बनतो आणि धीर गोळा करायला मदत होते. शिवाय फुकट टीका होते, त्याने मनोबल वाढते. शिवाय आपण कमिट केले, आता(तरी) करावेच लागेल, अशी परिस्थिती निर्माण होते.
मग एखाद आठवडा आधी उपलब्ध सर्व पाकृ वाचायला घ्याव्यात. वाचल्यानेही मनोबल वाढते (अथवा खचते).

जुन्या मायबोलीवरील पाकृ
- खव्याची पोळी http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/59984.html?1079651858
- सांजोर्‍या/साटोर्‍या http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93898.html

- पाकृ वाचून जमेल असे वाटल्यास नक्की जमते- (थंबरूल क्रमांक १)
- वाचता, वाचता, ज्या घटक पदार्थाचा अर्थ समजत नाही असे वाटते, अस्से दोनापेक्षा अधिक घटक पदार्थ निघाल्यास तो पदार्थ करण्याच्या इराद्यास डिच मारावे. (थंबरूल क्रमांक २)
- किंवा अगदी उत्तरआर्यंलडांतच मिळणारे exotic घटक पदार्थ असल्यासही डिच मारावे (आपण, आपला दुर्दम्य उत्साह आणि कामाचा उरक यांना शेवटपर्यंत विसरू नये. अंथरूण पाहून.. इ.इ.इ. ) (थंबरूल क्रमांक ३)
- सर्व पाकृ वाचल्या की ... मामी चांगल्या करते, तिलाच विचारू म्हणून फोन करावा. मग तिचीही पाकृ कानावर पडेल. की पुन्हा थंबरुल क्रमांक ३ रेफर करावा.
- मग गुमान सर्व पाकृ आणि आपले डोके यांचा वापर करुन आपल्याला जमेल तो घोळ घालावा. जमले तर पाकृ लिहावी आणि नाहीच जमले तर माकाचु वर अश्रु गाळावे. (थंबरूल क्रमांक ४)

१. खवा लालसार भाजून घ्यावा. (तूप सुटेपर्यंत). तो homogenous mass (mess) दिसेपर्यंत परतावे. (तो गिच्च गोळा जरा हार्टस्टॉपिंग दिसतो. :फिदी:)
२. मामी टाकते म्हणून त्यात साधी साखर टाकावी. मग ते एकदम लिक्वीड दिसते. मग गॅस बंद करावा.(मामीची टीप- रटराट उकळू नये म्हणे. साखर टाकली आणि वितळली की गॅस बंद कर.)
३. माकाचू, माकाचू म्हणून पॅनिक. मग अब 'ओखली में सिर दिया है तो मुसल से क्या डरना' असे आठवून, वाचलेल्या पाकृ आठवाव्या. मग भाजलेले बेसन, खसखस, खोबरे, आणि रवा त्यात ओतावे आणि हॅरीपॉटरच्या वाँड्सारखे वरवर न हलवता चांगले जीव खाऊन हलवावे. मग ते निदान सेमीसॉलिड दिसायला लागते. (तोवर घरातील एक सदस्य - हे लाटणार कसे? आमच्याकडे पुरणासारखे लाटताना मी पाहिले आहे' असा महत्त्वाची टिप्पण्णी करेल. त्याला अर्थातच इग्नोर करावे. त्यांच्या घराण्याबद्दल बोलण्याएवढा वेळ सध्या आपल्याकडे नाही एवढे लक्षात ठेवावे. मोह टाळावा. )
४. ते पुरेसे थंड होईपर्यंत टंगळमंगळ करावी. रामरक्षा (येत असल्यास) म्हणावी. रामरक्षा म्हणल्याने पदार्थ चांगला होतो की नाही ते त्या रामास ठाऊक. empirical evidence माझ्याकडे तरी नाही.
५. मिश्रण (आणि डोके) पुरेसे थंड झाले की पुरणासारखे पारीत ठेऊन, पोळ्या लाटाव्या.

वाढणी/प्रमाण: 
पाव किलो खव्याच्या ८ पोळ्या
अधिक टिपा: 

- जमल्या तर लग्गेच भाव खाऊ नये, कारण आपल्यासारख्यांना पुन्हा करायच्या झाल्यास नक्की जमतीलच असे नाही. त्यासाठी कमीतकमी १० वेळा जमल्या की मग भाव खावा. तोपर्यंत विमानं जमिनीवरच राहतील असे पहावे.
- फोटो टाकला रे टाकला की मायबोलीवरील सुगरण/सुगरणी साईज,वजन,प्लेट वगैरेंपासून टिपण्णी करत बिनाखव्याच्या वगैरे खव्याच्यापोळ्या कशा करतात तेही सांगतील, म्हणून टेंशन घेऊ नये. Chill !!
- प्रतिक्रियांमध्ये ' घरी आत्ता खवा नाहिये', काकडीच आहे, ती चालेल का ? अस प्रश्न आला की खचून जाऊ नये. मग 'खास' लोकांकडे उत्तरासाठी रेफर करावे.
- साखरेच्या दाण्याचा साईज आणि उसमळणी यावरही मायबोलीवरचे एक्ष्पर्ट बोलतील, बाफ काढतील, शंका विचारतील. ते क्वाईट नॉर्मल आहे. आपण तोंड म्हणून उघडायचे नाही.
- खव्याची पोळी होळीला कशी काय चालते अशीही एक अर्धधार्मिकपूर्णतांत्रिक शंका काढली जाईल. मंद स्मित करावे. (थंबरूल क्रमांक ५)
- घरी खपोळीच काय पंचपक्वान्न केली तरी आपली कार्टी 'वरणभात आणि साधी पोळी'च खाणार. तेच जर लोकांकडे केलेली असली तर मात्र मागून खाणार. (हा मात्र मर्फीज लॉ. अगदी आणि हमखास)

माहितीचा स्रोत: 
मायबोली सुगरणी + (माझी) मामी. मॉरल सर्पोट- पूनम आणि पुपु (मंजूतै आणि हिरकु)
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'>>घरी आत्ता खवा नाहिये', काकडीच आहे, ती चालेल का Lol

मस्तं!!! फोटू, पाकृ आणि वृ सगळंच. पुन:निर्मितीचा आनंद(!) मिळेल की नाही अशी शंका येतेच. अशावेळी एकदा(च) नाहिलेल्या घोड्याचा फोटो काढून डाकवून द्यावा. Proud

>>फारच लाडात असल्यास
कोण? कोणाच्या?? Proud

मस्त फोटो अन कृती. मधल्या स्टेप्स चे फोटो पण चालले अस्ते की .

खव्याची पोळी होळीला कशी काय चालते अशीही एक अर्धधार्मिकपूर्णतांत्रिक शंका काढली जाईल. मंद स्मित करावे. >> तुला चालत नसेल तर तू खाऊ नकोस असेही Sotto voce म्हणावे Proud

Biggrin

माकाचु, माकाचु>>> भारीच हं!

अरे नुसताच वृत्त्तांत वाचला आता पाकृ पण जरा बघते! आणि लवकरच 'करणारे करणारे' चे सुप वाजवते! Wink

मस्त पाकृ नी वृत्तांत तर खुपच भारी.
बेस्ट :

(तोवर घरातील एक सदस्य - हे लाटणार कसे? आमच्याकडे पुरणासारखे लाटताना मी पाहिले आहे' असा महत्त्वाची टिप्पण्णी करेल. त्याला अर्थातच इग्नोर करावे. त्यांच्या घराण्याबद्दल बोलण्याएवढा वेळ सध्या आपल्याकडे नाही एवढे लक्षात ठेवावे. मोह टाळावा. )>>>> अगदी बरोबर. Happy

प्रतिक्रियांमध्ये ' घरी आत्ता खवा नाहिये', काकडीच आहे, ती चालेल का ? अस प्रश्न आला की खचून जाऊ नये. मग 'खास' लोकांकडे उत्तरासाठी रेफर करावे.>>>>>> P: Proud

आहाहा.. मस्त पाकरु...... आयमीन वृत्तांत...

ते ताटात अजुन काय काय दिसतेय त्याचेबी वृतांत डकवा की इथे Happy

त्यांच्या घराण्याबद्दल बोलण्याएवढा वेळ सध्या आपल्याकडे नाही एवढे लक्षात ठेवावे. मोह टाळावा. )>>>
घरी आत्ता खवा नाहिये', काकडीच आहे, ती चालेल का ? अस प्रश्न आला की खचून जाऊ नये.>>> Lol पहिल्या टिपेत 'त्यांच्या घराण्याबद्दल आत्ता बोलायला बसलं तर डोकं चढेल नी त्याचा राग पोळीवर काढला जाईल म्हणून मोह टाळावा' असं लिही.

बाकी मस्त वृत्तांत.
फोटो झकास आलाय. करुन बघाविशी वाटतेय. ताटात बाकी भाज्या कोणत्या आहेत?

तुमचे लेखन एकदम मस्त! ह ह पु वा.पण ते मा का चु नाही कळले.पोळीचा फोटो पण छान आला आहे.एकदम तों पा सू..........................

मा का चु नाही कळले

इथे पूर्वी माझ्या काही चुका
अश्या नावाचा बीबी उघडला होता. सांगितलेल्या कृति जमल्या नाहीत की पदार्थ कसा बिघडला हे प्रथम तिथे लिहावे.

नंतर तोच पदार्थ 'वेगळ्या रीतीने' कसा करावा, असा बीबी उघडून आपण काय केले ते लिहायचे.

शेवटी काय, स्वैपाकातील चूक ही केवळ नव्या पाककृतीची जननी आहे!

Happy Light 1

Biggrin

मर्फीज लॉ अगदी अगदी Happy आमच्याकडे पुरणाची पोळी केली की ऑम्लेट मागायची पद्धत आहे Uhoh

फोटो आणि वृत्तांत दोन्ही मस्त. पण एवढ्या खव्याच्या पोळ्या केल्यानंतर बाकीचा साग्रसंगित स्वैपाक पण केलास म्हणजे तू बर्‍याच लेव्हल्स एकाच टप्प्यात पार पाडल्यास की. Happy

रैना Biggrin

मर्फीज लॉ एकदम करेक्ट Happy
आणि पोळ्या संपत आल्या किंवा संपल्या की म्हणायचं मी खाल्लीच नाही Sad

मस्तय वृत्तांत

रैना, चांगली जमली आहे कि पोळी. Happy

त्यांच्या घराण्याबद्दल बोलण्याएवढा वेळ सध्या आपल्याकडे नाही एवढे लक्षात ठेवावे. मोह टाळावा. )>>>>>
Lol हे सगळ्यात आवडल. Proud मस्त लिहल आहेस.

घरी खपोळीच काय पंचपक्वान्न केली तरी आपली कार्टी 'वरणभात आणि साधी पोळी'च खाणार. तेच जर लोकांकडे केलेली असली तर मात्र मागून खाणार. >> अगदी अगदी.

छान केली आहेस ग. मेनुपण एकदम फर्स्टक्लास.

Pages