| 
   | 
 
| | Arch 
 |  |  |  | Tuesday, September 12, 2006 - 5:18 pm: |       |  
 | 
 नलिनी, अगदी सुंदर दिसतायत तुझ्या पुर्या आणि किती व्यवस्थीत स्वयंपाक करतेस ग तू.
 
 
 |  | | Bee 
 |  |  |  | Wednesday, September 13, 2006 - 2:24 am: |       |  
 | 
 मला अशीच सचित्र कृती हवी होती. नलिनी धन्यवाद. फोटो खूप व्यवस्थित काढले..
 
 
 |  | | Nalini 
 |  |  |  | Wednesday, September 13, 2006 - 8:15 am: |       |  
 | 
 सुरभी, प्रज्ञा, आर्च, बी, ठांकू. अजुन शिल्लक आहेत पुर्या. कधी येताय मग माझ्याकडे?
 
 
 
 |  | | Megha16 
 |  |  |  | Wednesday, September 13, 2006 - 1:20 pm: |       |  
 | 
 नलीनी,
 मी पण उचलली एक. खुप च छान दिसत आहेत टपोरया टपोरया पुरया.
 
 
 |  | | Mrinmayee 
 |  |  |  | Wednesday, September 13, 2006 - 1:59 pm: |       |  
 | 
 काय दिस्ताहेत पुर्या!! नलु, खूप सुगरण आहेस तु!!
 
 
 |  | | Savani 
 |  |  |  | Wednesday, September 13, 2006 - 2:26 pm: |       |  
 | 
 नलिनी, खरच सुगरण आहेस तू. किती व्यवस्थितपणा आहे तुझ्या स्वैपाकात. त्या पुर्या एकसारख्या आकारच्या. ते जे लाडू करून ठेवले आहेत ते सुद्धा सुबक एका आकाराचे. सुरेख.
 
 
 |  | | Manuswini 
 |  |  |  | Wednesday, September 13, 2006 - 4:50 pm: |       |  
 | 
 नलिनी हा  item  मस्तच दिसतोय.
 
 ते  picture speaks thousand words really, very tempting to eat
 
 मला  temptation   होतय ते करण्यासाठी.
 
 तु म्हणतेस तो रवा मी इथे काढु शकत नाही.
 मग साधा रवा( semolina ) चालेल का वापरला तर?
 दुसरे म्हणजे तळताना तेल वापरले तर चालेल का?
 
 मी करायचा विचार करतेय. सध्या बराच वेळ असतो  Weekends ला
 
 
 |  | या सांजोर्या बघून मला पण करून पहाव्या आसे खूप वटू लगले आहे...बघतेच करून या वीकेंडला.
 
 
 |  | | Nalini 
 |  |  |  | Thursday, September 14, 2006 - 7:59 am: |       |  
 | 
 Manuswini , हो तु विकत मिळतो तो रवा वापरु शकतेस. तळण्यासाठी तेलच वापरायचे आहे.
 बी, तुला शक्य असेल तर तु तो रवा गाळून घे. म्हणजे किडे वर राहतील. रवा मंद गॅसवर चांगला भाजून
 घे.
 मृ., सावनी, अगं कसली सुगरण. फार कमी प्रकार करता येतात मला. तुमच्याकडेच क्लास लावायला हवा, स्वयंपाक शिकण्यासाठी. आर्चकडे खास उकडिचे मोदक शिकायला जायला हवे एकदा.
 
 
 |  | | Manuswini 
 |  |  |  | Thursday, September 14, 2006 - 4:23 pm: |       |  
 | 
 नलीनी
 तुझ्या ह्या पुर्या मी सतरांदा इथे येवुन बघत असते.
 
 काय  tempting  आहेत ग.
 बघच आता मी  weekend ला करतेच
 
 इथे फोटोची मजा काही औरच आहे.
 
 thanks  for info  नलीनी
 
 
 |  | | Deepa_s 
 |  |  |  | Thursday, October 12, 2006 - 6:11 am: |       |  
 | 
 मी खुप दिवस सांजोरी ची रेसिपी खुप दिवस शोधत होते. इथे दिवाळीच्या फ़राळात सापडली. पण माझा नवरा म्हणतो की त्याला गुळाची सांजोरी नाही आवडत.
 कोणी साखर घालून सांजोरी कशी करायची ते सांगू शकेल का?
 
 
 |  | | Prady 
 |  |  |  | Sunday, October 15, 2006 - 9:08 pm: |       |  
 | 
 इथे बघा अंजीराच्या साटोर्या.
 
 http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2170198.cms
 
 
 |  | | Milindaa 
 |  |  |  | Monday, October 16, 2006 - 12:02 pm: |       |  
 | 
 Deepa_s,हे बघा
 /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=740691#POST740691
 
 
 |  | | Shraddhak 
 |  |  |  | Monday, November 05, 2007 - 7:42 am: |       |  
 | 
 मंजू, तुझ्या सांगण्यावरून टाकत आहे साटोर्यांची कृती आणि माझं प्रमाण.
 
 इथे अर्काईव्हमध्ये खव्याच्या साटोर्यांची कृती आहे. जवळपास तशीच कृती आहे.
 
 सारण: दीड वाटी रवा, एक वाटी खवा, पाव वाटी खसखस, अर्धी वाटी सुक्या खोबर्याचा कीस, दोन वाट्या पिठीसाखर, वेलची पूड, जायफळ पूड हवी असेल तर.
 
 पारी: १ वाटी रवा, १ वाटी मैदा, पाव वाटी कणीक, अर्धी वाटी कडकडीत तापलेल्या तुपाचे मोहन, मळायला दूध, किंचित मीठ.
 
 लाटण्यासाठी तांदळाची पिठी. भाजण्यासाठी तूप.
 
 कृती: रवा किंचित तूप घालून भाजून घे. (अगदी लाडूंना भाजतो तेवढा नाही भाजायचा. जरा खमंग झाला की उतरव गॅसवरून.)
 तो जरा कोमट झाला की त्यावर थोडे दूध शिंपडून तो जरा दाबून ठेवायचा. चांगला फ़ुलतो.
 खवा भाजून घे. हाही जास्त नाही भाजायचा. खसखस लालसर दिसू लागेपर्यंत भाजून घे. खोबरंदेखील भाजून घे. (एकाच कढईत दिलेल्या क्रमाने भाजायचे एकेक आयटम्स.)
 
 सगळं भाजून होईतोवर पहिले भाजलेला रवा फ़ुललेला असेलच. बाकीचे पदार्थ थोडे निवू दे. मग ते सगळे एकत्र करून मिक्सरमधून काढ. सारण छान मिळून येतं. त्यात दोन वाट्या पिठीसाखर मिसळ, वेलची पूड, जायफ़ळ घाल. आणि ते नीट कालवून जरा मुरू दे.
 
 पारीचं साहित्य एकत्र करून दुधाने मळून घे. आणि ठेवून दे जरावेळ. साधारणतः तासाभराने ते सर्व मिक्सरमधून काढ.  ( कुटत बसावे लागत नाही मिक्सरमधून काढल्याने.) त्या मिश्रणाचा पोत आपण तळणीच्या मोदकाची पारी करतो तसा हवा.
 
 मग पारीच्या उंड्यात सारणाचा गोळा भरून तांदळाच्या पिठीवर तळहाताएवढी पुरी होईल इतपत लाटून घे. (सारण आणि पारीच्या उंड्याचे प्रमाण नाही सांगता येत गं. कारण मी अंदाजे घेते. पण पारीचा उंडा सारणाच्या उंड्यापेक्षा लहान घ्यायचा. पारी फ़ुटायला नको पण लाटताना.)
 
 एकावेळी दोन तवे ठेव. एका तव्यावर जरा गुलाबीसर शेकून घ्यायच्या साटोर्या. एकावेळी दोन सहज ठेवता येतात. मग दुसर्या तव्यावर तूप सोडून छान गुलाबी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या. जरा खरपूस भाजल्या गेल्या तरी चालतात.
 
 पहिल्यांदाच कृती लिहिलीये, तेव्हा जर काही शंका असेल तर विचार. कारण मी अंदाजे सगळा कारभार करते.
  काही राहून गेले असेलही. 
 
 |  | | Manjud 
 |  |  |  | Monday, November 05, 2007 - 7:52 am: |       |  
 | 
 वा वा, श्रद्धा, एकदम डिटेलमध्ये लिहिलंस ते बरं झालं. आता बघते करून पाडव्याला आणि सांगते कश्या झाल्या ते............ अनेक धन्स!!!
 
 
 |  | | Divya 
 |  |  |  | Wednesday, February 27, 2008 - 4:31 pm: |       |  
 | 
 श्रद्धा, तु लिहीलेल प्रमाण घेउन केलेल्या साटोर्या अप्रतिम होतात.
   वजन वाढायचे काम आहे.
 
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
| हितगुज गणेशोत्सव २००६ |  |  
   |