मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>नवरोबांच्या जेवणाची आज काय व्यवस्था केल>><<
मानुषी,

महिला दिनादिवशी पण नवर्‍याच्या जेवणाची चिंता. कमाल आहे. मग ते खोखो वर लिहिले ते सगळे फुकट? तुम्ही तुमच्या मैत्रीणींना जाणीव करुन द्यायची गरज आहे की त्या प्रथम 'व्यक्ती' आहेत हे. Happy

आज सकाळच्या कामांच्या गडबडीत पोळ्या करत असतांना,नेमका लाँड्रीवाला आला.. मग कपडे घे,पैसे दे,रीसीट घे इ. दंगलीत नवर्‍याला आवाज दिला,"तव्यावर पोळी आहे,बघ रे जरा.." लाँड्रीवाला गेल्यावर दार लावत असतांना पोळी जळाल्याचा वास आला म्हणून धावत किचन मधे गेल्या वर दिसले कि नवरा,सुपरवायझर सारखा दोन्ही हात पाठामागे बांधून पोळीकडे पाहात स्वस्थ उभा होता.. मी ओरडले अरे बघत काय बसलास,पोळी उलटवायची ना,यावर त्याने आशर्यचकित होऊन म्हटले,' हो का?? तूच तर म्हणालीस कि पोळी कडे बघ,म्हणून मी आपला बघत बसलो'.. Uhoh

कमाल आहे. मग ते खोखो वर लिहिले ते सगळे फुकट?>>>>>>>>>>
ध्वनी............नवरा काय रोज हातानी स्वयंपाक करत नाहीच. आणि तरी महिला दिनी सुद्धा त्याने हाताने करून घेण्याचा प्रयत्न केलाच ना. आणि नवर्‍यांना घरी उपाशी ठेऊनच महिला दिन साजरा होतो असं नाही. घरातली व्यवस्था बघणे यात घरच्यांची जेवणाची व्यवस्था बघणे हेही येतेच ना.
आणि हो मला वाटतं या बाफवर काही गोष्टी लाईटली घ्यायच्या असतात. एक विनोदाचा भाग म्हणून!

वर्षु,
हो का?? तूच तर म्हणालीस कि पोळी कडे बघ,म्हणून मी आपला बघत बसलो'..
Lol
हा वेपणाला , आज्ञाधारकपणा की भीतीयुक्त दरारा म्हणायचा ?
Lol

हा आज्ञाधारकही नाही आणी भितीयुक्तही नाही....

हा तर कामचुकार टाईपचा वेपणा आहे.....
वर्षु :दिवे घ्या:

मी एक खतरनाक वेपणा केला आत्ताच....

भुक लागली म्हणुन मॅकडीत गेलो...... ऑर्डर दिली पैसे दिले..... फोनवर बोलता बोलता ऑफीस मध्ये परत चाल्ल्या आलो..... खायच तर सोडा उरलेले पैसे पण परत नाही घेतले आणी बील पण नाही उचलल...

मग लक्षात आल्यावर परत गेलो..... कांऊटर वाला बरा निघाला.... नाहीतर उपाशीपोटी ५०० चा चुना होता...

काल फोनवर बोलता बोलता नवर्‍याने रिकामी प्लेट सिंकमध्ये ठेवायच्या ऐवजी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली.

१ मिनिटापूर्वी टॉवेल बाथरूमध्ये नेऊन ठेवला आणि मग आमचे काहितरी बोलणे चालू होते तेवढ्यात हा शोधाशोध करायला लागला, म्हटले काय हवंय तुला? अगं टॉवेल शोधतोय Happy

कंटाळले बाई मी या वेंधळेपणाला !

नाही ना, त्याची रास कुंभ आहे का तुळ आहे याबद्दल एकमत नाहिये अजून घरात Happy मीन राशीचा मान माझ्या सासर्‍यांनी पटकावला आहे. Happy
नवर्‍याचे अजून किस्से

लहानपणी शाळेतून घरी येताना एकदा दप्तरच विसरून आला.
बसने गावाला जाताना 'महत्वाच्या कामासाठी' खाली उतरला आणि नंतर भलत्याच बसमध्ये चढला.

अजून आठवले तर लिहिनच Happy

माझा नवरा मीन राशीचा. घरापासून कॉलेज जवळ होतं, एकदा स्कूटी नेलिये हेच विसरला नि आला चालत तसाच! मग आईंनी विचारलं तेव्हा आठवलं आणि परत जाऊन स्कूटी आणली.

नशीब मी मुलगी नाही

नाहीतर माझ्या नशीबी असा नवरा आला असता तर..... काटाच येतो बाई अंगावर

चिमण Rofl

हो ना

माझा नवरा मीन राशीचा. घरापासून कॉलेज जवळ होतं, एकदा स्कूटी नेलिये हेच विसरला नि आला चालत तसाच! मग आईंनी विचारलं तेव्हा आठवलं आणि परत जाऊन स्कूटी आणली.

>>>>

मी एकदा असाच गाडी ऑफिसात विसरून घरी आलोय. नशीब ऑफिस पूर्वेला आणि घर पस्चिमेला आहे Sad
या ड्रिमूने हा "मीन" राशीचा मुद्दा काढलाय ना....... श्या, फुकट बदनाम करतात मीन राशीला. बिचारे गुणी आणि पापभिरू असतो आम्ही. Wink

अरे बाप रे.. भुंग्या तू भी??? माझा नवरा बी मीन आहे... सो मीन यू ऑल आर Proud Light 1 घेच..

अनिल.. माझा 'भीतीयुक्त दरारा??'मी हॅलोविन चा मुखवटा घातला तरी कोणीच मला घाबरत नाही रे श्या!!! Angry
चिमणराव... तुम्ही कसं बरोब्बर ओळखलं?????? स्वतःचा अनुभव ना?? वाटलच मला Lol

'मी हॅलोविन चा मुखवटा घातला तरी कोणीच मला घाबरत नाही रे श्या!!! >>>>>>>>>>>वर्षू......हाहाहाहा!
आणि काय अनिल ? आपलाही असाच भीतियुक्त दरारा आहे की काय?

परवा नेहमीच्या सुपरमार्केट मध्ये गेले. तिथे नवीन रॅक्स बनविण्याचे काम चालू होते. व भरपूर पसारा होता. मी या, न्यु रॅक्स न्यु रॅक्स करत करत वर बघत चालत होते तेव्ह्ढ्यात एका दुकानातील पोरीने भाजीचा ट्रे पुढे सरकाविला व मला काहीही कळायच्या आत मी त्याला धडकून साष्टांग नमस्कार जमीनीवर पडले. चष्मा भलतीकडे, मोबाइल कुठेतरीच. मग धडपडून उठून मी ठीके असे लोकांना सांगून चषमा शोधून घातला. त्याची फ्रेम खराब झाली जरा. आता मी खाली बघून नीट चालते. व शॉपिन्ग करून चुपचाप बाहेर जुने रॅक्स असूदे कि नवीन.

एकदा असेच एक माणूस दुकानातल्या मुलीला तूच नीट भाजी बघून दे म्हणत होता तर मला फिसकन हसायलाच आले. तो उखडून बघू लागला. Happy

@ प्रज्ञा९.... माझ्या सौंची दया करु नका.... ती मेली अस्तीत्वातच नाही आलीये अजुन...

@ भुंगा अगदी खर बोलतोयस..... माझ्या कडे एक टी पण आहे तसा.....मीन राशीचा

"I do not swim in trouble water" अस म्हणणारा....

@ वर्षा.... तुम्ही पण अगदी बरोबर ओळखलत हो..माझ्या बद्दल.... पण तरी प्रत्येक नवरा बायकोला जरा "घाबरुनच" असतो अस मला तरी वाटत... ह्यावरुन एक विनोद आठवला

एकदा देव सगळ्या पुरुषांना आपल्या कडे बोलावुन घेतो..... आत जाण्यासाठी दोन दरवाजे असतात.... एक त्यांच्यासाठी जे बायकोला घाबरता आणी दुसरा जे नाही घाबरत...

पहिल्या दरवाजा वर लांबच लांब रांग असते..... दुसर्‍या दरवाजावर फक्त एक किडकिडा दिसणारा माणुस जाउन उभा राहतो. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात.... एकजण त्याला विचरातो.... का रे तु तिथे कसा उभा आहेस.... बायकोला घाबरत नाहीस की काय.....

तो म्हणतो " तस नाही हो.. बायको ने दम भरला होता ह्या दरवाजात उभे रहा म्हणुन इथे रांग लावलीये"

ती मेली अस्तीत्वातच नाही आलीये अजुन...>>> अरेरे बिचारीला आधीच मेली करुन टाकल Sad दिवे Happy

काल कामावरुन घरी गेल्यावर मोठ्या कष्टाने मी स्वःताला परत बाहेर जाण्यास तयार केल. कुकर चे वॉल्व्ह ठीक करायला (एका मागे एक दोन्ही कुकरचे वॉल्व्ह ऊडाले). कुकर ची झाकण पीशवीत घालुन ठेवली आणि तयार होऊन निघाले, चालतांना मनात स्वःताचच कौतुक करत होते कि "कंटाळा न करता गेले आठवडाभर रखडवलेल काम आज आपण करतोय तेही सुट्टीचा दिवस नसुन वै. " तोवर मी बराच पल्ला गाठला होता रीक्षा स्टँड पर्यंतचा आन मंग वाटल आपण किती मोकळ्या हाताने छान वॉक करतोय नि डोक्यात प्रकाश पडला की म्ह्या कुकराच्या खाकणांची थैली घरीच ईसरलो व्हतो की" मंग परत माघारी गेलो Sad Proud

माझी पायी फिरण्याची आवडच आहे
एकदा गडबड असल्या सरळ सायकलवर टांग मारली
व बाजारात गेलो, भाजी वाल्याच्या दुकाना समोर सायकल लावली
भाजी घेण झाल तसच पायी घरी भाजी घेंऊन आलो. घरी दरवाजा उघडताच लक्षात आले अरे आपण तर सायकल घेऊन गेलो होतो
पुन्हा २ कि. मी. जवळपास धावतच गेलो. सायकल जशीच्या तशी पाहुन हायसे वाटले

काही मिनीटांपुर्वीचा वेंपणा.... ज्याला सर्वस्वी माबोच जबाबदार आहे आधीच सांगते... तशी मी काही एवढी वेंधळी नाही हा Happy
आज टिपीकल मालवणी जेवणाचा बेत केला, चवळीच्या शेंगांची(वालीची) भाजी हिरव्या मिरचीची, लाल चण्यांची मस्त गरम मसाला, वाट्ण वगैरे घालुन केलेली झणझणीत आमटी, भात नी चपाती. तर अस मस्त माझ फेवरेट जेवण ताटात घेतले नी म्ह्टल जरा जेवता जेवता माबोवर नजर फिरवुया(तस आधीपासुन चालुच होते, माबो बंद करायचा सहसा पटकन धीर होत नाही). तर अस माझ मल्टीटास्कींग चालु होत. एकेक घास जेवणाचा नी माबो वरचे एकेक बीबी धूडांळण चालु होत. अचानक जीभेने (न बघता जेवण्याची शिक्षा म्हणुन की काय) आत बाहेर डान्स करण्यास सुरुवात केली मग लक्षात आल आपण भाजीतली मिरची चावली वर घाईत गिळली पण.... तरी पण माबोवरच लक्ष काही ढळल नाही (किती ती चिकाटी) म्ह्टल त्यात काय होत अस कधी कधी, पाणी पिऊन वर जरा सुका भात खाल्ला की होईल जीभ सेटल... नी तसच पाण्याचा ग्लास उचलला नी एका घोटातच सगळा तिख्टपणा, जीभेवरचे राहीलेले मिरचीचे अवशेष गटकन खाली जावे म्हणुन जोरात मोठा पाण्याचा घोट घेतला... नी........काय.... डोळे दिपले, काहीच दिसेनासे झाले, मायबोली तरंगताना दिसु लागली.... तारे चमकले काय सगळे दिवसाढवळ्या दिस्ले मला क्षण्भर ...... नाका-डोळ्यातुन पाणी भराभरा वाहु लागले... सरसरावुन घाम फुटलेला......थयथयाट झाला चांगला ....

पाण्याच्या ग्लासाऐवजी मी आमटीचा पेला उचललेला नी तिखट आमटीच्या वरच्या झणझणीत तरीचा (रस्स्याचा) एक भला मोठा जबरदस्त भुरका घेतलेला.....

११ वी संपवून १२वीत पाऊल टाकलेल आणि एका बालनाट्यात काम करायची संधी मिळाली.
फारच हरखलेलो. स्वर्ग दोन बोटे उरेल असा रोल होता म्हणजे ७० तल्या म्हता-याचा. नाटकाच नाव होत जिमि कीमी गिनीज बुकात. या बालनाट्यात ना काहीही लॉजिक असत. या दोन मुलाना गिनीज बुकात जायच असत ती भयंकर व्रात्य असता आणि शेवटी ती एक चोर पकडून शौर्य गाजवतात. मला तेव्हाही ते आवडल नव्हत पण स्क्रिप्ट पसंत नाही म्हणून नाकारण मला शक्य नव्हत.

तर त्यात माझ्याच वयाची माझ्या कॉलेजातली एक मुलगी त्या दोघांची आजी झालेली. आमचा एक सिन होता. ती काळजीत असते आणि मी येऊन विचारपुस करतो.

माझ्या वेळेस "आsssवाज आवाsssज" प्रेक्षकातून आरोळ्या आल्या.
अशावेळेस काळजाच काय अजुनही काही अवयवांच पाणी पाणी होत.
बर त्या मुलीचा आवाज पोचत होता.
आत आल्यावर "आपण प्रेक्षकांसाठी नाटक करतो" अशी कॉमेंट दिग्दर्शकांकडून आली.
आणि इतर सहकलाकारांनी त्या आजी वरून माझी यथेच्छ थट्टा केली.

असच एका प्रयोगाच्या वेळची गोष्ट
इंटर्व्हल संपलेला फ्रेश हो ऊन मी मेकपमनशी गप्पा मारत होतो. 'अरे वाह वझे कॉलेज का!!! फ्रेंच शिकतोस का !!' वगैरे वगैरे कौतुक करून घेण्यात मी रंगलेलो.
एकिकडे चालू झालेल्या नाटकातले संवाद ऐकू येत होते.
दिग्दर्शकांचीही एक भुमिका होती. त्यांचा एक संवाद ऐकू आला.

मी: "सरांच्या या वाक्यानंतर मी म्हणतो की..."

मेकपमनः "काssssssssssssय!!!!!!!!!!

दुस-या क्षणी मी माझा म्हाता-याचा गेटप सांभाळात विंगेच्या दिशेने धाव घेतलेली...

लेटेस्ट मधी काल कामाच्या ठीकाणी माझा काम्युटर बंद पडला. हो अचानक बंदच म्हणजी सुरुच झाला नाही सकाळ पासुन, मग त्याच्या दागटर ला फोन केला पेशंटची लक्षण सांगीतली, दागटर काल येऊन ऊपचार करणार व्हता पण त्याने शेंडी दिली. आज सकाळी पण म्ह्या काम्प्युटर सुरु करुन पाहिला न्हाय झाला मग वर च्या डिपार्ट्मेंट्ला जाऊन बसलो. आत्ता ईकड आलो आन साफ सफाई करणार्‍या मावशींना "काल त्या कॉम्प्युटर वाल्याला फोन केला पण तो आला नाही, अजुन माझा कॉम्पुटर निट झाला नाही" अस बोलत व्हतो तर सीनियर "मॅडम तो पहा तो आलाय तुमच्या बाजुच्या कॉम्प्युटर वर बसलाय तोच तो" , मग त्याला म्हणालो "माझा कॉम्युटर सुरु होत नाही" तो म्हणाला "सुरु होतोय करुन बघा, मी निट केलाय" Proud

खायच तर सोडा उरलेले पैसे पण परत नाही घेतले आणी बील पण नाही उचलल...>>>
चिमणराव,
मला तर तुम्ही याच्या उलट ५०० रु. खाऊन,वर बील न देता बाहेर येण्याचा वेप केला असता तर ते जास्त आवडल असतं ! Lol
आणि काय अनिल ? आपलाही असाच भीतियुक्त दरारा आहे की काय?
मानुषी,
दरारा एकेकाळी होता पण आता या स्त्रीमुक्तीच्या (माझा माझ्यावर झालेला) प्रभावामुळे आपोआप कमी होतोय
Lol
आजचा ताजा वेप,
खुप महिन्यांतुन एक कुरिअर आलं, जाऊन बघितलं तर बैन्केंच रेनुअल केलेलं क्रेडिट कार्ड होत,त्यांन आयडी प्रुफ मागितलं, नेमकं आज माझ्याकडे काही नव्हतं,पाकीट घरी विसरलं,त्यामुळे आज मला माझी ओळख देता आली नाही ,मग तो न देता उद्या येतो म्हणून परत गेला.:राग:

काही दिवसांपूर्वीचा किस्सा. रविवारचा दिवस होता. संध्याकाळचा चहा करत ओट्याजवळ ऊभी होते. डोक्यात विचारांचा पिंगा चालू होता. चहा उकळेपर्यंत एक पातेल घेऊन त्यात दूध घेतल. (चहा गाळण्यासाठी) चहा उकळल्यावर चहा चिमट्याने उतरवला, आणि दूध असलेल पातेल चिमट्याने धरून वर ठेवल. नंतर लक्षात आलं दूधाच पातेल थंड होतं. स्वतःलाच हसत चहाच पातेल हाताने उचललं. दुसरयाच क्षणी पातेल ओट्याअवर आदळल होत. ओट्याने चहाचा आस्वाद घेतला होता. आणि माझ्या हास्याचे हा....य मध्ये रूपांतर झाले होते. विचार पिंगा थांबवून सावधान मध्ये ऊभे राहून माझी कीव करत होते. आणि मनातल्या मनात माझ्या वेंपला हसत होते. Lol

Pages