Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी आत्ता चुकुन "अमानिवय"
मी आत्ता चुकुन "अमानिवय" समजुन हा घागा उघडला....
एक दोन अनुभव वाचल्यावर वाटल की आज काल भुत पण वेंपणा करायला लागलीत की काय
मग लक्षात आल..... अरे ही तरी आपलीच भुत आहेत.....
रच्याकने, जश्या ह्या जगात पॉसीटीव्ह किंवा निगेटीव्ह इनर्जी आहे अस म्हणल जात तस वेंपणा करायला लावणारी पण एखादी असेल का हो
वेंधळी एनर्जी....
चिमणराव
चिमणराव
वर लिहीलेल्या त्याच नाटकातला
वर लिहीलेल्या त्याच नाटकातला किस्सा
शेवटच्या अंकातला शेवटचा प्रवेश तो चोर भुत बनून घाबरवत लोकाना लुबाडत असतो. मी आणि इतर दोन म्हातारे एक आमचे दिग्दर्शक आणि अजुन एक कलाकार होते. आम्ही एक एक करत घाबरून बेशुद्ध पडतो.
इथे जेव्हा मला तो चोर धरायचा तेव्हा एका प्रयोगात मी घाबरल्याची एक्सप्रेशन देत धोतर उचलून खाली पाहील.
जबरदस्त लाफ्टर आला.
पण आत आल्यावर मात्र माझी चांगलीच हजेरी घेतली गेली. नाटक सेन्सॉर झालय अस काही करू नकोस हे बालनाट्य आहे.
मला आयपॉड लावून गाणी म्हणत
मला आयपॉड लावून गाणी म्हणत शॉपिन्ग करायची फार सवय आहे. ट्रॉली ढकलत आरामात दुकानात फिरायचे काय ते पिठे बिस्किटी काय काय घ्यायचे. तर मग बिलिन्ग च्या तिथे आल्यावर चुकून जोरात
एकदा तर ९/११ च्या दिवशी आमच्यात पावरकट होता व मी टॉर्च घ्यायला गेले होते तेव्हाच या बया. मला अजून लक्षात आहे.
काहीतरी दिल प्रेम वगैरे वाले हिन्दी गाणे म्हणले कि तो बिल कर्णारा माणूस वैतागतो व मी ओशाळते हे फार वेळा झाले आहे.
९/११ च्या काळात आय पॉड नव्हता
९/११ च्या काळात आय पॉड नव्हता बरे का नुस्तेच गाणे गात होते.
माझा पण एक भन्नाट किस्सा आहे;
माझा पण एक भन्नाट किस्सा आहे; माझे नुकतेच लग्न झाले होते, आणि सुरवातीला २-३ वेळा मी आमचे घरच चुकले होते! मी तेव्हा कॉलेजमधे जात होते; आणि घरी येताना मी नेमकी ७-८ घरे पुढे जायची! एका घरापाशी विचारायची की पुरंदरे कुठे रहातात? त्या बाई सांगायच्या की अगं मागे ७-८ घरं जा. असे २-३ दा घडले. आणि मी नेमकी त्याच बाईंना लूनावरून उतरून विचारायची!४ थ्यांदा जेव्हा मी विचारले तेव्हा त्यांनी मला विचारले की तू कोण? आणि मी पण बावळट! त्यांना सांगितलं की मी त्यांची सून! माझ्या दुर्दैवाने त्या माझ्या सा बां ची मैत्रीण निघल्या. मग काय विचारता! माझे काय झाले असेल त्याची तुम्ही चांगलीच कल्पना करू शकता. चेहेरे मात्र माझ्या अजून लक्षात रहात नाहीत. आणि रस्ते सुद्धा! पुण्यातल्या पुण्यात जरी जायचे झाले तर मी १० वेळा रस्ता मनात घोकते; अर्धा तास वगैरे आधी निघते आणि कशीबशी पोचते.
शांकली
शांकली

शांकली :हहपुवा:
शांकली :हहपुवा:
शांकली जरा आपले चरणकमल दाखवता
शांकली जरा आपले चरणकमल दाखवता का? नाही...........दर्शन घेऊ दे!
शांकली .......मलाही डायरेक्शन सेन्स खूपच कमी आहे. एखाद्या ठिकाणाहून कुठे गेले तर तर पुन्हा तिथूनच सुरवात केल्याशिवाय ते ठिकाण सापडत नाही.
जरा एक्सप्लेन करायला कठिण जातंय! समजून घ्या.
हाय वेंधळ्या फ्रेंडां
हाय वेंधळ्या फ्रेंडां फ्रेंडींनो... कसं काय चालू आहे... वेंधळेपणा वै... एकदम मस्त ना???
मध्ये बर्रेच दिवस गायबलेले... ४ दिवसांच्या वेंपंच्या उच्चांकांनंतर अस्मादिकांना एवढी शरम वाटली की त्यांनी वेंप धाग्याला आराम द्यायचं ठरवलं...
तर हा त्या उच्चांकातले काहे किस्से आठवतील तसे... बाकीचे विसरले... काय करणार...! स्वभावाला...
लिफ्ट नेहमीच बिघडतेय हल्ली... प्रोजेक्टमध्ये प्रचंड बिझल्यामुळे सतत त्याच विचारात असायचे... घरी आले तर लिफ्ट नुस्त्तीच ख्डखडण्याचा आवाज आणि दाखवतेय ७ वा मजला. खाली यायला तयारच नाही... चिडचिडत अस्मादिक आले चौथ्या मजल्यावर! आता जावं ना घरात एवढं चढले तर... नाही अस्मादिक चढत ७ व्या मजल्यावर गेले... लिफ्टचा दरवाजा नीट केला... लिफ्ट सरसरत खाली जायला लागली... अस्मादिक खूश! आता त्याच लिफ्ट मध्ये बसून जावं ना खाली... तर उतरले चौथ्या मजल्यापर्यंत!... नाही लिफ्ट मधनं गेले तेच बरं नाहीतर ग्राऊंड पर्यंत जाऊन पुन्हा ४ बटण प्रेस केलं असतं... काSSही नेम नाही अस्मादिकांचा!!!
बरं आता अस्मादिक चौथ्या
बरं आता अस्मादिक चौथ्या मजल्यावर पोहोचले बरं का... आणि घराबाहेर उभे राहून बेल बडवताहेत.. नवर्याला शिव्या घालत... काय बाई कुठे कडमडतोय... दरवाजा उघडायला कित्ती वेळ!!!! झोपलाय की काय!!! वैताग वैताग करताना खालच्या लॉककडे नजर गेली... जीभ चावली... नवर्याला बिच्चार्याला उग्गीच शिव्या घातल्या! त्याने केव्हाचच फोन करून सांगितलेलं मी उशीरा येतोय म्हणून! लॉक खोललं... आता लॅच खोलायची तर विसरून परत २ बेल मारल्या... देवा काय करावं या टकुर्याला!!! स्वत:लाच शिव्या घातल्या "मुर्खा काय करतेस..." तोपर्यंत शेजारीण किलकिल्या दरवाज्याआडून डोकावलीच की काय झालंय म्हणून! तिच्याकडे ओशाळ्लं हसू टाकून घरात शिरले पटकन..
घरात आले... फटाफट जेवणाला
घरात आले... फटाफट जेवणाला लागले... आधीच उशीर झालेला... म्हणजे विचार करा... वेंधळा स्वभाव, त्यात प्रोजेक्टसचे टेन्शन्स आणि त्यात झालेला उशीर!!! म्हणजे हरतालिका आणि महाशिवरात्र, एकादशीच्या घरी मुक्कामाला आल्यासारखे!
घाईघाईत तेलाचा प्लास्टीक डबा काढला आणि त्यातून बुधल्यात तेल काढायलाच विसरले.. नवरा नव्हता ना घरी.. नाहीतर हे काम तोच अंगावर घेतो..पुढचा व्याप टाळण्यासाठी!
नंतरचा अर्धा तास शिंकण्यात वाया गेला तो वेगळाच!

हा तर तेलाचा ५ लिटरचा प्लास्टीकचा डबाच डायरेक्ट कढईत ओतायला घेतला... थोडंसं जास्त पडलं तेल...!!
आणि या गोंधळात फूल गॅसवरच्चं भांडं तापून करपायला लागलेलं. तेल टाकताच ते लागलीच गरम होऊन वाफा यायला लागल्या. काही न सुचून तसंच हिंग, मोहरी, कांद्याची फोडणी टाकली नी लगेच हळद तिखट टाकलं...
तेलावर कोमेजलेला कांदा तरंगायला लागल्यावर पुन्हा जाणवलं तेल जास्त आहे, कांदा पोहतोय! तर कढई वाकडी धरून एका चमच्याने (तो मोठा घ्यावा ते पण नाही सुचलं मी चहाचाच घेतला...) ते जास्तीचं फोडणीमिश्रीत तेल हळू हळू काढायला गेले तर चमचा धरलेली बोटं खाली तापलेल्या कढईला चुकून टेकली नी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून तो चमचा हातून उडाला नी त्यातील फोडणीवालं तिखट तेल नेम धरल्यासारखं नाकात!!!!
रस्ता तर मला कद्धीच आठवत
रस्ता तर मला कद्धीच आठवत नाही!!! माझ्यावर नव्या जागी (नकाशा वै. देऊनही) जो विसंबला त्याचा कार्यभाग हमखास बुडाला!!! या बाबतीत मी फुल्ली बरोबरच्या व्यक्तीवर विसंबून असते... हा आता रस्ता विसरले तरी जगज्जेत्या सिकंदराचे भाव चेहर्यावर पांघरून चालत असते ती वेगळी गोष्ट!!!
माय
माय गॉड्......ड्रीम्गर्ल.......... ड्रीमी हैस गं तू.........हसून हसून कोलमडले.. पुढचं वाचताना धडधडत होतं ,'आता पुढे अजून काय काय होणार..............म्हणून.. तुला ___/\___ गं बाय!!!
रस्ता सोडा मी चेहरापण
रस्ता सोडा मी चेहरापण विसरते... आणि मी चेहरा विसरले हेही प्रामाणिकपणे सांगून टाकते... उगाच कशाला ओशाळं व्हा वा खोटं बोला!! नाही लक्षात राह्त तर नाही!!! आणि मीन राशीचा मुद्दा आहेच! आता भुंगा म्हणतो तसे आम्ही लोकं भोळे आणि पापभिरू असतो खरंच हा..
पण या गुणांमुळेच तर वेंप करतो ना...
आणि त्या लोकांसोबत जाणारा (आणि मी ओरडा खाईपर्यंत गडप झालेला) प्राणी अचानक अवतरतो नी तो पण ओरडतो बीच में क्यो घुस रहे हो!!!

आमच्या इथे शेअर ऑटोसाठी लाईन असते.. चेहरा विसरण्याच्या (अव)गुणामुळे भराभर भलत्यांच्यासोबत रिक्षेत बसायला जाते तर मागून माझ्या बरोबरचे लोक ओरडतात अरे आप हमारे साथ है ना...
परवाच्या माणसाला कळलेलं वाटते मी रोजच हा घुसखोरी करण्याचा वेंप करते... पुढे सरसावलेले घुसखोरी करण्यासाठी तेव्हा स्वताहूनच पुढे होऊन सांगितलं की अरे हम आगेकी ऑटोसे जायेंगे... चार लोग नही जा सकते ना उसमे... और वो अलग जगह पे रहते है, आप हमारे साथ चलिये...
भली माणसं पण आहेत बाई दुनियेत आम्हाला सांभाळून घेणारी 
मला भांड्यांच्या, बरण्यांच्या
मला भांड्यांच्या, बरण्यांच्या आणि त्यांच्या झाकण्यांच्या आकारांचा अंदाजच येत नाही....
तेलाच्या मोठ्या किटलीला चुकून छोट्या बुधलीचं झाकण लावायला जाते ते बद्दकन तेलाच्या तळाशी गुडूप्प होतं!!! मग किटलीतलं तेल संपेपर्यंत वाट बघा!!!
मोठ्या बरण्यांना छोट्यांची झाकणं लावायला जाईन प्रत्येकीत एक असं अडकवून ठेवते... नी नवर्याला काढायला लावते... तू चांगला इंजिनीअर आहेस.. काहीतरी क्लुप्ती काढ नी ते झाकण काढ म्हणून!! मग आमच्या अकलेच्या कांद्याचा घसरलेल्या भावाचा वचपा नंतर काढते ती वेगळी गोष्ट!!
भाजी तयार केलेल्या भांड्याला झाकायला हमखास छोटी ताटली घेते नी भाजीच्या रश्श्याने बरबटून ती बाहेर काढून परत धुवायला टाकते...
काय करावं बाई!! मला वाटते तारे जमीन पर मधल्या इशान अवस्थीचं नी गजनी तल्या आमीरचं पण अर्थात फिमेल वर्जनचं माझ्यात जबरदस्त ब्लेंडींग आहे...
सगळ्यात भयानक वेंप... नवरा
सगळ्यात भयानक वेंप...
नवरा जॉन्सनच्या इयर बडने कान कोरत होता... मला नर्स गिरी करायची हुक्की आली.. त्याला ओरडले... चल रे कान फोडून ठेवशील मी हळू करते... आणि जबरदस्तीने त्याचं डोकं मांडीवर ओढलं... गप्पा मारता मारता मध्येच तो किंचाळून उठला... मी गप्पांच्या नादात त्याचा कान...
दुसर्या दिवशी माझी रडारडी, फोनाफोनी नंतर त्याच गोंधळात इएन्टी स्पेशालिस्टची अपॉईंटमेंट घेऊन नेलं तर त्याच्या कानाच्या पडद्याला जखम झालेली... डॉक्टरच्या समोर पण अस्मादिकांचे डोळे तुडुंब भरले पाण्याने... त्याला वाटलं काय बाई नवर्यावर प्रेम!!
पण माझा नवरा खरंच खूप खूप गुणाचा त्यानं कुण्णा कुण्णाला सांगितलं नाही (म्हणजे त्याच्या आईबाबांनाही नाही) की हा पराक्रम अस्मादिकांनी केलेला
पुढचे २-३ दिवस उमाळ्याने खूप रडू येत होतं... स्वत:वरच्या रागाने आणि शरमेने या धाग्याकडे वळलेच नव्हते !!! 
ड्रिमू........... काय
ड्रिमू...........
काय आठवड्याभराचा वचपा काढलाय...

आता झालं ना, समुला पण सुरसुरी येणार....... उद्या चार पाच बस आणि कंडक्टरचे किस्से एकदम पडणार
ड्रिमू ________________________/\____________
आमचे अॅरेंज मॅरेज आहे.
आमचे अॅरेंज मॅरेज आहे. लग्नाआधी जेमतेम ३-४ दा भेटलो. त्यामुळे स्वभाव वगैरे काही माहित नव्हता. लग्नानंतर ३ दिवस गावी राहुन पुन्यात आलो. पुन्यात फक्त दोघेच रहाणार होतो. लग्नाआधी महिनाभर नवर्याने भाड्याने फ्लॅट घेउन ठेवला होता. ४ त्या ( शेवटच्या ) मजल्यावर आणी नो लिफ्ट. ( शेजारी-पाजारी पण माहित नव्हते ). नगरमधे राहिल्याने पुणे त्यामानाने बरेच मोठे वेगळे होते.
पुण्यात आल्यावर २-३ दिवसांनिच एका परिक्षेसाठी ठाण्याला जावे लागले. परत आले तेव्हा साधारण संध्याकाळचे ७ वाजले असतील. एकतर प्रवासाने दमलेले. ४ मजले चढले कसेबसे. पहाते तर फ्लॅटचे दार उघडेच. आणी आत सामाण जरा वेगळेच, दुसरीच कुणीतरी बाई ओट्याजवळ उभी होती. एकदम घाबरले.. आपल्ल्याला फसवले वगैरे काहीतरी मनात. मग म्हटले बिल्डींग चुकली असेल... म्हणून परत खाली.. पण बिल्डींगचे नाव तर बरोबर.. परत वर चढले... पण सेम प्रॉबलेम...डोळ्यात पाणिच आले... मागुन कुणीतरी आले आणि सरका म्हणाले... सरकल्यावर ते लोक वर गेले.. मग लक्षात आले.. आपण चौथ्या नाही तिसर्या मजल्यावर आहोत.

ड्रीमु खरच तुला आणी तुझ्या
ड्रीमु खरच तुला आणी तुझ्या नवर्याला ____/\____
वर्षे.........
वर्षे.........
ड्रीमू>>>>>>>> ______________
ड्रीमू>>>>>>>>
______________________/\_________________________
बघ हो ड्रीमू...... पुढेमागे,
बघ हो ड्रीमू......
पुढेमागे, बाळाचं झबलं नवर्याला घालायला देशील ऑफिसला जाताना........

साईझ कळत नाही ना तुला.....
मी माय्बोलि वर नवीन आहे मी
मी माय्बोलि वर नवीन आहे
मी एकदा औफीस मधे रीसेपशन वर कुरिअर साथि गेले होते
तिथे एका मेगझिन वर आमीर खान चा फोतो होता
मी एन्वलप वर क्लायन्त ऐवजि आमीर खान लिहिले
नन्तर माझ्या एका कलीग ने पाहिले
आनि मी वाचले
ड्रिमु.... तुझ नाव आता
ड्रिमु.... तुझ नाव आता उमगायला लागलय बघ......
रच्याकने... तुला बडबड करण्याची सवय असेल तर नवरा काही दिवस वाचला म्हणायचा....
काही दिवसांपुर्वी नवर्यांचे किस्से वाचुन बर वाटलेल की आपण मुलगी नाही म्हणुन
पण आता तर त्याची धास्तीच बसलीये मनात.....
नशीबशे हम शींगल हे अबीतक
Projet ची Yearly Review
Projet ची Yearly Review Meeting... बॉस ने कामासाठी बोर्ड रूम मधे बोलावले व कामाची काहीतरी ईमेल करायला सांगितली... मी धावत डेस्कवर आले, पाहिलं तर दुसरंच कोणी बसलं होतं... मी चिडून... वस्कन त्याच्या अंगावर ओरडले.. hey how can you grab my seat? it's mine...
दुसरीकडे मला प्रचंड आश्चर्य वाटलं होतं की डेस्कवरच्या वस्तू, फोन, माझी नेमप्लेट याने इतक्यात बदलली कशी काय?
नंतर माझाच गाढवपणा लक्षात आला, कोणत्याही मिटींगकरता आम्हाला आमच्याच फ्लोअर वरची (सेकन्ड फ्लोअरची) बोर्ड रूम मिळते, त्यादिवशी चुकुन थर्ड मिळाली होती. एक मजला खाली येऊन डेस्क गाठण्याऐवजी मी दुसर्याच माणसाच्या डेस्कवर स्वत:चा हक्क गाजवत होते.
दक्स!!!! तू भी >>>>>>>>
दक्स!!!! तू भी >>>>>>>>

चिमण्या, काय रे वाचताना नकळत
चिमण्या, काय रे वाचताना नकळत कानावर हात गेले असतील ना????
पुन्हा बायकोच्या मंडीवर डोके ठेवणं नको..... काय???? कानावर हात ठेवूनच डोके मांडीवर ठेवा रे नवर्यांनो.

भुंग्या...... कानावर हात गेले
भुंग्या...... कानावर हात गेले ... पण कान "साफ" होण्याच्या भितीने नाही रे बाबा
बायको नको"च" म्हणुन...
बाकी ते मात्र खर हा.... नवर्यांनो..... कानाला खडा लावा हवा तर.... साफ करताना मात्र जरा..... ड्रिम ची पोष्ट वाचुन घ्या...
आणी भुंग्या नवरे कशा कशा वर हात ठेवतील...... नंतर कळाल..... कान साफ करण्याच्या हट्टा पाई हात मोडुन ठेवलाय म्हणुन
त्याच बालनाट्यातला किस्सा तोच
त्याच बालनाट्यातला किस्सा
तोच सिन तोच प्रवेश तो चोर मला घाबरवतोय मी थरथर कापतो नंतर तो मला धरतो आणि ढकलतो. इथे लाईट डीम होत ब्लॅकाऊट
त्यानंतर तो पळतो पुढे पकडा गेल्याचे आवाजाचा गलका ... मग लाईट येतात आणि त्या मुलांची मिरवणूक
आता आर्ट फिल्म च अजिर्ण झालेल आणि आपल्यात कलात्मकता वगैरे ठासून भरल्याचा साक्षात्कार झालेला त्यामुळे मी त्या कलाकारा म्हटल उचल मला आणि टाक मी सांभाळेन सिन कस्सा अगदी रीय्यल वाटेल.
त्याने लगेच त्या प्रयोगात मला उचलल आणि फेकल...
मी अर्थातच कळवळलो. पुढे तो पळाला. मला याच ब्लॅकाऊट मधे विंगेत जायच होत आणि शेवटच्या मिरवणूकीत परत यायच.
पण.... मला मार लागलेला आणि उठताना माझ्या लक्षात आल माझी आब्रु एका खुर्चीत अडकलेय.
माझी झटापट चालू .... एसी त घाम फुटलेला..
पुन्हा एकदा ब्रह्मांद आठवल
बॅकग्रांडला आरडाओरडा पकडा पकडा सापडला...
मी निघू शकत नव्हतो काय कराव लाईट येत होते आणि ......
ती मिरवणून आली ज्यात मी नव्हतो. मी सेटवरच्याच एका कमरेएव्हड्या उंचीच्या सोफ्यामागे उभा राहून त्याना चिअर-अप करत होतो.
सगळे कलाकार हसत होते पण त्या दिवशी तो आनंद झाल्याचा अभिनय नव्हता
कारण
त्याना माहीत होत की सेटवर माझच धोतर पडलय
Pages