मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्यामारी या गुगुचे नाटक एकदा तरी जाऊन पहायला हवे होते. शक्य झाल्यास रेकॉर्ड केले असते...
धमाल विनोद बालनाट्य

शांकली Lol
ड्रिमू , तूला खरच साष्टांग नमस्कार. नवरयाने तुझा धसकाच घेतला असेल. Rofl
तुझ्या नवरयाला भावी आयुष्याला शुभेच्छा.
वर्षे, तुला कोपरापासून नमस्कार. Lol
दक्षे, तू पण या शर्यतीत आलीस. Proud
भुंग्या Lol

भुंग्या... माझा नवरा स्वतःचे ड्रेस स्वतःच घेतो हो... बायकोने रूमाल मोजे शर्ट टॉवेल घेऊन मागे मागे करावं असल्या ऑर्थोडॉक्स मेंटॅलिटीचा नवरा नाहीये तो Happy

माबोवरच्या (असतील तर) ऑर्थोडॉक्स मेंटॅलिटीच्या नवर्‍यांनी दिव्यांची माळच घ्यावी!!! Happy
Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1

मला मार लागलेला आणि उठताना माझ्या लक्षात आल माझी आब्रु एका खुर्चीत अडकलेय.
>>>>>>>>>>>गुगु.....खूप हसले.
माझ्या मुलाच्या (इ.२/३री) शाळेत गॅदरिगमधे मुलांचा आदिवासी डान्स(सोपा असतो ना हा!काहीही केलं तरी चालतं!!)बसवला होता. सर्वांच्या कमरेला अशोकाच्या पानांचे स्कर्ट बांधलेले होते. जरा भयानक मेकप. सगळ्यांच्या उघड्या वीत वीत छात्यांवर कवट्या रंगवलेल्या(?) हातात भाले वगैरे. पण डान्स सुरू केल्या केल्या एका मुलाचा पानांचा स्कर्ट सुटला आणि खाली पडला. पण तो आज्जाबात डरला नाय!आणि रडला पण नाय! त्याने तस्साच डान्स चालू ठेवला. हातात भाला वगैरे आणि कमरेला.....व्हीआयपीची छोटीशी अंडरपँट!
आत्ता जेव्हा फोटो पहातो तेव्हा सगळे आदिवासी पानांच्या स्कर्टात आणि एकच आदिवासी व्हीआयपीच्या अंडरपँटीत! आणि त्याच फोटोत स्टेजवर धारातीर्थी पडलेला अशोकाच्या पानांचा स्कर्टही दिस्तोय! तो फोटो पाहून आजही हसू येते.

माझा नवरा स्वतःचे ड्रेस स्वतःच घेतो हो... बायकोने रूमाल मोजे शर्ट टॉवेल घेऊन मागे मागे करावं असल्या ऑर्थोडॉक्स मेंटॅलिटीचा नवरा नाहीये तो
>>>>>

अरे वा वा....... चांगला शोधून निवडलायस....... मला वाटलं त्यात पण वेंपणा केला असेल की काय?? Light 1 (तू पण घे एक दिवा)

बायकोने रूमाल मोजे शर्ट टॉवेल घेऊन मागे मागे करावं असल्या ऑर्थोडॉक्स मेंटॅलिटीचा नवरा नाहीये तो
>>>

मीन राशीची बायको असताना काय हिम्मत त्या बिचार्‍याची की अश्या अपेक्षा तो ठेवेल??? Proud

पुढच्या वेळेपासून तो इथे येऊन किस्से लिहेल. बायकोकडे टॉवेल मागितला तर मला पायपुसणं आणून दिलं, आणि रूमाल मागितला तर ब्रेड स्लाईस ठेवली हातावर "बटर लावून" Rofl Lol Biggrin

Light 1 Light 1 Light 1 Light 1 ड्रिमू, हे सगळे तुझ्यासाठी हो.... Proud

भुंग्या अ‍ॅहॅ... तुम भी कुछ कम नही.. तुम्ही पण मीन राशीवालेच आहात टिकोजीराव विसरलात??? मी तर वाट बघतेय... तुझी बायको इथे तुझे वेंप कधी पोस्टायला येतेय ते... नाहीतर तिला नवीन धागाच उघडून देऊया... बर्का Wink

मीन राशीची बायको असताना काय हिम्मत त्या बिचार्‍याची की अश्या अपेक्षा तो ठेवेल???
>> बाकी हे मात्र अगदी खरं हॉ!!! Wink Proud

शोभा असुदे गं! सेम कॅटेगरीचा आहे ना... मग त्याच्यापेक्षा जास्त वेंधळी कॅटेगरी सापडल्याने हरखलाय बिच्चारा Proud

कसला सही स्ट्रेस रिलिव करणारा आहे धागा, हहमुव.

गुगु, ड्रिमु, समु, आदिवासि डान्स सर्व किस्स्यांना ________/\________
मलाही कधीच रस्ते लक्षात राहत नाहित. कितिहि वेळा गेले तरी आपली ती जागा नविनच भासते मला Sad

क्षणभर वाटलं .... "पाण्यात राहून माश्याशी (ड्रिमूशी) वैर करतोय की काय??? नंतर आठवलं आपण पण मासाच आहोत..... Proud
मग म्हटलं हरकत नाही .... आपल्याच झुंडीतली आहे Rofl Lol

शाळेत असतानाची गोष्ट, ८वी पासुन संस्कॄत विषय अभ्यासक्रमात आलेला...मित्राला प्रत्येक वाक्यात सुभाषित वापरायची भारी खोड. तो आणि त्याचे वडील लग्नाच्या पंगतीत जेवायला बसलेले. मित्राचे जेवण संपताना त्याला भात घ्यायचा होता...तर तो ऐटीत वाढप्याला म्हणाला
"अंत्यम् भातम् वाढम्" (असंच काहीतरी म्हणाला, माझ संस्कॄत चांगल नसल्याने क्रियापद आठवना)

तर वडिलांनी त्याचा कानाखाली जाळ काढला..कारण माणुस मेल्यानंतर जो भात बनवतात त्याला अंत्यभात अस म्हणतात

इयत्ता ३ अ बालक मंदिर कल्याण

"ह्रुषिकेश नेहमीच गोष्टी सांगतो आता दुसर कोणीतरी बोला निदान एखादा विनोद तरी" मराठे मॅडम सॉरी बाई म्हणाल्या

मी मी करत होते त्यात माझा नंबर लागला.

त्यावेळी वस्त्रहरण नाटक गाजू लागलेल आणि त्याची ऑडीओ कॅसेट आलेली हा व्हिडीओची चाहूल लागलेली तो काळ...
माझ्या मामा कडे असल्यामुळे ऐकून ऐकून नाटक पाठ झालेल. शिवाय त्यातले विनोद प्रत्यक्षात वापरायची सवयही
झाल मी उभा राहीलो त्यातलाच एक विनोद साभिनय सांगायला.

राजा मयेकर " अहो बाई मंजुळा बाssssई आम्ही तुमच हे पाहीलाय!!"
मंजुळा "काssssय"
राजा मयेकर " फोटो फोटो"

फारच थोडी मुल हसली. बरेचसे बहुदा मराठेबाईंचे रागावलेले डोळे पाहून गप्प बसले असावेत.

एक जण चिरकला "मला नाही कळ्ळ"
मी "अरे त्याच ना..."
धाप्प मागून जोरदार धपाटा आला.

"मालशे उद्या येताना आजीला घेऊन या"

आजीला नातवाची खात्री होती. शिवाय ती बाईंची आत्या लागत होती. त्यामुळे धोका कमी होता
मराठे बाई कळवळून तिला म्हणाल्या" नाही नाही ते बोलतो ग या वयात आवर त्याला"

साधारण त्याच काळातली गोष्ट
त्यात मच्छिंद्र कांबळीचा एक डॉयलॉग आहे " अरे हो कितवो पांडव कोणा पासून कोणाक झालेलो"

आई कुठल्याश्या मावशी बद्दल सांगत होती नी मी म्हतल " ही कोण मावशी कोणा....."
फाssssड्!!!!

गुगु महाराज..........आपलेही चरण कमल दाखवा ..... नाही म्हटलं दर्शन घेऊ दे!
-----------------------/\------------------------------

नमस्कार मंडळी माझ्या मागे ईथे बरेच वेपणे झालेले दिसता आहेत बर वाटल Proud नंतर निवांत वाचेन सगळ त्या अगुदर हे:

मागच्या आठवड्यात माझा डेस्कटॉप लई तरास देत व्हता, दागटर येऊन गेला पण ऊपेग न्हाय, मंग शनवारी पुन्हा दागटरला बोलावल पण सोमवारी येऊन कामाला सुरुवात करणार तो कामप्युटर ऑन पन व्हईना अन ऑन झाल्यावर चालेना. मग पुन्हा दागटर ले फोन केला त्याला चांगले व्हसकले अस कि तो आलाच लागलीच रीपेरींगला. चांगले २-३ तास तो रीपेरींग करत व्हता.

तो गेल्यावर मी काम्प्युटर वापरु लागलो मधीच तो हँग झाला म्हणुन म्ह्या समद्या कळा दाबुन तो बंद केला आणी परत समद्या कळा (स्वीच / बटन) सुरु करु लागले तो सुरुच व्हईना म्हणुन म्ह्या आरडा ओरडा सुरु केला. समुर सीनियर मॅम बसतात त्यांना

मी: "मॅम बघा ना आत्ता तो माणुस निट करुन गेला पण हा कॉम्प्युटर चालत नाही, मला मागच्या आठवड्या पासुन वैताग आलाय अणी आता तर खुप राग येतोय, चिडचिड होतेय..."
त्या मॅम "सगळी बटन बंद करुन २-३ मी. चालु करुन बघ"
मी: "मॅम मी ४-६ वेळा सगळी बटन बंद चालु करुन बघीतली पण स्क्रीन सुरुच होत नाही आहे तुम्हीच बघा"

मग त्या मॅम आल्या आणी ..... "अग स्क्रीन ची वायर ज्या प्लग मध्ये आहे त्याच बटन तर बंदच आहे आणी तू ते सोडुन बाकी सगळी बटन सुरु केलीत, त्या मधल्या प्लगच पण ज्यात वायर नाही " Uhoh

मी स्क्रीन ची वायर ज्या प्लगात होती त्याच बटन सोडुन ज्या प्लागात वायर नव्हती त्या सकट सगळी बटन ऑन केली (४-६ वेळा) आणी स्क्रीन ऑन होत नाही म्हणुन गोंधळ घातला.

झाल्या प्रकाराने ऊपस्थीत ईतर १-२ मॅडम लोकांनि ही दात काढले Proud

माझा शॉर्टफॉर्म बद्दल बराच गोंधळ उडतो...

माझ्या सानुनासिक स्वरांमुळे आणि होSSओSSओ अशा लांबलेल्या हो बोलायच्या टिपीकल हेल मुळे एकीने कॉलेजात विचारलं, तुम्ही कोब्रा का??? मी तिच्या डोळयांत वेडाची झाक दिसतेय का ते पाहीलं, मग स्वतःच्या दोन्ही हातांपायांवर नजर टाकून सहज बोलले... "नाही!!! आम्ही माणसं!!" Uhoh

Light 1

नुकताच त्या भूतांच्या अमानवीय धाग्यावर पेप्सी नी कोकचा अदलाबदल वेंप केला... आता त्या स्टोर्‍या वाचून नी चातकाने टाकलेले स्मायली बघून काहीही न पिताच मला बर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र झालंय मग परतले या धाग्यात Proud

माझ्या ऑफिसमधे आता मायबोली बद्दल माहित झालंय, वें प बद्द्ल आणि किश्श्यांबद्द्ल सांगितल्यावर आता मला सगळ्याजणी विचारतात की आज काय नविन? जणू काही मी किंवा ह्या सगळ्या अगदी व्यवस्थित असल्याचा दावा............. असो, पण रहावत नाही म्हणून आणि मैत्रीणीने पण परवानगी दिली म्हणून तिची गंमत सांगते. एकदा तिने ५-६ किलो गहू निवडले. दळण टाकण्यासाठी डबा घेऊन गिरणीत गेली. तेथील माणसाला सर्व सूचना दिल्या (कुठलीही बाई देते तशा). त्या माणसाने मान डोलावत डबा हातात घेतला व म्हणाला "पण काय दळायचं नक्की?"
ही वैतागून - "अहो, गहू - सांगितलं नं इतकं सविस्तर आताच !"
त्यावर तो माणूस थंडपणे - " पण हा डबा तर रिकामाच आहे" ( मनात म्हणला असेल - तुमच्या डोक्यासारखा)
तेव्हा कुठे बाईसाहेबांच्या लक्षात आले - गहू घरीच आणि रिकामा डबा गिरणीत !

हा एक आजोबांनी उघड केलेला लोकांचा भयानक वेंधळेपणा .....

माझ्या आजोबांना शेजारच्या गावातील (अंतर ३ किमी) असलेले एक जवळचे नातेवाईक (वय-९० च्या आसपास) वारल्याची वार्ता कुणाकडुन तरी सकाळी मिळाली,त्याकाळी (सन. सा. १९६५) कोणतही वाहन,बस अर्थातच नव्हती, ते मग लगेच सायकलनी तिकडे पोहोचले, तिकडे सगळे गावातले, पै-पाहुणे,जवळचे लोक तर गोळा झालेले होतेच, घरात बायकांचा आठवणी सांगण्याचा,गुणगान करण्याचा कार्यक्रम तर जोरात चालु होता, सगळीकडे बातमी पोहोचवण्यात आली होतीच, आता घरासमोर शेवटची तयारी चालुच होती.
आजोबा गेल्यानंतर त्यांनी जवळ जाऊन दर्शन घेतलं,आणि त्यांनी जवळ जाऊन एकदा नाडी पाहिली,त्यांना थोडी शंका आली, म्हणुन त्यांनी आपल्या गावच्या एका डॉक्टरना एकदा दाखवलेलं बरं असा आग्रह केला,काहीनी वेड्यात काढलं,विरोधही केला पण आजोबांसमोर (तब्येतीसमोर?) साहजिकच कमी पडला,तो डॉक्टर (डॉ.रानडे) त्या भागात तरी खुप गुणकारी होता. मग एका बैलगाडीने ताबडतोब त्या (वारलेल्या?) आजोबांना आपल्या गावी आणुन त्या डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टरांनी मग त्यांनी लगेच सलाईन/ऑषध सोडलं..
आणि विशेष म्हणजे ते आजोबा बरे होऊन पुढे २ वर्षे खणखणीत जगले.
Happy

शांकली...........अगं पण डब्याचं वजन जाणवलं नाही का? कारण मी एकदा असंच थालिपिठाची भाजणी दळायला एक डब्यात ठेवली होती. कामाला एक मुलगा आहे. त्याला म्हटलं...शरद...तो पहा डबा...भाजणी जरा भरडच सांग दळायला. त्याने डबा उचलल्याबरोबर म्हणाला," काकू हा रिकामा आहे." मीच त्याला चुकून दुसराच डबा दाखवत होते. हा झाला माझा वेंपणा. म्हणून म्हटलं हलका डबा कळला नाही का?
किंवा हाच वेंपणाचा कळस असेल!

परवा मी पोराला शाळेतून आणायला घाईघाईत गेलो. तिथे गेल्यानंतर त्याच्या बाई माझ्याकडे बघून हसल्या, मीही आपले तोंडदेखले स्माईल केले. नंतर त्याचा डबा, दप्तर गोळा करेपर्यंत आणखी दोघी ताया बघून हसतायत असे वाटले. हा काय प्रकार आहे हे समजेपर्यंत चिरंजीव पुढे ठाकले..
"अरे बाबा, तु शर्ट उलटा का घातलायस?"...खणखणीत आवाजात...
आणि चेहर्यावर असा का आपला बाबा बावळट असे भाव...
बघतो तर खरंच मी चक्क उलटा शर्ट घालून गेलो होतो.
आता काय करू सांगा...पटापट त्याला बखोटीला मारून घरी आलो..:)

मानुषी, अगं तेच तर,तिच्या लक्षातच आलं नाही डबा रिकामाच आहे. ऑफिसमधेपण ती नेहेमी पेन्स, टिफिन हे सर्व घरी विसरून यायची. एकदा तर गाडीची चावी कुठे ठेवली हेच तिला आठवेना, अख्खं ऑफिस चावी शोधत होतं (म्हणजे सर्व स्टाफ), बर्‍याच वेळाने ही हळूच म्हणाली की आज मी बहुतेक गाडीच आणली नाहिये. आता बोल! आम्ही सर्व जणी एकाच माळेच्या मणी आहोत.

शांकली...तुमच्या सगळ्यांच्या रिझ्युमेमध्ये
एक्ट्रा क्वालीटीज - वेंधळेपणा
असे टाकले होते का...
सगळ्यांना निवडून एकाच हापीसात भरलेय म्हणून वाटले...

बहुधा तसंच काहीसं असेल.मी तेव्हा ज्या ब्रँचला होते तेव्हा तिथे १२ लेडीज आणि ३ जेंट्स असा स्टाफ होता.आमचे ब्रँच मॅनेजर तर कायम नावात गोंधळ करायचे.बिच्चारे! आता आठवले तरी खूप हसू येते त्या वेळच्या गमती आठवून.आणि एकटीला हसताना बघून नवरा म्हणतो त्या गमती तुला आत्ता समजल्या वाटतं?

मी तेव्हा ज्या ब्रँचला होते तेव्हा तिथे १२ लेडीज आणि ३ जेंट्स असा स्टाफ होता
आशु,
हा देखील या कंपनीचा वेंधळेपणा म्हणायचा का ? तु अमानवीय देखील म्हणु शकतोस !
Lol

आज सकाळी म्ह्या हाफीसात ऊलट्या चपला घालुन बसलेले Proud

लई उकाडा व्हत होता म्हणुन थोड्या एळा साठी पाय चपलातुन काढुन ठेवले अन मंग नंतर खाली न बघता कामप्युटर मंधी डोस्क ठेऊन चपला घातल्या बराच एळ पायाला वेगळ वाटत व्हत मंग बघीतल तर Proud

सध्या फार्मविले खेळायला पुन्हा सुरूवात केलेय...

तेव्हा ऑफीसमध्ये खेळायचो... लंच ब्रेक मध्ये पटापट डबे संपवून हार्वेस्ट आणि सीड चालू... एकदा मध्येच एका क्लायंटचा फोन आला... पण लंच अवर संपल्याशिवाय नो वर्क असा आम्ही दंडक घालून घेतला होता... Proud
तेव्हा माझी कलिग पटकन म्हणाली अगं त्यांना त्यांच्या ब्लूबेरीमध्ये मेल होस्टींग चं सेट अप हवंय... मी म्हणाले काय गं आज शेतात ब्लू बेरी पेरल्यात वाटते!!! तेव्हा कुठे तिला समजलं... Happy

Pages