मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आत्ता बाथरुम मध्ये पहिले हात टिशु पेपर ने कोरडे केले नंतर रुमालाने पुसले..... आणी रुमाल पण फ्लश केला

मी एकदा झोपेतुन उठुन दात घासायला गेले आणि दात घासताना काहितरी वेगळे वाटले... बघितले तर नवर्‍याच्या ब्रश ने दात घासत होते... हसावे की रडावे कळेना... मग सबुत मिटवण्यासाठी बराच वेळ ब्रश कोरडा करत होते... नाहीतर त्याला भलती शंका यायची... ब्रश ओला कसा? ... Sad
गमतीचा भाग म्हणुन सांगते... माझ्या नवर्‍याच्या आजोबांना विस्मृती व्हायची त्यामुळे ते अनेकदा बेसिनवरच्या कपाटातुन जो ब्रश हाताला लागेल त्यानीच दात घासायचे... त्यामुळे सगळ्यानी आपापले ब्रश लपवुन ठेवलेले मी पाहिलेत... आणि आम्ही सुट्टीला गावाकडे गेल्यावर माझ्या ब्रशचा बळी गेला होता... आणि मला तो वेळीच कळला होता... मी दात घासायच्या आधीच ब्रश ओला सापडला होता.... Biggrin Biggrin Biggrin Biggrin

मला त्या नृत्यनाटीकेत घेतल्याने भयंकर खुष झालेलो. बारकीशीच भुमिका पण नृत्याभिनयातून सादरीकरण. काय करू नी काय नको अस झालेल.

मी होतो व्हीलन मग काय विचारता....

असाच भुमिकेच्या विचारात मी दादर स्टेशनला उभा होतो. अचानक लक्षात आला की लोक माझ्याकडेच पहातायत. अरे आपण प्रसिद्धही व्हायला लागलो की काय

आणि अचानक टाळाक्यात प्रकाश पडाला की जो अभिनय ज्या स्टेप्स माझ्या डोक्यात होत्या त्या मी करून पहात होतो.

भयंकर शरमेने मी धावत जाऊन दुस-याच डब्यात चढलो. कल्याणला आलो तरी लोक मला बघतायत अस वाटत होत.

आता तुम्ही म्हणाल त्यात काय एव्हढ

तर लोकहो!!!!!!

तो सिन बलात्काराचा होता.

आणखी एकची भर Rofl
भुंग्या, अगदी वेळेवर आलास. आत्ता तुझे <<<समू, ड्रिमू, चिमू..... आणि आता हा गुगु.........>>>.
हे वाक्य, तू नाहीस म्हणून मी तुझ्या ऐवजी लिहीणार होते, तेव्हढ्यात तू दत्त म्हणून हजर झालास. (आज गुरुवार)

शोभा, दत्तु म्हण भुंग्याला....
समु, ड्रिमु, चिमु, गुगु, दत्तु!

तो कदाचित दाढी घासून 'पामोलिव्हका जवाब नहीं' म्हणाला असेल.. Happy

चराग लेके धुंडता हुं पागल मीले जो कोई
दरपन में झाकां मिला मुझसे बडा ना कोई

"हद करदी आपने" Rofl sad0009_0.gif

engineering ला साधारण एका वर्शात सर्वांना टोपण नाव पडली होती...त्यात एकाच नाव 'बंटी" अस पडल...
एक दिवस मला कोणितरी "जा वरती बंटी कडे drawing sheet आहे घेऊन ये" अस सांगितल...मी ह्या बंटी शी आधी कधी बोलले नव्ह्ते...मी वरती practical room मधे गेले, वर्ग पुर्ण भरलेला...मी त्याच्या जवळ जाऊन बर्या पेकी जोर्यनी बोलते "तेरा नाम चिंटू है ना?" तो - "नही", मी - "मुझे पता है तेरा नाम चिंटू है, ज्यदा शानपण मत झाड, तेरी drawing sheet दे" बंटी चा सर्वांसमोर चिंटू करुन त्याचीच sheet त्याच्या कडून हिसकाऊन आणली.

चातक राव लई भारी दोहा हानलात.... पण काहीही म्हणा..... गुगु नी चांगलाच "सीन" केला हो

लोक त्याला टेड बंडीच समजत असतील....

चिमण
टेड बंडी कस समजतील इथे कोणाला तो माहीतेय.
फारतर भोतमांगे म्हणाले असते कारण ते नाटक खैरलांजी वर आहे.

प्रयोगात अजुन एक गंमत झाली अर्थात हा वेंधळेपणा मात्र माझा नव्हता

आम्ही तिघे होतो मी उपेंद्र आणि मयुरेश.
काही मुली नृत्याची तालिम करतायत.
आम्ही येतो प्रेक्षाकातून उजव्या बाजूच्या दरवाज्याने पाय-या चढून मग तो बलात्काराचा सिन (अरेरे नुसताच नृत्याभिनय) झाल्यावर आम्ही स्टेजवरून उतरून त्याच दरवाजाने exit घ्यायचो. पहीले उपेद्र मग मयुरेश आणि त्या मागून त्या मुलींना एक लूक देऊन धाडकन दरवाजा लावल्याचा अभिनय करत मी. इथे एक हृदयद्रावक म्युझीक पिस वाजायचा

इथे मयुरेशने पहीली चुक केली त्याने माझ्या तोंडावर दरवाजा लावला. म्हणजे माझी exit एक दरवाज्यातून झाली. आणि मग .....

मग तालात ताडताड तो सरळ चालत गेला...............
.
.
.
धप्प.......

बर हे इथेच संपत नाही.

आपण हे काय केल, हे लक्षात येऊन मयुरेश सैरभैर झाला नी अंधारात दरवाजा शोधत भिंतीवर धडका मारत होता.

माबो वरचा वेंपणा.
एकीकडे काम, दुसरीकडे मॅच चा स्कोअर बघणे. तिसरीकडे गगो वर गप्पा.

शोभा१२३: मला मॅच नाही बघता येत
मी: अरे, नेट व्यवस्थित कनेक्टेड आहे ना?
शोभा१२३: आहे ना. बघू. प्रयत्न करतेय.
मी: अरे हो,. तु गगो वर आहेस याचाच अर्थ नेट चालु असणार. काय हा माझा वेंपणा. :कपाळाला हात लाऊन घेतलेला बाहुला:

Proud Lol

गिरी Lol Proud Rofl

आधीच सांगते ..हा वेंपणा माझा नसून नवरोबांचा आहे.
८ मार्चला (महिला दिन!)आम्ही सगळ्याजणी ८ मैत्रिणी कलबात गेलो...आपला क्लब हो....!
नवरोबांच्या जेवणाची आज काय व्यवस्था केली यावर प्रत्येकीची काही तरी सुरस आणि चिमित्कारिक कथा होती. मी नवरोबांना विचारलं होतं..." रात्री तुमचा काय प्लॅन आहे?" तर मी अमूक तमूकबरोबर बाहेर जाईन" असं उत्तर मिळालं(खूपच खुषीत). म्हणून मी घरात काही बनवण्याचा घाट घातला नाही.
रात्री क्लबातून परत आल्यावर गॅसवर कसली तरी उतरंड दिसली. एक फ्राय पॅन गॅसवर अगदी उंचावर ठेवलेलं दिसलं. इतकं उंच कसं दिसतंय म्हणून पहायला गेले.......
तर दुपारी मी गॅसवरचा चौकोनी स्टँड आणि गॅसखालची गोल स्टीलची डिश(काही सांडलं तर ते या डिशमधे सांडतं) असं बाजूला काढून ठेवलं होतं. रात्री जरा साफ करून मग ठेवावं म्हणून !
तर नवरोबांनी गॅसवर आधी तो लोखंडी चौकोनी स्टँड ठेवून त्यावर गॅसखालची गोल डिश, त्यावर फ्राय पॅन ठेवून त्यात ब्रेड भाजला होता. त्यांचं कुणाबरोबर तरी बाहेर जाणं कॅन्सल झाल्यामुळे त्यांनी ही उतरंड रचली.
ती स्टीलची डिश अगदी (रागाने की काय?) अगदी लाल काळी निळी झाली होती. अती तापल्यामुळे.
स्त्री मुक्ती झिंदाबाद! जागतिक महिला दिन झिंदाबाद!

माझा आजचा ताजा वेंपणा.....

मॅच चुरशीची होईल म्हणून एकत्र बघूया असा मित्राचा निरोप आला. आफ्रिकेच्या इनिंगला त्याच्या घरी गेलो. ताईचा (म्हणजे मित्राची मोठी बहीण) वाढदिवस पण होता म्हणून जेवणही एकत्रच त्याच्या घरी ठरवले.
संध्याकाळी त्याच्या घरासमोर रस्त्यावर गाडी पार्क करताना, गाडीतून बाहेर पडताना एक कॉल आला मोबाईलवर.
सेंट्रल लॉकचं बटन दाबतोय असा समज करून आलेल्या कॉलला रिजेक्टच बटण दाबलं चुकून.
आता आपण चुकून हे बटण दाबलं हे लक्षात आलं पण याचाच अर्थ आपण सेंट्रल लॉक केलच नाही हे लक्षातच नाही आलं. आपण मॅच हरल्यावर ११.१५ ला साधारण घरी जायला निघालो. गाडीजवळ जाऊन बघतो तर गाडी लॉक झालीच नव्हती. साधारण ४ ते ५ तास गाडी तशीच होती रस्त्यावर पार्क, विदाऊट लॉक.

नशिबाने काही गेलं नव्हते. Sad

वाह ! एकापेक्षा एक किस्से !
Lol

मानुषी,
नवर्‍यांना उपाशी ठेऊन ...
स्त्री मुक्ती झिंदाबाद! जागतिक महिला दिन झिंदाबाद!
Lol

आमचा पण एक वेप ...
२-३ दिवसांपुर्वी ऑफीसमधुन बाहेर पडलो, जाताना टीफीन न्यायच विसरलो, ५-६ किमोवर लक्षात आलं, तिथुन कंपनीत एकाला कॉल केला, त्याची वाट बघत १ तास थांबाव लागल

राम राम मंडळी कसा होता ईकेंड Happy
भुंगा भावचा वेपणा पण जोरात सुरु हाये की Proud

आता आमचा वेपणा:

शनवार ला म्ह्या सख्यां बरुबर तुळशी बागेत शॉपींगला गेलो, तीथ एकीकड आम्ही आरसा बघीतल भाव केला पण दुकानदार काय आम्ही मागीतलेल्या किमतीला तो देईना म्हणुन त्याच्या दुकाना समुर असलेल्या दुकानात गेलो, त्याचे कडे पण भाव केला पण तो बि काय आमच्या किंमतीत आरसा द्यायला तयार व्हईना मग आम्ही "ईतक्या ईतक्या किमतीला द्या नाहीतर राहु द्या " अस म्हणलो तर तो बि म्हणाला "राहु द्या" त्यावर आमची एक मैत्रीण म्हणाली "नहीं देना था तो फीर वापीस क्युं बुलाया", दुकानदार: "मैने कहा बुलाया आपही आये थे" Uhoh

तीथ तु. बागेतच रीव्ह्यायटलच फ्री श्याम्पल मीळत व्ह्त दागटर न मले रीव्हायटल खाया सांगीतलय म्हणुन मी एक घेतल अन मैतरणीला ते फ्री मीळतय न सांगताच तीले ते समजल समजुन म्हणालो "तु पण एक घे", (मले देण्यासाठी :डोमा:) तीला वाटल ते विकत घ्यायचय ती 'नाही' म्हणाली; मी तीला परत म्हटल "अग एक घेना" तर ती "नहीं ना मुझे नही चाहिये, मुझे नहीं खरीदना, मेरे पास पैसे नहीं है..." मंग म्ह्या तीच्यावर वसकलो "वो फ्री में है" तेव्हा ती "अच्छा अच्छा" Proud

तीथच बागेत, समोरुन पोरांचा गरुप येत व्हता त्यातला एक मुलगा माझ्या समोर आला नेमक तेव्हाच म्ह्या कश्यावर तरी वैतागुन कधी नव्हे ते "आयला" शब्द उच्चारला तर ऊचारला त्या समोर आलेल्या मुलाकडे बघुन "हड" शब्द पण तोंडात आला. "आयला हड" अस तोंडातुन निघाल्या निघाल्या म्ह्या जीभ चावली न गुमान पुढ निघुन गेलो. Proud

Happy

माझा आजचा ताजा वें.प. सकाळी ९.३० वाजले होते. ऑफिसला ऊशीर होत होता. म्हणून पटापट काम आवरत होते. भराभर पोळपाट घासला आणि घासणी कचरयाच्या छोट्या डब्यात टाकली. आणि लगेच वें.प. लक्षात आला. समस्त वेंपगिरींची आठवण आली. Lol

Pages