मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रॉबिनहुड, नॉबच्या मागे भिंतिवर बाणाचा स्टिकर लावा नळ आणि शॉवर म्हणुन


अहो ह्या भानगडी साधारणतः डोके व चेहरा याना साबण लावल्यावर होतात त्यावेळी साबण डोळ्यात जाऊ नये म्हणून डोळे (गच्च) मिटलेले असतात. व अंदाजाने नॉब शोधलेला आतो. सांगतोय कॉय?
बाकी विकुंचा उपाय त्यातल्या त्यात जास्त व्यवहार्य वाटतोय... Proud

बाकी वेन्धळे पणाचा हा प्रकार फारसा लोकप्रिय दिसत नाही इथे.

एकदा रविवारी (कधी नव्हे ते) कोल्हापुरला ऑफीसला काम असल्यामुळे जाण्यासाठी गावाकडुन मिरजला आलो.
दुपारच्या २ च्या रेल्वेने (पास होता) जाणार होतो,पण मिरजमध्ये येण्यास २.०५ झाले,मग थोडे आधी उतरुन धावत जाऊन स्टेशन गाठलं,तर समोरुन एक गाडी निघालेली दिसली,मग धावत जाऊन इंजीनाजवळचा डब्यात चढलो, १० मिनिटे 'श्वास आवरायलाच' गेली, नंतर मग थोडं खिडकीतुन सहज बाहेर पाहिलं तर काही नविन झाडे,शेतं,पिकं दिसु लागली तेवढ्यात एकांनी विचारलं आणि नंतर सांगीतलं कि ती 'तिरुपती एक्सप्रेस' होती.(कोल्हापुरहुन नुकतीच आलेली)
मग ३०-३५ किलोमीटर पर्यंत गाडीला थांबाच नसल्यामुळे ती सरळ मला (विनातिकीट)
घेऊन कुडचीला थांबली.
पण आयुष्यात पहिल्यांदाच कुडचीचा पुल पाहिला आणि कृष्णेला आलेल्या महापुरातलं (काळजात धस्स करणारं) पाणी पहिल्यांदाच !

काल चुकुन एका झोपलेल्या कुत्र्याच्या पायावर माझा पाय पडला. तर sorry sorry असे बोललो. कुत्रा लगेच जागा होवुन उठला. तसा लगेच मी आपल्याच तंद्रीतुन बाहेर आलो. नाहीतर त्याच्याकडे सवयीप्रमाणे उजवा हात पुढे केला होता.. त्याला नमस्कार करायला. Happy

वर्षु ..
तुमच्या सारखे दाद देणारे आहेत तोपर्यंत आमच्याकडुन असा वेप होतच राहणार !
Lol

एके दिवशी मोबाइलवर बोलत होतो. अचानक हात खिशात गेला आणी लक्शात आल कि खिशामध्ये मोबाइल नाहीए. कावराबावरा झालो.
"माझा मोबाइल सापडत नाहीए" मि मोबाइलवरुन
"काय?" समोरचा
"अरे हो, खिशात ठेवला होता, आता नाहीए" मि
"अरे माठ, तुझ्या कानाला लावलाय ते काय आहे आणि तु कशावर बोलत आहेस" बोलुन जोरात हसु लागला.

अनिल Biggrin नशीब नुसतंच इंजीन फिरतात त्यातल्या एकात बसुन यार्डात नाही गेलास Rofl

आत्ता HP च्या साईट वर गॅस कनेक्शन साठी ऑनलाईन फॉर्म भरला ४-६ वेळा रेजीस्टर टॅब वर क्लीक केल पण रेजीस्ट्रेशन होइचना, परत परत ४-६ वेळा फॉर्म तपासला, सगळ भरलना, मॅनडेटोरी फिल्ड्स वै. चेक केल पण नो फायदा, शेवटी साईट बंद करुन री-ओपन केली परत फॉर्म ओपन केला व भरु लागले तेव्हा ध्यानी आल आधी म्ह्या "Name of the Consumer" ला "NUMBER of consumer" वाचुन नावा एवजी अंक (आकडा) घातला व्हता की Uhoh

आज काल हे अस लई व्हतय बघा, आता त्या दिसाला म्ह्या "ॠषी" "सुशी" समजलो की Uhoh

आता झाल अस, रस्त्याच्या कडन चालता चालत म्ह्या समोर दिसलेल्या हाटेलाच नाव "सुशी" अस वाचल अन काय कायते ईचार मनात आले बघा "आता चायनी पदार्थांची नाव हाटेलांना देतात, देशी शब्द कमी झालेत का, नाव देऊन पण काय दिल तर "सु-शी" मच्छी छी -छी!!!!......" मंग परत येताना नजर तीकड गेली तर ते तर ते "सुशी" न्हाई "ऋषी" हाये अस ध्यानी आल, एकदम अस्सल देशी Happy

भाषेचा घोळ.........
आज सकाळी रात्रीच्या(रोटरीची) भिशीबद्दल फोन आला. फोन करणारा पंजाबी होता.
१)लेटेस्ट रोटरी सर्क्युलरमधे माझी कथा "मिळून सार्‍याजणी" च्या जाने. च्या अंकात छापून आली अशी गुड न्यूज होती. त्यामुळे आमच्या ग्रूपमधे जे रोटरी सर्क्यूलर वाचतात(?) त्यांना ही बातमी नवीच होती.
२)आणि २३डिसे. ते १५जने. माझी लेक(मुलगी) आल्यामुळे आम्ही बीझी होतो. रोटरी कार्यक्रमांना जात नव्हतो.
या १) आणि २) या गोष्टींचा आमच्या या पंजाबी मित्राने घोळ घातला. आणि माझ्याही आधी ते लक्षात आलं नाही. पहा आमचा डायलॉग.
" आज आपली भिशी आहे.......मी ........ बोलतोय. काय? कुठे होतात इतके दिवस?" पंजाबी मित्र त्याच्या पंजाबी अ‍ॅक्सेंटने आमची चौकशी करत होता.
" अरे.......आमची लेक आली होती ना............" मी म्हणाले.
" ओह! तुमी सध्या अर्टिकल लिहिताय.......त्यात बीझी होता.... मी वाचलं...मैने पढा सर्क्यूलरमे...आपकी कुछ लेख आयी है मॅगेझिनमे!......ओके आज रातको भिशी है...क्लबमे...आना!" पंजाबी मित्र.
एवढं बोलून त्याने फोन ठेवला.

सगळ्यान्चे किस्से वाचुन मला पण किस्सा सान्गायचा मोह आवरत नाहिये
आम्हि सगळे मित्र एका मित्रकडे जेवयला जाणार होतो
आता आम्हि सगळेच सातारचे त्यामुळे आमचा आहार जरा ..........
असो तर झाल काय बेत होता आमरस चपाती कुरवड्या
आता ज्या मित्रच्या घरी जेवण होत तो कमी खाणारा
आणि आम्ही सगळे रानटी
आता त्याच्या मातोश्रीना काय माहित आमचा आहार
बर आम्ही एवढे नालायक कि कुनाची पार्टी असली कि सकाळ पासुन उपाशी राहणार
मी नाही हो मला काय कधीही जेवायला बसवा मी तेवढाच जेवतो
तर आमची ७ जनन्चि पन्गत बसली
तो आणि त्याची आई वाढतीये चपात्या
पोर वडतायत ( हा आमचा शब्द )
थोड्या वेळाने आम्हाला किचन मधुन एकु आल अरे १०० चपात्या सम्प्ल्या
मी पटकन भाताच भान्ड माझ्याकडे ओढल
अजुनही विचार करतो मी कस काय खात असु आम्हि एवढ

असाच एक किस्सा... आम्ही शाळेत असताना गणपतीच्या दिवसात देखावे बघायला जायचो... मैत्रिणी मिळुन!! त्यातल्या एका मैत्रिणीच्या मागे एक मुलगा होता.. आम्ही एका देखाव्यासमोर थांबलो... तो जिवंत देखावा होता आणि काहितरी शिवाजी महाराजांशी निगडीत होता... काही वेळानी देखावा सुरु झाला.. महाराज काहीतरी गंभिर डायलॉग मारत होते...आम्हीही तल्लिन होऊन ऐकत होतो.. वा वा करत होतो... काय डायलॉग आहे वगैरे... अचानक माझी ट्युब पेटली की ते महाराज म्हणजे तो माझ्या मैत्रिणीच्या मागे असणारा मुलगा होता ....आणि त्याच क्षणी कोणीतरी ओरडला..." ऐ अब्या... तुझी लाईन आलीये बघ!!"... महाराज लगेचच "कुठेय?कुठेय?" करत डायलॉगच विसरुन गेले.... एवढा हशा पिकला की लाजुन महराज बॅकस्टेजला पळाले आणि सगळी गर्दी ओरडत होती... "वन्स मोअर! वन्स मोअर!"......

मी लहान असताना चा किस्सा.....५-६ वीत असेल....
एकदा बल्ब आणल्या वर तो खराब निघाला....चेक करुन नाही घेतलेला..त्यामुळे घरी ओरडा खाल्ला.....
नंतर एके दिवशी माझ्या मित्रच्या प्रिंटिग प्रेस मधे......त्याने एक वायर चा टुकडा आणलेला....मित्र ही माझ्याच बरोबरीचा....मला ओरडा आठवला...(कारण त्याचे वडिल आणि माझे वडिल एकच माळेचे मणी ).म्हणुन परत त्याला ओरडा बसु नये म्हणुन त्याला बोललो कि " वायर चेक करुन आणलीस का".....त्याने उत्तर नाही असे दिले..
मग त्याला वायर चेक करायला सांगितली...आता प्रेस मधे आम्हि दोघेच....दिड शहाने म्हनले तरी चालेल तसे..
वायर चेक करन्या साठी एका बाजुची वायर वरचे प्लास्टीक काढुन प्लग मधे टाकली...आता रहीला तो दुसर्‍या बाजुचा प्रश्न......चेक करण्यासाठी हात लावु शकणार नव्हतो आम्ही.....थोडी सुबुध्दी होती..तशी..
मग काय करायचे...मित्राला सांगितले की एक सुरी आण..मोठी होती तशी...करणार असे होतो आम्ही कि वायरचे दुसरे दोन्ही टोके सुरी ला टेकवुन त्याला टेस्टर लावुन बघणार होतो......म्हणजे वायर बरोबर आहे हे कळाले असते...(टेस्टर वायरला लावण्याची सुबुध्दी सुचली नाही)......जसा आम्ही प्रयोग केला वायर सुरी ला टेकवल्या बरोबर....जळन्याचा वास येउ लागला......आणी काही सेकंदातच फ्युज पर्यत वायर जळत गेली....
दोघांचे चेहरे आमचे बघण्या लायकीचे होते.....कारण तो माझा बघत होता मी त्याचा...
मग एका इलेक्ट्रीशियन ला पाय वगैरे पडुन आणले आणि त्याचे वडील परत ये यी पर्यंत सगळे नीट करुन ठेवले...

वायर जळुन जे काळे झालेले तिथे आम्ही आमचे वॉटर कलर ची बाटली वापरुन थोडी रंगरंगोटी केली...
नंतर त्याच्या वडीलांना कळाले प्रकार...कारण इलेक्ट्रीशिअन चे पैसे तर तेच देनार होते.....

आजही आम्हा दोघां मित्रांना त्या प्रकारा बद्दल ऐकवले जाते.......

ऎकदा, पिल्ल्याला स्ट्रोलर मधे घालुन पार्क केलेल्या गाडी पाशी ढकलत घेवुन आलो. गाडीचा टृन्क उघडला, स्ट्रोलरमधुन पिल्लुला बाहेर काढ्ला, आणि स्ट्रोलरच्या ऎवजी पिल्लुला टृन्क मध्ये कोंबायला निघालो होतो.

काल बाहेर जायचं म्हणुन खिडक्या बंद केल्या माझ्या मोठ्या टेडी बेअर ला मनोभावे नमस्कार केला आणि कुलुप घालताना लक्षात आले आणि जीभ चावली... Biggrin नशिब घरात कोणी नव्हतं!! औंध ते सहकार नगर प्रवास पराक्रम आठवुन हसण्यात कसा संपला कळलच नाही...!! Rofl

काल बाहेर जायचं म्हणुन खिडक्या बंद केल्या माझ्या मोठ्या टेडी बेअर ला मनोभावे नमस्कार केला आणि कुलुप घालताना लक्षात आले आणि जीभ चावली... नशिब घरात कोणी नव्हतं!! औंध ते सहकार नगर प्रवास पराक्रम आठवुन हसण्यात कसा संपला कळलच नाही...!!

>>>>>> Biggrin Biggrin Biggrin
टेडी बेअरला मनोभावे नमस्कार केलास नं. आता तो तुझ्यावर प्रसन्न होईल तेव्हा काय वर मागायचा ते ठरवून ठेव हो. Happy

Lol

मानुषी, समु ...
Lol

आणि जीभ चावली... नशिब घरात कोणी नव्हतं!!
चिंगुडी,
पण यात नेमका 'वेप" कशाला समजायचा ? जीभ चावण्याला ?
Lol

चिंगुडी, ग्रेस, ऊदय Rofl

आत्ता लॅपटॉप चार्ज करायचा म्हणुन लॅपी ची वायर प्लगात घातली, आणी लॅपी वर असलेल्या बॅटरीच्या आयकॉनवर चार्जींग सुरु झाल्यावर येणार्‍या प्ल्ग-ईन वायरीचा सीमबॉल अजुन कसा आला नाही हा विचार करत बसले, ४-५ मी. नि ट्युब पेटली आपण कळ दाबलीच नाही मग कस चार्गींग सुरु होणार Proud

काल मॅनेजर सोबत मिटींग रुमला चाललेलो. हातात लॅपी नि कागदे असल्याने मॅनेजर्च्य मागे मागे लॅपी मध्ये डोके खुपसुन तसंच वाचत निघालो. मिटींग रुमचा दरवाजा उघदुन मॅनेजर आत गेला आणी नेमके त्याच वेळेला लॅपी वर काही तरि मेसेज विंडो आली. ते वाचुन पुढे सरकलो नि धाड करुन डोके काचेच्या दरवाज्यावर आदळले... Sad ति काच तर दिसलीच नव्हती, पण अत्ताच तर मेनेजर आत गेलाय, दरवाजा उघडाच आहे असे वाटलेले... पन तो मेसेज वाचायच्या नादात तो काचेचा दरवाजा कधी बंद झाला कळ्ळेच नव्हते.. Proud

Happy

मस्त समू चा सीम बॉल वाचून मला क्रिकेट मधील सीम बॉलच आठवला. हे आणिक वे पना

मल्ली ... लेका लकी आहेस बारीक आहेस ते ...
मी अशाच पद्धतीने एक आईस्क्रीम शॉपचा दरवाजा फोडला होता ...
दुर्दैवानं मला साधे खरचटलेही नाही. दरवाजा पूर्ण शहीद झाला. Sad

Pages