विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्ल्ड कप २०११ टीम इंडिया
भारताची १५ सदस्यीय वर्ल्ड कप टीम पुढीलप्रमाणे -

महेंद्र सिंह ढोणी (कॅप्टन), वीरेंद्र सेहवाग (उप कॅप्टन), सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंह, हरभजन सिंह, झहीर खान, मुनाफ पटेल, आशिष नेहरा, प्रवीणकुमार, युसूफ पठाण, पियुष चावला आणि आर. अश्विन .

तो अश्विनकुमार नसून आर अश्विन आहे. खालील बातमी वाचा.

http://www.indianexpress.com/news/indias-world-cup-squad-announced;-rohi...

संघ समतोल वाटतो. सौरभ तिवारी संघात असायला हवा होता असे वाटते. मुरली विजय, रोहीत शर्मा इ. ना वगळले ते योग्यच आहे.

पीयुष चावला फक्त भारत/आशिया दर्शन करेल, त्याला अकरात जागा मिळायची नाही, असं अजय जाडेजाला वाटतंय.

महागुरु.. श्रीकांतच्या मुलाचे नाव अनिरुद्ध श्रीकांत आहे... हा आर. अश्विन वेगळा आहे... तामिळनाडूचाच आहे पण.. तेव्हा श्रीकांतचीच कृपा म्हणायला हरकत नाही...

आशिष नेहरा व इशांत शर्मा या दोघात गोलंदाज म्हणून खास फरक नाही पण फलंदाजीमुळे इशांत अधिक उपयुक्त ठरला असता, असं वाटतं.
<<पीयुष चावला फक्त भारत/आशिया दर्शन करेल, त्याला अकरात जागा मिळायची नाही, असं अजय जाडेजाला वाटतंय.>>लेग स्पिनर या विश्वचषकात चमकतील असं मला राहून राहुन वाटतं; चावलाला ठराविक खेळपट्ट्यांवर व निवडक संघांच्या विरुद्ध खेळवणं खूप फायदेशीर ठरूं शकतं.

भाऊ फलंदाजीसाठी आपल्याला इशांतकडे डोळे लावायला लागणार असतील तर अफगाणिस्तान वर्ल्ड कप जिंकू शकेल!
आणि सध्या इशान्तपेक्षा नेहराच काय, मुनाफ़ आणि श्रीसंत पण बरे टाकतायत.
जाडेजच्या म्हणण्यानुसार चावला दोन वर्षे भारताच्या राष्ट्रीय संघात नव्हता, आयपीएल्/रणजीत ही कामगिरी नाही, तर सरळ वर्ल्ड कप टीममध्ये कसा आणि काय करणार?

भाऊ फलंदाजीसाठी आपल्याला इशांतकडे डोळे लावायला लागणार असतील तर अफगाणिस्तान वर्ल्ड कप जिंकू शकेल! >>> Lol

श्रीसंत असायला हवा होता असं वाटलं. रहाणे ३० च्या टीममध्ये होता ना ?

<<भाऊ फलंदाजीसाठी आपल्याला इशांतकडे डोळे लावायला लागणार असतील तर अफगाणिस्तान वर्ल्ड कप जिंकू शकेल!>> मान्य; पण नेहरा व ईशांत या दोघांत फलंदाजीमुळे ईशांत वरचढ ठरतो, एव्हढंच सुचवायचं होतं. अटीतटीच्या सामन्यात शेपटाची वळवळ निर्णायक ठरते हे सध्या चाललेल्या मालिकांमध्येही अधोरेखीत केलं जात आहे.
<<जाडेजच्या म्हणण्यानुसार चावला दोन वर्षे भारताच्या राष्ट्रीय संघात नव्हता, आयपीएल्/रणजीत ही कामगिरी नाही, तर सरळ वर्ल्ड कप टीममध्ये कसा आणि काय करणार?>> उपखंडात होणार्‍या विश्वचषकासाठी संघात [ १५ जणात] एक तरी लेग स्पिनर असणं आवश्यक आहे, हे मी आधीच म्हटलं आहे; चांगल्या दर्जाच्या लेगस्पिनरचा आपल्याकडे दुष्काळच आहे म्हणून चावलाचा नंबर लागला एव्हढंच !

माझ्यामते.. ठिकाय निवड ! आपले गोलंदाज दिवे लावणार आहेत भज्जी नि झाहीर वगळता.. तेव्हा सारी मदार फलंदाजीवर अवलंबून राहील असे दिसतेय.. बाकी आर आश्विन हा सरप्राईज पॅक असेल जर त्याला संधी मिळाली तर.. आशियातील इतर संघांचे माहित नाही पण त्याची शैली फिरंग्यांना चकवणार हे नक्की.. पियुष चावलाला घ्यायचा होता तर त्याच्यापेक्षा ओझा खूप पटीने बरा होता..

संघ तसा व्यवस्थित निवडला आहे ..

पण..

मुनाफ बर्याच म्याचेस खेळणार.. त्याने गेल्या सामन्यात ४ विकेट काढलेल्या असल्या तरी त्याच्या consistancy वर मला शंका आहे .. दुसरे म्हणजे तो स्विंग करत नाही, योर्केर टाकत नाही, पेस फार नाही, बाउन्सर पण टाकलेला पाहिला नाही.. एकाच लाईन लेंग्थ वर ६ च्या ६ बॉल टाकणार... १२६-१२७ च्या स्पीड ने... विश्वचषकात चालला म्हणजे नशीब..

पियुष चावलाच्या निवडीचे पण आश्चर्य वाटले ..

चेंडू मूव्ह म्हणजेच इनस्विंग आणि आऊटस्विंग करणं हे मुनाफ आणि प्रवीणचं कौशल्य>>>
प्रवीण कुमार बाबत मान्य.

I may be wrong.. पण मुनाफ ला स्वींग करताना फारसे तरी पहिले नाही.. off the seem movement मात्र देतो कधी कधी ...

सध्या असलेल्या खेळाडूतून चांगली निवड. एक खरा खुरा ऑल राउंडर असता तर बरे झाले असते पण नाहीच आहे तर काय करणार. सेहवाग, पठाण, रैना ऑल राउंडरच म्हणायचे मणजे झाल. (नाही तरी, बिन्नी, मदन, संदीप आणि संधूने वर्ल्ड्कप सोडला तर ऑल राउंडर म्हणून फारसे कुठे दिवे नव्हतेच लावले)

एकंदरीत आपण २० ओवर्स तेज व ३० स्पीन टाकणार या द्रूष्टीने संघाची निवड झाली आहे. हे ही ठीक आहे. फक्त यात एकच गोची आहे. आपली ग्राउंडस लहान असल्याने बॅटींग विकेटवर अगदी बांगला देश सुद्धा आपल्या विरूद्धा २७५ करू शकतो. त्यामुळे टर्निंग विकेटस कराव्या लागतील. त्या आपल्या ग्राउंडसमन ना करता येत नाहीत. त्यांचाही एक कॅम्प त्वरीत घ्यावा. नाहीतर ते अंडर प्रिपेअर्ड विकेटस करून ठेवतात. (कुंबळे साठी, तो ही आता नाही) मग त्या आखाड्यावर डेल स्टेन आपली धूळधाण उडवतो.

साहेब, सेहवाग लवकर फिट होवोत. बाकी काही फरक पडत नाही.

साहेबांचा शेवटचा वर्ल्ड कप असेल .

माझ्या मते आपणच फेवरीट.

वर्ल्ड कप जिंकण्याचा आनंद आजच्या पिढीला एकदाचा मिळू दे की. Happy

आफ्रिकेने अनुभवी बाउचरला वगळलय विश्वचषकाच्या संघातून तर ऑसीजनी टेट व ब्रेट ली या दोन जलदगती गोलंदाजांना संघात स्थान देत नॅथन हॉरिज हा एकच फिरकी गोलंदाज घेतलाय.

आजच बातमी ऐकली की वेट्टोरी विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपदाचा राजीनाम देणार. बिचारे न्युझीलंड, पाकड्यांकडून ही २-० असे हारले.

<<त्यामुळे टर्निंग विकेटस कराव्या लागतील>> मला वाटतं विश्वचषक सामन्यांच्या विकेटस एकतर्फी असूं नयेत हा अलिखित दंडकच आहे आणि तो योग्यही आहे. फलंदाजीवर आपला भर असला तरी विरुद्ध संघाच्या धावा रोखण्याचं काम आपले गोलंदाज व क्षेत्ररक्षक किती प्रभावीपणे करतात, हे निर्णायक ठरूं शकतं.

"कागदावर" भारताला विश्वचषक मिळायची संधी सर्वात अधीक आहे. फक्त हे कागदी घोडे ऐन वक्ताला बसले नाहीत म्हणजे मिळवले. अन्यथा प्रत्त्येक सामन्यात किमान २ फलंदाज जरी "लागले" (साहेब, विरू / गंभीर, रैना / युवी, पठाण / कोहली, धोणी) तरी आपण फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकू शकतो.
एक झहीर सोडल्यास गोलंदाजीच्या बळावर विश्वचषक जिंकून देणारा गोलंदाज आपल्याकडे नाहीये. आणि आपल्या खेळपट्ट्यांवर झहीर तितका आक्रमक/भेदक नसतो.
---------------------------------------------------------------------------------
रच्याकने: द्रविड अन लक्षमण एकदिवसीय मधून अनॉफिशियली निवृत्त झालेले आहेत- त्यांना निवड समितीने निवृत्त केलेल आहे- पण तसे त्यांनी जाहीर केले तर आयपील मधील त्यांचा भाव कोसळेल हे माहित असल्याने दोघे गप्प आहेत. Happy

योग Happy खरयं, अण्णा आणि लक्खन बहुदा विश्वचषकानंतर अधिकृतरित्या निव्रुत्त होतील.
आपल्या संघात नेहरा आणि चावला यांच्या सहभागावर शंका उपस्थित केल्या जातायत, त्यामुळे त्यांच्यावर दडपण आहेच, त्यात गंभीरने ' हा विश्वचषक तेंडुलकर साठी जिंकायचा आहे' असं वक्त्यव करुन स्वतःवरच दडपण वाढवून घेतलयं (बहुदा आता हा विश्वचषक जिंकल्यावर का होईना, साहेब रिटायर तरी होतील असं त्याला वाटत असाव काय? Wink )

पाकड्यांना नॉन प्लेइंग कॅप्टनची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी अशी उपसूचना मांडायला हरका नाही.

आफ्रिका दौर्यातील म्याचेस पाहून तरी इतकंच वाटतंय की सध्या फोर्मात फक्त कोहली आहे.... कोहली कडे तंत्र आणि आक्रमकता दोन्ही आहे.. कुणीतरी फोर्मात आहे हे चांगले आहे...

तरी पण काळजी ची गोष्ट ही आहे की रैना, धोनी आणि युवराज फार काही दिवे लावत नाहीयेत. साहेब, सेहवाग, गंभीर जखमी अवस्थेतून परतणार .... पठाण चा तर ८-१० म्याच मध्ये एक जोरदार खेळी, असा कोटा असतो बहुतेक. म्हणजे इन फॉर्म फलंदाज एकाच ... कोहली.. गोलंदाजांमध्ये मुनाफ आणि नेहरा हे चालायला पाहिजेत हे ठीक आहे. पण एक मात्र ... ते चालतीलच असे विधान करण्याचे धाडस कुणीही करणार नाही..

सध्याच्या स्थितीत संघाची विशासार्हता किती? आफ्रिकेत २५० च्या पुढे धावा झाल्यावर दोन्ही वेळा हरलो ही गोष्ट दृष्टीआड करता येत नाही.. कागदावर आपण मजबूत आहे.. आणि उपखंडातच विश्वचषक आहे हे ठीक आहे... पण आत्तापेक्षा खेळ बराच उंचावावा लागेल... thinking positive is good, but facts can not be understated... धोनी आणि कर्स्टन साहेबांना ह्याची जाणीव नक्कीच असणार...

आत्ता एक चांगली गोष्ट आहे म्हणजे अशी घाबरण्यासारखी, भयंकर फॉर्मात असलेली, २०००-२००७ च्या ऑसीज सारखी टीम कुठलीच नाहीये... Proud Proud

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर यंदाची संक्रांत आलीय. शेन टॉट, माइक हसी, स्वतः रिकी पॉंटिंग, हॉरित्झ इतके सध्या जायबंदी आहेत. ब्रेट ली बर्‍याच महिन्यांनी मैदानावर परतलाय. शेन वॉटसन हा एकटाच फॉर्मात दिसतोय.

असे असून सुध्दा ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा फॉर्मात आहेत. कसोटी मालिका ३-१ ने हरून सुध्दा पहिले २ एकदिवसीय सामने त्यांनी सहज जिंकले. पहिल्या सामन्यात २९४ या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला तर दुसर्‍या सामन्यात २३० असे लहान लक्ष्य असूनसुध्दा इंग्लंडला १८४ धावात रोखले.

दुसरीकडे न्यूझीलँडचा एकदिवसीय सामन्यातील विजयाचा दुष्काळ संपला. लागोपाठ ११ पराभवानंतर आज त्यांनी पाकिस्तानला सपाटून मार दिला. (पाकडे - सर्वबाद १२४, न्यूझी - १७ षटकात १ बाद १२५)

ऑस्ट्रेलियाची वनडे टिम चांगली आहे.

आपल्या संघापुढे विश्वचषक सुरू व्हायच्या आधी नेहमी येणारे प्रॉब्लेम्स सुरू झाले आहेत. आधी एक दिड वर्षे एकदम बढिया आणि विश्वचषकात फुस्स.

<<विश्वचषकाचा इतिहास सांगतो कीं ज्या संघाना स्पर्धा सुरू असताना लय सापडते , तेच संघ चमकून जातात. भारत, श्रीलंका व पाकिस्तान अनपेक्षितपणे विश्वविजेते असेच झाले. या विश्वचषकासाठी मी तर न्यूझीलंडवरसुद्धा आधीच काट मारणार नाही;>> ही माझी टिमकी मी नम्रपणे पुन्हा वाजवतो !!! Wink

>>ही माझी टिमकी मी नम्रपणे पुन्हा वाजवतो !!<< Happy माझी बेट यंदा ऑसीजवरच.
वानखेडे स्टेडिअम अजून पूर्ण झाले नाही अशी बातमी वाचली, आत्ता हे पण लोक कॉमनवेल्थ सारखं घोळ घालू नयेत म्हणजे झालं.

अमेरिकेमध्ये टी.व्ही. वर (कंप्युटरवर नाही) वर्ल्ड्कप बघायचा असेल तर कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
डिश टी.व्ही./डिश नेट्वर्क नको आहे. २ महिन्याकरताच सोय हवी आहे.

कोणाला माहिती असल्यास कृपया सांगा.

धन्यवाद.

सध्यातरी विलो च्या व्यतिरिक्त इतर कोणाचे कव्हरेज ऐकले नाही. त्रिशंकू - विलो चे कव्हरेज घेउन टीव्हीला जोडायचा पर्याय आहे. विलो हाय डेफिनिशन मधे करणार आहेत. मी तोच विचार करतो आहे.

धन्यवाद फारेंड.

विलोचे कव्हरे़ज डिश टीव्ही/डिश नेट्वर्क शिवाय मिळू शकते का?
असेल तर साधारण किती किंमत आहे वर्ल्डकप पॅके़जची?

आणि सर्व मॅचेस लाइव्ह दाखवतात का?

Pages