भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
विलो टीव्ही कसे आहे याचा
विलो टीव्ही कसे आहे याचा प्रत्यक्ष अनुभव कोणाला आहे का?
बफरिंगचा त्रास कितपत होतो?
माझा विचार चालू आहे घेण्याचा.
त्यांच्या वेबसाईटवर बँडविड्थ खूप आहे इ.इ. आश्वासने आहेत पण ते किती खरे आहे?
कोणी स्वतः अनुभवले असेल तर सांगा.
सांगोवांगीच्या गोष्टी असतील तर नकोत.
धन्यवाद.
मी विलो कैक वर्षांपासून वापरत
मी विलो कैक वर्षांपासून वापरत आहे. मला कधीही त्रास झाला नाही. सा अ मॅचसोबत मात्र बफर झाले, पण एकूण क्वालिटी उच्च आहे. कालची मॅच मी विलोवरच पाहिली.
शिवाय त्यांचे व्हिडिओ कार्ड, इ इ प्रकार पण महान आहेत. मिटिंगरूम मध्ये असताना पण फोनवर मॅच हळूच (फोनचा आवाज शून्य करून पाहता येते.
)
(अजुन मी पॅकेज घेतले नाही, अनुभव सांगत आहे.)
मिटिंगरूम मध्ये असताना पण
मिटिंगरूम मध्ये असताना पण फोनवर मॅच हळूच>>> असले किस्से माझ्याकडे बरेच आहेत आणि इतरांकडेही असतील
लिहायला पाहिजेत एकदा.
एकदा आपली मॅच आणि आपली बॅटिंग भरात असताना २-३ तासाची रटाळ मीटिंग ठेवली होती आधीच्या कंपनीत. आम्ही ३-४ जण मग अधूनमधून टॉयलेट ला जायचे म्हणून बाहेर जाऊन स्कोर बघायचो आणि मीटिंग चालू असताना हातवारे करून एकमेकांना सांगायचो. स्मार्ट फोन चा शोध आम्हीच कसा लावला नाही याचे आता आश्चर्य वाटते.
विलो चा माझा अनुभव केदारप्रमाणेच.
विलोचा माझा अनुभव पण चांगला
विलोचा माझा अनुभव पण चांगला आहे. १२९ द्यायचे जीवावर आले म्हणुन ह्यावर्षी नाही घेतले. ह्यावर्षी टिव्हीएन स्पोर्ट्सचे पॅकेज घेतले आहे. अनुभव लिहिनच.
स्मार्ट फोन चा शोध आम्हीच कसा
स्मार्ट फोन चा शोध आम्हीच कसा लावला नाही
मला पण नेहेमी हाच प्रश्न पडतो. एव्हढे स्वतःला हुषार म्हणवणारे भारतीय, पण कधी अमुक शोध भारतात लागला असे ऐकले नाही. फार तर फार इथे येऊन स्थायिक झालेल्या भारतीयाने काहीतरी नवीन केले एव्हढेच. तेहि आजकाल ऐकायला येत नाही.
केदार, फारएण्ड, महागुरू
केदार, फारएण्ड, महागुरू धन्यवाद.
केदार, बफरिंगचा त्रास शेवटच्या १० ओव्हर्समधे जास्त होतो का?
खूप वेळा चित्र फ्रीझ होते का?
हरभजन, झहीर, नेहरा हे खरे
हरभजन, झहीर, नेहरा हे खरे भारताचे फलंदाज! त्यांना ओपनिंगला पाठवलं तर बरं होईल. निदान त्यांना जास्त ओव्हर्स खेळायला मिळाल्यामुळे स्कोअर तरी जास्त दिसेल.
>> चिमणराव, तुमचा घोडा आयत्यावेळी कच खातो हो.
खेळामधे कुठलाही टॅग फार दिवस रहात नाही मास्तर! आणि ही जास्त करून हाईप आहे. एक वर्ल्ड कप ते केवळ गिब्जच्या शायनिंग करण्याच्या वृत्तीमुळे हारले. त्यांनी ऑस्ट्रेलियाला ४०० च्या वर रन्सा करून मारलेला आहे ते आठव! कॅलीस एकदम डोकं शांत ठेवून खेळतो. खेळपट्टीत काही जीव नसेल तर त्याला आउट करणं मुष्कील आहे. चुकून रन-आउट झाला किंवा त्यानंच विकेट फेकली तरच! एनी वे, आपल्या ग्रुप मधेच आहे द. आफ्रिका! तेव्हा लवकरच कळेल.
केदार, बफरिंगचा त्रास
केदार, बफरिंगचा त्रास शेवटच्या १० ओव्हर्समधे जास्त होतो का?
खूप वेळा चित्र फ्रीझ होते का?>>>
हो दोन तीन वेळेस चित्र फ्रीझ झाले होते पण ते शेवटच्या १० च मध्ये नाही तर अधेमधे कधीही होऊ शकते. पण तेवढेच, रिफ्रेश केले की परत गाडी सुरळीत, एक दोनदा मी प्रक्षेपण साईट १ वरून दोन किंवा तीन वरही गेलो पण हा त्रास इतका नव्हता की त्यामुळे मी त्यांचावर चिडेन. एकदा चित्र नीट दिसत नव्हते बहुदा २००५ साली तेंव्हा मी इ मेल केला तर लगेच त्यांचा रिप्लाय देखील आला व त्यांनी उपाय सांगीतला.
आज संध्याकाळी सीएनएन-आयबीएन
आज संध्याकाळी सीएनएन-आयबीएन वर राजदीप सरदेसाई ने घेतलेली रिचर्डस आणि इम्रान ची मुलाखत पाहिली. खूप मजा मस्त व पहाण्यासारखी. उद्या पुन्हा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वा. दाखवणार आहेत. चुकवू नका. मला वाटत हे चॅनेल इंटर्नेट वर पण लाईव दिसते.
राजदीप क्रिकेट सोडून पत्रकार कशाला झाला कोण जाणे.
केदार, धन्यवाद. तू एवढी
केदार,
धन्यवाद.

तू एवढी खात्री दिल्यामुळे मी विलो घेणार आहे.
काही प्रॉब्लेम झाला तर तुझा पत्ता देउन ठेव.
इथे भारता विरूद्ध बोलणार्या
इथे भारता विरूद्ध बोलणार्या सगळ्यांचाच मला पत्ता पाहिजे. केदार तुमचा नको.
भाउ तुम्हाला माफ. मात्र एक कार्टून मात्र टाका. (आणि त्यात पाँटींगचे डोळे फिरलेले दाखवा.)
काही प्रॉब्लेम झाला तर तुझा
काही प्रॉब्लेम झाला तर तुझा पत्ता देउन ठेव >>> सोपा आहे.
प्रेम गली,,खोली नं ४२०
Hi, ICC World cup TV channels
Hi,
ICC World cup TV channels for abroad ..................See the link.
http://www.totalsportsmadness.com/2010/12/19/tv-channels-broadcasting-ic...
>>> सोपा आहे.प्रेम गली,,खोली
>>> सोपा आहे.प्रेम गली,,खोली नं ४२० स्मित.
काय रे थापा लावतोस. तो पत्ता अॅंथनी गोनसाल्विसचा आहे.
तो पत्ता अॅंथनी गोनसाल्विसचा
तो पत्ता अॅंथनी गोनसाल्विसचा आहे. >>> हो पण त्याने खोली भाड्याने दिली आहे.
खरे तर अँथनी गोन्सालेसच
खरे तर अँथनी गोन्सालेसच 'केदार' या नावाने इथे लिहितो.
झक्की, अहो उगीच फेकू नका.
झक्की,
अहो उगीच फेकू नका. अँथनी माझा चांगला मित्र आहे.
परवाच त्याला भेटलो.
आमच्या शेजारीच राहातो.
शिकागोत किंवा न्यूजॉयझी मधे नाही:-)
<<इथे भारता विरूद्ध
<<इथे भारता विरूद्ध बोलणार्या सगळ्यांचाच मला पत्ता पाहिजे. केदार तुमचा नको.
भाउ तुम्हाला माफ>> त्रिविक्रमाक्राजी, भारत चषक जिंकला तर मला बंद खोलीत बांधून ठेवण्याचा कुटुंबीयांचा डाव शिजतो आहे; नाहीतर मी आनंदाने रस्त्यावर जाऊन या वयातही वेड्यासारखा नाचेन अशी त्याना भिती आहे. पण... जिंकण्याआधीच मी नाचणं शक्य नाही याचीही त्याना खात्री आहे !
इथे भारता विरूद्ध बोलणार्या
इथे भारता विरूद्ध बोलणार्या सगळ्यांचाच मला पत्ता पाहिजे.
>>
१ - ग्रेग चॅपेल, पत्ता कायम ऑस्ट्रेलिया, पण सध्या पैसे कमाईसाठी भारतात
२ - संजय मांजरेकर, भारताची मॅच चालु असल तिथेच पडीक. हे महाशय सचिनने एखादी खराब ईनिंग खेळली कि लगेच चालु होतात
...
अजुन बरेच आहेत,सवडीनुसार माहिती टाकण्यात येईल
<<"I have always believed
<<"I have always believed that leg-spinners are essential in ODIs as they are attacking options and take wickets.">> हे म्हणणं आहे पाकिस्तानच्या इम्रान खानचं ! आणि त्याने चावलाला संघात घेणं हा अत्यंत शहाणपणाचा निर्णय आहे, असंही म्हटलंय .
पाकिस्तानच्या झहीर अब्बासच्या मते [ माझ्या आवडत्या शैलीदार खेळाडूंपैकी एक] सचिन हा इतका महान क्रिकेटर आहे कीं तो एकहाती विश्वचषकासारखी भव्य स्पर्धाही जिंकून देऊं शकतो !!!
[स्त्रोत - रिडीफ.कॉम [क्रिकेट]
बर ते सर्व जाऊदे, फलंदाजीचा
बर ते सर्व जाऊदे, फलंदाजीचा क्रम काय असावा?:
सेहवाग
सचिन
रैना/गंभीर
कोहली
रैना/युवी
धोणी/पठाण
भज्जी
झहीर
नेहरा
ऊरलेले
वास्तविक विरू, सचिन ही सलामिची जोडी भयंकर परिणामकारक असेल. पण ऊजवा, डावा फलंदाज कॉम्बो हवे तर गंभीर ला पाठवावे लागेल- पण सध्ध्या तो पार गेल्यात जमा आहे.
नंतर कोहली ने यावे- सध्ध्या गडी लय फॉर्मात आहे.
मग रैना/युवी पैकी तूर्तास रैना ला पसंती.
धोणी ने वर यावे- पठाण शेवटच्या १५ षटकात सामन्याचे गणीत बदलू शकतो.
थोडक्यात विरू टिकला तर पहिल्या १५ षटकात अन पठाण पेटला तर शेवटच्या १५ षटकात एकहाती सामना फिरवणारे हे दोघे फलंदाज आहेत. सचिन निव्वळ ३० षटके ऊभा राहिला तरी आपण सामना फलंदाजीच्या बळावर जिंकू शकतो (मोठी धावसंख्या ऊभारणे किंव्वा नंतर पाठलाग करणे). ऊर्वरीत पब्लिक ने या तीघांभोवती निव्वळ साथ देणारी फलंदाजी केली तरी पुरेसे आहे. पण
आजकाल प्रत्त्येक जण मोठे फटके मारून हीरो होण्याच्या मागे असतो विशेषतः रैना, युवी, गंभीर. नेमकी तिथेच सामना आपल्यावि. फिरतो.
झहीर, भज्जी, नेहरा हे सर्व सामने खेळतील. चावला, अश्विन अलटून पालटून असे वाटते. श्री फारच अन्प्रेडिक्टेबल वाटतो.
थोडक्यात खालील विश्लेषण करता येईलः
विरू: नैसर्गिक खेळ करावा पण ऊगाच विकेट फेकू नये. १५ षटके टिकला तरी खूप फरक पडू शकतो.
गंभीरः विरू किंवा सचिन ला निव्वळ साथ् देणारी फलंदाजी करावी. ते दोघे चालले नाहीत तरच स्वतः धोका पत्करावा
सचिनः काय लिहावे? साहेबांनी निव्वळ खेळाचा आनंद घ्यावा.. ३० षटके ऊभे रहावे- वि. संघाचे खच्चीकरण अन आपला विजय निव्वळ तेव्हड्याने निश्चीत आहे
विराटः लगे रहो भाय.. मस्त चाललय
रैना: हिरोगीरी नको. प्रचंड गुणवत्ता अन क्षमता आहे, साहेब, विरू, विराट यांच्या भोवताली फलंदाजी करावी
युवी: फक्त एक चांगली खेळी हवी आहे. भले ५० च्या स्ट्रा. रे. ने पहिल्या सामन्यात धावा काढल्या तरी पुरे आहे. या घडीला त्याच्या नावे ५०+ धावा हा "प्राणवायू" ठरेल. फॉर्मात आलेला युवी हा विशेषतः ईंग्लंड, ऑसी, न्युझी यांना एकटा पुरेसा आहे. (सामन्यात आपली सुरुवात छान असेल तर युवी ला विराट नंतर पाठवावे- अधिक षटके आरामात खेळता येतील आणि आत्मविश्वास वाढेल)
धोणी: काहितरी कुठेतरी माशी शिंकते आहे.. तूर्तास वरील फलंदाजांना फक्त साथ द्यायची या ईराद्याने खेळला तरी फायदा होईल.
पठाणः पठाण ने झोडायचे नाहीतर काय मारवाड्याने? तेव्हा त्याचा हा मूळ गुण कायम ठेवावा फक्त ऊगाच shot fabrication नको.. खराब चेंडू ला पठाण ठोकतो तेव्हा चेंडू स्टे. बाहेरच असतो. चेंडू नुसार खेळला तर एकहाती सामना फिरवू शकतो.
ऊरलेले शेपूटः भज्जी ने पुन्हा एकदा हिरोगिरी पेक्षा चेंडू खेळून धावा जमवण्यावर भर द्यावा. नेहरा, झहीर देखिल धावा करू शकतात, हाराकिरी नको.
गोलंदाजीतः
झहीरः चेंडूचा अचूक टप्पा, दिशा, लांबी ईतपत ठेवले तरी आशियातील खेळपट्ट्यांवर फलंदाजाला डोकेदुखी ठरेल.
नेहरा: ऊगाच भलते यत्न, प्रयत्न नकोत- झहीर ला साथ द्यायच्या ईराद्याने गोलंदाजी करावी.
भज्जी: धावांचा स्त्रोत अडवणे एव्हडेच गोलंदाजीचे उद्दीष्ट ठेवले तरी अपोआप विकेट्स मिळतील.
चावला/अश्विनः अशी सोनेरी संधी पुन्हा येणार नाही कदाचित, तेव्हा ऊगाच अपेक्षांच्या ओझ्याखाली न दबता, निव्वळ क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी केली तरी खूप मोलाचे ठरेल.
धोणी: एकच सूचना, नाणेफेक जिंकावी
...... आणि या सर्वानी
...... आणि या सर्वानी प्रत्येक झेल घेणं व हरेक फटका अडवणं यावर आपलं जगणं अवलंबून आहे असं समजून क्षेत्ररक्षण करावं, हेही सर्वात महत्वाचं !!!
आज कॅनडाने इंग्लंडला चांगलेच
आज कॅनडाने इंग्लंडला चांगलेच दमवलं. अशाच चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे, तेवढीच रंगत येईल.
इकडे भारत व्यवस्थित गतीने आपला डाव सावरत धावा वाढवतोय. साहेब आणि वीरू अपयशी ठरले, पण कोहली-गंभीर यांनी मस्त खेळी करत डाव सावरला. बिचार्या न्यूझीलंडला तेवढेच समाधान की २-३ विकेट्स लवकर मिळवल्या.
गंभीर आज बर्यापैकी चांगला
गंभीर आज बर्यापैकी चांगला खेळतोय.
भारत - ३८षटकात २१६-३. विरू व
भारत - ३८षटकात २१६-३. विरू व सचिनवरचा दबाव कमी व्हायला खूपच चांगलं !
भन्नाट.. काल मी ईथे टाकलेली
भन्नाट..
काल मी ईथे टाकलेली फलंदाजी क्रमवारीतील पोस्ट लागू पडलीये... असाच खेळ प्रत्त्येक सामन्यात केला तर चषक निश्चीत आहे. धोणी ने स्वताला वर पाठवून योग्य निर्णय घेतलाय.
हाच फलंदाजीचा क्रम असावा.
काल मी ईथे टाकलेली फलंदाजी
काल मी ईथे टाकलेली फलंदाजी क्रमवारीतील पोस्ट लागू पडलीये... >>>> न्क्की सचिनने तुझी इथली पोस्ट वाचून धोनीला सांगितलं असणार फलंदाजीचा क्रम काय असावा ह्या बद्दल....
धोनी, गंभिर भारी खेळलेले दिसतायत.. चांगलं आहे फॉर्म परत येण्याच्या दृष्टीने..
>> इथे भारता विरूद्ध
>> इथे भारता विरूद्ध बोलणार्या सगळ्यांचाच मला पत्ता पाहिजे
मी ऑक्सफर्डात आहे रे! कधीही (सांगून) ये!
युवराजला आज चान्स द्यायला हवा
युवराजला आज चान्स द्यायला हवा होता बॅटींगचा.. आधीच गोची झालीये त्याच्या फॉर्मची..
भारताची ३६०ची मजल ! शुभलक्षण
भारताची ३६०ची मजल ! शुभलक्षण !!
Pages