न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो.. खाण्याची काय, न खाण्याची काय.. सगळी आपलीच माणस आहेत हो. म्हणुन म्हंटल..

अरे आम्हालाही जेवायचय Proud सुमंगलताई Light 1

कांदापोहे यांना भेटायला काही अडचण नाही ना?>>>>>> बाई Lol
के पी, आयडी बदलून दडपे पोहे वगैरे करुन घे. Proud

कसा छान संक्रांतीचा मेन्यू हवा: बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, ताजं लोणी, भोगीची भाजी, वांग्याची भाजी, कढी, खिचडी, गुळाची पोळी, लसणाची चटणी. Wink

कांदापोहे यांना भेटायला काही अडचण नाही ना? >>> Lol

फारच शेलफिश बाई तुम्ही >> Lol

दडपे पोहे वगैरे करुन घे>>> Happy दे दडपतील लगेच.

हाताळायला म्हणजे चिरायला, सोलायला>>>
अरे बापरे!! असे मला सोलुन काढणार असाल तर यावे की नाही विचारच करावा लागेल. Proud त्यापेक्षा अशी हजेरी लावलेली बरी.
त्यापेक्षा अशी हजेरी लावलेली बरी.

के. पी. घाबरताय कशाला. मी जर सुरी ची तलवार घेऊन आले तर तुम्ही मॅंगो पाय ची ढाल घेऊन या. तेवढिच सगळ्यांची करमणुक. नाही तरी अजुन करमणुकीचे कार्यक्रम कुणी सुचवले नाहीत. हाहापुवा

बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, ताजं लोणी, भोगीची भाजी, वांग्याची भाजी, कढी, खिचडी, गुळाची पोळी, लसणाची चटणी

व, व्वा, व्व्वा! अंजली, सगळे करून घेऊनच इकडे या.

एव्हढे सगळे डिटेलमधे चालले आहे म्हणून विचारतो बीअर कुठल्या ब्रँडची? वाईन?

सुमंगल, मी जर तुरिया पात्रा आणली तर कंद नसेल त्यात. चवीपुरतं आलं असणार, पण कांदा, लसूण नाही. ते चालेल का?

स्वाती तिचा सिग्नेचर मसाले भात आणणार आहे. त्याला पुलाव म्हणू नका. (सेरेनाला व्हिनस म्हणु का ? :फिदी:)

अरे काय हे लसूण कांदा न घालता भरली वांगी वगैरे नका हां ट्राय करू Happy तुरिया पात्राची भाजी पण बदलू नको गं सायो , सुमंगल ताई मसालेभात खातील की , अजून पण काही काही आहे ना. मेन कोर्स च्या रेसिपी नका बै बदलू. मला वरिजिनल चवी बघायच्यात! चालेल ना सुमंगल ताई ? Happy
बर गुळाच्य पोळ्या कोणीतरी दोघे / तिघे मिळून कॉन्ट्रिब्यूट करा हवे तर, किंवा सगळे कॉन्ट्रिब्यूट करू, तसे पण चालेल. ऑर्डर मी देते हवे तर. नात्या किंवा भाई येता येता पिकप कराल का कुणीतरी?
लिस्ट अपडेट करा:
मसालेभात - स्वाती
भरली वांगी / बंजारा आलू - सिंडी
तुरिया पात्रा वाटाणा - सायो
मैत्रेयी - कढी पकोडे
गुळाच्या पोळ्या - ?
साध्या पोळ्या -
स्टार्टर - १ - ?
स्टार्टर- २- ?
ड्रिंक्स

के पी, आयडी बदलून दडपे पोहे वगैरे करुन घे.>>> दडपे पोह्यांमध्येही कांदा असतोच की.
नाही, मी रेसिपी बदलणार नाहीये. कारण आलं अगदी नावालाच आहे भाजीत.

नात्या किंवा भाई येता येता पिकप कराल का कुणीतरी? >> मी आणीन सुमाकडुन गुळपोळ्या. माझ्या घरापासुन जवळ आहे. किती आधी ऑर्डर द्यावी लागते आणी किती आणाव्यात? Uhoh

कोणीतरी सॉफ्ट ड्रिंक्स, प्लेट्स, कप्स, नॅपकिन्स ची जबाबदारी घ्या..

शिरगणतीला पण सुरवात करुया.
किती डोकी येणार आहेत ते सांगा. म्हणजे अंदाज येईल किती सामान आणायच ते. Happy

फचिनच नाव कुठे आहे लिस्ट्मधे.. म्हणुन तर म्हणतोय मी. Happy
कुणीतरी बो..लवा.. दाजीबाला...

किती डोकी येणार आहेत ते सांगा. >>>>> आता आर्च येऊन तिचा नेहेमीचा डोक्यांबद्दलचा जोक मारेल... Wink
बहूतेक प्रत्येक बारागटगच्या बाफवर आहे तो..

Pages