पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नम्रता बिल्डर "फ्लोरा सिटी" तळेगाव प्रोजेक्ट बद्दल कुणाला माहिती/अनुभव आहे का?

@ योग,
>>>>>>एक दुसरा अनुभव/सल्ला असाही आहे की जे बिल्डर देत आहे ते घेवून त्या घरात एक दोन वर्षे राहिल्यावर मग आतील बदल करायचे. पहिले एक दोन वर्षे घरातील भिंती, वस्तू, प्लास्टर, रंग, टाईल्स, बाथरूम मधिल फिक्सचर्स ई. सर्व गोष्टी या बदलत्या हवामानाला जुळवून घेत असतात. या स्थित्यंतरातून जाईपर्यंत कधी प्लास्टर पडणे, ओटा गळणे, टाईल्स ओल्या रहाणे, भिंतीला, कॉलम ला तडे, बालकनी मध्ये पाणी साचणे, ई. समस्या येवू शकतात- ऊपाय एकच, चक्क एक दोन वर्ष थांबून मग संपूर्ण आतील बदल पुन्हा करून घेणे. दरम्यान च्या काळात सोसायटी फॉर्मेशन वगैरे बाबी पार पडल्याने आतील बदल व ईतर बदल करणे थोडे सोपे होते>>>>> उपयोगी सल्ला, आमच्या कडे सध्या हिच चर्चा सुरु आहे Happy

घराला एक तरी बाल्कनी हवी. कपडे वाळविणे, वाळवण-साठवण कामे, ऊन देणे वै. साठी बाल्कनी हवीच. आम्ही ताई साठी बुक केलेल्या फ्लॅट मध्ये कपडे कुठे नि कसे वाळवायचे हा प्रश्न/अडचण आहे कारण बाल्कनि असली तरी त्यात कपडे वाळवायची सोय तशी नाही.

घराच ईंटेरीयर, अरेंजमेन्ट वै. बाबत गाईड करणार्‍या चांगल्या वेब साईटस ची नाव कुणाला माहित असल्यास प्लीज इथे पोस्टा.

@माधव तुम्हाला २ बीएचके साठि कमीत कमी ६५ ते ७० ची तयारी करावी लागेल.+ बाकि खर्च जे साधारण खरेदि च्या १०% पर्यंत जाउ शकतात. जर अगदिच जुनी इमारत असेल तर ५५ ते ६० तरी जातील.

परांजपे सीलींग ची उंची इतकी कमी का ठेवतात मला कधी कळाले नाही. बाकि काम मात्र छान असते.

@रंगासेठ : आमचा फ्लॅट रिसेलचाच आहे. त्याबाबतीत आम्ही घेतलेली काळजी :

१. पावसाळ्यात किंवा अन्य सीझन मध्ये बाल्कनी, बाथरूम इ. गळत नाही ना, घरात कोठे लीकेज नाही ना, बाल्कनीवरच्या पत्र्याला वॉटरप्रुफिंग केले आहे ना इ. खात्री. थोडक्यात सर्व घरातील प्लंबिंग, वायरिंग, वॉटर प्रुफिंग चेक करणे. आवश्यकतेनुसार दुरुस्त्या कराव्या लागल्यास तो खर्च घरमालकाकडून वळता/ कमी करून घेणे. जुने नळ, जुन्या ट्यूबलाईट्स/ पंखे/ रेग्युलेटर्स, जुने पाईप्स, गीझर, स्विचेस हे हमखास छळणारे घटक असतात. आवश्यकतेनुसार बदलून घेणे. बाल्कनीत / टेरेसला आवश्यकतेनुसार असलेली ग्रिल्स, खिडक्यांची ग्रिल्स चेक करणे.

२. जर फ्लॅट फर्निश्ड घेत असाल तर त्या फर्निशिंग्जची खात्री, गुणवत्ता, दणकटपणा इ. चेक करणे. कपाटे / वॉर्डरोब्ज ना वाळवी/ कसर इत्यादी न लागल्याची खात्री. किचनमधील ट्रॉलीज व्यवस्थित आहेत ना... इ. इ.
साध्या साध्या वाटणार्‍या गोष्टी असतात, पण सुरुवातीपासून लक्ष घातले नाही तर तापदायक ठरू शकतात.

३. सोसायटी रजिस्टर आहे ना, फ्लॅटची मालकी जी व्यक्ती तुमच्याशी व्यवहार करत आहे ना तिचीच आहे ना, इत्यादी कायदेशीर बाबींची छानबीन करणे. अपार्टमेंट आहे की हाऊसिंग सोसायटी आहे त्याप्रमाणे नियम बदलत जातात. सोसायटीत आपापसात सदस्यांचे खूप वाद भांडणे वगैरे असल्यास नव्या सदस्याला त्याचा ताप होऊ शकतो. तसेच आधीच्या घरमालकाने सोसायटी मेन्टेनन्स इ. व्यवस्थित दिला आहे ना, कोणती बिले/ चार्जेस थकविले नाहीत ना ह्याची खात्री करणे. (उदा वीजबील, पाणी मीटर इ. इ.)

४. शेजार कसा आहे हे बघणे.

धन्यवाद अकु, या गोष्टी तर जास्त विचारात घेतल्याच नव्हत्या.:-( काळजी घ्यायलाच हवी. या अशा रिसेल फ्लॅटच्या किंमती नवीन फ्लॅटच्या मानाने थोड्या कमी असतात ना? एजंटकडून घ्यावा की HDFC / ICICI अशा कंपन्यांच्या सुविधा असतात, त्यांच्याकडून घेतलेला बरा. कारण सध्या कुणाच्या ओळखीने असा फ्लॅट मिळेल अशी परिस्थिती नाहीये. अशा वेळी पेमेंट कुठल्या स्वरुपात होते?

सध्या नवीन जागांचे वाढलेले भाव व शहरापासून दूर असलेल्या यांच्या साइट्स पाहता रिसेलचा फ्लॅट घ्यावा यानिर्णयापर्यंत आलोय.

आधीच्या मालकाने प्रॉपर्टी टॅक्स भरला आहे की नाही, तसेच घरावर बँकेचे लोन आहे की नाही, त्याची पण खात्री करून घ्यावी.

मी वैयक्तिकरित्या रिसेल फ्लॅट घेण्याच्या संपुर्णपणे विरोधात आहे.
त्यामध्ये बरेच घटक असतात, आर्थिक अडचण, वाईट शेजार, वास्तूदोष, कागदपत्रांची अपुर्णता, त्या फ्लॅटवरच्या हक्काविषयीचे वाद इ. कोणताही मालक इतका प्रामाणिक नसतो यातली एकही गोष्ट उघडपणे सांगण्याइतका.. अर्थात वास्तुदोष हा काढता येतो, कधी कधी एखाद्याला न लाभलेले घर दुसर्‍या माणसाची भरभराट करू शकतो... पण वास्तुत दोष असेल तर ती कोणालाच लाभत नाही हे अत्यंत खरं आहे. सध्या मी रेंटच्या फ्लॅटमध्ये राहते तो अतिशय लाभदायी आहे. मालकांकडून मी ऐकलंय की पुर्वी जे जे लोक इथे राहून गेले ते ते थेट इथून त्यांच्या स्वत:च्या घरात गेले.... मी २००५ पासून तिथे राहते, एक दिवस मी मालकांना बोलून ही दाखवलं की तुमचा विश्वास खोटा ठरणार बहुतेक, पण मागच्या वर्षी(०९)ला मी पण फ्लॅट बूक केला.. त्याउलट एकजण ओळखिचे आहेत त्यांच्या खाली एक फ्लॅट आहे, त्याचे तीन मालक बदलले, तिघांचे ही हातातोंडाशी आलेले तरूण मुलगे हकनाक जीवास मुकले. त्यामुले रिसेल चा फ्लॅट घेताना ऑपरेशनल बाबींबरोबर या असल्या अदृश्य गोष्टींची पण विशेष खबरदारी घ्यायला हवी.
बाकी कागदपत्रं, वाद वगैरे आपण शोधून काढू शकतो, पण कधी कधी फ्लॅट आपल्या गळ्यात बांधल्यानंतर ते सर्व आपल्यावर शेकते....

रंगासेठ, रिसेल फ्लॅट घेताना ती इमारत बांधून / त्या फ्लॅटला जर १२ ते १४ पेक्षा जास्त वर्षे झाली असतील तर लोन मिळायला अडचण येऊ शकते. (माहितगारांनी कृपया नक्की वर्षांची मुदत कन्फर्म करावी). तसेच जास्त वर्षे जातात तशा इमारतीच्या मेन्टेनन्सच्या समस्याही उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, प्लंबिंगचे प्रॉब्लेम्स, बॅक-अप जनरेटर (लिफ्ट असल्यास), टाकी, लिफ्ट, गटार पाईप, टेरेसचे वॉटर-प्रुफिंग इत्यादी इत्यादी. ते जर नीट केले नसेल तर ते प्रश्न नंतर डोकेदुखी ठरू शकतात.
परंतु फ्लॅट जर फार जुना नसेल तर लोन मिळायला अडचण येत नाही. एच डी एफ सी कडून, किंवा आय सी आय सी आय कडून लोन मिळू शकते. लोनसाठी सर्व कागदपत्रांची (फ्लॅटसंबंधीच्या) आवश्यकता असल्यामुळे त्याच प्रोसेस मध्ये फ्लॅट विषयीच्या कायदेशीर बाबींची छानबीन करता येते. वकिलाद्वारे वर्तमानपत्रात नोटीस देऊन त्या मालमत्तेवर मालकाव्यतिरिक्त इतर कोणाचा हक्क असल्यास ठराविक मुदतीच्या आत तो क्लेम करण्याचे निवेदन/ आवाहन देता येते.

दक्षिणा, अनेकदा फ्लॅटमालक आधीची जागा अपुरी पडते/ दुसर्‍या गावी शिफ्ट होणे/ परदेशगमन/ केवळ आर्थिक गुंतवणूक म्हणून घेतलेल्या फ्लॅटची विक्री करून ते पैसे दुसर्‍या ठिकाणी गुंतविणे इत्यादी कारणांसाठीही फ्लॅट विकताना दिसतात. त्यात कोणाच्या माथी आपली जागा मारण्याचा प्रश्न नसतो.
हां, आपण जर पुरेशी खबरदारी घेतली, चौकशी केली, कायदेशीर सल्ल्याने वागलो तर फसण्याचे चान्सेस फारच कमी. आतापर्यंतच्या आमच्या दोन्ही जागा आम्ही रिसेलच्याच घेतल्या. पहिली जागा अपुरी पडू लागल्यावर दुसरी घेतली. आताच्या जागेच्या मालकांनी त्यांना हा फ्लॅट अपुरा पडत होता म्हणून अजून मोठी जागा घेतली.
ह्या अगोदर घेतलेल्या दोन फ्लॅट्सच्या खरेदी-विक्रीचा अनुभव माझ्या आई वडिलांच्या गाठीशी होता, त्यामुळे अडचण आली नाही. कागदपत्रे, वकिली सल्ले, एजंट, शेजारी, कर्ज इ. कोणत्याच बाबतीत! मात्र अनुभव नसणार्‍यांनी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावे.

>>पण वास्तुत दोष असेल तर ती कोणालाच लाभत नाही हे अत्यंत खरं आहे. सध्या मी रेंटच्या फ्लॅटमध्ये राहते तो अतिशय लाभदायी आहे. मालकांकडून मी ऐकलंय की पुर्वी जे जे लोक इथे राहून गेले ते ते थेट इथून त्यांच्या स्वत:च्या घरात गेले.... मी २००५ पासून तिथे राहते, एक दिवस मी मालकांना बोलून ही दाखवलं की तुमचा विश्वास खोटा ठरणार बहुतेक, पण मागच्या वर्षी(०९)ला मी पण फ्लॅट बूक केला.. त्याउलट एकजण ओळखिचे आहेत त्यांच्या खाली एक फ्लॅट आहे, त्याचे तीन मालक बदलले, तिघांचे ही हातातोंडाशी आलेले तरूण मुलगे हकनाक जीवास मुकले. त्यामुले रिसेल चा फ्लॅट घेताना ऑपरेशनल बाबींबरोबर या असल्या अदृश्य गोष्टींची पण विशेष खबरदारी घ्यायला हवी.

मुद्दा योग्य आहे पण हा श्रध्धेचा प्रश्ण आहे.. काही ठीकाणी काही जणांना असे अनुभव आलेले ऐ़कीवात आहे. अशा वेळी दोनच पर्याय ऊरतात- एक तर अशा ठिकाणची जागा घेवू नये भले ती तुमच्या सर्व अटि अपेक्षा आणि आर्थिक कसोट्यांमध्ये बसत असेल तरीही नाहीतर दुसरे म्हणजे अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करावे. दोन्ही बाबतीत बरे वाईट परिणामांना आपणच जबाब्दार असतो हे ध्यानात ठेवावे लागेल. अर्थात हा वास्तू चा विषय एका वेगळ्या बा.फ. चा विषय होईल आणि मला वाटते या आधी या विषयावर अनेक चर्चा/बा.फ. झाले आहेत. शेवटी -अनुभवांती शहाणपण किंव्वा पुढच्याला ठेच मागचा शहाणा या दोन पैकी एक मार्ग स्विकारावा लागतो.

अरूंधती आणि योग, तुमच्या दोघांच्याही पोस्ट्स १००% पटल्या... कदाचित मी पाहिलेली सगळी उदा. अशीच असतील ज्यामुळे मी स्वत: रिसेल चे २-३ फ्लॅट्स पहायला जातानाही नाक मुरडलं होतं... Sad

dsk vishwa चे rates काय आहेत? specially विश्व विला बद्दल कोणाला काही माहिती आहे का?
blue ridge चा सध्याचा rate 4000/sqft आहे.

अरुंधती, दक्षिणा, योग धन्यवाद. अनेक चांगले मुद्दे कळाले. Happy

सध्या वाघोलीला त्यातल्या त्यात कमी रेट चालले आहेत, पण वाघोलीला घर घेतले तर हिंजवडी-कोथरुड-औंध भाग विसरा असं आहे. तसं वाघोली चंदननगर पासून ५ किमी अंतरावर आहे आणि तिथून खराडी ६-७ किमी, मगरपट्टा १३ किमी, विमान नगर १२ किमी आणि कल्यानी नगर १५ किमी पडतयं. सध्या अजून तो भाग कॉर्पोरेशन मध्ये येत नाहीये आणि तिथेही काही चांगले प्रोजेक्ट्स आहेत. पुणे-नगर हायवेच्या रुंदिकरणाच काम जोरात सुरू आहे आणि रस्ताही मस्त आहे. आत्ता गुंतवणुकीसाठी तो भागही विचारात घ्यायला हरकत नाहीये.

परांजपेने "युथिका" हा प्रोजेक्ट बाणेर मधे सुरु केला आहे.
रेट ४६०० गार्डन फेसिंग
४३०० नॉन गार्डन फेसिंग
२बीएच्के १२००
३ बीएच के १६००

तसेच ब्ल्रु रिज चा रेट आता ४००० झाला आहे.

औन्ध मधे "अलोमा काउंटी" नावाचा २/३ बीएच के चा प्रोजेक्ट सुरु आहे
रेट ५४००

बाणेर - मायवर्ल्ड नावाचा प्रोजेक्ट
२/३ बीएच्के ५१ लाख ते ७२ लाख.

माझ्या मते युथिका च प्रोजेक्ट बकवास आहे.

एक तर रेट चालु रेट पेक्शा जास्त आहे आणि जायला यायला खुप छोटा रस्ता आहे.
शिवाय हाय वे च्या जवळ आहे. रात्री खुप त्रास होउ शकतो गाड्यांच्या आवाजाचा.
२बीएचके ५६ ते ५८ लाखाला जातो आहे.
या बजेट मधे बाणेर किंवा औंध मधे कित्येक रेडि पझेशन सदनीका मिळतील.

अलोमा काउंटी ७२ ते ७५ लाख २ बीएचके साठी.
ही स्कीम मात्र छान आहे. आणि औंध मधुन जो रस्ता हाय वे ला जोडला जाणार आहे त्या रस्त्या वर आहे.

<<माझ्या मते युथिका च प्रोजेक्ट बकवास आहे. ........................अलोमा काउंटी ७२ ते ७५ लाख २ बीएचके साठी.
ही स्कीम मात्र छान आहे. आणि औंध मधुन जो रस्ता हाय वे ला जोडला जाणार आहे त्या रस्त्या वर आहे.>>

प्रत्येक प्रोजेक्टचे आपापले प्लस मायनस पॉइंट असतात. एका वाक्यात युथिकाला उडवून चालणार नाही.

प्लस पॉइंट्स

१. बाणेर - हिंजवडी रस्ता अगदी जवळ आहे.
२. हाय-वेच्या जवळ असल्याने बाहेरगावी जाण्यायेण्याला फायदा होतो.
३. परांजपे हे नाव. या ब्रॅण्डला पुण्यात बाकीच्या बिल्डर ब्रॅण्डमध्ये सर्वात जास्त किंमत आहे.
४. पूर्णपणे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असल्याने गोंगाट कमी आणि सिक्युरिटी जास्त.

मायनस पॉइंट्स

१. किंमत जास्त. (पण ७०-७५ लाख २ बी.एच. के पेक्षा १०-१२ लाख कमी)
२. हाय्-वे चा त्रास. माझ्यामते हाय्-वेचा त्रास होणार नाही कारण रेसिडेन्शियल एरिया आणि हायवे यात १०० मीटरचे अंतर आहे.
३. तंग अ‍ॅप्रोच रोड.

>>परांजपे हे नाव. या ब्रॅण्डला पुण्यात बाकीच्या बिल्डर ब्रॅण्डमध्ये सर्वात जास्त किंमत आहे.

अरे बापरे! मग बाकीच्या बिल्डर्स च्या कामाबद्दल न विचारलेलेच बरे.. परांजपे हे स्टॅ. असेल तर अवघड आहे. Sad

या ब्रॅण्डला पुण्यात बाकीच्या बिल्डर ब्रॅण्डमध्ये सर्वात जास्त किंमत आहे.
अरे बापरे! मग बाकीच्या बिल्डर्स च्या कामाबद्दल न विचारलेलेच बरे.. परांजपे हे स्टॅ. असेल तर अवघड आहे. >>

परांजप्यांचे काम तांत्रिकरीत्या इतर बिल्डर्सपेक्षा कीती चांगले वा किती वाईट याबद्दल मला भाष्य करता येणार नाही पण एक ब्रँडनेम म्हणुन सामान्य मध्यमवर्गीय मराठी समाजात त्यांचे नाव नक्कीच चांगले आहे. नविन फ्लॅट घेताना सर्वसाधारण ग्राहकांच्या ज्या अपेक्षा असतात त्या त्यांच्याकडे नक्कीच पुर्ण होतात. माझ्या माहितीत ज्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट्स घेतले/घेत आहेत त्यांचा सगळ्यांचा अनुभव चांगला आहे. काही अपवाद अर्थातच आहेत. बाजारभावापेक्षा जास्त किंमत आकारली तरी चोख व्यवहार आणी मान्य केलेल्या सर्व सोयीसुविधांसह बर्‍यापैकी वेळेत फ्लॅट पुरवणे हे मला त्यांचे प्लस पॉईंट वाटतात.

शहाण्या माणसाने वकिलाची पायरी चढु नये असे म्हणतात तसे आजकाल बिल्डर्सबाबत म्हणायला हवे. पण नाईलाजास्तव हे करावे लागते. सगळ्याच बिल्डर्समध्ये काही त्रुटी असतात त्यातल्या त्यात तुझ्या अनुभवावरुन पुण्यातील चांगल्या बिल्डर्सची नावे (आणी कारणे) दिलीस तर त्याचा इतरांना फायदा होऊ शकेल.

चिमेघ,

मला वाटते रेट ९०००/१०००० आहे. २५०० स्क्वे फुट चा बंगला २.५ करोड ची मी जाहिरात पाहिली आहे.

मायबोलीकरांची अ‍ॅफोर्डॅबिलिटी पाहून मी थक्क झालो आहे...>> बाजो आपण ह्या मोठ्या कामप्लेक्सांसमोर चहाची ट्परी लावूया.
चहा, इडीकाडी, शिळे सामोसे, बरणीत खारी
खरेच फार महाग घरे आहेत ही सारी. दिवे दिवे. चर्चा चालुन्दे.

मामी , एवढे पैसे घेऊन हे लोक क्वालिटी देत नाहीत याचेही दु:ख आहे. मध्ये ठाण्यात हिरानन्दानी ची एक बिल्डिंग पाहण्यात आली. काय एखाद्या राजवाड्यासारखे भक्कम बांधकाम होते.ऐसपैस लॉबीज ,विस्तीर्न लिफ्ट्स , मोठाले बाथरूम्स. इथल्या जिन्यातून आणि टॉयलेट मधून एखाद्या स्थूल माणसाला जाणेही अशक्य व्हावे इतकी यांची स्पेस चोरी...

पुण्यात मालाच्या क्वालिटी पेक्षा गरजेचे पैसे वसूल करतात असे वाटते.

योग,अरुंधती, दक्षिणा,शरद,रंगासेठ
तुमचे सर्वांचे अनुभव/माहिती आम्हाला नक्कीच उपयोगी पडतील !

माझ्या काही शंका...(अज्ञान)
१.फ्लैट बुक करताना नेमकी किती प्रमाणात रक्कम (मार्जीन) भरावी लागते ? ती चेकनी की कैशनी द्यावी लागते ?
२. त्यासाठी लोन कधी घ्यावं लागतं ,बुक केल्यावर की पझेशन नंतर ?
तुर्तास एवढं पुरेसं आहे....

आम्ही सिंहगड रोड, नवशा मारूतीच्या आसपास रिसेल चा फ्लॅट बघत आहोत, कोणाच्या ओळखीचा एजंट असेल तर प्लीज सांगा

अनिल,

बुकिंग अमौंट फिक्स असा कायदा नसतो. काही बिल्डर बेसिक कॉस्टच्या दहा टक्के घेतात. शिवाय अ‍ॅग्रीमेन्ट टू सेल चे रजिस्ट्रेशन करताना पाच टक्के अधिक टॅक्सेस अधिक लीगल चार्जेस अधिक स्टॅम्प ड्यूटी घेतात. अ‍ॅग्रीमेन्ट टू सेल चे रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच आपण लोन प्रपोजल करू शकतो.

बॅन्कासुद्धा कमीत कमी १५ टक्के पैसे दिलेले असल्याशिवाय लोन देत नाहीत. लोनचा अमौंट तुमच्या रीपेमेन्ट कपॅसिटीवर अवलंबून असतो. तुम्ही तुमच्या सध्याच्या सोर्स ऑफ इनकमच्या साधारणतः पन्नास ते साठ टक्के लोन हप्ता देऊ शकता असे गृहित धरून लोन सँक्शन केले जाते. हाऊस लोनचे पैसे तुमच्या कडे बॅन्क देत नाही तर डायरेक्ट बिल्डरकडे त्याच्या कम्प्लिशन नुसार देते.

प्राजक्ता .सध्या या परिसरात रिसेलचे वांधे आहेत. आणि या भागात कंजस्टेड सोसायट्या आहेत. काही तर गुंठेवारीत आहेत.

Pages