पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुनिधी,

आमचे मगरपट्टा सिटीत अपार्टमेंट आहे. मगरपट्टा सिटी मधे ४०००-५००० रेट सुरु आहे.
तुम्हाला मगरपट्टा सिटीच्या जवळपास थोड्या कमी दरातही फ्लॅट मिळु शकतात.
मगरपट्टा सिटीजवळच अमानोरा पार्क म्हणुन पण एक प्रकल्प आहे. तिथे रेट्स जरा जास्त आहेत.
कोरेगाव पार्क हा भाग श्रीमंत वस्तीत गणला जातो. तिथेच ओशो आश्रम आहे. परदेशी लोक त्या भागात जास्त आहेत.
दर शनिवारी ईपेपर् डॉट टाईम्सऑफ इंडीया डॉट कॉम यात पुण्याची रीयल्टी विषयी पुरवणी येते. त्यात बर्‍याच जाहिराती असतात.
सकाळचा पण ईपेपर आहे त्यातही बर्‍याच जागाविषयक जाहिराती दिसतील.
मगरपट्टा भागात घरे अतिमहाग आहेत हे काही तितकेसे खरे नाही. अजुनही आवाक्यात येतील अशा किमतीत घरे तिथे उपलब्ध आहेत.

मगरपट्टा सिटी मधे ४०००-५००० रेट सुरु आहे >> म्हणजे महागच आहे हो Happy या रेटने १००० फुटाचा फ्लॅट ४५ लाख जातो + बाकीचे सटरफटर चार्जेस (स्टॅ. ड्यु. रेजी. वगैरे) म्हणजे ५० च्या आत हल्ली २ बीएच्के होत नाही Sad

मी सहज म्हणुन नेटवर पहात होते तेव्हा कोरेगाव, कल्याणीनगर , मगरपट्टा ह्या भागातली घरे अतीमहाग आहेत असे दिसले. ७ ते ८००० रेट आहे. असे काय आहे त्या भागात? कोरेगाव पार्क तर बाप रे बाप!!!>>>>>>>>>>>>>>>

मगरपट्टा ला ईतका रेट नाही माझ्या माहिती प्रमाणे...

पुण्यात कोरेगाव, कल्याणीनगर, प्रभात रोड, मॉडेल कॉलेनी, भोसले नगर, मोदीबाग, लॉ कॉलेज रोड, एरंडवणे, सानेवाडी (औंध) इकडे खिशात कमीत कमी १ करोड असल्याशिवाय फिरकू नये असा एकंदरीत माझा अनुभव आहे. कुठेही ९००० ते १०००० प्रती चौरस फूट च्या खाली रेट नाही.

जगात कुठेही गेलात तरी लोकॅलिटी प्रमाणे दर बदलतो ( एकाच शहरामधे सुध्धा).

थँक्स मंडळी. पण त्या भागात आजुबाजुला असे काही विशेष आहे का की त्यामुळे भाव इतके जास्ती आहेत? चांगल्या शाळा-कॉलेज वगैरे? किंवा गर्दी वगैरे कमी असते का? रस्ते मोठे वगैरे असे? डेक्कन्/कोथरुड व आजुबाजुचे भाग मला माहीत आहेत, पाहिलेत पण कोरेगाव व आसपास नाही. त्या बाजुला जे आयटीपार्क आहे ते हिंजवडी च्या तुलनेत कसे आहे? (न संपणारे प्रश्न : ) .. परवडले तर तिथे घर घेण्याचा (घाबरत घाबरत) (सध्यातरी फक्त) विचार चालु आहे म्हणुन चवकशी करते आहे.

अमानोरा पार्क विषयी कोणाला काही माहिती\अनुभव आहे का?
नेट वर बराच सर्च केला पण कोणत्याही फोरम मधे फारसा उल्लेख आढळला नाही. २ वीक पुर्वी ते प्रोजेक्ट बघून आलो. रेडी पझेशन चा रेट ४७०० सांगत आहेत. सर्व अमेनिटीज, मेन्टेनन्स अगदी वीज , पाणी ई. सुद्धा डेव्हलपर पुरवत आहे \ पुरवणार आहे. मेनटेनन्स महिना per sq. ft. २ रु. पडेल असे सांगितले. अस्पायर टॉवर मधले फ्लॅट खूपच छान आणि मोठे आहेत. २ BHK - १६०० sq ft ते ३ bhk 2000 sq.ft. असे आहेत.

अ‍ॅमनोरा म्हणजे बराच मोठा प्रोजेक्ट असल्यान नंतर मेंटेनन्स वाढण्याचे चान्स जास्त आहेत.
अजुन काही ड्रॉबॅक,
- फ्लॅटच्या आत तुम्ही काहीही बदल करु शकणार नाही (तोडफोड वगैरे,)
- प्रॉपर्टी मालकीची नसुन ९९९ वर्ष लीझवर आहे (??) ही त्यांची एकदम भंकस पॉलीसी वाटते. अर्थात फ्लॅटच लाईफ ९०-१०० वर्षच असत.
- जास्त किंमत आणि रेडी पझेशनच्या नावाखाली ब्लॅकनेच फ्लॅट विकणे. कंस्ट्रक्शन म्हणावे ईतके खास वाटल नाही.

+ पॉईंट, सध्यातरी १च वाटतोय,
- मगरपट्टाला जवळ.

तसच अमिताभ, सुनील शेट्टी यांनीही ईकडे बंगले घेतल्याने (?? असे तो सेल्समन म्हणाला) त्याचाही भुर्दंड ईतरांच्या माथी मारत असावेत Happy

एकंदरीत, अ‍ॅमनोरा फारच जंगी काम वाटल. अर्थात बजेट रिझनेबल कमी असणार्‍यांकरता.

अमनोरा पार्क कोणाचे अपत्य आहे हे तुम्हाला माहीत नाही असे दिसते >> सांगा ना! Happy
माझ्या एका मैत्रिणीनं घेतलाय इथे फ्लॅट.. काय माहिती हवी आहे ते सांगितलं तर विचारू शकते तिला..
अर्थात तीनं ३ आठवड्यांच्या भारतवारीत घेतलय ते.. मला माहित नाही कितपत माहिती आहे तिला..

अमनोरा पार्क कोणाचे अपत्य आहे हे तुम्हाला माहीत नाही असे दिसते >> अजुन कोण, मगरपट्टा सिटीवालेच...मेन पवार पण नावाला देशमुख...का याहीपेक्षा वेगळ कोण?

सर्व अमेनिटीज, मेन्टेनन्स अगदी वीज , पाणी ई. सुद्धा डेव्हलपर पुरवत आहे \ पुरवणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------
पाणी बोअरींग्चे असु शकते. वीज कशी काय पुरवणार?? जनरेटर?

वीज कशी काय पुरवणार?? जनरेटर?>> जनरेटरच्या सेपरेट २-३ बिल्डींग असणार आहेत.

अमनोरा पार्क नाव अनिरुद्ध देशपान्डेंचं आहे . अनिरुद्ध देश. म्हणजे कोण हे जर माहीत नसेल तर तुम्ही निश्चितच पुण्यात राहण्याच्या योग्यतेचे नाहीत Proud

..

>>म्हणजे कोण हे जर माहीत नसेल तर तुम्ही निश्चितच पुण्यात राहण्याच्या योग्यतेचे नाहीत

अरेरे! एव्हडे वाईट दिवस आले काय पुण्याला? Happy

म्हणजे कोण हे जर माहीत नसेल तर तुम्ही निश्चितच पुण्यात राहण्याच्या योग्यतेचे नाहीत >> हाहाहा, Lol हे विनोद बाफवरच वाक्य ईकड कस आलं?

म्हणजे कोण हे जर माहीत नसेल तर तुम्ही निश्चितच पुण्यात राहण्याच्या योग्यतेचे नाहीत
>> म्हणूनच आम्ही पुण्याबाहेर रहातोय Wink
आता तुम्ही नाव सांगा म्हणजे आम्ही परत येऊ शकू.. Proud

कोणाला nyati esplanade Bhavdhan & viva hallmark Bhavdhan विषयी माहिती आहे का?

मला कोणी गुंठेवारी आणि N.A. फ्लॅट्स मधला फरक सांगेल का ? आम्हाला एक फ्लॅट कळलाय त्याचं गुण्ठेवारी झालयं, N.A. नाहीये असं कळलयं , अजून बघितला नाहीये, पण एरीया तरी बरा वाटतोय.

Non-Agriculture(N.A.>>फ्लॅट(सदनिका) नसून प्लॉटसाठी(जमीन) असतं . जमिनीचं अकृषीक प्रमाणपत्र .
गुंठेवारी झालय आणि N.A. नाहीये>> याचा परस्पर संबंध नाहिये. गुंठेवारी हे जमीन मोजण्यासाठी वापरतात
४० गुंठे म्हणजे एक एकर.

घर , जमीन नाही , आणि तुम्ही नको म्हणू Happy

अगं माझ्या नवर्याने सनसिटी च्या इथे पाहीली घरं, तिथे खूप ठिकाणी अशा भानगडी होत्या , N.A. \ गुंठेवारी नाही अशा , आता आमच्या एरीयामधे कळलयं घर, त्याचं पण तेचं , म्हणून म्हंटलं इथे विचारावं

N.A. \ गुंठेवारी नाही >>ज्या ठिकाणी हे केलेल नाहिये तिथे महानगरपालिकेच्या सुविधा मिळू शकत नाहीत. खरंतर N.A. नाही म्हणजे बांधकामाची परवानगी मिळत नाही. इथे कशी मिळालीये?

याबद्दल बिल्डरला आणि त्या भागातल्या इतर अपार्टमेंट्स मधल्या लोकांना विचारुन बघ. नक्की काय प्रकार आहे ते नीट कळेल.

अहो श्यामली आणि प्राजक्ता,

साधारण १९८० ते १९९० मधे अनेक जणांनी अनधिकृत घरे बांधली. खुप कारणांमुळे ही घरे पाडणे शक्य नव्हते
मधे आपल्या नगर पालिकेने टुम काढली कि आता बांधली तर बाधंली. सगळी कागद पत्रे आणि प्लॅन घेउन या आम्ही ती पाडणार नाही. त्याबदल्यात तुम्ही अमुक अमुक दंड भरा.

ते सगळे प्लॉट म्हणजे गुंठेवारी झालेले. गुंठेवारी माझ्या मते साधारण २००० साली बंद करण्यात आली आहे.
त्या नंतरची असेल तर कागद पत्रे खोटी असु शकतात.

राष्ट्रियकृत बॅंका याला कर्ज मंजुर करत नाहीत.

आम्हाला वारजे ला flat घ्यायचा आहे. राहुल चा बराच भाव वाटत आहे. budget सधारण ६०-६५ आहे (३ bhk). कोणी suggest करु शकेल का ? under construction पण चालेल. आम्हि जुन मध्ये भारतात १ महिन्यासठि जाणार आहोत. सद्या investment म्हणुन घेनार आहोत. जाणकार मदत करा.please.

इथे कोणाला घर विकल्यावर काय कर पडतो वगैरे माहित आहे का? म्हणजे आमचं घर घेऊन आता जवळ जवळ ८ वर्ष होतील. त्यामुळे long term capital gains tax पडेल. पण अनिवासी भारतीय आणि OCI card holders ना काय पडतील? शिवाय इथे US मध्ये ते पैसे परत आणले तर त्यावर वेगळा कर पडेल का? Double Taxation avoidance साठी काही तरी असतं का?

Pages