पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राईड प्लॅटिनमच्या साईटवर मी डिसेंबर मध्ये जाउन आलो.

मला त्यांचे घर आवडले होते, एक मुख्य प्रॉब्लेम जाणवला तो म्हणजे हा प्रोजेक्ट खूप म्हणजे खूपच लांब आहे. हायवे पासून खूप मध्ये जावे लागते, नंतरचे (बहुदा ) १ ते २ किमी नीट रस्ताच नाही, त्यातून हेलकावे खात पोचल्यावर घर पाहिले तेंव्हा काही त्रुटी लक्षात आल्या होत्या त्या आता आठवत नाहीत. पण ओव्हरऑल चांगले वाटले होते. अगदी नौकरी हिंजवडीत असली तरी एकवेळ डेक्कनला लवकर पोचू पण पॅन कार्ड क्लब कडे जायला उशीर होईल असे वाटते. शिवाय बाजूला गाव आहे, तिथून जवळ चांगला मोठे इस्पितळ असे एकही नाही, अडचणीच्या वेळेस त्रास होईल ह्याची खात्री. चांगली शाळा म्हणजे ऑर्किड व ऑर्किडवाले दर वर्षी काही हजाराने फि वाढवतात. सध्याची फी ५५-६०,००० च्या आसपास आहे. दुसर्‍या शाळा फार लांब आहेत, तुमच्या पाल्याला विनाकारण रोज अनेक किमीचा प्रवास करावा लागेल. शिवाय अमेरिकेसारख्या ठिकाणाहून जर तिथे राहायला जात असू तर इथून जाताना ते सांस्कृतीक पुणे वगैरे विसरावे लागेल कारण पुण्यापासून हे फार लांब आहे.

शिवाय एक महत्वाचे माझ्या लक्षात आले आले ते म्हणजे पुण्यात अश्या मोठ्या कॉम्लेक्स मधिल लहान मुलं अजिबात मराठी बोलत नाहीत. (कदाचित हा मुद्दा ह्या बाफच्या निगडीत नाही, पण घर घेताना विचार व्हावा म्हणून लिहला. )

पुण्यात अश्या मोठ्या कॉम्लेक्स मधिल लहान मुलं अजिबात मराठी बोलत नाहीत. (कदाचित हा मुद्दा ह्या बाफच्या निगडीत नाही, पण घर घेताना विचार व्हावा म्हणून लिहला. ) >> हा माझ्यामते तरी महत्वाचा मुद्दा आहे, आपल्या घरातले वातावरण, संस्कुती ... बाहेरही जवळपास सारखी असली पाहिजे ...

पुण्यात घर घेउ इच्छिणार्‍यांनी http://www.maayboli.com/node/18962 हा बाफ पहावा.
<<शिवाय अमेरिकेसारख्या ठिकाणाहून जर तिथे राहायला जात असू तर इथून जाताना ते सांस्कृतीक पुणे वगैरे विसरावे लागेल कारण पुण्यापासून हे फार लांब आहे. >>
केदार शी सहमत आहे.
या व वर उल्लेखलेल्या कारणामुळे कोथरुड पौड रोड डहाणूकर कॉलनी या भागातील संकुलातील रिसेल फ्लॅटला जास्त मागणी आहे.

हिन्जवडित काहि प्रोजेक्ट्स अहेत असा मॅसज आला होता , भाव कमि अस्ल्याच जाणवल. पण पूण्या पासून अगदीच दूर आणी खेड्यात राहिल्याचा फील येइल.

अमेरिकेत राहुन फ्लॅट सर्च कसा करावा याबद्दल माहीती हवी आहे..
मला पुण्यात २ बी. एच. के. फ्लॅट घ्यायचा आहे..
बजेट आहे ३५-४० लाख.. (त्यावर शक्यच नाही Happy )

प्रेफर्ड लोकेशन खालिल पैकी एका तरी भागांच्या जवळचे हवे :
कोथरुड, हडपसर, हिंजेवाडी, शिवाजी नगर..

कुणाकडे पुण्यातल्या चांगल्या बिल्डर्स ची लिस्ट असेल तर ती पण द्या....

या आठवड्यातल्या जाहिराती बांधकामाच्या रेट्ला आलेली सुज कमी होती आहे अस दर्शवत आहेत. पुणे परिसरात बांधकामे पडुन आहेत. फ्लॅट्ला भाडेकरु मिळत नाहीत अशी चिन्हे दिसत आहेत तेव्हा गुंतवणुक म्हणुन घेणार्‍यांनी लक्ष ठेवावे.

well friends, here is a good news for you.

Im Sharang Pande my firm name is Pande Associates Im looking out for plot in -

Baner , Balewadi, Bavdhan, Warje, Mulshi Road Bhugaon or pirangut, Sinhagadh Road - Wadgaon, Nanded, Dhayri, NIBM, Pimple Saudagar, Pimple Nilakh, Rahatni, Rawet, PCMC area for development.

plot area would be 8000 to 15000 sft.

I want to develop there Consept Flats with square Hall, Kitchen dining, Specious Bedrooms, and big terrace.

Flats will be Fully furnished with artistic interiors,

below the building will be - Parking, Common Hall with Screen TV, Munic LIbrary, Books LIbrary, Necessary GYM equipments, provided with Solar lights and water,

The flats will be eco friendly and with maximum use of natural sourses.

Right now i have 3-4 investors or members who are ready to invest from 35 L to 80 Lac

the buildings will be of one type of flats in one building eg. 1 bhk buildings, 2 bhk buildings, Duplex buildings, etc.

We Do Not Compromise On Quality.

if any one interested then let me know.

if any one has plot then we can do Joint Venture and share the profit.

if group of people are ready to come together then I can construct best possible flats with made to order as per choice.

waiting for response -

Pande Associates
9823054740

मगरपट्टा सिटीचे फायदे-तोटे कोणी सांगु शकेल का?
फायदा: walk to school & walk to office.
तोटा: हिंजवडीत कंपनी असेल तर.. Uhoh थोडक्यात शहराच्या बाकी भागापर्यंत प्रवास करणे अवघड.

जास्त काही माहीत नाही. तिकडे कधी राहिले नाहीये किंवा जास्त फिरले पण नाहीये.

चि.न्गी,

मगरपट्टा सिटीचे फायदे:
१. तुम्हाला (निदान आत तरी) चा.न्गले रस्ते मिळतात.
२. मे.न्टेनन्स फ्री आहे त्यामुळे निश्चिन्त राहता येते.
३. सिक्युरिटी चा.न्गली मिळते.
४. वॉक टु होम,स्कुल, वॉक टु वर्क (जर तुम्ही सायबर सिटी, शाळा इ. पासुन जवळ रहात असलात तर..कारण सिटी खुप मोठी आहे).

तोटे:
१. शॉपिन्ग इ. आत जरा महागडे आहे (जवळ असल्याने). बाहेर स्वस्त पडते.
२. हि.न्जवडी कि.न्वा मध्य पुणे ला.न्ब पडते.

जर पुर्व पुणे इथे नोकरी असेल तर मगरपट्टा आणि पश्चिम पुणे इथे असेल तर बाणेर, बालेवाडी, औन्ध बरे पडेल.
किवा जर शक्य असेल तर मध्य पुणे म्हणजे दोन्ही समान पडेल.

@मानसी१८

मगरपट्टा / नान्देड सिटी मध्ये घर घेन्यार्यानी खालील गोष्टी ध्यानात घ्याव्या.

कन्सत्रक्शन RCC असल्यामुळे भितिना तुम्हि सहजासहजी होल करु शकत नाहि. तुमच्या कडे चान्गलि ड्रील लागेल किन्वा दरवेळी पैसे मोजण्याची तयारी ठेवावी.

तुम्ही Internal Structure मध्ये बदल करु शकत नाहि. (विकत घेत्ल्यावरही....)

किमती पण महाग आहेत. मेन्टन्स्स चार्गेस बदलु शकतात कारण सोसायटी फोर्म होत नाहि. जुन्या राह्नार्या व्यक्तिना विचार्लेले उत्तम.

@बाळू जोशी

वारजे - आधि पाण्याची चोकशी करा. ट्न्कर ने पाणी आणायची तयारी ठेवा. Happy

पराग, मी ह्याच संदर्भात लिहायला आलेले Happy
@बाळू जोशी: मला तरी घर आणि एकंदरीतच राहुल पार्क आवडलं! (मी राहुल पार्क मधे घर घेतलय.)
शेजारीच अतुल नगर आहे - तेही राहुल बिल्डरचच आहे. तिथे पाणी व्यवस्थित आहे - त्यामुळे इथेही पाण्याचा प्रश्न येणार नाही (असं वाटत)
पण (माझ्या माहितीप्रमाणे) अजूनतरी तिथे कॉर्पोरेशनचं पाणी आलेलं नाही.. (कुणीतरी स्थानिक नेता राहुल वाल्याला पैसे मागतोय - आणि त्यामुळे अडलय असं ऐकिवात आहे - पण ही माहिती साधारणतः महिन्यापूर्वीची आहे. )
पण एकंदरीत तिथे लाँग टर्म पाण्याचा प्रश्न असणार नाही असं मला वाटतं कारण अतुल नगर राहुलपार्क पेक्षा चढावर असूनही तिथे पाण्याचा प्रश्न नाही...
आत्ता तरी राहुलपार्कवाला बोअरचं पाणी पुरवतोय

नानबा, एकदम शॉलेट्ट बाफ.. शारलेट मधून तिथे गेल्यावर एकदम कामालाच लागलीस की Happy
मला व्यक्तिशः परांजपेंचा अनुभव चांगला आहे.. केवळ मुलंच नाही तर आई-वडिलांना जुळवून घ्यायला सोप्पे पडेल म्हणून आणि पुण्यातच राहयचं असेल तर, कम्युनिटी मध्ये मराठी लोक जास्त आवडतील हे डोक्यात होतं आणि बिल्डरही चांगलाच विश्वासू हवा होता (कामाची क्वालिटी आणि टाईमली कंप्लिशन हे मुख्य उद्देश), तसच आम्ही अमेरिकेत असताना आणि आई-बाबा मुंबईत असताना फॉलो अप करण शक्य नव्हतं. परांजपें मुळे हे सगळं जुळून आलं. एकूणात सगळं काम चांगलं आणि वेळेवर केलं त्यांनी. अजून एक म्हणजे आम्ही खूप आधीच याहू ग्रुप सुरु करुन सगळ्या सभासदांना एकत्र ठेवलं, बरेचसे एन आर आय असल्याने सगळ्यांनाच त्यात खूप फायदा झाला शिवाय कामाची प्रोग्रेस ट्रॅक करता आली.
अवांतरः
सध्या, मी बाणेर /पाषाण मध्ये (शकयतो बाणेर पाषाण लिंक रोडच्या आसपास) रोड टच दुकान बघतोय, (गुंतवणूक किंवा जॉब केला पुढे मागे तर पोटापाण्यासाठी Wink ) कुणी सांगू शकेल का काही माहिती.. मला माहितेय हा विषय नाही ह्या बाफचा, पण कुठं विचारावं काहीच कळना. कुणी दुकान किंवा गाळा खरेदी केलेय काय, काही चिट-शीट्स असतिल तर विचारपूशीत टंकवा.. धन्यवाद!

सध्या मलाही घरघर लागली आहे, त्यामुळे मुद्दाम शोधत आलो हा बाफ. चांगली माहिती मिळाली इकडे, धन्यवाद.

परांजपे ब्लू रीज, प्रचंड रखडलेला आणि परांजपेंचा नावलौकीक धुळीला मिळवलेला प्रोजेक्ट. ( नेटवर शोधा कॅन्सल केलेल्या लोकांचे अनुभव)' मॅग्नोलिआ' ला पण सर्व ग्राहकांना दीड दोन वर्षे रखडवले त्यांनी. पैसे देउन बसलेल्यांचे हाल झाले. परांजपेंची खात्री द्यावी अशी स्थिती नाही आता.

>>परांजपेंची खात्री द्यावी अशी स्थिती नाही आता.

जीएस,
कुणाचीच खात्री देण्याची परिस्थिती नाहीये.. ठाणे, मुंबई, पुणे, ई, सर्व ठिकाणि हाताच्या बोटावर मोजण्या एव्हडेच चांगले सच्चे बिल्डर्स ऊरले आहेत.
यात दोन मुख्ख्य मुद्दे आहेतः
१. सक्षम ग्राहक: प्रत्त्येक ग्राहकाला या संबंधी सर्व ज्ञान असेल असे नाही, अशा वेळी समगरजू वगैरेंचे याहू गृप वगैरे स्थापून किंवा एकत्रीतपणे एका तज्ञ/हितसल्लागाराशी चर्चा करून बरेचसे धोके टाळता येतात. बिल्डर अन कंस्ट्रक्शन या दोन गोष्टीबद्दल माहिती काढणे फार फार गरजेचे असते. दुर्दैवाने बरेच वेळा आपला निर्णय हा कमर्शियल टर्म्स वर अवलबून असतो ज्याचा फायदा बिल्डर, बॅका, एजंट्स घेतात.
२. डिमांड्-सप्लाय चं गणीतः बूम टाईम मध्ये ग्राहकाला भीक न घालता, बिल्डरच्या टर्म्स वर सर्व व्यवहार चालतो, अन घर घेण्याची शर्यत असल्याने ग्राहक स्वताच्या मागण्या/फायदा/सवलती ई. ना चुलीत घालून जे मिळतय ते घेतो (कारण अशा वेळी बँका देखिल भरमसाठ कर्ज द्यायला तयार असतात- ग्राहकाचे हित वगैरे या गोष्टीशी त्यांचं काहीही देणं घेणं नसतं!). बूम टाईम नसेल तर कदाचित बिल्डर तुमचे म्हणणे ऐकून तरी घेईल.

नविन चांगलं घर मिळणे हे आजकाल नशीबाचा भाग झाले आहे. नविनच हवे हा हट्ट नसेल तर मग अगदी ५-१० वर्षे जुनी असलेली वसाहत देखिल अत्यंत चांगली ठरू शकते कारण यात बरेच वेळा ईतर लॉजिस्टीक प्रश्ण सुटलेले असतात- शिवाय जवळ जवळ सर्व गोष्टी खरेदी करण्या आधी "ज्ञात" असतात, नुसते भविष्यातले वायदे नसतात. ईमरात बाह्य अंगाने चांगली मेंटेन केलेली असेल तर हवे तसे ईंटीरीयर करून देखिल नविन घराचा फील देता येतो.

परांजप्यांच्या २ फर्म्स आहेत. परांजपे स्कीम्स व परा.बिल्डर्स. त्यातली कोणती गाळात गेलीय? राहुलनगर ची चौकशी करून आलो. ३८०० दर आहे. अधिक एमेस इबी ,रजिस्ट्रेशन, वगैरे .पार्किन्गचे २ लाख जादा. वरशभराचा वन टाईम मेन्टेनन्स फक्त. १ वर्शानन्तर सोसायटी तुम्हीच करा (आणि भान्डत बसा.)सुप्रईम कोर्टाने पार्किन्ग फुकट द्यावे असा आदेश दिला असताना २ लाख पार्किन्गचे कसे? अर्थात पार्किन्ग फुकट दिले तर त्याचा चार्ज स्क्वेअर फूट दरात वाढवतील. २ लाख पार्किन्ग अर्थात ऑप्शनल आहे त्यामुळे कप्म्लसरी फुकट पार्किन्ग घेऊन कार्पेट दरात वाढ करून घेण्यापेक्शा. पार्किन्ग विकत घेणे परवडेल का ? ज्याना पार्किन्ग नको असेल त्याना त्या दरातून सुटका मिळेल. पण यापुढे बिन पार्किन्गचा प्लॅट घेण्यात पॉइन्ट नाही. २ बीएच के ४८ते ५० पर्यन्त जातो सगळे धरून...

नमस्कार गोविंद, मॅग्नेलियाला थोडा उशीर लावला हे खरंच आहे, पण इतर बिल्डर्सशी तुलना करता मला तरी ठीक वाटलं (राज ठाकरे इफेक्ट मुळे बाहेरचे कामगार निघून गेले त्यामुळे काम थांबलं दरम्यान असं कारण देण्यात आलं खखोदेजा!). आता बाणेर/ पाषाण सारख्या ठिकाणी स्वतः घर बांधून घेणे शक्य नाही (रिसोर्सेस आणि वेळे अभावी) म्हणजे बिल्डर्स बघावा लागणारच ना, मग त्यातल्या त्यात चांगला कुठला हे बघायचे.

अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बिल्डर्सकडे कॅश फ्लो चांगला हवा म्हणजे पैसे नाहीत म्हणून काम अडत नाही, लहान बिल्डर ह्यात पलटी मारु शकतो आणि कामाचा वेग खूप कमी होतो मग. अर्थात बिल्डरकडे कॅश फ्लो असला की मग ते रेट कमी करायला जाम तयार होत नाहीत, बडी धेंड ह्यात घुसलेयत आता त्यामुळे फ्लॅट रिकामा ठेवणं त्यांना परवडत किंमत क्मी करण्यापेक्षा.

ब्लू रीज हे एक कोडं आहे. पण अजूनही बुकींग करणार्‍यांमध्ये 'परांजपे आहेत ना म्हणजे ते करणारच' असं म्हणतायत. शिवाय, बुकिंगच्या वेळी कबूल केलेल्या गोष्टीमध्ये थोडे बदल (उदा. एखाद दोन अ‍ॅमेनिटीज बदलणे वगैरे) होतातच त्यामुळे तीन वर्षात कुठे जाईल ते प्रोजेक्ट हे बघण्यासारखे असेल. मनस्मिने वरती म्हटल्याप्रमाणे सात आठ वर्ष तरी लागतील ती चांगली राहाण्यायोग्य जागा व्हायला पण जर आयटीने तग धरला तर तिथले भाव कैच्याकै होणार हे आलेच्.सगळ्यात गंमत म्हणजे, परांजपेनी स्वतः ब्लू रीज हे फ्लॅगशिप प्रोजेक्ट ठरवून जास्त प्रायॉरीटीवर ठेवले आहे आणि कॅसेलेशन्स आली तरी भाव विशेष कमी केल्याचे ऐकीवात नाही, तसच परांजपे स्कीम कडे बर्‍याच प्रमाणात रीटर्न कष्टमरच असतात (ऐसे ऐकून आहे) म्हणे.

बरं, वर योग यांनी मांडलेल्या एका मुद्द्यावर - टाऊनशीप डेव्हल्प्ड होताना आणि झाल्यावर दुकाने कशी विकली जातात, उदा. मेडीकल स्टोर्स, किराणामाल, सलून वगैरे? इथे जर गाळे बघायचे असतील तर काय करावे, इस्टेट एजंट की कमर्शिअल पण असतात, अंडर कन्स्ट्रक्शन? कुणाला काही अनुभव?

बाळू जोशी, मी परांजपे स्कीम बद्दल बोलतोय.

तसच परांजपे स्कीम कडे बर्‍याच प्रमाणात रीटर्न कष्टमरच असतात (ऐसे ऐकून आहे) म्हणे.>> अगदी बरोबर.आमच्याकडे सर्व नातेवाईकांची घरे परांजपेंकडची आहेत.अजून तरी काही प्रश्न जाणवले नाहीत.त्यामध्ये सर्वांत जुने १४-१५ वर्षापूर्वीचे आहे आणि सर्वात नविन गेल्या वर्षीचे आहे.त्यांचा पझेशन नंतरचा मेंटेनेंस चांगला असतो.

काही दिवसांपासुन इ-सकाळ मधे 'virtual property exhibition' जाहिरात येत आहे. काही बिल्डर्स चे सध्याचे प्रोजेक्ट्स आणि रेट्स वगैरे माहिती आहे. साधारण बाजारभावाचा अंदाज येण्यासाठी ही साईट बरी वाटली.
http://www.credaipune.in

फक्त आणि फक्त गुंतवणुक या एकाच निकषावर जर २ बिएचके फ्लॅट घ्यायचा असेल तर कुठे घ्यावा.
गेल्या काही म्हणजे ५-६ वर्षातील पुण्याच्या विस्ताराची टोटलच लागत नाहीये.

प्राजक्ता फक्त गुंतवणूक या निकषावर घर घेणार असाल तर सध्या बावधन, सुस रोड पाषाण , पिंपळे सौदागर, रहाटणी , औंध - बाणेर या एरियात घर घेणे सोयीस्कर ठरेल.

उपयुक्त माहिती.
एक शंका : मी आज एक प्लॅट घेतला कर्ज काढून आणि ३-४ वर्षानंतर तो विकायचा ठरवला, तर अशा वेळी मला अ‍ॅप्रिसिएशनचा फायदा मिळेल काय? तसेच माझ्या उर्वरित कर्ज बँक कसे वसूल करते? असे करण्यात काही फायदे-तोटे आहेत काय? काही कायदेशीर अडचणी?

मगरपट्टा- वाईट्ट कन्स्ट्रक्शन क्वालिटी... आंधळ्यालाही दिसेल इतपत! भाव तर अव्वाच्या सव्वा! फिनिशिंग अगदी थर्ड ग्रेड्ची!

जीएस्,तुला रे का घरघर लागली?

>>बरं, वर योग यांनी मांडलेल्या एका मुद्द्यावर - टाऊनशीप डेव्हल्प्ड होताना आणि झाल्यावर दुकाने कशी विकली जातात, उदा. मेडीकल स्टोर्स, किराणामाल, सलून वगैरे? इथे जर गाळे बघायचे असतील तर काय करावे, इस्टेट एजंट की कमर्शिअल पण असतात, अंडर कन्स्ट्रक्शन? कुणाला काही अनुभव?>

नगरपालिका अन खाजगी कंपनी असे समभागी डेवलपर्स असतील तर त्यातील खाजगी कंपनीकडे कुठले गाळे ऊपलब्ध आहेत ते पाहून त्यांच्याशी व्यवहार करता येईल (जे अधिक बरे पडेल) किंव्वा थेट नगरपालिकेशी त्यांच्या अधिकारातील गाळे असतील त्याबद्दल व्यवहार करता येईल.
दोन्ही केस मध्ये ईस्टेट एजंट मदत करू शकतो- म्हणजे कागदपत्रे तपासणी, अर्ज, सर्व संबंधीत पालिका, विभाग, कार्यालयातील अ‍ॅप्रूवल्स वगैरे. काही एजंट फक्त निवासी जागा/घरे खरेदी विक्री मध्येच काम करतात.
खाजगी बिल्डर्स च्या निवासी संकुलातही असे व्यापारी गाळे बिल्डर्स स्वतः बांधतो अन विकतो. बांधकाम चालू असताना रेट कमी असतो, कींवा सवलत मिळते.

>>एक शंका : मी आज एक प्लॅट घेतला कर्ज काढून आणि ३-४ वर्षानंतर तो विकायचा ठरवला, तर अशा वेळी मला अ‍ॅप्रिसिएशनचा फायदा मिळेल काय? तसेच माझ्या उर्वरित कर्ज बँक कसे वसूल करते? असे करण्यात काही फायदे-तोटे आहेत काय? काही कायदेशीर अडचणी

रंगासेठ,
प्रश्णात थोडा टेक्निकल लोचा दिसतोय. असे बघा, जर ऊ.दा. मी घर ४५ लाखाला घेतले, पैकी ३५ लाख कर्जे बॅंकेकडून घेतले. ५ वर्षांनी साधारण महिन्याला ३०,००० हप्ता या रेट ने मी बॅकेचे १८ लाख फेडले आहेत. जर ५ वर्षांनी माझ्या घराची किम्मत आता वाढून ५५ लाख झाली असेल तर एखादा ग्राहक त्या किमतीला घर घेणार असेल तर त्याला ते विकून बँकेला कर्जाचे ऊर्वरीत १७ लाख देवून बाकी ३८ लाख मला मिळतील. थोडक्यात माझा शिल्लक नफा होईल १० लाख (३८ लाख - खर्चः स्वताचे १० लाख घर घेताना+ बँकेचे आजवर भरलेले १८ लाख).
अशा वेळी ते कर्ज ग्राहकाच्या नावावर ट्रांस्फर करून माझा काय फायदा? ऊलट यात बॅंकेचा फायदा अधिक आहे. शिवाय ते नविन ग्राहकावर पुन्हा सर्व नियम, अटी अन एलिजिबीलीटी वगैरे निकष लावू शकतात..
आता ग्राहकाकडे तेव्हडी रक्कम विकत घ्यायला नसेल तर ग्राहक तुमच्याकडे कर्ज ट्रांस्फर चा ऑप्शन मागू शकतो. अशा वेळी तुम्ही किती रकमेचे कर्ज ट्रांसफर करता यावर तुमचा नफा अवलंबून आहे. याही स्थितीत बॅंक त्यांचा कमीत कमी नफा बघणारच.
एक नक्की आहे की जोपर्यंत कर्ज पूर्ण फिटलले नाही तोपर्यंत मला घर विकता येत नाही.
सर्वात सोपा, कमी कटकटीचा मार्ग म्हणजे ग्राहकाकडून दुसर्‍या बेंकेचा चेक घेणे, तो वठल्यावर स्वताच्या बँकेचे कर्ज फेडणे अन रीतसर स्वतः ग्राहकाला घर विकणे. यात दुसरे अनेक फायदे आहेत जसे की विक्रीची किम्मत अन अटी तुम्ही ग्राहकाबरोबर बसवून ठरवू शकता, थोडक्यात तुम्हाला तुमची बॅक वा ग्राहकाची बॅंक कुणाशीही डील करायला लागत नाही. ग्राहक फक्त एकच सक्तीची अट घालू शकतो की ज्या दिवशी त्याचा चेक वठेल त्याच दिवशी तुमच्या घराचे सेल डीड त्याच्या बरोबर पूर्ण केले जावे.
असो. हे अगदी सरळ ऊ.दा. वापरले आहे- ईतर तपशील, नियम व स्वताच्या कर्जाच्या अटी या बँकेकडून खात्री करून घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये.

Pages