पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलींचे कमिन्स कॉलेजजवळून वारजेनाकेकडे जाणर्‍या छोट्या रस्त्यावर (कॅनॉल रोड)डावीकडे पार्थ कन्स्ट्रक्शन असा एक प्रोज्र्क्ट आहे. कोणाला काही माहिती त्याबद्दल?

नुकताच वारजे अनेक्स ला २ बीएचके २० लाखात असा काही प्रोजेक्ट सुरु झालाय. (या वीकेंड्च्या सकाळ मधे जाहिरात आली आहे).

अर्बन ग्राम त्याचे नाव . अ‍ॅनेक्स वारजे म्हणे वारज्यापासून किती किमी वर? आणि २ बी एच के म्हनजे किती एरिया? हल्ली ५५० चौ फू चे देखील २ बी एच के प्लॅट आहेत... Sad

>>हल्ली ५५० चौ फू चे देखील २ बी एच के प्लॅट आहेत...
महान! कसे काय बसवतात? १५० चौ तर लोडींग मध्ये जाते, सं/बाथ अन पॅसेज साठी अगदी ५० चौ. सोडले तर ३५० चौ. मध्ये २ बेड्स किचन आणि लिविंग??? Sad
५५० कारपेट म्हणलात तर एकवेळ शक्य आहे!!

मला वाटते ते ८५० स्क्वे फुटाचे आहे. २ बी एच के..
तुम्ही मु.बईतले २ बी एच के पाहिले नाहीत वाटते..तिथे ७०० स्क्वे फुट चे २ बी एच के पण असतात.:)
त्यानी जाहिरातीत दिले आहे लोकेशन मॅप.. मी पुण्यात नवीन असल्याने ते किती लांब आहे वगैरे पुण्यातील इतर जाणकार सांगु शकतील.

ज्याना हिंजवडी (आयटी पार्क) पासुन जवळ घ्यायचे आहे त्यानी बालेवाडी ऑप्शन जरुर विचारात घ्यावा.
सध्या इथे ३४०० बुकींग आणि ३६०० तयार असा रेट सुरु आहे. मागे इतर काही जणानी लिहिले होते तसा खुप गैरसोयीचा भाग वगैरे अजिबात नाही.

मनस्मी! तुम्हाला वास्तुशोध म्हणायचे आहे का? वास्तुशोध्-कोंधवा(चु,भु.द्या.घ्या) असेल तर त्याचे 'बुकिंग संपले आहे. ' असे ब्लॉगवर बातमी आहे फोटोसहित.( लिंक टाकते शोधुन)

प्राजक्ता
हो... तेच..

डीपसी,
ब्लु रिज, एका महिन्यापुर्वी ३५०० होता.. ९ व्या का ११ व्या माळ्यापासुन २० रु प्रति फ्लोअर राईझ..

नुकताच वारजे अनेक्स ला २ बीएचके २० लाखात असा काही प्रोजेक्ट सुरु झालाय. (या वीकेंड्च्या सकाळ मधे जाहिरात आली आहे).>>>>>

दीड दिवसात त्याचं १६५ फ्लॅट्चं बुकींग फुल झालं ..आणि तिसर्‍या दिवशी सकाळपर्यंत १०५ वेटिंग लिस्ट मधे होते..

तो प्रोजेक्ट मला तरी वाटते थेट NDA च्ह्या जवळ आहे,उत्तमनगर ओलांडून! काय अर म्हणे वारजे अनेक्ष
! उद्या थेट शिरवळला कात्रज अनेक्स म्हणायलाही कमी करणार नाहीत!

इतरही काही "अनेक्स" असे:
औंध अनेक्स: पिंपळे सौदागर, वाकड (आता हे अनेक्स प्रकरण गेलं)
कोथरूड अनेक्स: वारजे, बावधन
बिबवेवाडी अनेक्स: कात्रज, सुखसागर नगर
थोडक्यात, अनेक्स म्हणजे मूळ उपनगरापासून बरंच लांब!

डीपसी,

जुन २०११ असे म्हणतात. तुम्ही एकदा विझिट करा आणि अनुमान लावा. माझ्या मते सगळे नीट होउन रहाणेबल व्हायला किमान ५ वर्षे लागावीत. तीनही लागु शकतात.

सायली,

काहीवेळा असे होते की लोक उत्साहात टोकन अमाउंट देउन बुकिंग करतात पण नंतर तो उत्साह जातो आणि कॅन्सल करतात. त्यामुळे ज्याना आशा असेल त्यानी नाव लिस्ट मधे घालुन ठेवावे. कदाचित मिळुन जाईल.

कल्पतरु चे बान्धकाम चा.गले असते. माझा एक फ्लट ठाणे येथे आहे. (final amount na vicharlele changale) Happy ६,५०० sq. feet

आता वाकड ला नविन बान्धकाम चालु आहे.

http://www.kalpataru.com/properties/overview.asp?p_id=77&sec_no=1

छान काम आहे. चक्कर टाका, कल्पना येइल.

किंमतीत घासाघीस करत नाहित. Sad

राहुल वाल्यांचा फ्लॅट प्लान बोगस आहे. चक्क किचनमध्ये टॉयलेट आहे. दोन्ही बेडरूम मध्ये हॉलमधून जाताना किचनमधून जावे लागते. दॅट इज व्हेरी एम्बरासिन्ग!

मुलींचे कमिन्स कॉलेजजवळून वारजेनाकेकडे जाणर्‍या छोट्या रस्त्यावर (कॅनॉल रोड)डावीकडे पार्थ कन्स्ट्रक्शन असा एक प्रोज्र्क्ट आहे. कोणाला काही माहिती त्याबद्दल?

राहुल वाल्यांचा फ्लॅट प्लान बोगस आहे. चक्क किचनमध्ये टॉयलेट आहे. दोन्ही बेडरूम मध्ये हॉलमधून जाताना किचनमधून जावे लागते. दॅट इज व्हेरी एम्बरासिन्ग!
>> कुठली स्कीम म्हणताय तुम्ही? त्यांच्या बर्‍याच स्कीम्स आहेत - राहुल पार्क बिल्डिंग A to C (C1,C2) - मधे तरी तसं काही नाही.. एकदा जाऊन सँपल फ्लॅट बघून या!

>>दोन्ही बेडरूम मध्ये हॉलमधून जाताना किचनमधून जावे लागते. दॅट इज व्हेरी एम्बरासिन्ग
बाळूराव,
त्यात काय एव्हड एंबरासिंग आहे? बाहेरचा माणूस तर कुणी थेट बेडरूम पर्यंत जात नाही ना? आणि घरच्यांना व्हाया किचन जावं लागलं तर त्यात काय मोठं लज्जास्पद आहे? ऊलट "बाहेरच्याला" हॉल मधून थेट बेडरूम ला जायला रस्ता नाही हे चांगलच नाही का? नेमकं काय म्हणायचय तुम्हाला?
किचन मध्ये टॉयलेट हे जरा गैरसोयीचं आहेच.. पण पुण्यात पूर्वीही बर्‍याच वाड्यांतून मला वाटतं छोट्या घरात किचन च्या ओट्याच्या बाजूला भिंत घालून बाथरूम असायचे, अजूनही असेल. जागा कमी असल्याने किमान हात पाय धुणे, अंघोळ ई. साठी ती सोय असावी/होती.
किचन मध्येच कुणी संडास बांधल्याचं माझ्या तरी ऐकीवात नाही........ that will be really embarasing Happy

त्यात काय एव्हड एंबरासिंग आहे? बाहेरचा माणूस तर कुणी थेट बेडरूम पर्यंत जात नाही ना? आणि घरच्यांना व्हाया किचन जावं लागलं तर त्यात काय मोठं लज्जास्पद आहे?>>>>>>> ह्यातल्या कुठल्याच गोष्टींकरता लज्जास्पद नाहीये. एकदा किचन मध्ये कोणी स्वयंपाक करत असताना किंवा जेवत असताना (छोट्या फ्लॅट्स मध्ये वेगळी डायनिंग रुम नसते सहसा) जर आदल्या दिवशी छोले भटोरे खाललेला माणूस गेला तर मग बाहेरच्याच काय घरातल्या माणसाला लज्जा आणि घृणा दोन्ही एकाच वेळेस येईल.

एकदा किचन मध्ये कोणी स्वयंपाक करत असताना किंवा जेवत असताना (छोट्या फ्लॅट्स मध्ये वेगळी डायनिंग रुम नसते सहसा) जर आदल्या दिवशी छोले भटोरे खालले माणूस गेला तर मग बाहेरच्याच काय घरातल्या माणसाला लज्जा आणि घृणा दोन्ही एकाच वेळेस येईल.
>> बिलिव मी बुवा, किचन जवळ टॉयलेट नाहीये राहुलपार्क मधे.
हॉल + डायनिंग (एल शेप) - डायनिंग समोर किचन - मग पॅसेज, पॅसेज मधे ड्रायबाल्कनी (धुणी भांडी साठी), आणि त्यानंतर टॉयलेट आहे.

नानबा, अगं नसेल तू म्हणतेस तर. माझी पोस्टं मी "असलं तर काय झालं" ह्या मुद्द्याकरता लिहीली होती. Happy

हा पहा राहुलचा प्लान. . आणि किचनच्या कडेचे टॉयलेट. ते किचनमध्ये नाही काय ? शिवाय गेस्ट बेडरूममधून गेस्टला टॉयलेटला किचनमधून जावे लागत नाही काय? मास्टर बेडरूमचे सोडा. वैद्यबुवानी वर्णन केल्याप्रमाणे एखाद्या पाव्हण्याला 'आवाजी मतदान ' करायचे असेल तर?
एकदम यूसलेस डिझाईन

rahul.jpg

यात दोन बाबी आहेत.एकतर तॉयलेट किचनमध्ये आहे. ते घरच्यानाही वापरताना कानकोन्डेपणा वाटणार. दुसरे गेस्ट बेडरूम पहा. गेस्टला किरकोळ विधीसाठीही आधी किचनमध्ये या मग टॉयलेत मध्ये जा असे करावे लागणार. म्हनजे पाहुण्याने बनियन उन्डरप्यान्टवर येणे नाही. गृहीणीलाही जरा रीतसर कपडे घालणे आले. कोणे म्हणेल कुठे रोज रोज पाहुणे येतात ? पण घरातलेही लोक असू शकतात. या आर्किटेक्टला कोणी डिग्री दिली असावी बरे?

Pages