पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही नवशा मारूतीच्या गल्लीत राहतो (rent वर) , तिथे चांगल्या आहेत सोसायट्या , आता सवय झाल्ये त्या एरीयाची आणि मुलीची शाळा , पाळणाघर हे सगळं पण जवळ आहे

माझा नवरा सनसिटीच्या इथे १-२ ठिकाणी घरं बघून आला तिथे गुंठेवारीची भानगड होती, आमच्या एरीयात पण आहे माहीत नव्हतं Sad , एजंट १ घर आहे म्हणाली आणि आज फोन केला तर म्हणे गेलं Sad

धन्यवाद mansmi18! Happy
blue ridge बद्दल तुमच काय मत आहे? आत्ता भारतात आले होते तर त्यांची scheme खूप आवडली. तसेही मी आणि माझा नवरा ४-५ वर्षांनी परत येणार आहोत म्हणून एक under construction flat book करून ठेवायचा विचार करतोय.

अनिल,
आयडियली घर घेताना प्रथम आपण आपली लोन एलिजिबिलिटी चेक करावी हे उत्तम. मला मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं. मी धाडकन जाऊन फ्लॅट बूक केला. बुकिंग अमाऊंट १ लाख रू दिले, ही गोष्ट जुलै २००९ ची, त्यानंतर प्लिन्थ वगैरे साठी पण साठवलेले पैसे दिले. अखेर फेब्रु. २०१० मध्ये माझ्याकडचे साठिव पैसे संपले तेव्हा मी लोन साठी अप्लाय केले... बँकेने कुठे प्रॉपर्टी पाहताय इथून सुरवात केली... Uhoh मी म्हणलं अहो मी घर घेऊन बसलेय... सुदैवाने लोन पास करणारा मॅनेजर ओळखितला निघाला आणि माझं लोन प्रोसेसिंग अक्षरश: एका दिवसात पुर्ण झालं... नशिबात असलं की सगळं नीट होतं.. लोनची चौकशी बाहेरून केलेली तेव्हा मला एजंटस् म्हणाले होते अमूक अमूक लोन मिळेल, मला अजून २-३ लाख सहज लागणार होते, पण सुदैवाने संपुर्ण लोन पास झाले.

लोन साठी लागणारे कागदपत्रं घेऊन बँकेत गेलं की तिथला माणूस आपली एलिजिबिलिटी तर सांगतोच, शिवाय बँकेकडे प्रॉपर्टी लिस्ट असते, त्यात नविन प्रोजेक्ट्स, रिसेल फ्लॅट्स अव्हेलेबल असतात. तुमच्या बजेट आणि रिक्वायरमेंट प्रमाणे बँक सुद्धा प्रॉपर्टी फायनल करायला मदत करते.

प्रत्येक हाऊसिंग प्रोजेक्ट हा कोणत्या ना कोणत्या बँकेकडून अप्रूव्ह झालेला असतो, म्हणजे तिथे फ्लॅट घेणार्‍यांना ती बँक लोन देईल असं बिल्डरशी करार करते... मग असे प्रोजेक्ट्स बँकेच्या लिस्ट मध्ये सामिल होतात...

तुम्ही जाऊन पहा एखाद्या बँकेत आणि चाचपडून पहा... फक्त आयसीआयसीआय सोडून कोणत्याही बँकेत जा.. शक्यतो एचडीएफसी मध्ये जा.

नॉर्मली बिल्डरनुसार बुकिंग अमाऊंट बदलते बहुतेक. नक्की नाही माहित.. Sad
अ‍ॅग्रीमेंट करताना मात्रं, फ्लॅटच्या अग्रीमेंट व्हॅल्यूच्या २०% + स्टँप ड्यूटी + रजिस्ट्रेशन असे भरभक्कम चार्जेस एकाच वेळी पे करावे लागतात... किंवा ते २०% आधी भरून मग रजिस्ट्रेशन केले तरी चालते, उलट करून चालत नाही..

जागेचे रेट कमी होणार असं ऐकलय.
घर घ्यायचा विचार माझाहि आहे, पन जुन जुलै पर्यंत थांबून मग पहावे असा विचार केलाय.
काय वाटत ह्या बद्दल? आणि कालच्या पेपर मधे असहि वाचलं कि आता पूर्ण किमतीच्या ९०% लोन मिळेल. आपल्याला फक्त १०% अमाउंट आपल्याकडून भरावी लागेल.

चिमेघ,

ब्लु रिज संपुर्ण रहण्यालायक योग्य व्हायला किमान ५-६ वर्षे तरी जातील. स्कीम बरी आहे. लाँग होरायझन असेल तर विचार करायला हरकत नाही.

येत्या काही महिन्यात इंटरेस्ट रेट वाढल्याने रीयल इस्टेटच्या भावांवर परिणाम होउन १५-२०% करेक्शन ची शक्यता आहे. करेक्शन जेव्हा येते तेव्हा चांगल्या स्कीम्स मधे सुद्धा बिल्डर्स घासाघीस करुन कमी भाव देतात (२००८ मधे आलेल्या मंदीत परांजपेनी सुद्धा भाव कमी केल्याचे मी ऐकले आहे). त्यामुळे ज्याना खरेदी करायची आहे त्यानी मे पर्यंत थांबावे.

माझ्या माहितीप्रमाणे २५ लाखा पर्यंत १०% आणि त्याच्यावर २०% डाउन पेमेंटची आवश्यकता असते. यात बदल झाला का?

एकंदरीतच थांबा आणि वाट पहा.. हेच सध्या योग्य वाटते.

माझ्या माहितीप्रमाणे २५ लाखा पर्यंत १०% आणि त्याच्यावर २०% डाउन पेमेंटची आवश्यकता असते. यात बदल झाला का? >> इतकं डिटेल माहिती नाहि पण ओव्हरऑलच १०% भरावे लागतील असं लिहिलं होतं. पण ह्यात हल्ली पॅकेज मधे अस्लेल्या हिडन कॉस्ट्स इंक्लुड आहेत का ते माहिती नाहित जसे कि ३ वर्षाचा मेंटेनन्स, पार्किंग आणि इतर ज्या काहि गोष्टी असतात रजिस्ट्रेशन आणि स्टँप ड्युटी सोडून.

जागांचे रेट मुळीच कमी होणार नाही. असे गेले कित्येक दिवस म्हणताहेत्.कारण शेअर मार्केट नरम आहे. पुणे मुम्बई नाशिक मध्ये लोक रहायला घर घेत नाहीत्.गुंतवणूक म्हणून घेतात. त्यामुळे कितीही दर वाढले तरी लोकांकडे गुन्तवणूकीसाठी पैसा असतो. अगदी एक कोटीचा फ्लॅट बुक करून पूर्ण झाल्यावर दीड दोन कोटीला विकला जातो. लोकानी २५०० मध्ये लेक टाऊनमध्ये बुक करून इमारत पूर्ण होताच ४००० रेट काढला. करिश्मा सोसायटीत सुरुवातीला १६०० दर काढला तर गिर्हाईक नव्हते कारण तेव्हा गुन्तवणुकीचा कन्सेप्ट नव्हता. आता लोक मागचा फ्लॅट विकून नव्या प्रोजेक्ट मध्ये पैसा लावतात्.बहुसंख्य मंडळी नव्या फ्लॅटमध्ये प्रवेशही करत नाहीत.
जोपर्यन्त रिअल इस्टेटपेक्षा स्टॉक मार्केट मध्ये परतावा वाढत नाही तो पर्यन्त प्लॅटमध्ये गुन्तवणूकदारच येत राहणार. गुन्तवणूकदाराना स्वस्त महाग काही नसते. त्यामुळे मागच्या दोन तीन महिन्यात बरेच प्रोजेक्ट सुरू झाले आहेत. आणि कोणाचेही दर रिझनेबल नाहीत.

लोन ९० % पर्यन्त मिळू शकेल पण १ लाखाचा लोनचा प्लॅट शेवटी ३लाखाला पडतो.

पुण्यात जागांचे रेट्स कमी होणे शक्य नाही. बिल्डर्सची लॉबी असते, त्यानुसार ते रेट्स खाली पडू देत नाहीत. त्यांना फ्लॅट्स तसेच पडून राहाणे परवडते, रिकामे राहाणे परवडते. गेल्या ४ वर्षांत अनेकदा रेट्स खाली येतील असे ऐकले, मात्र तसे झालेले नाही, ह्यावरून वस्तुस्थिती काय ते ओळखा. जर बिल्डर नवा असेल, त्याचे एखाद-दुसरेच प्रोजेक्ट सुरु असेल तरच त्याला कॅश फ्लो ची टंचाई निर्माण झाल्यास थोड्याशा कमी दरात फ्लॅट मिळण्याची आशा असते. परंतु सहसा तसे होत नाही. तेव्हा जागांचे रेट्स कमी होतील ह्या गैरसमजात कृपया राहू नका.

चिमेघ
बाणेर ला रेट ४२०० ते ४६०० पर्यंत चालु आहे.

शरद
माझा मुद्दा value for money किंवा cost vs benifit चा आहे. तिथे ५६ ते ५८ लाख घालविण्यात काही अर्थ नाही माझ्या मते.त्या कॉस्ट मधे खुप छान छान फ्लॅट मिळतील.

ब्लु रिज झक्कास. मस्त स्किम आहे.

आणि जर long term investment साठी प्राधिकरणा मधे वूड्सविले चा प्रोजेक्ट छान आहे. स्पॉट झक्कास आहे. पुढे मोनोरेल चा प्रोजेक्ट जिथुन जाणार आहे त्याच्या अगदी जवळ आहे. ज्या लोकांचा engg industry शी सारखा संबंध येतो त्यांच्या साठी तर उत्तम.

आत्ता गुंतवणुकीसाठी तो भागही विचारात घ्यायला हरकत नाहीये
आणि जर long term investment साठी प्राधिकरणा मधे वूड्सविले चा प्रोजेक्ट छान आहे

>>या मायबोलीवरच्या पोस्ट बोलक्या आहेत. म्हणजे घर खरेदीस गुंतवणूक हा अजून एक आयाम प्राप्त झालेला आहे. (त्यावर मला टीका करायची नाही पण किमती वाढण्यातला हा एक घटक आहे येवढेच मला म्हणायचे आहे.)
माझा मित्र तर हातावर कर्ज उचलून पहिलयांदा नव्या स्कीम मध्ये प्लॅट बुक करतो. २००५ पासून त्याने अजून तोटा पाहिलेला नाही आणि शेअर मार्केटपेक्षा जास्त परतावा मिळवलेला आहे.

त्यामुळे गुंतवणुकीसाठी प्लॅट विकले जातात आणि ही बाब बिल्डरांच्या चांगली लक्षात आलेली आहे. याचा आणखी एक तोटा असा दिसतो की गॅलर्‍यांचे क्षेत्र कमी झाले, फ्री गॅलर्‍यापासून तर १०० % किमतीच्या गॅलर्‍या झाल्या, ९०० चे २ बी एच्के फ्लॅट ६५० पर्यन्त कार्पेट रिड्यूस झाले तरी त्याची तक्रार कुठे झाली नाही. कारण इन्व्हेस्टरला कुठे रहायचे असते तिथे? त्यामुळे अल्पमतात असलेल्या जेन्युइन ग्राहकाला जे मिळते ते घेण्यावाचून (आणि सांगाल त्या दरावाचून) पर्याय राहिलेला नाही.... त्यामुळे ग्राहकांच्या इच्छेचा अथवा मागणीचा दबाव निर्माण झाला नाही. अन्यथा १ बीएचकेचे बरेच प्रोजेक्ट झाले असते. अ‍ॅफोर्डेबल हाऊस ही 'भिकार' विचारसरणी बिल्दरांनी कधीच सोडून दिली आहे.

बाजो , अगदी सहमत. क्वालिटी देत नाहीत किंमतीच्या मानाने आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून देखील किंमती वाढतात. बाकी पुण्यातील घरांचे दर कमी येतील अशी हवा २००८-०९ च्या रेसेशन काळात पण होतीच, पण काही फरक पडला नाही.

गूंतवणुक करायला पैसा असेल तर सध्या खरचं रियल ईस्टेट सारखा पर्याय नाही. पुण्याच्या कोणत्याही भागा मधे अगदी प्रभात रोड ते वा़कड पर्यंत असे रिसेल चे फ्लॅट मिळतात.

ज्या दिवशी बूकिंग ओपन होइल त्या दिवशी फ्लॅट बूक करायचा आणि ताबा मिळाल्यावर विकून टाकायचा.
मस्त फायदा आहे.

बाळू जोशी

एक clause पण आला आहे की फ्लॅट पझेशन शिवाय विकता येणार नाही.
माझ्या माहिती प्रमाणे हा नियम आधी नव्हता. आता केला.

धन्यवाद अभिजीत, मनस्मि! Happy येस, मलाही ब्लु रीज आवडलय पण हिंजवडी जरा लांब वाटतं. अर्थात प्रदुषण कमी, tech industry साठी सोईचे, आणि अजुन तरी मुलं नाहीयेत so त्यांची शाळा वगैरे अजुन १० वर्षं तरी आहेत, तोपर्यंत तिथल्या शाळा पण develop होतील Lol

राम राम दोस्त लोक्स.
छान चर्चा सुरु आहे. वेळात वेळ काढुन हा धागा मी नक्की वाचतोच. Happy

माझ्या काही टिप्स लोन संदर्भात.

१) काही बॅन्क्या व्याज दर कमी आहेत अशी जाहीरात करतात. त्यावेळी त्यांच्याकडुन हप्त्यांच शेड्युल मागुन घ्या.
एका एक्सेल शीट मध्ये बॅन्कवाले हे शेड्युल देतील. त्यात लोनच्या आउटस्टँडिन्ग अमाउंटच्या किती टक्के व्याज आणि किती टक्के मुद्दल जातेय हे लक्षात घ्या सुरवातीला व्याज दर कमी लावतात बँका पण व्याज मात्र आपल्याकडुन जास्त वसुल करतात.
सरळ आपल्या लोन साठी महिन्याचा हप्ता विचारुन घ्या आणि दोन तीन बॅन्क्यामध्ये तुलना करुन पहा.
२) प्प्रीपेमेंट चार्जेस किती आहेत हे आधीच विचारुन घ्या. काहि बॅन्क्या आउटस्टॅन्डीइन्गच्या २% लावतात.
काही बॅन्क्या असा चार्ज लावत नाहीत. (लोन ट्रान्स्फरला मात्र बॅन्का चार्ज लावतातच)
रिसेशनच्या काळात बॅण्कानी प्रीपेंमेंट चार्जेस २ वरुन ३ टक्के केले होते अस ऐकल मी काही मित्रांकडुन.
३) सध्या आरबीआयच्या सुचनेनुसार फक्त ८०% गृहकर्ह मिळतं Sad
माझ्यासारख्या गरजु लोकाना हा भुर्दंडच की. कारण २५ लाखाच्या फ्लॅटला सुद्धा ५% म्हणजे सव्वालाख रुपये अजुन अ‍ॅडजस्ट करणे आल.
४) प्रोसेसिंग फीची नीट माहिती करुन घ्याच शिवाय एजंटच्या थ्रु जरी लोनसाठी अप्लाय करत असाल तरी एक चक्कर बॅन्केत मारुन घ्या. एसबीआयच्या एका एजंटाने ओळखीतल्या एकाला अन्डर कंस्ट्रक्शन फ्लॅटला देखील बॅन्केची माणसं वॅल्युएशनला येतात अशी थाप ठोकुन हजार रु[पये काढले होते. आपल्याला नेमेके किती आणि कशाचे चार्जेस लावले जात आहेत त्याची बिलं मिळत आहेत का हे नक्की बघा.
५) शक्यतो नॅशनलाइज्ड बॅन्काच चांगल्या लोनच्या बाबतीत.प्रायव्हेट बॅन्कांमध्ये HDFC चांगली आहे.
आयसीआयसीआय ही दरोडेखोर बॅन्क आहे. नका तिच्या वाटेला जाउ.
६) हल्लीच सरकारने सर्विस टॅक्स लावला आहे घरांवर त्यामुळे अग्रीमेंट कॉस्टच्या २५ % अमाउंटवर १२.३% सर्विस टॅक्स आहे. ह्याने बजेट नका कोलमडु देवु. २५ लाखाला साधारण ७५ ते ८० हजार जातो सर्विस टॅक्स.
काही बिल्डर बोक्यासारखे हे पैसे आधी घेवुन ठेवतात. पण सरकारदरबारी ते लगेच जमा नाहियेत करत. त्यांची केस सुरु आहे म्हणे, Sad

बिल्डरला देण्याचे पैसे हे लोन अमाउंटवर देखील ठरतात. समजा फ्लेट २५ लाखाचा (सरड्याची धाव कुंपनापर्यंतच त्यामुळे मी कॅल्क्युलेशनला २५ लाखच घेणार. :हाहा:) आहे. आणि तुम्हाला त्याच्या ८०% लोन म्हणजेच जवळपास २१ लाख लोन (तुमच्या पगाराची अडचण न येता) अप्रुव्ह होणार आहे तर चार लाख रुपये बिल्डरला आपण अग्रीमेंटच्या आधी दिले पाहिजेत.
काहि बिल्डर बुकींगच्या वेळी १ लाखच घेतात आणि काम कितपत झालय त्यानुसार अग्रीमेंट कधी करायच ह्याचा निर्णय घेतात. शक्यतो एक महिन्याचा कमीत कमी कालावधी असतोच. हा जास्त असु शकतो.

<<<जर long term investment साठी प्राधिकरणा मधे वूड्सविले चा प्रोजेक्ट छान आहे.>>>>
वुड्सविले हा प्राधिकरणात येत नाहिये. प्राधिकरणाची हद्द संपते आणि रस्ता जातो त्याला लागुनच हा प्रोजेक्ट सुरु आहे. कॉर्पोरेशन मध्ये आहे प्लॅन. ह्या प्रोजेक्टला लागुनच GAIL च गॅस फीलींग स्टेशन आहे. त्याच भविष्यात वाढणार ट्रॅफिक सहन करण्याची शक्ती हवी. Happy
प्रोजेक्ट चांगलाच असेल कारण आधीच फरांदेच कल्चर क्रेस्ट हा भारी प्रोजेक्ट होता. लोकेशन मस्त आहे.

आणि हो प्राधिकरणात कुठेही फ्लॅट बुक करताना प्राधिकरणाची ट्रान्स्फर फी नामक भानगड असते हे विसरु नये. फार नाही पण तुमच बजेट ताणवण्याइतकी तरी ती असेलच. Happy
शिवाय प्राधिकरणात SBI लोन देत नाही हे ही लक्षात असु द्या. बाकी बॅण्क्या देतात.

दिवसेंदिवस घर घेण प्रचंड अवघड होत चाललय.

प्रायव्हेट बॅन्कांमध्ये HDFC चांगली आहे.>> लोन प्रिपेमेंट, लोन क्लोजर ह्या दृष्टीनं चांगली नाही वाटली..
आयडीबीआयचाही फारसा चांगला अनुभव नाहीये. जुन्याच सिस्टीम वापरताहेत ते अजून अत्यंत त्रासदायक प्रोसेस.

एस बी आय मधे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे.. म्हणजे माझं लोन जर २० लाख रुपये २०२० सालापर्यंत आहे
आणि मी १९ लाखाचं प्रिपेमेंट केलं २०१५ सालापर्यंत, तर २०१५ ते २०२० ह्या दरम्यान मला त्या १९ लाखातले कितीही लाख/हजार पुन्हा उचलता येतात..

झकासराव आणि जोशी जर तुमच्या माहितीत कुठे जागा असेल तर नक्कि सांगा..
बाकि किमती कमी होतील असं उगाचच मला वाटतय, का कुणास ठाऊक..

समीर तुम्हाला तसं का वाटतंय याचं तार्किक कारण सांगितलंत तर बरे होईल. म्हनजे आम्हालाही अशा धरता येईल Happy

माझ्या मते तरी नॅशनलाईज्ड बँका हा पर्याय नेहमीच चांगला आहे.
पण लोकान्ना हल्ली सगळं फास्ट हवं असतं त्यामुळे लवकरात लवकर लोन जिथून उपलब्ध होईल तिथून घेण्याचा कल दिसतो आणि नॅशनलाईज्ड बँकांमधे डोक्युमेंट्स जास्त द्यावी लागतात आणि प्रोसेस्ला जरा वेळ लागतो. पण ऑव्हरऑल इंटरेस्ट रेट मधे प्रायव्हेट पेक्षा नॅशनलाईज्ड चांगला ऑप्शन आहे, का दोन्हि सारखचं?

सम्या नॅशनलाईज्ड बँकात प्रोसेसिंग फर स्लो असते, शिवाय एलिजिबिलिटी पण कमी सांगतात फार... मला एसबीआय ने माझी एलिजिबिलिटी तेव्हा ६,००,०००/- च्या वर लोन देणार नाही म्हणलेलं.. एचडीएफसी ने मला १२,५०,०००/- चे लोन एका दिवसात दिले...

झकासराव २५ लाखात पुण्यात कुठे फ्लॅट मिळतो ते सांगशील काय? ४-५ घेउन ठेवतो लगेच

अहो जोशीसाहेब,
२५ लाखातच का ? अगदी १८-१९ लाखात २ बीएचके आणि १०-१२ लाखात १ बीएचके फ्लैट उपलब्ध आहेत,आळंदी रोड ला (गाववजा) दिघीमध्ये ...(पुणे स्टेशन १२ किमी,भोसरी ४ किमी,विमाननगर १२ किमी वर)
पण बाकी लोकेशन, सोयी मात्र अजुन तरी नाहीत,जसे मार्केट्,मंडई ,पेट्रोल पंप इत्यादी, शेजारी आर्मी एरिया,डोंगर आणि हिरवीगार झाडी असल्यामुळे शुद्ध ऑक्सीजन मात्र भरपुर आहे ..

बाळू जी ओळखितला मॅनेजर असला तरिही एचडीएफसी ने आधी ऑफर केलेली अमाऊंट ही मिळालेल्या लोनपेक्षा दिड लाखाने कमी होती फक्त... तुम्हीच सांगा मग ६ लाख कुठे आणि ११ लाख कुठे ते...

हुडा, ३५-४० लाखांत २बीएचके अजूनही सगळ्या ठिकाणी मिळतात. तेही पीएमसी आणि पीसीएमसीच्या हद्दीतच.

बाळू, २५ लाखांतही फ्लॅट मिळतील. (इथे मायबोलीवर देखील जाहिराती आहेत. पण बीबी वाचले जातात, तशा जाहिराती बघितल्या जात नाहीत, हे दुर्दैव). थोडे बाहेर जावे लागेल इतकेच. उंड्री, आंबेगाव, सूस, तळेगाव, खडकवासला रस्ता इ. अनेक ठिकाणी. ही ठिकाणे आता दूर वाटतात. पण उदाहरणार्थ डीएसके विश्व, इतकेच काय, सनसिटीही लोकांना दूर वाटत होती. आता तिथे अनुक्रमे ३५०० आणि ४५०० भाव आहेत! Happy

(अवांतर : बाकी हुड आणि बाळू यांची बजेट्स वेगवेगळी आहेत, हे वाचून करमणूक झाली. Proud )

धन्यवाद दक्स,
पण माझा प्रश्ण कोण किती लोन देइल हा नाहिये. मला जाणकारांकडून हि माहिती हव्ये कि प्रायव्हेट बँक आणि नॅशनलाइज्ड बँक ह्या दोन्हिमधे जर पूर्ण देय रक्कम काढली तर कुणाकडून लोन घेणं फायद्यात पडेल?

बहुतांशी नॅशनलाइज्ड बँकांचे व्याजदर प्रायव्हेट बँकांपेक्षा कमी असतात आणि छुपे खर्च, प्रिपेमेंट चार्जेस फार नसतात.... त्यामुळे कधीही नॅशनलाइज्ड बँकेकडुन लोन घेणं फायद्यात पडते!

Pages