Submitted by के अंजली on 3 June, 2010 - 04:54
लहानपणी आम्ही नातवंडे जमलो की आजीच्या पोतडीतून एकएक किस्से, गंमतीजमती गाणी आणि छान छान कोडी निघत असत.आजी गेली अन ते सार संपलं,
आज काही काहीच त्यातली कोडी मला आठवताहेत. तुम्हालाही काही माहिती असतील तर मला लिहाल?
एक दोन त्यातली आठवताहेत ती इथे लिहीतेय, उत्तरे सोपी आहेत,पहा!
१. कुट कुट काडी पोटात नाडी
राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी
२. एवढस कार्टं घर कसं राखतं
३. पांढरं पातेल पिवळा भात
न ओळखेल त्याच्या कमरेत लाथ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती म्हणाली ३-११ २११ सांगा बर
ती म्हणाली ३-११ २११
सांगा बर तिच नाव काय?
<<<
दिलीप, LOL इन्टरेस्टिंग आहे कोडे.
नमस्कार जीडी, मी इथे फक्त
नमस्कार जीडी,
मी इथे फक्त सुट्टीच्या दिवशी.
मुलीचे नाव आशा
३-११ म्हण जे आ २११ म्हणजे शा
पुरूष असून पर्स वापरतो वेडा
पुरूष असून पर्स वापरतो
वेडा नसून कागद फाडतो
असा माणूस कोण ?
कंडक्टर...... बस वाहक
कंडक्टर...... बस वाहक
डॉ. साहेब आपण बरोबर ओळखलत.
डॉ. साहेब आपण बरोबर ओळखलत. दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
i have four letters My first
i have four letters
My first letter has two circles in it
My second letter is in their, but not in there
My third letter is twice in rare.
My fourth letter of dog
काकाकाकाकाकाकाकरता या वाक्यात
काकाकाकाकाकाकाकरता या वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.
काका, ''काका काका'' का करता?
काका, ''काका काका'' का करता?
Bird
Bird
दिलीप, ३११२११ = आशा
दिलीप, ३११२११ = आशा
गजानन, नमस्कार, ३११२११ = आशा
गजानन, नमस्कार,
३११२११ = आशा नाही
३-११ २११ = आशा !
मला एक असे नाव हवे आहे ज्याचा
मला एक असे नाव हवे आहे ज्याचा अर्थ सुन्दर व हेल्दी (स्वस्थ) असा होइल मला माझ्या मैत्रिनिच्या क्लिनिकसाथि नाव हवे आहे >> स्वास्थ्य
माझ्याकडुन काही १. पाणी
माझ्याकडुन काही
१. पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं
कात नाहि, चुना नाही, तरी तोंड कसं रंगल
२. पाटिल बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब
३. खण खण कुदळी, मण मण माती
इंग्रजांनी राज्य घेतले मध्यराती
४. हरीण पळतंय, दूध गळतयं
५. एव्हढिशी नार, तिचा पदर फार
६. सुपभर लाह्या, त्यामध्ये रुपया
७. चार आले पाहुणे, चार केले घावणे
प्रत्येकाच्या तोंडात दोन दोन
८. इतकासा गडू पाहुन येते रडू
ओळखा पाहू
हरीण पळतंय, दूध गळतयं >>>
हरीण पळतंय, दूध गळतयं >>> jaate?
१ पोपट ६ चन्द्र , चान्दण्या ८
१ पोपट
६ चन्द्र , चान्दण्या
८ कान्दा
५ खार ? ?
५ खार ? ?
हबा -->>बरोबर cutepraju पहिले
हबा -->>बरोबर
cutepraju पहिले तीन बरोबर
आता उरलेले ओळखा
२. पाटिल बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब
३. खण खण कुदळी, मण मण माती
इंग्रजांनी राज्य घेतले मध्यराती
५. एव्हढिशी नार, तिचा पदर फार
७. चार आले पाहुणे, चार केले घावणे
प्रत्येकाच्या तोंडात दोन दोन
पाटिल बुवा राम राम, दाढी मिशा
पाटिल बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब
कणीस
३=घड्याळ?
सह्हीये भरत एकदम करेक्ट
सह्हीये भरत

एकदम करेक्ट
२. मकयाचे कणिस ५. सुई आणि
२. मकयाचे कणिस
५. सुई आणि धागा
३=घड्याळ?>>>>>नाही svalekar
३=घड्याळ?>>>>>नाही
svalekar >>>>दोन्ही उत्तरे बरोबर
घड्याळ कसे? नाही समजले.
घड्याळ कसे? नाही समजले.
गजानन, घड्याळ हे उत्तर
गजानन, घड्याळ हे उत्तर चुकलेलंच आहे.
३. घूस ७. खाट
३. घूस
७. खाट
३. घूस ७. खाट
३. घूस
७. खाट
३. घूस ७. खाट
३. घूस
७. खाट
.
.
रविंद्र, दोन्ही उत्तरे बरोबर
रविंद्र, दोन्ही उत्तरे बरोबर
(पण तीनदा का? :))
You tried to access the
You tried to access the address http://www.maayboli.com/comment/reply/16662, which is currently unavailable. Please make sure that the web address (URL) is correctly spelled and punctuated, then try reloading the page.
हा मेसेज वारंवार मिळाला.
ओह्ह!! नो प्रॉब्लेम
ओह्ह!! नो प्रॉब्लेम
Pages