Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वर्षा_म, तु़झे साबु साबांच्या
वर्षा_म, तु़झे साबु साबांच्या अगदी ऐकण्यातले आहेत वाटतं!! तुझा नवरा आहे की नाही तुझ्या ऐकण्यात?
स्वप्ना.. बये ते माझ्या
स्वप्ना.. बये ते माझ्या साबा-साबुंचा संवाद नाहीये... माझ्या नशीबात नव्हते ग माझे साबु पहाणे.. माझ्या लग्नाच्या आधीच ते देवाकडे गेले
वर्षा बघितलास माझा वेंधळेपणा
वर्षा बघितलास माझा वेंधळेपणा तुझा किस्सा समजून तुलाच पोस्टले....सॉरी मानुषीला लिहायचे होते....असो..
माझ्या बहिणीचा एक
माझ्या बहिणीचा एक वेंपचाकि:
मी, नवरा, मुलगी, माझी अमेरीकेतली बहीण आणि तिचा नवरा असे आम्ही सगळे अलास्काला गेलो होतो. तिथल्या देनाली नॅशनल पार्कात राहून काही ट्रेक्स करायचे होते. त्या भागात ग्रिझली अस्वले असतात. ती हल्ला वगैरे करू शकतात म्हणून ट्रेकिंग करताना जवळ 'बेअर स्प्रे' ठेवावा लागतो. आम्ही तो घेऊन गेलो होतोच. तर त्या स्प्रेवर सुचना होती की एकदा तो घरी वापरून बघावा (- हो ना, नाहीतर समोर ते भलेमोठे ग्रिझली बेअर उभे आणि आपण इथे स्प्रे कसा वापरावा याची सुचना वाचतोय अशी वेऴ यायची!)
तर, सकाळी सगळे रुममध्ये तयार होत असताना माझ्या बहिणीने ती सुचना वाचून अजिबात डोकं न वापरता, रुममध्येच जोरदार 'बेअर स्प्रे' मारला. आणि मग तिच्यासकट आमची जी काय वाट लागलेय ना! त्याच्यात भरलेल्या मिरचीच्या तिखटजाळ पाण्यानं खोकून खोकून आणि शिंकून शिंकून जीव नकोसा झाला. सगळे बाहेर पळून चांगले १५-२० मिनिटं खोकत होतो. डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहतयं - त्यातच हसू ही येतयं. शिवाय सगळे बहिणीला ओरडतायत. ही बिकट परिस्थिती मग जरा वेळानं आटोक्यात आली.
मग आम्हाला त्या 'ग्रिझली बेअर्स'चं एवढं वाईट वाटायला लागलं. एकतर आपण त्यांच्या परिसरात आपल्या मजेखातर जाणार आणि मग जर ते आपल्यावर चाल करून आले तर त्यांना ही शिक्षा देणार....
केसाना शँपूऐवजी, दाढीचा साबण
केसाना शँपूऐवजी, दाढीचा साबण लावला..
परदेसाई, असं एका वाक्यात
परदेसाई, असं एका वाक्यात नाही. सविस्तर सांगा. आधी वातावरणनिर्मिती, मग प्रत्यक्ष कृती, मग परिणाम.
फोटो टाकला तर अधिक चांगल.
फोटो टाकला तर अधिक चांगल.
.
.
परदेसाई काय ऑटोक्लिक कॅमेरा
परदेसाई काय ऑटोक्लिक कॅमेरा घेवुन आंघोळ करतात का ... काय अनिलभाई
केसाना शँपूऐवजी, दाढीचा साबण
केसाना शँपूऐवजी, दाढीचा साबण लावला.. >>>>>>>>>>>
मी पण एकदा शांपू ऐवजी डायरेक्ट कंडिशनरच लावलं. (चष्मा न घालता नुस्ती बाटली पाहून )आणि डोळे मिटून (मिटावेच लागतात ना!)वाट पहात बसले की आत्ता फेस होईल मग होईल..पण फेस झालाच नाही. मग विचार केला ," काय बै तरी एकेक शांपू ...असेल बै नवीन काही तरी टेक्निक....बिन फेसाचा शांपू!..काही तरी नवीनच काढतात एकेक!"
मग केसांची काही तरी विचित्र अवस्था झाली( म्हणजे आधी होती त्यापेक्षाही!). मग चष्मा लावून नीट बाटलीवरचं वाचलं........................!
केसाना शँपूऐवजी, दाढीचा साबण
केसाना शँपूऐवजी, दाढीचा साबण लावला.. >>>>>>>>>>
फेस तर होतोच की .... झाले तर मग ...
निळ्या मानुषी नेक्ष्ट
निळ्या
मानुषी नेक्ष्ट टायमाला ट्राय कर बरं निळ्यानी सांगितलेला उपाय
काल काही कामा साठी मले फोन
काल काही कामा साठी मले फोन लावायचा व्हता पण तो म्हाये नंबर वरुन लावायचा नव्हता म्हणुन मैत्रीरणी कड पडलेल सीम घेतल ( त्याचा नंबर तीले आठवत नव्हता) रीचार्ज माराया गेलो, दा रुपयाच वावचर घेतल आणी दुकाणदाराला "ह्याचा नंबर मले ठाव न्हाय तो कसा मीळेल"
इथ समद्यांनि माजी आवठन काढली वाचुन लई बर वाटल बघा
अन आज बर्रेच दिसांनी मा. बो. येण्याचा योग आला, मा. बो. च दरसन झाल म्हणुन लई लई धन्य धन्य वाटतया बघा. समद्यांना राम राम बर का 
आर हो, मागल्या आठवड्याला
आर हो, मागल्या आठवड्याला बाहिर जातांना दाराला बाहेरुन कडी लावुन गेलो, आत दोन रुम-मेटस व्हत्या पण मधी कोणी न्हाय अस दारा बाहेर पडल्यावर वाटल म्हणुन ओढल दार न लावली कडी
रस्त्यात ट्युब पेटली परत माघारी जाण्याचा ईचार केला मग म्हटल जाऊ दे ऊघडल कोणी तरी

समे ... शेवटी माहेर सापडलेच
समे ... शेवटी माहेर सापडलेच म्हणायचे !

स्वगृही स्वागत असो ...
मग आम्हाला त्या 'ग्रिझली
मग आम्हाला त्या 'ग्रिझली बेअर्स'चं एवढं वाईट वाटायला लागलं. एकतर आपण त्यांच्या परिसरात आपल्या मजेखातर जाणार आणि मग जर ते आपल्यावर चाल करून आले तर त्यांना ही शिक्षा देणार...>>>>>>>
त्यांनी आपल्याला दिलेली शिक्षा अजून भयानक असणार ...
दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने तो स्प्रे बरोबरच आहे ...
माझ्या मैत्रिणीचा वेंधळेपणा
माझ्या मैत्रिणीचा वेंधळेपणा :
मैत्रिणीच्या नात्यातल लग्न होत. हीने भारीतली साडी नेसली. (ऑफ व्हाईट कलरची साडी चॉकलेटि काठ)छान मेकप केला. (लीप्स्टिक वगेरे)परफ्यूम मारला. नवीन पर्स घेतली. दागिने घातले. रिक्शाने लग्नाला गेली. तिथे सगलीकडे मिरवून झाल्यावर नातलगाबरोबर पाय हलवत गप्पा मारायला बसली. बोलता बोलता तिला कायतरी खटकल. म्हणून तिने आपल्या पायाकडे पाहिले. आणि.. आणि.. त्वरीत आपले दोन्ही पाय साडीखाली लपवले. का माहीत आहे तीने पायात घरी घालण्याच्या फेंट लव्हेंडर रंगाच्या स्लीपर घातल्या होत्या.
आहे की नाही भन्नाट................
ऑफीसमध्ये क्लायंट येणार
ऑफीसमध्ये क्लायंट येणार असल्याने लवकर जायचे होते.
सकाळी झोपेतून लवकर ऊठुन दाढी करायला घेतली. जाम वैताग!! दाढी च्या ब्रश वर फेस तयार होईना. मग झोपाळलेल्या डोळ्यांनी अजून ट्यूब खाली केली ब्रश वर. तरीही तेच. मग तशीच गालावर घासायाला लागलो अन टूथपेस्ट्चा वास आला अन खाडकन झोपाळलेले डोळे ऊघडले.
बघतो तर काय, अर्धी च्या वर टूथपेस्ट् संपलेली ( दाढीच्या ब्रशवर)
दिवस भर गालावर टूथपेस्ट्चा वास दरवळत होता.
आता नेहेमी टूथपेस्ट आणि दाढी ची पेस्ट वेगवेगळ्या ड्रावर मध्ये ठेवतो.
शक्यतोवर रात्रीच झोपायच्या आधीच दाढी ऊरकतो.
कशाला ऊगाच धोका पत्करायचा,
टूथपेस्ट गालावर ठीक आहे, पण दाढी ची पेस्ट टूथब्रशवर, यक्क!!!
चला समूचं प्रदीर्घ
चला समूचं प्रदीर्घ कालावधीनंतर पुनर्पदार्पण झालं आहे. माझी चिंता मिटली. वेलकम गं समू! एनीवेज तुझ्या रूममेट्स निघाल्या का रूममधून फायनली?
मानुषी, तु वेंपणा करुन खुप
मानुषी,

तु वेंपणा करुन खुप दिवस झाले ...
अनील............!
अनील............!
नमस्कार मंडळी कस काय बर हाय
नमस्कार मंडळी कस काय बर हाय ना!!!
म्हा आलेय माझा लेटेस्ट वे. पणा घेऊन
गेले २ दिस मी कस्ट्मर केअरचा फोन नंबर कस्टमर कोड समजुन लॉग्-ईन होण्याचा अफाट प्रयत्न केला
, आपण एंटर करत असलेला कोड फोन नंबर सारखा वाटतो अस कैकदा मनात आल तरी 
तर त्याच झाल अस कि, म्ह्या D-Mat Account म्हणजी शेअर ट्रेडिंग का काय असत ना ते, त्याच खात ऊघडल. त्या नंतर एकदा तीथल्या साहेबा कड जाऊन Online Trading करण्यासाठी लागणार Cutomer Code, Login Id, Trading Id हे समद घेऊन/समजुन आलो. एका चिटुर्यावर हे समद लिखाटुन पण आणल. मंग आता २-३ दिसा पासुन ट्रेडिंग च लॉग-ईन करण्याचा १००००० एळा परयत्न केला पण ते काय व्हईच ना, Cutomer Care ला फोन लावले (जे कधीच कुणीच ऊचलले नाई
) पण काय उपोग न्हाय झाला. माझे प्रोब्लेम साठी म्हा नेट वर सर्च मारला. System Settings चेंज केले. मैत्रीणीला ट्राय माराया लावले समद समद केल बघा पण काय उपेग झाला न्हाय.
शेवटी आज तीथल्या साहेबाले फोन लावला, त्याने मले समदे डिटेल ईचारले तेव्हा मले समजले म्हा काय करत व्हतो
राज्ज कि बात : म्हा त्या चिटुर्यावर (Cutomer Care साठी) CC अस लिहुन त्या पुढे फोन नंबर लिहला होता आणी Cutomer Code नुसताच कोड लिहला होता ते काय आहे न लिहता, म्हणुन CC हे कस्ट्मर कोड हाए असे मले वाटत होते
..... हुश्श!!!!
मानुषी, निघाल्यात कि त्या
मानुषी, निघाल्यात कि त्या बाहिर
मागल्या आठवड्यात म्ह्या सेल चार्जींगला लावला, तीकड चार्जींग सुरु असे पर्यंत दुसरी काम ऊरकली, मंग बर्याच एळाने सेल बघीतला तर एका काडीच पण चार्जींग झाल नव्हत आणी चार्जींग होतांनाचा काडी डान्स पण व्हत नव्हता
ईज गेली कि काय वाटल पण ट्युबा सुरुच व्हत्या, मग प्लग कड बघीतल्यावर ध्यानी आल म्ह्या चार्जर प्लगाडला पण कळ दाबाया ईसरलो व्हतो.
हे अस ३-४ एळा झाल म्हाये कडुन मागच्या काही दिसात 
रेल्वेचा वेंधळेपणा मी गेल्या
रेल्वेचा वेंधळेपणा
मी गेल्या आठवड्यात रात्री व्हीटिहून कुर्ला लोकल मध्ये चढले. नंतर प्रत्येक स्टेशनवर प्रवासी महिला चढत होत्या. माटुंगा गेल्यानंतर एका महिलेने मला विचारले की विक्रोळी केव्हा येते? मी तिला सांगितले की ही ट्रेन कुर्ल्यापर्यंतच जाते. ती म्हणाली, कसे शक्य आहे?इंडिकेटर वर तर टिटवाळा लिहिले होते. सर्व जणी असेच म्हणू लागल्या. नंतर कळले की व्हीटीनंतरच्या कुठल्याच स्टेशनवर इंडिकेटर बदलला नव्हता. त्यामुळे आधीच्या टिटवाळा ट्रेनचे डिटेल्स दाखवले जात होते.
आणी चार्जींग होतांनाचा काडी
आणी चार्जींग होतांनाचा काडी डान्स पण व्हत नव्हता>>>
रस्त्यातून चालताना अचानक समोर
रस्त्यातून चालताना अचानक समोर आडवा आलेल्या कुत्र्याला Sorry बोलायचा वेंधळेपणा मी केलाय......!!!!
आणि मी चक्क दोन वेळा Sorry बोलले........
<< आणि मी चक्क दोन वेळा Sorry
<< आणि मी चक्क दोन वेळा Sorry बोलले........>>
कुत्रा कितीवेळा बोलला मग ? नाही बोलला ? म्यानरलेस कुठला
९ वाजता टि.व्हि. लावला..रिमोट
९ वाजता टि.व्हि. लावला..रिमोट चालत नव्हता म्हणुन अलार्म क्लॉक मधलं सेल काढुन त्यात घातलं, रवीवर सकाळ म्हणुन निवांत टि.व्हि. बघत बसलो चहा घेत.. थोड्या वेळाने खूपच भूक जाणवयला लागली.. म्हंटल आज सकाळीच भूक लागली आपल्याला.. सव्वा ९ च झालेत. नवरा ही म्हणाला बघ लवकर उठलं कि लवकर भूक लागते..सहज मोबाइल पाहीला तर चक्क १२:३० झालेले होते.. नवरा आणि मी दोघेही हसत सुटलो :फिदिफिदि:
आमच्या कडे पूर्वी दोन
आमच्या कडे पूर्वी दोन भांड्यांचा मधे मातीचीकँडल असलेला वॉटर फिल्टर होता. एकदा बाबांना काम करायची हुक्की आली. त्यांनी पाहिले कि फिल्टरच्या वरच्या भांड्यात पाणी नाही. भरून मोकळे झाले. खालचे भांडे आधीच फिल्टर्ड पान्याने भरलेले होते ते पाहिले नाही, मग घरात छान तळे नाही तरी डबके झाले.>>>>>>>>>>>>>>>>>>>
आमच्याकडे अजूनही आहे तसा फिल्टर. मी पण एके दिवशी बाबा घरात नसताना हेच केले होते आणि ऑफिसला निघून गेले, रात्री घरीयेऊन बघते तर काय........ !!!
मी रोज हापिसात एकदातरी हमखास
मी रोज हापिसात एकदातरी हमखास माउस समजुन मोबाईल हलवुन बघते.. >>>>>>
मी तर हे नेहमीच करते!!!

Pages