मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

नमस्कार मानुषी,
सर्व पायर्‍या परत लिहील्याबद्दल आभारी आहे.

>>मग डाव्या बाजूला खाते दिसते. यूजरनेम खाली नवीन लेखन करा. त्याखाली सदस्यत्व, त्याखाली जाण्याची >>नोंद. मग जाण्याची नोंदवर टिचकी मारून लॉगाउट झाले की परत लॉगिन करताना तो पासवर्ड चालतच नाही.

कुठल्या पानावरून लॉगिन करता तुम्ही?
तुमच्या ब्राउजरमध्ये पासवर्ड साठवून ठेवलेला आहे का? तो आपोआप भरला जात नाही ना?
तुम्ही स्वतःच टाईप करून पासवर्ड घालता ना?
आणि अजून एक म्हणजे परत लॉगिन करताना पासवर्ड घालण्यापूर्वी 'Ctrl + \' वापरून भाषा इंग्लिश करा आणि मग पासवर्ड देऊन बघा.
तुमचा पासवर्ड हा नोटपॅडमध्ये टाईप करून कॉपी करा. आणि तो पेस्ट करून बघा पासवर्डसाठीच्या जागेत तसेच पानाच्या शेवटी असणार्‍या गूगल सर्च बॉक्समध्ये, जेणेकरून तो कुठल्या भाषेत [युनिकोड का ईंग्रजी] उमटतो आहे ते तरी कळेल.

धन्यवाद नंद्या
हो मी मायबोली उघडते..तिथे नवीन अकाउंट उघडा म्हणते. तिथे अकाउंट आहे पासवर्ड विसरलात का? नवीन पास्वर्डसाठीची प्रोसेस करते. पुढील सूचना तुमच्या इमेलमधे आहेत असा मेसेज.
नंतर तिथे लिंकवर क्लिक केल्यावर इमेल आड्रेस लिहिण्यासाठी सेटिंग इग्रजी करावे लागते. ते तसेच ठेऊन खाली दोनदा पास्वर्ड टाईप करते. तिथे तो मॅच होतो त्यानंतर एकदम येण्याची नोंद असं येतं..तिथे मी पासवर्ड टाईप करत नाही. त्यावर क्लिक केल्यावर डायरेक्ट आपल्या आकाउंटचा फ्रंट पेज दिसतो.
आता जर जाण्याची नोंद करून पुन्हा नव्याने सुरवात केली तर आधी २दा टाईप केलेला पास्वर्ड दिला तर ...काही तरी गडबड..हा मेसेज येतो.

नंद्या, मी तुझ्या युक्तीनं त्या पानावर गेले. पण पुढच्या पानावर क्लिकल्यावर तोच एरर मेसेज दिसतोय.
तुझं म्हणणं, त्यातल्या अर्काईव्हच्या पानांवर पुन्हा पुन्हा जाऊन पुढलं पान बघावं लागणार का काय?
मलाच इथे लिहिताना काय लिहिलं ते कळत नाहीये... कुणाला काय समजाऊन सांगणार!
म्हणजे तिथलं सगळं इथे आणावं लागणार का काय?

चिन्या १९८५ - त्या दोन्ही मोबाईलवर युनिकोड सपोर्ट असल्यास मायबोली दिसेल. अन्यथा चौकोन चौकोन येतील.

shugol डाव्या बाजूला हिरव्या रंगात छोट्या जाहिराती अशी लिंक दिसते, तिथे उजव्या कोपर्‍यात वरती 'नवी जाहिरात' असा दुवा आहे, त्यावर क्लिक करा. अकाउंट उघडा आणि जाहिरात सबमिट करा.

" कामा हॉस्पिटल....२६ नोव्हेंबर २००८" ह्या लेखात काही फोटो टाकायचे आहेत. पण खाजगी जागा मध्ये send to text area हा ऑप्शनच दिसत नाहीये.काय करू?:(

तुम्ही जर आधी प्रतिसादाची/लिखाणाची चौकट उघडली नसेल तर कुठल्या टेक्स्ट एरीयात फोटो पाठवायचे हे कळले नसावे दृपालला. तुम्ही लेखाच्या संपादनमध्ये जा आणि मग तिथे जावून इमेज अपलोड करण्यासाठी 'सेन्ड टू टेक्स्ट एरीया' हा पर्याय दिसतो का बघा. असे केले तरीही हा पर्याय दिसत नसेल तर प्रशासकांना तसे कळवावे लागेल.

supriyal सर्व भाग इथे सापडतील.
जयेंद्र, मदतपुस्तिकेत त्यावर एक धागा आहे - मदतपुस्तिका --> लेखनासंबंधी प्रश्न --> लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा. तो बघावा.

वाकुरे - फोटो ज्यांचे आहेत त्यांना विचारायचे , हे फोटो मी डाउनलोड करू का?
त्यांनी हो म्ह्टले की मग करायचे.

रुनी, मला एका मराठी पुस्तका बद्दल विचारायचे आहे. कथासरित्सागर हे पुस्तक मी ४५ वर्षांपुर्वी वाचले होते. गूगुल वर पाहिले पण मराठीत नाही मिळाले. त्या बद्दल माहिती हवी आहे, कुठे लिहु?
सुमंगल.

>>पाऊलखुणा मधे दिसते पण माबोवर दिसत नाही
हँ ?

नवीन लेखनात दिसत नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?
तसे असेल तर, थोड्या मागच्या पानांवर बघितलेत का? तिथे असेल.

भावना हा धागा वाचा व त्याप्रमाणे माहिती पुरवा. http://www.maayboli.com/node/10008
अमित मदपुस्तिकेत धागा आहे "लेखनासंबंधी" मध्ये "प्रकाशचित्रे कशी चढवायची" याबद्दल.

>>पहिलेच पान येते आहे.
हे कशावरून म्हणता ?
दुसर्‍या पानावर जाण्यासाठी कुठे क्लिक केले आहे?
तिथे क्लिक केल्यावर जी यूआरएल येते ती इथे लिहीणार का?
मी वरती दिलेल्या लिंकवर जाता येते आहे काय?

Pages