मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ताच NDTV च्या SMS नुसार - 5 to 6 terrorrists believed to be loose in the city... हे खरे असेल तर धोका अजूनही आहेच!

>अरे, इथली बरीच मंडळी अन त्यांचे बाहेरचे गॉड्फादर यांनी करकरेंच्या ए टी एसविरुद्ध काल रात्रीपर्यन्त गरळ ओकली होती ना? आता एकदम नक्राश्रू? ये बात हजम नही हुई..
अरे मित्रा.. सारासार विचार बुद्धी घरी वाळत घालून इथे येतोस का..?
मनुष्य गेल्यावर सर्व वाद विवाद सम्पतात, गेलेल्या आत्म्याच्या सद्गतीसाठी प्रार्थना कराय्ची हिंदू संस्क्रूती आहे. त्यातही करकरे यांच्या शौर्य अन कारकीर्दीबद्दल सर्वाना अभिमानच आहे..
तू मालेगावच्या तपासाच्य अनुशंगाने म्हणत असशील तर अशा प्रभावी अन प्रामाणिक माणसाच्या हाताखाली चौकशीत असे contracdictory सर्व कसे काय चालते याचेच आश्चर्य होते.. अन त्याविरुध्ध इथे कुणि काही लिहीले वा प्रतिक्रीया दिली म्हणजे करकरेंविरुध्ध गळा काढला असे होत नाही.. तेव्हा पोस्ट लिहीताना जरा थोडा common sesne (शिल्लक असल्यास) वापरत चला....
इथे काय संकट आले आहे अन या टोणग्यांन्ना काय सुचते आहे...? कमाल आहे राव...

हो मला ही तीच भीती वाटते आहे की संकट अजुनही भिरभिरतंय.. सगळ्यांचं लक्ष ताज, ओबेरॉय आणि नरिमन हाउस वर असताना अतिरेकी दुसरीकडे हल्ले करण्याची शक्यता नाकारता येत नाही.. मुंबईकरांनो काळजी घ्या.. खरंच शक्यतो घराबाहेर पडू नका...

नरिमन हाऊस इथे अनेक ज्यू कुटुंबे राहतात असे ऐकले. या हल्ल्याला अनेक धार्मिक पदर आहेत म्हणायचेत. सगळ्या चॅनेलवरचे गुर्हाळ आणि लाईव प्रक्षेपण काही काळ बंद करायला हवे.. त्यामुळे अनेक गोष्टी चुकिच्या पद्धतिने प्रसृत होत आहेत.. त्या इन्डिया टिव्ही वाल्याने तर थेट अतिरेक्यांशी फोनवर गप्पा मारल्या.विशवाश्वासार्हता मुळीच नाही त्यांच्याबद्दल! अश्यामुळे कमांडोंना कारवाई करतानाही अडथळा येत असणार!
_______________________
-Impossible is often untried.

सैन्य व NSGचे २०० अधिकारी ओबेरॉयमध्ये शिरले आहेत. गोळीबाराचे आवाज येत आहेत.. अतिरेक्यांशी बोलणी होऊ शकलेली नाहीत..

मढ्याच्या टाळूवरचे लोणी आणि सामान्यांच्या चितेवर स्वत:च्या भाकरी भाजणार्‍यां राजकीय पक्षांनी आता आपला स्वार्थ त्यागून एकत्र येण्याची वेळ आलिये....
ह्याच्यामुळे असे घडले म्हणण्यापेक्षा असे का घडते... आपल्या राजकिय पोळ्या भाजण्याकरीता आपण कसे सामान्य जनतेच्या जीवाशी खेळतोय आणि असे खेळत असताना पर्यायाने देशाला खाईत ढकलीत आहोत ह्याची जाणिव आता ह्यांना व्हायला हवी... आणि प्रत्येक राजकिय नेता जर स्वत।अला ह्या देशाचा तारण हार मानत असेल तर एकमेकांवर चिखलफेक करीत बसण्यापेक्षा एकत्र येऊन अश्या संकटाचा मुकाबला करायला हवा!
पण आमचे स्वार्थ जो पर्यन्त आड येतायेत तो पर्यन्त हे शक्य होईल??

एके ४७ सारख्या बंदुका आणि स्फोटके घेउन समुद्री मार्गाने अतिरेकी शहरात प्रवेश तरी कसे करतात? एरवी सामान्य माणूस परदेशातून काही चोरून तर आणत नाही ना ह्याची सखोल तपासणी करणारे, एवढी प्रचंड स्फोटके आणि बंदुका घेऊन येणार्‍यांना अटकाव का नाही करू शकत! जर आमच्या कुठल्याही राजकिय पक्षाला हे थांबविणे शक्य नसेल तर आता जनतेच प्रतिसरकार चालवावे काय?
समस्त राजकिय पक्षांना एवढेच सांगावे वाटते की ही वेळ तुम्हा सर्वांच्या दांभिक देश प्रेमाने आलिये! आता एकत्र येऊनच ही दहशात थांबविता येईल एकमेकांवर दोषारोप ढकलून नव्हे!

पुनम ला अनुमोदन. करकरें चा असा शेवट खरच अस्वस्थ करुन गेला.

इथे गळा काढणारानी एखादी ग्रामपंचायत तरी चालवून दाखवावी! >>
निदान मतदान तरी न चुकता करावे, देशातील आणि विदेशातील भारतीयांनी.

असो, ही वेळ नाही हे बोलण्याची.

अरे, इथली बरीच मंडळी अन त्यांचे बाहेरचे गॉड्फादर यांनी करकरेंच्या ए टी एसविरुद्ध काल रात्रीपर्यन्त गरळ ओकली होती ना? >>>

टोणग्या तेव्हा करकरे जातिल असे जिऐस ला माहीती न्हवते. जि ऐस ने जे लिहीलय ती सर्व व्यक्तव्या करकर्‍यांचीच आहेत, त्याने फक्त विरोधाभास दाखवून दिला. ह्यात नक्कीच काही चूक नसावी. तेवढे मत व्यक्त करन्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.

आणी तिथे कॉमेंट करतना मलाही ते जातील हे माहीती न्हवते की ते आज जाणार आहेत नाहीतर नक्कीच केली नसती.. मेलेल्या माणसा बद्दल नक्कीच वाईट वाटते. मग तिथे असनारा ऑफीसर "सलीम वा मूश्ताक " असला असता तरी.

ते गेले हे नक्कीच चूक झाले पण ते ज्या पध्दतीने परिस्तिथीला न समजता सामोरे गेले हे त्यापेक्षा जास्त चूक.

तू परिस्तिथीवर भाष्य करायच्या ऐवजी हे का लिहीत आहेस? त्या बॉम्बस्फोटाचा साधा निषेध तूझ्या पोस्ट मधून दिसला नाही.

आणि हो फक्त माझ्या बाबतीत बोलायचे तर माझा गॉडफादर मी स्वतः आहे. कोणी दिल्लीतली बाई नाही. मी "डोळस नागरिक" आहे आणी राहनार. (इथे कोणाला मान्य नसले तरी)

उगीच कशाला वादविवाद इथे. सरकारने वेळीच योग्य पावल उचलली असती तर असे हजारो बॉम्बस्फोट झाले नसते आणी ते सर्व करनारे मुसलमान आहेत ही देखील फॅक्ट आहे ही फॅक्ट तू नाकारत आहेस, त्याची चिडचिड म्हणून हे पोस्ट.

आदरवाईज तू पंडित आहेसच. (रेफ तूझीच सिग्नेचर)

नंतरची भर - मी लिहीतानाच योग ने वर योग्य लिहीले.

कृष्णाजी,
तुम्ही म्हणता ते कधीही होणार नाही हे अतिरेक्यांना माहितीये त्यामुळेच तर....
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रधानमंत्री आणि विरोधी नेते मुंबईला एकत्रीत भेट देणार आहेत, चांगली सुरवात आहे. हे युद्ध आहे, आणि युद्धात समस्त भारतीयांनी एकत्र यावे असा आदर्श जनतेला दिसेल.

http://www.rediff.com/news/2008/nov/27sheela-advani-to-visit-mumbai-with...

(अजुन हल्ला होण्या बाबत) वर उल्लेख आलेला आहेच, कुठल्याही परिस्थितीत सावधानता कमी नको व्हायला. आपल्या लढणार्‍या विरांना लवकरात लवकर यश मिळो.

अरे मी वरती एक प्रश्न विचारला होता. कोणाचं मत कळलं नाही.
आपल्या देशाच्या नागरीकांची सुरक्षितता महत्वाची की परदेशी?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सर्वांचीच. आणि rescue operationsमध्ये असा भेद कधीच केला जात नाही.

ते गेले हे नक्कीच चूक झाले पण ते ज्या पध्दतीने परिस्तिथीला न समजता सामोरे गेले हे त्यापेक्षा जास्त चूक.>>>>> ही शंका सगळयांनाच होती, पण आताच बातमी ऐकायला आली की अतिरेक्यांनी त्यांना रस्त्यात त्यांच्या गाडीत पॉईंट ब्लँक रेंज हुन गोळ्या मारल्या!

अज्जुका,
अमेरीका किंवा ब्रिटन किंवा रशिया या देशांनी काय केले असते?

आपले मत देणे म्हणजे गरळ ओकणे????
तर टोणगेश्वर, तुम्हीच ते करताय.
आणि ह्या बी बी वर तर काहीच गरज नव्हती असले पोस्ट टाकायची. वेळ कुठली, आणि लिहिता काय! असो !!

यानंतर तरी आपल्या पुढार्‍यांत बदल घडायला हवा....दहशत्वादाच्या विरुद्ध काहितरी ठोस, निर्णायक पावलं उचलायलाच हवीत.

एन डी टिव्ही ऑनलाईन बंद पडलाय का ?
अरे हे पत्रकार लोक, कसले चक्रम आहेत, ते सुटलेल्या होस्टेजसवर प्रश्नांचा भाडिमार करतायत, उदा. तुम्हाला कस वाटतय.... Angry

अहो परदेशी नागरीकच सर्वात महत्वाचे,तेच आपल्याला डॉलर देणार,त्यांना वाचवुन आपला मान जगात वाढणार.भारतीय काय आज इथे उद्या तिथे मरणारच आहेत त्यांची कशाला काळजी.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

माहीत नाही. मला प्रश्न पडलाय. आणि त्या देशांनी स्वतःच्या नागरीकांना प्राधान्य दिले असते असं वाटतं.

चिनूक्स,
सगळ्यांची हे खरं आहे पण 'आत सैन्याची कारवाई कराल तर परदेशी नागरीकांना मारू.' हे स्टेटमेंट आहे त्यांचं. थोडक्यात त्यांना मोकळं सोडण्याची मागणी. आणि त्यांना मोकळं सोडणं म्हणजे आपलेच नुकसान.. अश्या वेळेला काय महत्वाचं?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सर्वांचीच सुरक्षा महत्वाची आहे. जे झाल ते अतिशय वाईट, पण आता मनमोहन सिंगानी (की देसाईंनी) ह्या घटनेचा जितका म्हणून फायदा इंटर नॅशनल लेवल वर घेता येइल तितका घ्यायला पाहीजे. इंटर नॅशनल कम्यूनिटी आता भारताला अमेरिकाचा अलाय मानते. तेव्हा पाक व्याप्त काश्मीर व बांग्लादेशातील तळ उध्वस्त कसे करता येतील त्या बद्दल जास्तिची इंटेल व भारताचे स्वतचे ऑपरेशन्स करावेत. सध्या इंटरनॅशनल कम्यूनिटीची आपल्याला सहानूभूती आहे त्याचा वापर भविष्यासाठी करायला आज पासूनच सुरु करायला हवे.

(कोणी विद्वान लगेच मढ्याच्या टाळू वरचे लोणी समजेल पण असे करने उरलेल्या भारतीय नागरिकांसाठी आवश्यक आहे. ग्राम पचांयत चालविनार्‍याला हे सुचत नसते तर जो देश चालवायची इच्छा ठेवतो त्याला हे सुचते ही जाणकारांनी नोंद घ्यावी)

त्यांच्या गाडीत पॉईंट ब्लँक रेंज हुन गोळ्या मारल्या >> अरेरे ह्यावरून तर आणखी प्रश्न निर्मान होतात. ते नंतर लिहीन.

आज सुप्रभात म्हणवत नाही! Sad
या परिस्थितीत मी काय करू शकतो, मी काय करणारे असे प्रश्न स्वतःलाच विचारले अस्ता कळणार्‍या, वयपरत्वे व परिस्थितीमुळे आलेल्या माझ्यातल्या षण्ढपणामुळे माझीच मला लाज वाटत्ये आज!
आत्यन्तिक उद्विग्नता! ५५ कोटी रुपयान्च्या तोडीची!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

सगळ्यांची हे खरं आहे पण 'आत सैन्याची कारवाई कराल तर परदेशी नागरीकांना मारू.' हे स्टेटमेंट आहे त्यांचं. थोडक्यात त्यांना मोकळं सोडण्याची मागणी. आणि त्यांना मोकळं सोडणं म्हणजे आपलेच नुकसान.. अश्या वेळेला काय महत्वाचं?
---- कुठल्याही परिस्थितीत blackmail नको व्हायला. आत २०-२५ (कमी जास्त) नागरिक असतील, जास्तीत जास्त लोकांना बाहेर काठण्याचे सर्व प्रयत्न करावेत, पण अतिरेक्यांच्या कुठल्याही धमकीला भिक घालू नाही. माझे स्वतःचे रक्ताचे नातेवाईक असते (आहेतच) तरी मी हेच म्हटले असते. तशीच जर वेळ आली तर कारवाई करावीच. त्याने एक धडा मिळतो.

blackmail साठी थोडी जरी जागा दिली तरी पुढच्या आपत्तींना आपण जन्म (भावी हल्ल्यांना आमंत्रण) देतो. त्या आपत्तींची किम्मत २५-३० जिवांपेक्षा जास्त असते.

मी ऐकलं की अतिरेक्यांशी बोलणी झालीच नाहीत. सैन्याने प्रयत्न केले, पण अतिरेक्यांनी दाद दिली नाही.
आत्ता 'वसाबी'चा एक शेफ बाहेर पडलाय. आत खूप लोक आहेत, पण ते सर्व सुरक्षित आहेत, असं तो म्हणाला. तो एका टॉयलेटमध्ये लपून बसला होता.

अतिरेक्यांना ओबेरॉयमधील इंटरकॉम निकामी केले आहेत.. आणि गेले १२ तास गोळीबार सुरू आहेत. केवढा प्रचंड शस्त्रसाठा असला पाहिजे त्यांच्याकडे.

मनमोहन देसाईंनी >> केदार ते करेक्ट कर रे ..

आपण आपल्या नागरीकांनाच प्राधान्य द्यायला हव नाही का ?

कोणत्याही वेळेला अतिरेक्यांच्या मागण्या मान्य न करता देशहिताची कारवाई करणं हेच सगळ्यात महत्वाचं.

मनमोहन देसाईंनी >> केदार ते करेक्ट कर रे >>>> नाही तो, पन ईंटेंडेड आहे. हा रोज बॉम्ब स्फोटाचा पिक्चर भारतात चालतो त्याचे ते मुख्य (डायरेक्टर) आहेत. ते कट म्हणायलाच तयार नाहीत. म्हणूण तो पन.

केदार,
ह्या हल्याल्या भेकड हल्ला असे म्हणन्या पेक्षा भेकड जनतेवर हल्ला म्हणा. ज्या सरकारला आपले नागरिक सुरक्षित ठेवता येत नाही ते सरकार भेकड तसेच हे सर्व सहन करनारी जनता भेकड.
याचा अथ काय?
तसं म्हणशील तर अमेरिकेच्या ही जुळ्या म्हणवणार्‍या ईमारतींवर हल्ला झाला होता त्या सरकारलाही तू असचं म्हणणार का?आणि जनतेलाही.
अश्या दहशदवादी कारवाया बर्‍याच देशांमध्ये झाल्या आहेत.
त्यामुळे सगळे भेकडच का?

>>सर्वांचीच. आणि rescue operationsमध्ये असा भेद कधीच केला जात नाही.
--- ते योग्यही आहे असे मला वाटते.<<
उदय ते योग्य मलाही वाटते पण जेव्हा सरळसरळ दोनच पर्याय असतात आणि हा किंवा तो निवडायचा असतो तेव्हा काय करायचे? प्रश्न तिथे आहे.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सलाम त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना जे तळहातावर शीर घेउन लढले आपल्या मुंबईकरांसाठी..

आता जत्रा भरेल वृत्तवाहिन्यांवर .. कोणी निषेध करेल तर कोणी सरकारला धारेवर धरेल .. सगळेच सारखे.. या नेभळट राजकारणी लोकांमुळेच हा दिवस बघावा लागतोय..

या सगळ्या राजकारण्यांना समुद्रात बुडवून टाकले पाहिजे आणि त्या वृत्तवाहिन्यांच्या मालकांना तर भर चौकात उलटे टांगून धुरी द्यायला हवी. शेवटी काय थोडे दिवस हा प्रसंग चर्चिला जाणार.. पकडलेच अतिरेकी तर त्यांच्यावरून राजकारण होणार... सगळेच सारखे..

आता कुठे गेले स्वतःच्या नेत्याला संरक्षण देणारे , मुंबईचं संरक्षण का नाही केलं म्हणावं..

आणि तोडफोड करणारे , नारे लगावणारे.. तुम्ही तरी अतिरेक्यांची डोकेफोड का नाही केली??

आता कुठे गेले उठसूठ निषेध करणारे आणि संप करणारे.. त्यांना तर आनंदच होत असेल अर्थव्यवस्था डळमळीत होते आहे म्हणून..

स्व्यंयंशिस्तवाले कुठे आहेत.. आता सुपात आहेत म्हणून बोलतील चार शब्द, उद्या जात्यात आल्यावर ते पण नाचणार या सर्वांच राजकारण करून

आणि ते.. जे खऱ्या अर्थाने या सर्व गोष्टी रोखू शकतात त्यांना तर बोलण्यातच अर्थ नाहि.. कारण जनते पेक्षा त्यांना 'जनपथा'ची काळजी अधिक..

या कुणाकडून अपेक्षा ठेवणेच व्यर्थ आहे हे माहितच होते आता खात्री पटली

नागरिकांनो एक व्हा.. एकत्र रहा..

पोर्णीमा
अमेरिकेत एकच हल्ला झाला, रोज, रोज प्रत्येक शहरात झाले नाहीत. गेले दोन वर्षे भारतात रोज कुठेनाकुठे स्फोट होतो. जर त्याला आपण देश आणि जनता मिळून व्यवस्तिथ सामोरे जात नसू तर, वी डिसर्व्ह धिस.
अन्याय सहन करनार्‍यावरच अन्याय होतो. आणि आपण तो सहन करतो म्हणून आपण भेकड. अमेरिकेत दुसरा हल्ला झाला का? का झाला नाही ह्याचा विचार करा? येथील जनता व पर्यायाने सरकार जागरुक आहे इथल्या नागरिकांप्रती.
आणि दुसर्‍या देशात लोक मरतात म्हणून माझ्या देशात मेले तरी मी शांत राहनार हे चूकीचे.( म्हणजे जनता शांत राहते, सरकारला जाब विचारत नाही म्हणून सरकार काही करत नाही, ह्याचा अर्थ आपण शस्त्र घेऊन रस्तावर मारामारी करु हा नाही. )

आत्ताच आयबिएन च्या प्रिती खान ने तो इ मेल वाचून दाखविला. त्यावर हिंदूंनी त्यांचावर अत्याचार केले म्हणून हा हल्ला असा मसुदा आहे. टोणग्या जरा प्रकाश पाड बार, आपण त्यांचा वर काय अत्याचार केले ते? Happy

केदार सध्याच्या भेकड सामान्य जनतेला नक्की काय करता येऊ शकतं आणि अमेरिकेतीन सामान्य जनतेनी काय केलं?

Pages