प्रबोधनकार कला दालन बोरिवली
प्रबोधनकार नाट्यगृह बोरिवली च्या तळ्मजल्यावर अगदी दर्शनी भागात येक प्रशस्त कला दालन आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कधीही नाटकाला गेलो तर तिथे फक्त साड्या, कपडे आणि गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स दिसायचे.
काही दिवसांपुर्वी या कलादालनाचे नुतनिकरण झाले आहे आणि तेथे बोरिवली परिसरातील काही नावजलेल्या चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन चालु आहे . हे पर्दर्शन ३१ तारखे पर्यंत चालु आहे.
या प्रदर्शना बरोबर सायंकाळी ६:०० वाजता रोज कला प्रत्यक्षिकांचे / व्याख्यानांचेही आयोजन केले जात आहे
२७ मार्च - व्यक्तीचीत्रण - श्री. वासुदेव कामथ