रत्नागीरी

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

रत्नागीरि मिर्‍याबंदर च्या थोडे पुढे सुंदर समुद्र किनारा आहे ( या जागेचे नाव लक्षात नाही), तीथे बर्‍याच बोटी दुरुस्तीसाठी , पावसाळ्या आधी कव्हर करुन ठेवतात.

ratnagiri.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मस्तच ..

फक्त निळा रंग असा एका रेषेत का संपला ते कळत नाहीये?

रत्नागिरी चौपाटीच्या (?) बाजूने तर नाही ना हे चित्र? पाठी भगवती दिसतो आहे ..:)

हायला, सकाळी सकाळी चक्क मिर्‍याचा रस्ता दिसला मला आज. दिल गार्डन गार्डन (खरंतर समुद्र समुद्र) हो गया.

पाटील, हे ठिकाण मिर्‍या बंदरच्या थोडं अलिकडे आणि सडा मिर्याच्या थोडं पुढे आहे. मिर्‍याचं बंदर जिथे आहे, तिथे भारती शिप यार्ड आहे, माझ्या वडलांचं नोकरीचं ठिकाण.

याच रस्त्यावर थोडं अलिकडे पलिकडे सावरकरांची "सागरा प्राण तळमळला" कवितेतील काही ओळी शिलालेखटाईप कोरल्या आहेत. सुनीता देशपांडेच्या आहे मनोहर तरि मधे याच स्थानाचा अतिशय सुंदर असा उल्लेख येतो.

सशल, पाठीमागे दिसतोय तो भगवतीचाच कडा आहे. पण "चौपाटी" म्हणजे मांडवी म्हणायचंय का तुला? तो भाग याच्या बरोबर मागच्या बाजूला येतो.

छान आहे. Happy

(अवांतरः मागचा कडा हा एखाद्या खुशालचेंडू अजस्र मगरबाळाचे तोंड असल्यासारखाही वाटतोय. कार्टूनातल्यासारखा. :-))

सशल, पाठीमागे दिसतोय तो भगवतीचाच कडा आहे. पण "चौपाटी" म्हणजे मांडवी म्हणायचंय का तुला? तो भाग याच्या बरोबर मागच्या बाजूला येतो.>>> हे मीच लिहिलं होतं. पण आज एका रोमातील मित्राने सांगितलंय की हा बहुतेक काळबादेवीचा डोंगर आहे. पाटील, हे चित्र फेबुवर टाकले आहे का? असल्यास अजून काही मित्रांना विचारून बघेन.

अर्थात कुठलाही भाग असला तरी चित्राच्या सौंदर्यात काही फरक पडत नाही म्हणा. Happy पण आम्हाला असल्या गोष्टीतच जास्त रस!!!!

नंदिनी, Happy

तुझं पोस्ट बघितल्यावर मी नवर्‍याला दाखवून विचारलं .. आमच्याकडे तो रत्नागिरी एक्स्पर्ट त्याचं आजोळ तिकडे असल्यामुळे .. तेव्हा तोही हेच म्हणाला की भारती शिपयार्डकडून दिसणारा व्ह्यू असेल तर हा भगवती नाही पण त्याच्यानंतर जे डोंगर दिसतात ते आहेत .. हे त्यादिवशीच लिहीणार होते पण म्हंटलं मिलिंदा येईल छडी घेऊन "विषयाला धरून बोला" सांगत .. Wink किंवा मग पाटीलच वैतागतील म्हणून सोडून दिलं .. Happy (असो, आता आवरते .. :))

हा काळबादेवीचा डोंगर आहे हेच खरं. माय मिस्टेक!!

याच डोंगराला पप्पांचं एक जहाज जाऊन आपटलं होतं तेव्हा मी मैत्रीणींना "जहाजाचं नाक डोंगरात अडकून फुटलंय" असं सांगितल्यावर पिताश्रींनी जी काय माझी परीक्षा घेतली. चारेक दिवस जहाजाचे भाग आणि प्रकार यावर लेक्चर दिलं होतं मला.

मग या अडकलेल्या जहाजाच्या रेस्क्यु टीममधे माझा(पण) एक फार महत्त्वाचा सहभाग होता. त्यावर कधीतरी सविस्तर लिहेन.

मस्तच.

नंदिनी - याच रस्त्यावर थोडं अलिकडे पलिकडे सावरकरांची "सागरा प्राण तळमळला" कवितेतील काही ओळी शिलालेखटाईप कोरल्या आहेत. सुनीता देशपांडेच्या आहे मनोहर तरि मधे याच स्थानाचा अतिशय सुंदर असा उल्लेख येतो. >>> म्हणजे त्यांनी त्यांचे स्वप्नातले घर दिसले असा उल्लेख केला आहे ते का?

मस्त