हा आमचा २००८ चा गणपतीबाप्पा

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

Bappaa.jpg

हा आमचा गणपतीबाप्पा. मंगलमूर्ती मोरया!

विषय: 

आर्च, मूर्ती सुरेखच आहे. मोदक फारच छान करतेस तु. मी मागे पण एकदा फोटो बघितला होता. इतक्या नाजुन छान कळ्या कशा घेतेस सांगशील का ?

आर्च .. खूपच सुबक मूर्ती.
मोदक तर खासच ... पण आभासी मोदकांनी पोट नाही भरलं ब्वॉ ... तू आपले खरेच मोदक पाठव Happy

अरे वा! धन्यवाद. बाप्पाने दिले न आशिर्वाद.

सिन्ड्रेला, मी त्या रेसिपीच्या बी बी वर लिहिलं आहे डिटेलमध्ये पाकळ्या कशा करायच्या ते.

हो सापडले मला. इथे पोस्टल्यानंतर तो बाफ बघितला.

अर्च
तू मोदक स्वता: केलेस? अप्रतीम. आणि पूजा आणि मूर्ती पाहून मन प्रसन्न झाले.
अर्च सहज विचारते....तू वॉशिन्ग्टन डी सी ला रहातेस का?

माधुरी, हो मोदक मी स्वतःच केले आहेत. धन्यवाद. मी टेनसीत असते.

मस्तच.. मोदक तर एकदम खास... तुझ्या आणि लालुच्या टिप्स वाचुनच मी मोदक केले. Happy

आर्च, तुला दुर्वा कुठे मिळाल्या ग?

मनु, घरच्या लॉनवरच्या ग.

छान! मला आतापर्यन्त ते गवतच मिळते. ते तीन अन्कुर असलेल्या(exactly काय म्हणतात तो शब्दच विसरले बघ) दुर्वा इथे मिळाल्याच नाही. आईला विचारायला हवे.

मी पण लॉनवरच्या दुर्वा घेते दर वर्षी. ह्या वर्षी नेमकी घरमालकांनी गणपती बसवयच्या आदल्या दिवशी लॉन छाटली Sad नाहीतर छान तीन अंकुर असलेल्या पण मिळतात.

आर्च, जमलं ती रेसिपीची लिंक दे ना इथे.