कविता

असंबद्ध..

Submitted by भानुप्रिया on 18 April, 2011 - 00:43

ह्या कवितेला एक premise आहे..अर्थात, सूज्ञ वाचकांच्या तो लक्षात येइलच..
आपल्या प्रतिक्रियांची वाट बघतेय..
--
आज झोपू नकोस रात्री..
म्हणजे झोपलास तरी जागासा रहा..
रात्र आळसावली की मग
दाराची चाहूल घे जरा..
कधीतरी आडनिड्या वेळी
तुझ्या अंगणात पैंजण रुणझुणतील..
दचकू नकोस तेव्हा..
हळूच नादणारी ती पावलं माझीच असतील..
तुझ्या अंगणातली शांतशी ती तुळस
थरारेल क्षणभर..
गाढ झोपलेला पाचोळाही कूस बदलेल..
रातकिड्यांच्या किरकिरेला भेदून जाईल
माझा एक रोखलेला हुंदका..
तू इतक्यात उठू नकोस..
अजून तुझ्या बागेतल्या गुलाबाशी बोलायचंय मला..
त्या फुलांचं आणि माझं नातं असं नाहीचे..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अपशकुन

Submitted by निवडुंग on 10 April, 2011 - 18:09

तुझ्या देव्हार्‍यातली सांजवात
काल अचानक फडफडत राहिली
माझ्या काळजाचा ठोका चुकवत..
रित्या हातांचा लगबग आडोसा
निमीषार्धात तिला सावरायला
निष्ठूर वाऱ्यापुढे हतबल होण्याआधी..

पण तुझी सांजवात केव्हाच विझली होती.
उरला होता फक्त भयाण काळामिट्ट अंधार,
चुटपुटणारं मन,
आणि जळकट तेलाचा असह्य दर्प..
खरंय..
अपशकुनच तर झाला होता..
तुझ्या देव्हार्‍यात माझा पाय जो पडला होता..

गुलमोहर: 

सुरुवात

Submitted by रामकुमार on 20 March, 2011 - 15:28

लाख जुन्या त्या सुरुवातींवर
नवी सुरुवात करावी लागेल
खूप उशीर होणापूर्वी
लगेच सुरुवात करावी लागेल!

शेतकरी मी स्वप्ने पाही
कधी न भरल्या कोठाराची
नवे कर्ज अन् जुने बियाणे
पुन्हा सुरुवात करावी लागेल!

ग्रंथही सारे कालच मिटले
फोल!रितेपण त्यांचे कळले
पण धूळ तयांवर जमण्यापूर्वी
पुन्हा सुरुवात करावी लागेल!

डावा झालो रस्ता चुकलो
उजवा होता मार्गा मुकलो
जीवन तारेवरची कसरत
पुन्हा सुरुवात करावी लागेल!

संकट येई मानवनिर्मित
नैसर्गिक वा लाटा येती
खेळ मांडण्या नवा वाळुचा
पुन्हा सुरुवात करावी लागेल!

अंतरातला देव येतसे
परत फिरूनी जाण्यासाठी
त्याच्या येण्याकरिता क्षणभर

गुलमोहर: 

आता बास्स..!

Submitted by मी मुक्ता.. on 17 March, 2011 - 10:53

आपल्या भिंगाच्या चष्म्यातून,
तुझी ती अतिचिकित्सक नजर माझ्यावर खिळवत तू म्हणालास,
लिखाणात आता तोचतोचपणा यायला लागलाय...
मग म्हटलं आता पुरेच झालं नाहीतरी..
माझ्याकडे काही गुलजा़रसारखा चिरतरुण चंद्र नाही
किंवा साहिरसारखी चिरंजिवी वेदना पण नाही..
सतत तिच चुकार-मुकार किरणं..
फुलांचे रंग..
पौर्णिमेचा समुद्र..
श्रावणातला पाऊस...
स्वप्नांचे प्रदेश वगैरे...
मग बाहेर काही भेटतय का ते बघावं म्हटलं..
बाहेर पडतच होते,
तर सगळ्यात आधी ऋतूच रुसले..
आतले सगळेच फुरंगटुन बसले..
त्यांची समजुन घालणं तसं अवघडच..
कारण ग्रीष्माचा दाह, शिशिराची वेदना, वर्षेची उत्कटता..

गुलमोहर: 

पाठ्यपुस्तकातील कविता

Submitted by रायगड on 17 March, 2011 - 02:16

शाळेत मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कित्येक कविता आपल्या आठवणीत दरवळत रहातात. काही अजूनेही पूर्ण आठवतात तर काही थोड्या-फार! पण त्या कविता आठवून त्या जुन्या शाळेतल्या आठवणींना उजाळा देण्याची मजा काही औरच!
तुम्हाला कोणत्या कविता आवडायच्या? कोणत्या अजूनही आठवतात? कोणत्या पूर्ण आठवायला आवडेल?

विषय: 
शब्दखुणा: 

तू-(वजा) मी = शुन्य!!!

Submitted by मी_आर्या on 14 March, 2011 - 05:10

आताशा, जीवनाची गणितं नाही
मांडत बसत मी!
कारण, तुझी केवढी तक्रार
माझ्या व्यवहारशून्यतेबद्दलची!!

आठवत असेल तुला
कधीतरी रस्त्याने
जातांना झालेला
'पायथागोरसच्या सिद्धांता'वर
आपला वाद!

कर्ण वर्ग बरोबर बाजु वर्गांची बेरीज
हे माहित असुनही तुझी जवळच्या
रस्त्याने जाण्याची धडपड
आणि मग काळ, काम, वेगाचं
गणित मांडल्यावर होणारा वैताग
तशीच तुझी हातचं राखुन
बेरजा करण्याची सवय!!

हं! आता तुझ्यासारखं व्यावहारीक
नसेल होता येत मला....
पण तू - (वजा) मी = एक मोठ शुन्य
हे तरी मान्य करशील ना?

शब्दखुणा: 

वजाबाकी..

Submitted by मी मुक्ता.. on 10 March, 2011 - 00:43

जगात सगळीकडेच अर्धा अधिक अर्धा एक होतो..
तसा प्रत्येक अर्ध्याला शोध असतोच स्वतःच्या पुर्णत्वाचा..
आणि पर्यायाने पुर्णत्वासाठी लागणार्‍या दुसर्‍या अर्ध्याचा..
क्वचितच कोणीतरी पुर्ण एक असतो
आणि आपलं गणित जरा वेगळं ठरलेलं ना..
ठरवलेलं आपण,
आपला एक अधिक एक पण एक..
आणि एक वजा एक पण एकच असेल..
.
.
.
.
.
.
पण वजाबाकीच करायची होती का?

गुलमोहर: 

आपली आई वेगळी असल्याचं जाणवतं तेव्हा..

Submitted by मी मुक्ता.. on 5 March, 2011 - 04:46

"ती गेली तेव्हा.." ऐकुन त्यातल्या अबोध सूरांनी
काळजात अनाहत कळ उठवलेली..
त्यातल्या गाभ्याला हात घालुन तो अलगद माझ्यासमोर
उलगडुन दाखवलेलास तेव्हा..

बाकिच्या बायका साड्या, दागिन्यात रमत होत्या
त्यावेळी समुद्रावरच्या वार्‍यात आणि
डोंगरावरच्या ढगांत स्वतःला हरवत होतीस तेव्हा..

आजुबाजूच्या बायका, एकमेकिंची उणिदुणी
काढण्यात समाधान मानायच्या त्यावेळी
मु़काट बसुन असायचिस आणि अशा या स्वभावामुळे
कळपापासुन वेगळं पडलेलं तुला पाहिलं तेव्हा..

तू नॉस्टॅल्जिक झाल्यावर
सांगितलेल्या आठवणींतून
तू पण माझ्यासारखीच
बंडखोर असल्याचं जाणवलं तेव्हा

गुलमोहर: 

आयज जागतिक मराठी दिन .. त्यानिमतान कांय कोकणी कवितांचो अणकार

Submitted by प्रीतमोहर on 28 February, 2011 - 12:26

ज्यो ताई च्या लेखात लिहिल्याप्रमाणे कोकणी- मराठी ह्या बहिणी आहेत हे तर कळलेच असेल . तर आता आपण काही कोकणी रचना पाहुया
कोकणी कविता- विश्वात , मराठी वाचकांच श्रद्धास्थान , अभिजात लेखक व कवी श्री. बा भ. बोरकर उर्फ आमचे बाकीबाब ह्यांना एक आदरणीय स्थान आहे . तेव्हा सुरवात बाकीबाबांच्या काही मधुर रचनांनी .


पायजणां

त्या दिसा वडाकडेन गडद तिन्साना
मंद मंद वाजत आय्लीं तुजी गो पायजणां

मौन पडले सगळ्या राना, शिरशिरुन थाम्ली पाना
कवळी जाग आय्ली तणा झेम्ता झेम्ताना
मंद मंद वाजत आय्लीं......

गुलमोहर: 

पत्ता..

Submitted by मी मुक्ता.. on 28 February, 2011 - 10:08

काल कुठल्यातरी रानात
कोकिळेमागे फिरताना,
मला तू पाठवलेला ढग भेटला होता..
तुझा पाऊस घेवुन आलेला..
माझ्यासाठी..
चला..!
शेवटी तुझा पाऊस माझ्याचसाठी होता तर..
मला कित्ती आनंद झाला म्हणुन सांगु..
त्या आनंदात आम्ही खूप गप्पा मारल्या..
काय काय दाखवलं मी त्याला..
माझी फुलपाखरांची शेती,
नुकतच अंकुरु लागलेलं चांदणं..
मावळतीच्या किरणांना अडकवलेला झुला..
खास तुला द्यायला म्हणुन ठेवलेला, पिकुन भोपळ्यासारखा झालेला
पिवळाधम्मक चंद्र...
आणि मग तिथेच त्यातला थोडा पाऊस शिंपुन
आम्ही इंद्रधनुष्य पण बनवलं..
त्याच्यावरच गप्पा मारत बसलेलो आम्ही..
कितीच्या किती वेळ..
त्याला म्हटलं,

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता