कविता

कविता आणि चिता

Submitted by मिल्या on 30 June, 2011 - 02:58

चिता आणि कविता...

दोघीत तसा फार फरक नाहीच...

चिता रचतात आणि कविताही....

दोघीही माणसाला दुसर्‍याच दुनियेत घेऊन जातात.

एक सूक्ष्म फारक मात्र नक्कीच आहे दोघींमध्ये...

चिता रचणार्‍याला जाळत नाही.... कधीच!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हायकू -

Submitted by विदेश on 27 June, 2011 - 15:07

आकाशी पक्षी
उडतात मजेत
शिकारी खिन्न

हाती लपली
चार फुले चाफ्याची
शीळ वाऱ्याची

निजरूपाचे
कुतूहल बाळाचे
आरसा खूष

पुढे दगड
पडलेले रग्गड
मी का शहाणा

उत्सुक डोळे
पिंडापाशी कावळे
मोकळा आत्मा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सावज

Submitted by सत्यजित on 23 June, 2011 - 11:31

पुन्हा पाऊस पुन्हा एक कविता.. तशी जुनीच आहे.

आत्ताच पाऊस पडून गेला
त्याचा हवेतील ओलावा अजून जाणवतोय
सर्वस्व देऊन रीता झालेला तो
पांढर्‍या पुंजक्यांतून खुणावतोय

अंग चोरुन बसलेलं रोप
थंडीने शहारलंय
त्याच्या पानात लपवून पाणी
मोत्यांनी बहरलंय

एका ओल्या तारेवर
एकटाच ओला पक्षी
त्याची समाधी न्याहाळतेय
पाण्याची ओघळ नक्षी

पारव्यांच्या जोड्या गेल्या
ओसरीत ओसरीला
माझा राजस गं भला
एक सांगे दुसरीला

एक छोटंसं पिल्लु
रुसून गूपचूप बसलेलं
आता आईला शोधताना
चिंब चिंब भिजलेलं

त्याच्या डोळ्यातील पाऊस
त्याच्या आईला शोधतोय
पाऊस थांबला तरी तो
त्याच्या आसवांत भिजतोय

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुझे नक्षत्रांचे देणे

Submitted by भानुप्रिया on 20 June, 2011 - 00:27

तुझे नक्षत्रांचे देणे..
माझ्या मनात दाटलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
काही अर्थ लाभलेले!!!

एकांती आर्त स्वरांनी..
विरहात रंग भरले,
स्मरणात तुझ्या गुंतुनी..
माझे 'मी' पण विरले,
मुग्ध ह्या भासांनी..
माझे जीवन भारलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
काही अर्थ लाभलेले!!

तुझे नक्षत्रांचे देणे..
माझ्या मनात दाटलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
काही अर्थ लाभलेले!

गुलमोहर: 

साहित्याशी जवळिक साधत -

Submitted by विदेश on 15 June, 2011 - 07:59

साहित्याशी जवळिक साधत खुशाल हा बसणार ,
गोड बोलुनी सर्वांशी हा साहित्यातच रमणार !

भविष्यवाणी सांगुन गेले जाणते कुणी स्वर्गाला
भविष्यवाणी खोटी नव्हती , सांगतोच मी तुम्हाला !

बालपणीचा काळ सुखाचा - म्हटले आहे कुणीतरी
वह्या नि पुस्तक हाती पडता, चीरफाड मी नित्य करी ;

शैशवात मी वह्यांत लपवी - आठवणींची मोरपिसे ,
फूल सखीच्या गज-यामधले पुस्तकातुनी दडवितसे !

कविता, कादंबरी नि नाटक यांचा नव्हता गंध मला
दैनिक मासिक पुस्तक साहित्याची आवड तरी मला !

साहित्याशी सलगी करणे मजला खूपच आवडले,
'वजनदार साहित्य' मलाही रद्दीत घेणे परवडले !

दीड-दान्डीचे मोल मला; ते नसेल काही इतरांना -

शब्दखुणा: 

सण पाऊस साजरा ---

Submitted by विदेश on 14 June, 2011 - 10:36

निळ्या निळ्या नभातून -
कोसळती शुभ्र धारा ;

काळ्या काळ्या मातीतून -
ओल्या गंधाचा फवारा ;

हिरव्या हिरव्या कोंबातून -
दिमाखात ये फुलोरा ;

पिवळ्या पिवळ्या फुलांतून -
झुले तो सोनपिसारा ;

अज्ञातशा कुंचल्यातून
खेळ रंगतो हा न्यारा !

सप्तरंगी अफलातून
इंद्रधनूचा नजारा -

फुलतो रोमांचातून
मनमोराचा पिसारा -

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एका भांड्याचे आत्मगान

Submitted by मामी on 14 June, 2011 - 10:11

लखलखीत स्टीलत्व माझे, तु पहाटे नीरखावे
मोकळ्या पोटात माझ्या, तूच जेवण शीजवावे

लागूनी विमबार हिरवा, तकतकी आली अशी की
छानसा, छानसा रस्सा वा आमटी, गॅसवरी तु ऊकळावे

तापल्या माझ्या तळाची, खास फोडणी वठावी
रेशमी मऊसूत पोळ्यांचे, पीठ ताजे तू मळावे

रे तुझा स्वैपाक होता, घर-दारा जाग यावी
डबे भरूनी मजला पुन्हा तू, भांडीवालीस सोपवावे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

(मुन्नी बदनाम हुई)

Submitted by जागोमोहनप्यारे on 9 June, 2011 - 04:06

मुन्नी बदनाम हुई

रंग काळा बाबाच्या दाढीचा
रंग खाकी पोलिसांच्या सदर्‍याचा

रंग भगवा बाबाच्या लंगोटचा
रंग हिरवा गांधीबाबाच्या नोटेचा

रंग सावळा त्या रात्रीचा
रंग पिवळा 'सोनिया' काविळीचा

रंग लाल डोक्यावरच्या जखमेचा
रंग निळा पाठीवरल्या वळेचा

रंगात सार्‍या रंगुनी रात्र होई सुन्नी
बिचारा बाबा ! दुपट्ट्यात झाला मुन्नी

मी एक अश्वत्थामा

Submitted by प्राक्तन on 4 June, 2011 - 03:34

मी एक अश्वत्थामा

मी एक अश्वत्थामा
वाहतं मन घेऊन फिरणारा
जगाच्या कुठल्याश्या कोपरयात
समदु:खी शोधणारा

मनाच्या भळाळत्या जखमेवर
दवापाणी शोधणारा
आणि सतत गर्दीत असूनही
सलग एकाकी असणा्रा

नाही मी चिरंजीव
पण वाहतं मन आहेच
म्हणूनच ठरलो कदाचित
मी एक अश्वत्थामा

गुलमोहर: 

संधीसाधू पाऊस

Submitted by सत्यजित on 3 June, 2011 - 17:39

एक ओली छत्री,
बस मध्ये चढली
तशीच ओली निथळती
सीट वरती दुमडली

खिडकी बाहेर, दारावर
काचांवरल्या धारांवर
धावत्या तरुंच्या पारांवर
खाबांवरल्या तारांवर...
इथे तिथे रेंगाळल्या नजरा
आल्या होत्या भानावर

सारे पारधी साव़ज झाले...
निवांत बसले सावध झाले
इतके सावध ...
कुणी सांगुन खिसा कापावा इतके (बे) सा­वध..

पुढच्या माना अचानक
करु लागतात व्यायाम
किमान दोनशे अंशात फिरली नाही
तर मानेच काय काम?

मागचे पुढे, पुढचे मागे
एक ओझरती झलक... आणि उगाच त्रागे..

हा पाऊस काही पहीला नव्हता
तरी इतका मोहक पाहीला नव्हता
बावर्‍या सावळ्या नभांवर
ओघळताना पाहिला नव्हता

ओढणी इतकी सावधान

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता