तू-(वजा) मी = शुन्य!!!

Submitted by मी_आर्या on 14 March, 2011 - 05:10

आताशा, जीवनाची गणितं नाही
मांडत बसत मी!
कारण, तुझी केवढी तक्रार
माझ्या व्यवहारशून्यतेबद्दलची!!

आठवत असेल तुला
कधीतरी रस्त्याने
जातांना झालेला
'पायथागोरसच्या सिद्धांता'वर
आपला वाद!

कर्ण वर्ग बरोबर बाजु वर्गांची बेरीज
हे माहित असुनही तुझी जवळच्या
रस्त्याने जाण्याची धडपड
आणि मग काळ, काम, वेगाचं
गणित मांडल्यावर होणारा वैताग
तशीच तुझी हातचं राखुन
बेरजा करण्याची सवय!!

हं! आता तुझ्यासारखं व्यावहारीक
नसेल होता येत मला....
पण तू - (वजा) मी = एक मोठ शुन्य
हे तरी मान्य करशील ना?

अवांतरः वर उल्लेखलेल्या पायथागोरसच्या सिद्धांताबद्दल खुप उहापोह झाला. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी:
pythagoras-abc.gifpythagoras-squares.gif
इथे त्रिकोण हा फक्त काटकोन त्रिकोणच असतो. त्याचे प्रमेय असे:
काटकोन त्रिकोणाचा कर्ण वर्ग= काटकोन त्रिकोणाची एक बाजु वर्ग + काटकोन त्रिकोणाची दुसरी बाजु वर्ग.

शब्दखुणा: 

मस्त
पण तू - (वजा) मी = एक मोठ शुन्य
त्या शुन्यातुन विश्व निर्मीती करा

अरे सॉलीड जमलीये...
वाहवा...
कर्ण वर्ग बरोबर बाजु वर्गांची बेरीज
हे माहित असुनही तुझी जवळच्या
रस्त्याने जाण्याची धडपड

अगदी अगदी तंतोतंत उतरलीये...

आणि मग काळ, काम, वेगाचं
गणित मांडल्यावर होणारा वैताग
तशीच तुझी हातचं राखुन
बेरजा करण्याची सवय!!

हे सुद्धा...

आशु Biggrin

कवितेचा आशय आवडला
-----------------------------------------------------------------------
(पायथागोरस आणि जवळचा रस्ता हा संबंध
भौमितिक दृष्ट्या तितकासा सुटेबल वाटला नाही)

कर्ण हा इतर दोन बाजूंच्यास बेरजेपेक्षा लहानच असतो.....

त्या मुळे..

कर्ण वर्ग बरोबर बाजु वर्गांची बेरीज
हे माहित असुनही तुझी जवळच्या
रस्त्याने जाण्याची धडपड

हे अगदी चपखल...

मस्ताय कविता...:)

.

फारच छान कन्सेप्ट होता...
बाकी कैच्या कै म्हणावी अशी बिलकुल वाटली नाही... खरच छान वाटली

कैच्याकैच लिहायच असेल तर मंद्यानी काय "भौमैतीक" विचार मांडलेत ते बघा

अजिबात कायच्याकाय नाही .. मला आवडली.. सुंदर.... खोल आतुन आलेली गर्ततेची भावना अप्रतिम साकारली आहे... टू गुड...

सर्वांचे धन्यवाद! Happy
काहिंना कळली नाही त्यामुळे थोडंस विवेचन देतेय:
इथे 'तो' अतिशय प्रॅक्टीकल जगणारा माणुस आहे, नेहमी बुद्धीने निर्णय घेणारा. तर 'ती' आपली बुद्धीपेक्षा भावनेला प्राधान्य देणारी.
पायथागोरसच्या सिद्धांताचा रेफ्रन्स यासाठी की कळत्या वयात शाळेतुन येतांना कधी कधी काटकोन त्रिकोण रस्ता असला तर एवढं फिरुन जाण्यापेक्षा'चल, शॉर्टकट मारु' असं एखादी म्हणायची की लगेच दुस-या दोघी म्हणायच्या,"अगं पायथागोरसचा सिद्धांत आठवतो ना? सारखच पडतं अंतर (कर्ण वर्ग बरोबर दोन्ही बाजुंच्या वर्गांची बेरीज)!!! याचा मोठेपणी जोडला संबंध जोडला की 'शॉर्टकट' मारायला जावं आणि नंतर काळ काम वेग आणि अडथळे यांच गणित मांडलं तर आधिच्या रस्त्याने गेलो असतो तर बर झालं असतं असा कधी कधी अनुभव येतो. म्हणुन 'त्या'चा होणारा वैताग!

'बेरीज करणे' म्हणजे माणसं जोडायची असतील तर हातचं राखुन बोलण्याचा काय उपयोग? माणसं जोडायची तर दोन मनं सांधली गेली पाहिजेत. आणि मनं सांधण्यासाठी तुमचे मन शुद्ध, विकाररहित आणि निकोप हवीत.

म्हणुन अखेर शेवटी ती म्हणते, तुझ्यासारखं व्यावहारिक नसेल होता येत पण तुझ्या जीवनात मला किमान एवढ तरी महत्त्व असेल ना? की तुझ्यातुन तु 'मला' वजा केलस तर शुन्य उरेल ? की आपले वैवाहिक संबंध हा ही एक व्यवहार आहे देण्या-घेण्याचा हेच समजतोस तु?

Pages