नातीगोती
सुवासाच्या देशात
नव्या रचलेल्या घड्यांच्या उतरंडीत कोणत्या चीजवस्तू ठेवल्या आहेत हे काही दिवसांनी विस्मृतीत जाते तसेच त्याचे झाले होते. काहीच महिन्यांपूर्वी यंत्रवत झालेले जगणे तो पुर्णपणे विसरुन गेला होता. जणू त्याच्या प्रखर बुध्दीला मृदुल व रेशमी अश्या रसिकतेचा स्पर्श झाला होता. त्याच्यातील हे स्थित्यंतर अगदी नकळत्या क्षणाला झाले होते. ज्यापासून तो स्वतःही अनभिज्ञ होता. मनगटावर पुसल्या गेलेल्या सुवासाचा स्पर्श जसा अत्तराला कळत नाही तितकेच हे सहज त्याच्या जगण्यात घडून गेले होते. त्याच्या आयुष्याच्या चौकटीच्या उंबरयावरचे माप तिने ओलांडल्यापासून त्याच्या मनात तिचे प्रेम घर करुन बसले होते.
फादर्स डे
‘फादर्स डे’ आहे म्हणे आज. नेटकऱ्यांना वडिलांचा पुळका येण्याचा खास दिवस! एरवी वडिलांच्या सावलीला देखील उभे न राहणारे वडिलांना खेटून उभे असतानाचे फोटो टाकतायत. हे एक बरंय, आजकाल कुठला ‘special day’ आहे हे सकाळ झाल्या बरोबर कळतं. नेटकऱ्यांनी फोटो टाकलेत, स्टेटस ठेवलंय. काहींचा उत्साह अगदी काल रात्री पासूनच दांडगा आहे. ‘फादर्स’ पण आजकाल ‘social’ वर आल्यामुळे त्यांनाही कळतंय की आज आपला कौतुकाचा दिवस आहे!! असो.
साडेतीनशे पानी झाकोळ (पुस्तक परिचय : शगी बेन, लेखक : डग्लस स्टुअर्ट)
१९९० च्या दशकाची सुरुवात. स्कॉटलंडची राजधानी ग्लासगो. १५-१६ वर्षांचा एक मुलगा, शगी, कॉट-बेसिसवर एकटाच राहतोय. एका सुपरमार्केटच्या स्नॅक्स काऊंटरवर जेमतेम नोकरी करतोय. त्याच्या अवतीभोवती स्थानिक गरीब नाहीतर स्थलांतरित माणसं. अभावग्रस्त जीवन. शगीला हेअरड्रेसर व्हायचंय. पण आधी रोज येणार्या दिवसाला एकट्याने तोंड द्यायचंय.
रोज येणार्या दिवसाला काहीही करून तोंड देणे हे त्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. कसं? कोण आहे हा शगी?
त्याची गोष्ट सांगण्यासाठी कादंबरी आपल्याला ११ वर्षं मागे नेते.
घरचा आहेर
अव्वा
अव्वा.
“ स्वयंपाकघरात चूल पेटवणाऱ्या अव्वाच्या शेजारी मी बसायचो. ती भाकऱ्या थापायची आणि मी चुलीच्या आगीत लाकडे टाकायचो. शाळेत काय काय शिकवलं ते ती विचारायची. अव्वा चौथी पर्यंत शिकली होती. मी शाळेत शिकलेली कविता, पुरंदर दासांचे पद, गोष्टी, मित्रा सोबत केलेल्या गमती तिल्या सांगितल्या कि ती खळखळून हसायची आणि सगळं आवडीने ऐकायची.
नात्यांचं भावस्पर्शी इंद्रधनुष्य- काहे दिया परदेस
✪ दिग्गज व नवोदित कलाकारांची सुरेल मैफल
✪ गौरी अर्थात् सायली संजीव - कमालीच्या गुणी अभिनेत्रीचं पदार्पण
✪ वडील- मुलगी नात्यातले भावतरंग
✪ हँडसम शिवचं डोळ्यांनी फ्लर्ट करणं!
✪ छोटा "अहं" ते "सर्वसमावेशक हम" ही वाटचाल
✪ प्रेमळ आजीची डॅशिंग बॅटींग- मी सांगतंय तुका
✪ सासू- जावयातलं जिव्हाळ्याचं शीतयुद्ध
भावना
आज च मेव्हण्याच लग्न झालं. म्हणजे झालं एकदाचं!!! भावाच्या लग्नाची तयारी करायची म्हणून बायको लेकरा सहित महिनाभर आधीच बोरिया बिस्तर घेऊन माहेरी आलेली. या महिन्या भराच्या कालावधीत पोरगं 'बाबा' म्हणायचं विसरलं, व्हिडीओ कॉल वर पण बोलेनास झालं. वाटलं, आता पोरगं बापाला विसरण्या आधी आपण तिथं पोचलेलं बरं. . .आलो. बायकोनं दरवाजा उघडला, तोच पोरानं माझ्या पायाशी लोळण घेतली होती, खाताना-खेळतांना खरकटं झालेलं तोंड, सर्दी म्हणून शेवाळ झालेलं नाक, कंटाळा म्हणून न घातलेली चड्डी . . .मी तसाच त्याला उचलला. तब्बल २२ दिवसांनी 'बाबा' म्हणाला. रात्री माझ्या च मांडी वर झोपला.
मोठा झालो मात्र आईसाठी नाही .!!
कसा विसरलो मोठा झालो मी
मात्र आईसाठी नाही...!!
जेवण केल्यानंतर आज ही
पोटात जागा असते
मात्र आता आई च्या हातचा तो एक घास खात नाही
विखुरले असतात केस माझे
केसांचा भारा असते
मात्र आता आईला केसांचा भांग पाडून मागत नाही
चेहरा धुतल्यानंतर आत्ता ही
चेहऱ्याला पाणी चिकटून असते
मात्र आता आई च्या पदराने तो साफ करत नाही
तिच्या गोष्टी काही संपत नाही
जुन्या गोष्टींचा पिटारा खोलते
मात्र आता तिच्या मांडीवर बसून मी ऐकत नाही
अलवार सुगंध मोगरीचा
अलवार सुगंध मोगरीचा
दरवळला माझ्या मनांत
जणु मिठीत सरुन माझ्या
तु शांत नीजली आहे ।।१।।
अधिर कटाक्ष तुझा
अंगी रोमांच दाटलेले
ती भेट चांदण्यात
मनांत जपून आहे ।।२।।
बरसतात श्रावण सरी
अंग चिंब भिजलेले
निसर्ग हा सजलेला
प्रेम गीत गात आहे ।।३।।
बंद होतां पापण्या
तुलाच पाहतो मी
पुर्ण चंद्र आसमंती
स्वरुप तुझेच आहे ।।४।।
श्वासात तुच माझ्या
तुच स्पंदनात आहे
तुच नादब्रह्म माझा
ओंकार तुच आहे।।५।।