पुस्तक

मायबोलीकरांचे ग्रंथालय

0

देणार्‍याचे देत जावे, घेणार्‍याने घेत जावे; घेता घेता घेणार्‍याने, देणार्‍याचे हात घ्यावे -- असे तुमचे-आमचे विंदा असे म्हणालेत. जगभराच्या कानाकोपर्‍यात वसलेल्या मायबोलीकरांनी आपली पुस्तके एकमेकांसोबत वाटून घ्यावीत असे इथे कित्येक वाचकांना वाटत असेल. इथे तुम्ही तुमच्याकडील पुस्तकाची यादी करा. तुम्ही कुठल्या गावात-शहरात-देशात राहतात ते लिहा. पत्ता लिहू नका. फोन न. लिहू नका. फक्त यादी लिहा. म्हणजे पुस्तके देता-घेता येतील आणि त्यातून नवीन मित्रही जमतील. ही कल्पना मीनूने सुचवली आहे. मी फक्त अमलात आणत आहे. हे जर तुम्ही करू शकलात, वेळ असल्यास, तर तेच तुमचे विंदांना मी देणे म्हणेल.

स्कॅन केलेली जुनी मराठी पुस्तके

0

मराठी भाषेत जुन्यातील जुनी पुस्तकं मिळणे दुर्मिळ झालेली आहेत. वेगवेगळ्या भारतीय भाषेतील जुनी पुस्तकं वाचकांना उपलब्द्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने अशी जुनी पुस्तके स्कॅन करुन ती 'डिजीटल ग्रंथालयात' ठेवलेली आहेत. या कार्यात भारतातील नावाजलेल्या आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थानी देखील मोलाची मदत केलेली आहे. जसे की Indian Institute of Technologies, Indian Institute of Science. पुस्तकांची संख्या इतकी आहे की एका वेळी कुठले वाचू.. हे की ते असे होते. तुम्हाला हे दुवे पाहून नक्कीच आनंद होईल. बाकी इतर भाषेतील पुस्तकांपेक्षा मराठी पुस्तकं सर्वाधिक आहेत.

१) http://www.new.dli.ernet.in/

माझ्या आवडीचे पुस्तक-परिच्छेद

0

जेंव्हा नवीन असं काही वाचायला जवळं नसतं किंवा नवीन असे वाचताना आकलन व्हायला हवी असलेली मनाची स्थिती नसते, तेंव्हा संग्रही असलेलं आणि आधीच वाचलेलं पुस्तक मी घेतो आणि त्या पुस्तकांच कुठलं पान मला निदान विरंगुळा तरी देईल हे मला इतकं छान माहिती असतं की बरेचदा ते ते पान.. त्या त्या पानावरील ते ते परिच्छेद मुखपाठ व्हायला लागतात.

पुष्कळशी पुस्तके ही पहिल्या पानापासून अगदी अखेरच्या पानापर्यंत वाचनिय नसतात पण अधून-मधून लेखकाला मनापासून स्फुरलेलं काहीतरी असतं आणि तो ते चांगलं लिहून जातो.