अवांतर

सावधान.. खुलं आव्हान.. कारण आता शर्यतीत मी आलोय..

Submitted by विक्रम मोहिते on 23 February, 2024 - 08:48

इथुन सुरुवात झाली http://www.maayboli.com/node/12190
इथे पान पलटलं http://www.maayboli.com/node/1275
आणि हे आमचे प्रेरणास्थान https://www.maayboli.com/node/13017

विषय: 

कोवळ्या जिवाचे ते नर्कातले जगणे...त्यालाही समजेनI. -२

Submitted by - on 22 February, 2024 - 03:10

तुम्ही सगळ्या बरोबर आहात. मी पाळणा घाराविषयी नाही बोलत आहे.

मी बोलत आहे बोर्डिंग स्कूल ज्यात मुले अगदी लहान पानापासून राहतात कि जिथे आई फक्त सहामाही आणि वार्षिक परीक्षे नंतरच भेटते, आणि माझ्या माहितीतल्यान, तर ते हि नशिबात नाही.

माझी मुळीच तक्रार नाही बोर्डिंग मानजमेंट बद्दल.

mazha मुद्दा आहे, हक्काच्या माणसा बद्दल.
कधी रडावेसे वाटते , कधी चिडावेसे वाटते , कधी खूप ओरडावेसे वाटते, कधी आपली खूप आवडती वस्तू घरात लपून ठेवायची असते .. सगळ्यांपासून दूर आपल्या हक्काच्या माणसाकडे.

हे काहीच नसते. फक्त आपण असतो आणि आपणच असतो. मन मोकळे करायलाही कोणी नसते. .

विषय: 
शब्दखुणा: 

कोवळ्या जिवाचे ते नर्कातले जगणे...त्यालाही समजेनI.

Submitted by - on 21 February, 2024 - 01:44

कोवळ्या जिवाचे ते नर्कातले जगणे...त्यालाही समजेनI.

आई..

खरच देवाचे रुप...

कोवळ्या जिवाची धडकन. ... कसा जगेल जीव तिच्या शिवाय?

जी आई आहे. जिला आईपण आले...तिच समजेल हे नर्कातले जगणे.. त्या कोवळ्या जीवनाने आई असण्याचे स्वर्गच पाहीले नाही, त्यला काय समजनार की , नर्कातच जगतोय..

मी बोलते आहे डे बोर्डिंग फॉर प्री-प्रायमरी स्कूल ...हो....प्रायमरी स्कूल and प्री-प्रायमरी स्कूल . (LKG and UKG , पहिली ते चौथी पर्यंत )

1. त्याला कसे समजेल रात्रीचे आईच्या कुशीत निवांत झोपणे.

2. त्याला कसे समजेल मन मोकळे करणे.

3. त्याला कसे समजेल मायेचा हात.

विषय: 
शब्दखुणा: 

प्रतीकं

Submitted by Abuva on 20 February, 2024 - 23:35
Google Gemini generated image of Indian woman with mangalsutra

माझा सुट्टीचा दिवस होता. सकाळच्या दूरच्या रपेटीनंतर भरपेट जेवण झालेलं. डोळ्यावर झोप अनावर झालेली. मी आडवा होणार तोच बायको उत्साहात कुठला तरी फोटो मोबाईलमध्ये दाखवत आली.
"काल मी गाडगीळांकडे गेले होते ना तिथे मला परफेक्ट कानातलं मिळालं आहे. माझ्या हिऱ्यांच्या पेंडंटला परफेक्ट मॅचिंग आहे."

विषय: 

चित्रावरून कथा: गुलमोहोर..

Submitted by छन्दिफन्दि on 14 February, 2024 - 14:10

कित्येक वर्षानी या एरियात आलोच आहोत तर सहज नजर टाकू या, म्हणून ती कॉलेजशी डोकावली.
पूर्ण एरिया सारखीच कॉलेजनेही कात टाकली होती. दोन मजल्यांची साधीशी बैठी इमारत जावून कित्येक मजली उंच चकाचक टोलेजंग लिफ्टवांली इमारत झाली होती, आण्टीचा चहाचा stall, वडापावची गाडी काहीच ओळखीचं दिसत नव्हतं.. अपवाद फक्त ..
एकमेव तो बहरलेला गुलमोहोर आणि त्याखाली तसाच, तिथेच असलेला तो बाक.
हळूच हसत त्या बाकावर हलकेच टेकेपर्यंत मन विजेच्या वेगाने गेलं होत पार २५ वर्ष मागे..

विषय: 
शब्दखुणा: 

कॉर्पोरेट पद्मिनी

Submitted by Abuva on 13 February, 2024 - 23:21
Padmini By Raja Ravi Varma -

उपसुंद आठवतोय?! त्याच्या प्राॅडक्टचा वार्षिक रिलीज होता.
हो, हा प्री-क्लाऊड काळ होता. तेंव्हा असायचे असे ठरवून केलेले रिलीजेस. आणि आमच्यासारख्या एंटरप्राइज प्राॅडक्टचे तर नक्कीच असायचे.
तसे अजून दोन महिने होते त्याला. पण सगळे कस्टमर नव्या व्हर्जनवर आणायचे तर व्यवस्थित प्लॅनिंग लागायचं. (बोअर मारतोय? साॅरी.)

विषय: 

अहोऽऽ मुंबईत रिक्षा चालत नाहीत

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 February, 2024 - 14:03

अहोऽऽ मुंबईत रिक्षा चालत नाहीत
(संदर्भ - मायबोलीवरील चर्चा. (शोधा पुन्हा कधीतरी))

आज माझे आजोबा जिवंत असते तर तब्बल १२० वर्षांचे असते. त्यांचे बालपण मुंबईतच गेले. थोडक्यात मुंबईकर म्हणून आमचा किमान शंभर वर्षांचा ईतिहास आहे असे म्हणू शकतो Happy

विषय: 
शब्दखुणा: 

एक व्यक्ती अशी …

Submitted by काव्यधुंद on 13 February, 2024 - 01:26

एक व्यक्ती अशी भेटली पाहिजे, जिच्या स्पंदने अंतरीची कळावी
मनाचा मनाशी संवाद व्हावा, हृदयातली तार तेथे जुळावी

एक व्यक्ती अशी भेटली पाहिजे, जिला भेटता दुःख सारे सरावे
निसर्गा वसंती जसा गंध येतो, तसे चित्त उत्फुल्ल अलवार व्हावे

एक व्यक्ती अशी भेटली पाहिजे, जिची ओढ काळास व्यापून टाके
जिला भेटण्याने तमाच्या जिव्हारी, प्रभा लालिम्याची क्षणार्धात फाके

एक व्यक्ती अशी भेटली पाहिजे, जिने फक्त देताच आधार थोडा
संपून जाईल आकांत सारा, विसावा सुखे जीव घेईल वेडा

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर