पुस्तक

शेरलॉक होम्स

Submitted by निंबुडा on 9 April, 2010 - 05:26

हल्ली हल्लीच "शेरलॉक होम्स" या पुस्तकाचा (लेखक - Sir Arthur Conan Doyle) पहिला व्हॉल्यूम वाचून संपवला आहे. दुसरा वाचते आहे. आत्ता पर्यंत शेरलॉक होम्स हे पात्र (character या अर्थाने) नुसते ऐकून माहिती होते. मनोगतावर शेरलॉक होम्स च्या अनुवादीत कथा वाचून मूळ कथा वाचायचा मोह झाला. मित्राकडून दोन्ही भाग मिळाल्या मिळाल्या त्यावर तुटून पडले आणि शेरलॉक होम्स ची अशी काही मोहिनी पडली की त्यातून अजून बाहेर पडलेले नाहीये.

विषय: 
शब्दखुणा: 

वाचनाची आवड अशीही!!!!!!!!!!!

Submitted by हर्ट on 7 April, 2010 - 11:35

या बीबीचा उद्देश -- वाचन, साहित्य कशाला म्हणतात याची जराही जाण नसताना -- काहीच्या काही वाचन करणारे वाचक नक्की काय वाचतात त्याबद्दल इथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 

पुस्तक परिचय : उदगीरचा इतिहास

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

माझ्या वडिल व्यवसायाने सर्जन. व्यवसायाव्यतिरीक्त प्रचंड वाचन आणि अधुन मधुन लिखाण.
महाराष्ट्र टाईम्स, सुधारक इ. मधुन त्यांचे लेख येत असतात. त्यांची काही पुस्तके पण प्रकशित झाली आहेत.

पहिले पुस्तक हे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी होते. (Surgery for Undergraduate Students)
दुसरे पुस्तक हे हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या आठवणी वर आधारीत होते, त्यांनी फक्त संपादित केले.
मागच्या वर्षी 'राष्ट्र आणि राष्ट्रवाद' हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्याला राज्यशासनाच्या २००९ च्या उत्कृष्ठ वाडग्मय निर्मितीचा पुरस्कार पण मिळाला. ह्या पुस्तका बद्दल नंतर कधीतरी लिहीन.

प्रकार: 

इंडिया आफ्टर गांधी - रामचंद्र गुहा

Submitted by टवणे सर on 26 March, 2010 - 05:55

आपल्या अनेकांच्या मनात इतिहास म्हटले की पंधरा ऑगस्टला वर जाणारा भारताचा तिरंगा आणि खाली उतरणारा युनिअन जॅक (वजा फाळणी) हाच शेवट डोळ्यासमोर येतो. याला कारण आपल्या इतिहासाच्या पुस्तकात इतिहास इथेच संपतो. इथून पुढे सुरु होते ते नागरिकशास्त्र आणि ते जणू काही इतिहासाशी काहीच संबंध नसल्यासारखे शिकवले जाते. इंडिया आफ्टर गांधी ह्या ७५० पानी (अधिक १००-१५० पाने संदर्भसूची आणि तळटीपा) ग्रंथात रामचंद्र गुहांनी नेमक्या ह्याच काळाच्या (१५ ऑगस्टपासून पुढच्या) इतिहासाचा परामर्ष घेतला आहे.

विषय: 

पाचट - श्री. योगीराज बागूल

Submitted by चिनूक्स on 22 March, 2010 - 00:21

बलुती संपली आणि नगर-बीड जिल्ह्यांतला मोठा दलित समाज ऊसतोडणीच्या कामाला लागला. या वर्गाला शिक्षणाचा गंध नव्हता. गाठीशी जमिनी नव्हत्या. असल्या तरी त्या बहुतेक निकस. पोट कसं भरायचं हा मोठाच प्रश्न उभा राहिला. अशातच सहकारी चळवळ उदयास आली. सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सहकारी पतपेढ्या भराभर स्थापन झाल्या. हे सहकारी साखर कारखाने चालवण्यासाठी दारिद्र्यात खितपत असलेला, हाताला कामाची आणि पोटाला भाकरीची गरज आहे, अशा कामगाराची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे अनायासेच साखर कारखान्याच्या अगदी पायरीतल्या कामात, म्हणजे ऊसतोडीत हा साराच्या सारा समाज अलगद ओढला गेला.

विषय: 

पुस्तक परिचयः आपले मराठी अलंकार..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

'भारद्वाज प्रकाशन' माझ्या वडिलांचं असूनही आणि पुस्तकांबद्दल प्रचंड ओढ असूनही - प्रत्यक्ष 'प्रकाशनाच्या' कामात माझा आजवर फारसा हातभार नव्हता. पण 'काहीतरी वेगळं करावसं वाटतंय' ह्या विचारानी जेव्हा मी अस्वस्थ व्हायला लागले, तेव्हा 'आता प्रकाशनाच्या कामाची जबाबदारी आपण स्वीकारायची' असं ठरवलं.
हे क्षेत्र माझ्यासाठी खूपच नवीन आहे...पण लहानपणापासून परीक्षेला, कोणत्या स्पर्धेला जायला निघालं की बाबा सांगायचे "लढ बाप्पू...जा आणि बिनधास्त batting करून ये...आगे जो होगा देखा जायेगा".
हे प्रकाशनाचं काम हातात घेतलंय ते ही 'लढ बाप्पू..." या शब्दांच्या आधारावरच Happy

प्रकार: 

लॉराचे ' लिटल हाऊस '

Submitted by शर्मिला फडके on 21 February, 2010 - 10:11

लहानपणी शाळेत असताना मे महिन्यातल्या उन्हाळी सुट्ट्यांच्या एका दुपारी माझ्या हातात लॉरा इन्गाल्स वाईल्डरच्या 'लिटल हाऊस' या आठ पुस्तकांच्या मालिकेतील कोणतेतरी मधलेच एक पुस्तक पडले. तेही अनुवादित. अंबादास अग्निहोत्री नावाच्या लेखकाने केलेला तो 'वसंत फार दूर नाही..' या नावाचा अनुवाद होता. अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातल्या एका शेतकरी इन्गाल्स कुटुंबातील लॉरा ही दोन नंबरची मुलगी असते आणि तिचे व तिच्या आनंदी, हसर्‍या कुटुंबाचे तिथल्या खडतर हिवाळ्यात, अनेक संकटांशी सामना करत केलेल्या प्रवासाचे, प्रवासातल्या मुक्कामांचे, वर्णन त्यात होते.

विहंग प्रकाशन - प्रशस्तीपत्र

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी मायबोली.कॉमशी व्यावसायिक संबंध जुळले आणि त्यानुसार आमच्या विहंग प्रकाशन संस्थेची पुस्तकं या वेबसाईटवरून उपलब्ध झाली. मराठी पुस्तकांची सर्वप्रथम ऑनलाईन विक्री करण्याचं श्रेय बहुधा याच वेबसाईटकडे जातं.

प्रकार: 

लेखन प्रकल्पासाठी सहभागाचे आवाहन

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

Dear Friends,
I am embarking on a new literary project. This is a Marathi book with "20*20" as the title. Apart from the usual 20/20 or 6/6 perfect vision or "India 2020" vision, the title is so because I am going to compile 20 stellar profiles of young budding Marathi administrators along with 20 implementable and practical ideas collected from Marathi folks for betterment of India. Hence the name of the book is "20*20".

प्रकार: 

नववर्षाची (पुस्तक) भेट!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आज दिनेशदादांनी नवीन वर्षाची भेट म्हणुन भारतातुन चार पुस्तके पाठवली:

१) बारोमास- सदानंद देशमुख
२) आम्ही सारे अर्जुन- व. पु. काळे
३) निवडणुक जिंकण्यासाठी सर्व काही! (राजहंस प्रकाशन, पुणे)
४) स्व..देश! (ग्रंथाली प्रकाशन)

अन हो, एक कालनिर्णय देखील पाठवलेय! Happy

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - पुस्तक